कथा

नातं

Submitted by saakshi on 13 December, 2009 - 05:22

तो. smart, handsome, stylish..... अशी सगळी विशेषणं एकामागून एक आठवावीत त्याला पाहिल्यानंतर असा. नाव आकाश... त्याचं मित्रमंडळ दांडगं.... मैत्रिणीमंडळ तर त्याहून मोठं. पोरी जीव टाकायच्या त्याच्यासाठी... पण हा पठ्ठ्या म्हणायचा "छे! अरे ती मुलगी मला अजून भेटलीच नाही. जिला बघून असं वाटेल की YES! हीच ती....."

गुलमोहर: 

मैत्री

Submitted by सुमेधा आदवडे on 13 December, 2009 - 03:06

"शैलु, चल आम्ही निघतोय आता. खुप रात्र झालीये. तू थोडा वेळ पड इथे.आणि हो, जास्त विचार करत बसु नकोस.
आता आदित्य "आऊट ऑफ डेंजर" आहे, डॉक्टर म्हणालेत ना. ४-५ दिवसात घरी पण येईल बघ तो." वोकहार्ड्ट हॉस्पीटलच्या आय.सीय़ु बाहेर रुना शैलजाच्या जवळ बसुन तिला समजावत होती. ती जे काही बोलत होती ते शैलजाला कळतंय याची आता तिला खात्री वाटत होती. नाहीतर काही तासांपुर्वी तिला कशाचंही भान नव्हतं.

गुलमोहर: 

आमची शोधपत्रकारिता!

Submitted by झुलेलाल on 9 December, 2009 - 07:40

कुणाचं बोलणं चोरून ऐकण्याची आणि ते दुसर्‍यापर्यंत विनाविलंब पोहोचवायची आमची सवय तशी फार जुनीच. म्हणजे इतकी जुनी, की, आम्ही बातमीदार होणार असं भविष्य आमच्या पिताश्रींनी खूप लहानपणीच- म्हणजे `आमच्या' लहानपणी- वर्तवलं होतं. आज आम्हाला हे सांगण्यास आनंद होतो, याचं कारण, पाळण्यातले पाय पाहून भविष्य वर्तवण्याचे शास्त्र अलीकडे लोप पावत असताना, असे शास्त्र खरोखरच अस्तित्वात होते, याचा ठोस पुरावा आमच्या रूपानेच आमच्या हाती आहे. बातमीदाराने (पक्षी- रिपोर्टराने) पुरावा हाती असल्याखेरीज बातमी `डिस्क्लोज' करू नये, असं पत्रकारितेच्या वर्गात शिकवलं जातं असं म्हणतात. म्हणून हा पुरावा..

गुलमोहर: 

३ मिनिटाचा टॉक टाईम

Submitted by पल्ली जुनी on 8 December, 2009 - 03:47

ह्या आधी प्रकाशित झालेला लेख ह्या ठिकाणी http://www.maayboli.com/node/1971

'हॅलो...हॅलो....प्लीज...!'
'हॅलो, कोण बोलतंय्...लाईन स्पष्ट नाहीये. मोठ्यान बोला....'
'हॅलो, समीर्...राजा मी बोलतेय रे. ऐक ना जरा....देवा....'
'हॅलो, कोणीच बोलत नाहीये...कोण आहे?'
'देवा, काय रे हे? तीनच मिनिटाचा टॉक टाईम. त्यात आवाजच पोचत नाहीये माझा त्याच्या पर्यंत. टॉक टाईम वाढवा ना...वाढवता कसा येत नाही...मला किती बोलायचंय समीरशी....'
'अरे कोण रडतंय पलिकडे...कोण आहे?'
'समीर, मी आहे रे तुझी सुमा..........'
'सुमे........'
'माझा आवाज पोचला तुझ्यापर्यंत. थँक्स देवा...'

गुलमोहर: 

नितांत (संपुर्ण)

Submitted by चिन्गुडी on 7 December, 2009 - 06:15

मित्र मंडळीनो, जरा गंभीर लिखाणाचा पहीलाचं प्रयत्न आहे.. कदाचित काही चुका झाल्या असण्याची शक्यता आहे.. सांभाळुन घ्या.. अपेक्षा आहे तुम्हाला आवडेल... काही सुचना असतील तर नक्की कळवा.
कथा जरा मोठ्ठी असल्याने संथ वाटु शकते पण सर्व बारकावे मला नमुद करावेसे वाटत आहेत म्हणुन हा सगळा खटाटोप.. सगळे भाग लवकर लवकर पोस्ट करेनच.. अभिप्राय जरुर कळवा..

*****************************************************

आजची संध्याकाळ खुपचं हुरहुर लावणारी जाणार होती याची प्रियाला कल्पना आली होती..पण प्रेमात पडलं की असचं होणार...

गुलमोहर: 

न शमणारी तहान!!!

Submitted by sas on 7 December, 2009 - 03:08

रात्री १० चा सुमार, घरात नेहमीची शांतता व्यापली होती. रमाच्या खोलीतला आणि घराच्या मुख्य दारा जवळचा दिवा सोडला तर ईतर सर्व खोल्यातले दिवे बंद असल्याने घरात अंधार होता. खीडकीत बसुन ती आकाशात संथ संथ पावलांनी झळकणार्‍या चंद्राला निहाळत होती. रात्री टिपुर चांदण्यांनि लुकलुकणार आकाश आणि त्यात झळकणारा चंद्र पहाण तीला नेहमी सारखा आनंद देत होत पण आज त्या आनंदात जराशी ऊदासी होती. चंद्र चांदण्यांनी लुकलुकणार्‍या रात्रीत मंद मंद वाहणार्‍या शीतल वार्‍याचा स्पर्श तीला शीतल भासत नव्हता.

गुलमोहर: 

चारी मुंड्या चितपट

Submitted by यशवन्त नवले on 4 December, 2009 - 10:25

चारी मुंडया चितपट
कोल्हापुरच्या एस.टी. स्टँड वर उतरलो तेंव्हा सकाळचे दहा वाजले होते. प्रवासाने सगळं अंग कस आंबून गेलं होत. देवीच्या दर्शनाला जायच तर ते सर्वसामान्य भक्ता प्रमाणे एस.टी. च्या लाल डब्यातूनच जायचे हा हट्ट. या हट्टा पायी स्वारगेट वरून ड्रायव्हरला गाडी घेऊन परत पाठविला. आता त्याचा पश्चाताप होत होता. एस.टी.स्टँड च्या बाहेर रस्त्यावर येऊन चोहिकडे नजर फिरवली. जवळपास एकही रिक्शा दिसली नाही. हातात ताज्या हिरव्यागार भाजीची पिशवी घेऊन जाणार्‍या एका ईसमास हटकले ..

" ओ ~~ भाऊ ! ईथं रिक्शा स्टँड कुठं आहे ? "

गुलमोहर: 

पडझड

Submitted by Girish Kulkarni on 3 December, 2009 - 23:41

*****************************************************
****************************************************

रस्त्यावरुन जाणारी ती बायी कसल्यातरी घाईत असावी. मध्यम उंची, तीक्ष्ण नाक, साडी ओंगाबोंगा झालेली...केंस विखुरलेले..मात्र त्यातही ती आकर्षक दिसत होती. तिनं हातातली पर्स चक्क ओढून पकडल्यासारखी धरलेली...पण तिच कशाकडेच फारस लक्ष नव्हत. ती आणखी झपाझप चालायला लागली. तीच सगळ लक्ष सारख मागेच जात होत... त्याच्याकडे.. तो अजुनही मागेच येतोय का म्हणून. तिला अजुनही पाचेक मिनीटे तरी चालाव लागणार होतं... स्टेशनपर्यंत.

गुलमोहर: 

फुटकळ

Submitted by टवणे सर on 28 November, 2009 - 11:30

पुढे अनेक वर्षांनी उंचावरुन जेव्हा त्याने शरीर खाली ढकलले तेव्हा त्याच्या ढुंगणाला जसा गार वारा लागला तसाच गार वारा आत्ता त्याच्या चेह‍र्याला लागत होता. कॉलेजच्या मुख्य इमारतीमागच्या हिरवळीवर त्याच्या आणि तिच्या सारखी अनेक युगुले पहुडलेली होती. त्याआधीच्या चार वर्षाच्या इंजिनीअरींगमध्ये एकाही मुलीने ढुंकुनही बघितले नसल्याने तो अश्या पहुडलेल्या युगुलांकडे तुच्छ कटाक्ष टाकून मनात चरफडत फिरत असे. सध्या मात्र इतर जगाची आपल्याला पर्वा नाही अश्या आविर्भावात तो हिरवळीवर मांडीवर डोके ठेवून पहुडला होता. समाजाच्या रुढी-रिती ह्या त्याच्या प्रक्षोभांचे इंधन होत्या.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा