गोष्ट एका Marriage certificate ची

Submitted by Shrik on 9 March, 2010 - 01:14

सरकारी कार्यालयातून चहापाणी न पाजता एखादं काम करुन घेण्यासाठी किती जोडे झिजवावे लागतात याचा अनुभव तुमच्यापैकी बर्‍याच जणांना आला असेलच. माझ्या मित्राचा असाच एक अनुभव मांडत आहे...

हि 'यशोगाथा' माझ्या मित्राच्या Marriage certificate ची...त्याने ज्या चिकाटीने ते मिळवलं त्यामुळे मी या गोष्टीला 'यशोगाथा' म्हटलं, केवढी सहनशक्ती लागते हो त्यासाठी!

त्याचं नाव सुजित .. एका आय.टी. कंपनी मध्ये नोकरी असूनही मी Marriage certificate बनवण्यासाठी agent पकडणार नाही किंवा पैसे चारणार नाही हा त्याचा हट्ट.

Office मध्ये दुपारची shift असल्यामुळे हा सकाळी ११.०० च्या नंतर महानगरपालिकेच्या कार्यालयात गेला. कागद्पत्रे सर्व होती, अडचण फक्त एकच... लग्न लावणारे भटजी याला विवाहबंधनात अडकवुन स्वतः मात्र या जगातून मुक्त झाले होते.
पहिल्या काही दिवसात form सकट सर्व कागदपत्रे पुरवल्यानंतरही तुमचे अमूक-तमूक कागदपत्र नाहीये तर ते आणून द्या असे सांगण्यात आले होते. महपालिकेत कागदपत्रे घेउन जाणे हा त्याचा "दीन"क्रम झाला होता. एखादं कागदपत्रं दिल्यानंतर हा स्वतःच विचारायचा, "उद्या काय घेउन येऊ ?"... असो..शेवटी त्या अधिकार्‍याने गरजेची असलेली-नसलेली सगळी कागदपत्रं सांगून झाल्यावर याला तंगवण्यासाठी form वर नजर टाकली आणि दिसलं की भटजींची सही आणि संबंधीत कागदपत्रं नाहीयेत.

अधिकारी (आसूरी आनंद झालेला)- भटजींची सही, फोटो, निवासस्थानाचा दाखला घेऊन या..

मित्र: लग्नं लावणारे गुरुजी ह्यात नाहीत आता.

अधिकारी (अधीकच आसूरी आनंद झालेला)- चालणार नाही, गुरुजींची सही आणि संबंधीत कागदपत्रं लागतीलच.

या जाचाला कंटाळलेल्या मित्राच्या मनात, यालाच गुरुजींची सही घ्यायला पाठवावं असा विचार नक्किच आला असणार, पण सुसंस्कृत आणि मुख्यत्वे मध्यमवर्गीय नुकताच लग्नं झालेला माणूस असल्याने त्याने तो मनातच दाबला असावा.
महापालिकेचे फेरे मारून आता ५-६ महिने उलटले होते. शेवटी हा वरिष्ठ अधिकार्‍याकडे गेला.

वरिष्ठ अधिकारी (निर्लज्जपणे): अहो आणा तुम्ही कुठल्याही गुरुजींची सही, काय बिघडतंय.

मित्र : सॉरी साहेब, पण मी बेइमानीचे धंदे करत नाही.

वरिष्ठ अधिकारी : मग त्याशिवाय certificate बनणार नाही.

मित्र : ठिक आहे, मग तुम्ही मला एका कगदावर लिहुन द्या, कि लग्न लावणारे गुरुजी expire झाले असतील तर Marriage certificate मिळणार नाही, मला वर्तमानपत्रात द्यायचं आहे.

वर्तमानपत्राचं नाव ऐकून अधिकारी जर बिचकला, हे प्रकरण काही साधं नाही हे समजुन त्याने फॉर्म वर काहीतरी खरडपट्टी केली आणि witness identification साठी तारिख दिली.

मित्र : ह्या तारखेला नाही जमणार साहेब, दुसरी तारीख द्याल का प्लीज?

अधिकारी : का बरं? काय प्रॉब्लेम आहे?

मित्र : ह्या तारखेला माझी पत्नी hospital मध्ये असेल, तिची due date आहे. शेवटी तुम्ही ही वेळ आणलीतच माझ्यावर! Birth certificate बनवायची वेळ येईल आता तरी माझ्या हातात Marriage certificate दिलं नाहीत तुम्ही..

गेंड्याची चामडी असलेल्या अधिकार्‍यामध्ये थोडी तरी शरम बाकी असावी म्हणून त्याने मित्राला दुसर्‍या दिवशी बोलवलं आणि पटापट सगळी कामं करून त्याचं Marriage certificate बनवून दिलं.

आपल्या चिकाटी मुळे चांगलाच प्रसिद्ध झालेल्या मित्राला थोड्या दिवसांनी हा अधिकारी बाजारात भेटला.

अधिकारी : काय साहेब आज इकडे? खरेदी करताय?

मित्र: हो साहेब, नवीन चप्पल घेतोय....आता Birth certificate बनवायचं आहे..वर्षभर तरी चालतील अशा घेतो.

अधिकारी खाली मान घालून निघून गेला.

गुलमोहर: 

सही आहे. आवडलं.

नवीन चप्पल घेतोय....आता Birth certificate बनवायचं आहे..वर्षभर तरी चालतील अशा घेतो.>>>:फिदी:

अहो आपलीच चामडी जाड करायला हवी. यांची जन्मजात असतेच. या देशात एक वेळ लाच न खाता जगता येईल पण लाच न देता जगता येईल याची खात्री नाही. हे शब्द माझे नाहीत एका हायकोर्ट जज चे आहेत. हे सुधरणार नाहीत आणि सिस्टीम सुध्दा नाही. पैसे द्यावे लागले तर वाईट वाटुन घेऊ नका. तुम्ही आम्ही जग बद्लु शकत नाही, मग स्विकारा आहे तसे.

नवीन चप्पल घेतोय....आता Birth certificate बनवायचं आहे..वर्षभर तरी चालतील अशा घेतो.>>>> तुमच्या मित्राच्या उत्तरावर हसायला आलं पण अशा काम न करणार्‍या लोकांचा राग आला. न केलेल्या कामाचा पगार कसा घेववतो?
तुम्ही आम्ही जग बद्लु शकत नाही >>>>>> असं प्रत्येकवेळी कसं चालेल नितीन? सुजितला जमलच नां.

नमस्कार,
माझ्या माबो वरच्या पहील्या कथेला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.
आजकाल आपल्याला वेळ नसतो म्हणुन आपण shortcut मारतो..आणि कोण त्या फेर्‍या मारत बसेल असा विचार करतो. तसं नाही केलं तर अर्थातच नुकसान आपलच असतं, office मधून सुट्ट्या तरी मिळणार आहेत का तेवढ्या? ज्याला शक्य आहे त्याने करावं नाहीतर agent आहेच.

परवा माझ्या बहीणीला post office मधून passport दिल्याबद्दल पैसे मागीतले, म्हणाले साहेबांना खुश करा जरा. तिने सडेतोड उत्तर दिलं,"त्यांना खुश करायला नोकरी गेली का त्यांची?" आणि सरळ passport घेउन निघुन आली.

तुमच्या मित्राचे चिकाटीबद्दल अभिनंदन!
मला स्वतःला मात्र लग्नाचा दाखला आणि मुलाच्या जन्माचा दाखला सहज मिळाला. (जादा पैसे न देता, २ र्‍या फेरीला मिळाला.) मला वाटते, कागदपत्र अपूर्ण असतील तर फावते सरकारी लोकांचे.

अश्विनी , चांगली गोष्ट आहे. यांची भूक ठिकाणानुसार बदलते, मुम्बई मध्ये agent 2000 घेतो तर कल्याण मध्ये ३००० ते ३५००... कारण हेच की मुम्बई मध्ये applications जास्त येत असणार.

>>>> सरकारी कार्यालयातून चहापाणी न पाजता एखादं काम करुन घेण्यासाठी <<<<
हे अर्धसत्य! कारण खाजगी आस्थापनान्मध्ये सुद्धा टक्केवारी अस्तेच अस्ते!
बाकी गोष्ट बरीचशी अतिरन्जित वाटते! पण असो.
माझ्या घरात, माझ्या जाणतेपणीच्या हयातीत दोन लग्ने, दोन मृत्यु, तिन जन्म झाले, त्यान्ची डेथ वा बर्थ वा म्यारेज सर्टिफिकेट्स आणायला जाताना मला वा लिम्बीला कसलाही त्रास झाला नाही. ही गोष्ट मी पुणे व पिम्परीचिन्चवड महापालिकेची सान्गतो आहे!

विवाह नोंदणीच्या वेळी घडलेला किस्सा...

माझ्या कॉलेज मधिल २ आणि शाळेतील एका मित्रांचे लग्न दोन-तिन महिन्याच्या अंतरात पार पडले होते... त्यामुळे सगळेच जण एक मेकाला विटनेस राहू या उद्देशाने एकत्र फॉर्म भरून एकाच दिवशी ओल्ड कस्टम हाऊसला विवाह नोंदणी साठी गेलो होतो... त्यातिल एका मित्राने २ विटनेसच्या जागी एका विटनेस मधे सासर्‍याची सही आधीच घेतली होती... विटनेसला रजिट्रार समोर पण सही करावि लागते हे त्याच्या गावीसुद्धा नव्हते... मित्राचे सासरे हापिसात.... आता झाली ना पंचाईत...

शेवटी एक मित्रच दुसर्‍या मित्राच्या मदतीला धावून येतो... दुसर्‍या मित्राने तिथे जातीचा दाखला काढायला आलेल्या एका वयस्कर व्यक्तीला झाला प्रकार सांगितला आणि तुम्हाला १०० रु. देतो पण रजिट्रार समोर मुलीचे वडील बनून सही करा अशी गळ घातली... तो बिच्चारा बिचकत बिचकत मुलीचा बाप बनून सही करायला रजिस्ट्रार समोर उभा राहिला... हा सगळा उपद्व्याप मित्राच्या बायकोच्या नकळत सुरू होता... आपल्या वडिलांच्या नावाखाली सही करणारा हा इसम कोण हे लक्षात न आल्याने मित्रांची बायको बिथरली... "अहो हे कोण?" म्हणून तिने नवर्‍यावर डोळे वटारले... Uhoh

झाला प्रकार रजिस्ट्रारच्या लगेच लक्षात आला आणि त्याने सगळ्यांची चांगलीच कानउघडणी केली... मात्र मॅरेज सर्टफिकेट वेळेवर मिळाले... Happy

limbutimbu, नशिबवान आहात.. अजून एक गंमत जळगाव महपालिके मध्ये पेढ्यांचा box मागतात..

>>>>>> अजून एक गंमत जळगाव महपालिके मध्ये पेढ्यांचा box मागतात..
मग द्यायचा की! Wink
आम्ही तर इकडे सर्टिफिकीट न देता देखिल लाडू-पेढे-बर्फी मागतो! Proud
(अर्थात त्या त्या आयडी बरोबर सन्वादातून तेवढीच जवळीक झालेली असेल तरच Happy नैतर लफड होत! )

मी अश्विनीशी सहमत आहे..मलाही लग्नाचा दाखला २ र्‍या फेरीला मिळाला..ओल्ड कस्टम हाऊसला ..

@Shri@... छान लिहिल आहात तुम्हि..पु.ले.शु..

नवीन चप्पल घेतोय....आता Birth certificate बनवायचं आहे..वर्षभर तरी चालतील अशा घेतो...
श्रिक ...धिस मेक्स द डीफ्रन्स !! नाईस

>>>> पु.ले.शु.. चा fullform सांगाल का प्लीज..
पुढील लेखनासाठी शुभेच्छा Happy
नविन आहात काय? तुमचे स्वागत Happy

धन्यवाद limbutimbu.... अरे तुरे केलत तरी चालेल..तुमच्या ID शी जवळीक (मैत्री) झाली कि मी तुम्हाला पेढे, बर्फी मागू शकेन, तुम्ही म्हणाल्यप्रमाणे...

चांगला मांडलाय अनुभव

पण मलाही लग्नाचा दाखला नी लेकीच्या जन्माचा दाखला विनासायास आणि एकही पैसा न चारता मिळाला. म्हणजे चांगले अधिकारीही आहेत नक्की Happy

कविता, नक्कीच आहेत्...पण दुर्दैवाने कमी प्रमाणात... माझा passport सुद्धा पोलिस verification नंतर कोणालाही पैसे न चारता मिळालेला.

मित्र : सॉरी साहेब, पण मी बेइमानीचे धंदे करत नाही.
>> माफ करा, पण दुसर्‍या गुरुजींची सही आणणं ह्यात काही बेईमानी आहे हे मला पटत नाही.
लग्न केलेल्या मुलीबरोबरचाच लग्नाचा दाखला मागताय ना - मग गुरुजींनी काय फरक पडतो!
गुरुजींची सही ही कायदेशीर बाब आहे फक्त आणि "कायदा आणि नैतिकता" ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याची गल्लत केली तर मग 'कुणी बघत नाही ना - मग गैरव्यवहार केलेला चालतो' असं होतं.
म्हणूनच ह्यातला फरक स्वतःला स्पष्ट पणे माहित असणं महत्त्वाचं (म्हणजे मग "योग्य तेच" वागण्याची जबाबदारी येते आपल्यावर.)
असो! हे माझं मत झालं! हवं असेल तर घ्या, नाहीतर सोडून द्या

नानबा ,
मग गुरुजींनी काय फरक पडतो!>>>>>
तुमचं मत मला घ्यायला काहीच हरकत नाही, पण जो माणूस (मित्र) या गोष्टी साठी ६ महीन्या नंतर ही फेर्‍या मारायाला तयार असतो तो ज्या गुरूजींनी लग्न लावलंच नाही त्यांची सही कशी आणेल? ही झाली नैतिकता..

माझ्या एका मित्रानं आग्र्याला लग्न केलं.... दोन वर्षांपूर्वी....
नोकरी बंगलोरची.... बायको लखनौची....मित्र पुण्याचा....
तेव्हा मॅरेज सर्टिफिकेट घ्यायचा कंटाळा केला.....

आता दोन वर्षांनी ज्या भटजीनं लग्न लावलं, ज्या ठिकाणी लग्न लागलं त्यांच्या सह्या/ शिक्के वगैरे मिळवण्यासाठी 'फार खटपट-लटपट करायला लागेल उगाच!' म्हणून साहेबांनी पुण्यात रजिस्टर्ड लग्न केले. नवरा बायको दोघंही नट्टून थट्टून आले होते....आणि बाकी मित्रमंडळी ह्या पुनर्विवाहाचे साक्षीदार! त्यात तेव्हा पुण्यात स्वाईन फ्ल्यू च्या साथीने थैमान घातले होते. मग काय! वधू-वरांसकट सगळी मंडळी मास्क लावून वावरत होती! तशाच सह्या केल्या व फोटोही काढून घेतले! Biggrin

तुमच्या ह्या किश्शानं ती आठवण ताजी केली. पु.ले.शु. Happy

Pages