कथा

दे कॉल मी इ. झेड - शेवट

Submitted by कौतुक शिरोडकर on 4 February, 2010 - 05:00

सुरुवात - http://www.maayboli.com/node/13598
मध्य - http://www.maayboli.com/node/13766

३१ जानेवारी २०१०
खान अल खलीली बाजार, कैरो, इजिप्त
सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी
कॉफी हाऊस

वेटरने कॉफीचे दोन मग समोर ठेवले.
"शिशा ?" त्याने विचारलं. दोघांनी नकारार्थी मान डोलावली.
"बोल." समोरच्या मगातील अरेबिक कॉफी ढवळत प्रिन्सने विचारलं.

गुलमोहर: 

दे कॉल मी इ. झेड - भाग २

Submitted by कौतुक शिरोडकर on 1 February, 2010 - 13:45

पहिला भाग - http://www.maayboli.com/node/13598

१८ मार्च २०१५
राजीव गांधी मेमोरियल हॉस्पिटल, अंधेरी, मुंबई, भारत
दुपारी १२ वाजून २७ मिनिटांनी
व्हिडियो कॉन्फरेंस रुम

गुलमोहर: 

प्रार्थना

Submitted by सिद्धार्थ राजहंस on 1 February, 2010 - 02:56

देवा आज मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलणार आहे. मी, माझे आयुष्य, त्यातील शक्यता, माझी स्वप्ने, माझे विचार, माझ्यातील दडुन बसलेली भीती, माझे अस्तित्व आणि मी जे जे काही करु शकतो ते सगळे काही.
देवा...
कुठुन सुरुवात करु.... तुझ्याशी बोलायचे म्हणजे काहीतरी मागण्यापसुनच सुरुवात करतो...
अ...ह....हा!!
देवा या हिवाळ्यात रोज सकाळी माझी गाडी वेळेत सुरु होऊदे.
देवा मंदीनंतर मला चांगली नोकरी किंवा पगारवाढ मिळुदे.
देवा सगळ्यांचे कल्याण होऊदे.
आणि... खरं काहीतरी सांगू का???
म्हणजे....
देवा मी फटाके वाजवत असताना बाकीचे जगही फटाके वाजवु देत, म्हणजे मला त्रास होणार नाही.

गुलमोहर: 

द्रौपदी

Submitted by क्रांति on 28 January, 2010 - 21:45

ती कोण, कुठली, कुणाची काहीच ठाउक नाही. तिचं मी माझ्यापुरतं ठेवलेलं नाव द्रौपदी. तेही तिच्या अवतारावरून. तिच्या अंगावर एक नेसूची साडी असते आणि तीन ते चार साड्या पोटावर बांधलेल्या. त्याशिवाय सोबत असलेल्या कापडी पिशवीत दोन-तीन साड्या असतात. साध्याच जुनेर झालेल्या, विटलेल्या, रंग उडालेल्या त्या साड्या ही तिची दौलत!

गुलमोहर: 

थोडी शांतता

Submitted by नविना on 28 January, 2010 - 14:28

एअरपोर्ट वरून सरळ धावत पळत हॉस्पिटल मध्ये पोचली सुजाता पण ICU च्या दाराशी पोचेपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता की ती पाहू शकते की नाही काकूला शेवटचं. बँगलोर वरून फ्लाइट निघालं तेव्हा पासूनच तिच्या डोक्यात एकच होतं माझी काकू, माझ्या आई नंतर जिने मला आईची कमतरता भासू दिली नव्हती, ती पण आईसारखीच मला सोडून जाते आहे. पूर्ण फ्लाईट ती काकूचाच विचार करत होती. तरी बरं अगदी ऐनवेळेला शोधून सुद्धा कधीही न मिळणारं ईंडिगो चं डायरेक्ट फ्लाईटचं तिकीट मिळालं होतं. बाकी सगळं नवर्‍यावर सोपवून ती अगदी धावतपळत निघाली. तोही जाणून होताच तिचं काकू प्रेम. १.३० तासाचा प्रवास पण खरंतर तिला नको वाटत होता.

गुलमोहर: 

नसतानां ही स्पर्श तुझा गं

Submitted by mona_somkuwar on 27 January, 2010 - 12:39

नसतानां ही स्पर्श तुझा गं, जेव्हा छेळून जातो
परत पुन्हा त्या स्मरणानी, हळूच ओलावा येतो....

लक्षात येत, तुला बघाया, कसाबसा मी व्हायचो
आणि समोर येता तु, मात्र लपून बसायचो....

नजरभेट होता वेळी, मन दडपडून बसायचं
तु गेल्यावरही मात्र, ते तुझ्याशीच बोलायचं....

दूर तुला जाऊ बघतानां, येई डोळ्यात पाणी
आणि काही बोलण्याआधि, येई कंठ दाटुनी....

वाट तुझी गं बघता बघता, वाटांवरही त्या झालाय काळोख
तुला जवळ मी जपता जपता, विसरून गेलो माझी ओळख....

राहूनी गेले तुझ सागांया, शब्द जे माझ्या मनी
ठाऊक नाही होईल का गं, भेट या जीवनी....

गुलमोहर: 

इन्व्हाइट

Submitted by साजिरा on 25 January, 2010 - 06:47

गाडीच्या खाली काहीतरी मोठा आवाज आला, आणि तो दचकला. भान येऊन त्याने समोर पाहिलं. डावीकडे सरळ जाणारा रस्ता, आणि उजवीकडे पुढल्या मोठ्या चौकात न थांबता सरळ निघून जाण्यासाठी नव्यानेच तयार झालेला फ्लायओव्हर. या दोघांच्या मध्ये लख्ख पिवळ्या रंगात रंगवलेले दगड. सुरुवातीला छोटे, मग मोठे होत जाणारे. मग त्यानंतर रीतसर लोखंडाचे रेलिंग.

गुलमोहर: 

दे कॉल मी इ. झेड

Submitted by कौतुक शिरोडकर on 24 January, 2010 - 23:42

२६ डिसेंबर २००९
लंडन, यु.के.
रात्री ८ वाजुन ३२ मिनिटांनी
अँ. एल्डरसन यांनी संपादीत केलेली बातमी, चीफ रिपोर्टर, डेली टेलिग्राफ (संक्षिप्त स्वरुपात)

रात्री साडेआठ वाजता डेल्टा एअरबस ए ३३० एम्स्टरडॅमवरून डेट्रोइटच्या प्रवासाला निघाली. एखादा फुगा फुटावा वा फटाका फुटावा तसा जोरदार आवाज कॅबिनमधून घोंगावला. काहीनी प्रकाशझोत पाहीला तर काहीना वास आला. काहींनी तर उमर फारुक अब्दुल मुतल्लब या एका बसलेल्या तरुण पुरुष प्रवाश्यातून ज्वाला निघताना पाहील्या. ते काही ठराविक प्रवासी सोडले तर आपलं आयुष्य धोक्यात आहे याची त्या अकरा 'क्रु'ना व बर्‍याचशा प्रवाशांना माहीतीही नव्हती.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा