कथा
रस्ता
'स्त्री' मासिकाच्या जून-२०११च्या अंकात ही कथा प्रकाशित झाली.
---------------------------
॥ १ ॥
मांडीवर गपगार झोपलेल्या वैजूला दमयंतीनं हळूच खाली ठेवलं आणि ती पळत बाहेर आली. कल्पना तिची वाट बघत अंगणात उभीच होती. पायरीवर ठेवलेली शंकरकाकांची किटली दमयंतीनं उचलली, आत बघून आईला "कल्पी आलीऽऽ, मी जातेऽऽ..." असं सांगितलं आणि दोघी चालायला लागल्या.
वैजू आज रोजच्यापेक्षा जरा उशीरानंच झोपली. त्यामुळे कधी एकदा तिला गाढ झोप लागतीए आणि कधी आपण बाहेर पडतोय असं दमयंतीला झालं होतं.
माझी कलाकारी !
एकदा माझ्या डोक्यात एखादं पिल्लू शिरलं ना! की मला गप्प बसवत नाही, आणि हे महान कार्य त्यादिवशी पार पाडलं ते घरात आणलेल्या कापसाने. त्याचं असं झालं की घरात वाती वळायला आणलेल्या कापसाभोवती एक अर्धवट टरकावलेला लेख होता तो मी वाचला. हो ! असलं पुडीवरचं साहीत्य वाचायची मला जुनी खोड आहे. तर, त्या लेखाचा मतितार्थ इतकाच की `प्रत्येकाने आपल्यातल्या सुप्त कलाकाराला वाव करुन दिलाच पाहीजे'. बस्सSS इथे माझ्या सदा उत्साही मेंदुने उचल खाल्ली, आणि मी माझ्यात दडलेल्या त्या सुप्त कलाकाराला शोधायला सुरुवात केली.
भेट...
एक प्लान ..... खुनाचा
"हॅलो ?"
"कोण ? शिरोडकर का ?"
"बोलतोय."
"माधव... माधव जोशी"
"मा..ध..व....?"
"मी माबोकर आहे. आपली तशी वैयक्तीक ओळख नाही"
"अच्छा... बोला."
"तुमच्या कथा वाचल्यात मी. जवळजवळ सगळ्याच. मला तुमची लेखनशैली फार आवडते."
"थँक्स." (हरभर्याच्या झाडावर चढत असलेली बाहुली)
"फॅन आहे मी तुमचा. कस काय जमतं तुम्हाला इतकं बारिक सारीक डिटेल्ससह लिहायला ?"
"अहो, ते गुपित आहे. कधी भेटलो की सांगेन तुम्हाला."
"मग भेटूयाच. तसं एक महत्त्वाचं काम पण आहे माझं तुमच्याकडे. परवा मी मुंबईत असेन. अंधेरी येथे. भेटता येईल का ? "
"परवा.. ? हो, हरकत नाही. भेटू."
हाऊसकीपर भाग २
भाग १
http://www.maayboli.com/node/12090
क्रमशः .....
विमानतळावर विशाखा, मन्दार, हर्षू सगळेच आले होते. विशाखाने आईला धावत येऊन मिठी मारली. " आई.........तू अशी एकटी........तेही जॉब करायला इथे इंग्लंडला येशील........वाटलंच नव्हतं गं! आम्ही बोलावतोय इतके दिवस तर कधी जमलंच नाही तुम्हाला.........पण आई तू चांगला डिसिजन घेतलास. करू देत बाबांना घर मॅनेज......आणि आता विनितलाही चांगली किंमत कळेल आईची."
विशाखाची अखंड बडबड चालू होती. जावई नातूही आनंदी चेहेर्याने अवती भवती बागडत होते.
हाऊसकीपर भाग १
आज लंडनहून पाहुणे यायचे होते. नीरज नमिताचे लंडन परिसरात रहाणारे मित्र मैत्रिणी.........!
प्रिये तुझ्याचसाठी ..
मंडळी, तुम्ही कधी प्रेमात पडलाय का हो? असाल तर सुरूवातीचे दिवस आठवा.. हो तेच दिवस जेव्हा ती/तो आपल्याकरता super hero च्या वरताण असतो.. हो हो, तेच दिवस - जेव्हा चंद्र, सूर्य, तारे, वारे असे शब्द आलेल्या सगळ्या कविता आपल्याला 'आपल्यासाठीच लिहिलेल्या' वगैरे वाटत असतात, तेच दिवस जेव्हा तिचं उशिरा येणं पण आपल्याला भलतंच गोSSSड वाटत असतं..तेच दिवस... अरेच्या! इथेच जास्त पाल्हाळ लावला तर मुळ कथा राहूनच जायची की! असो! तर थोडक्यात काय, असल्या नव्यानव्या - रोमँटीक का काय म्हणतात ना तसल्या दिवसातली ही गोष्ट.
वादा
वादा
``मि. गोरे“ ?
``यस डॉक्टर !“
``या बसा नां“ डॉ. संघवी म्हणाले. डॉ. संघवी हे विख्यात न्युरोलॉजीस्ट होते व मुंबईत एका मोठ्ठया हॉस्पीटलमधील आपल्या कन्सल्टींग रुममध्ये बसले होते.
``मि. गोरे, तुम्ही लकी आहात. तुम्हाला प्रमिलाताईंसारख्या बाई पत्नी म्हणून मिळाल्या. मी त्यांना एक चांगल्या सोशलवर्कर म्हणून ओळखतो. त्यांच्या आदिवासींच्या काही कँपमध्ये मी ही भाग घेतला होता. परवाच आपले आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री बबनरावांचा फोन होता ... अं - पाणी हवयं !“
``नको. थँक्स !“
रेशीमधागे (जुन्या मायबोलीवरून)
खोलीच्या खिडकीतून सूर्यकिरणं डोळ्यांवर आली तशी मला जाग आली.त्रासिक चेहेर्यानंच मी डोळ्यांवर आडवा हात धरला.काल रात्री उशिरा झोप लागल्यानं आज जास्त वेळ झोपायचा बेत होत खरा,पण आता कसली झोप लागणार?
शेजारी झोपलेल्या नवर्याकडे बघून मला नेहेमीसारखंच आश्चर्य वाटलं. ऊन चेहेर्यावर येऊ दे,नाहीतर कानाशी ढोल वाजू दे,याला कसं काही होत नाही? मुलं लहान असतानाही रात्री कामावरून उशिरा आलेला विशाल सकाळी त्यांच्या किलबिलीनं हसतच जागा होत असे. कधी चिडचिड नाही की वैतागणं नाही. त्याच्या सुखी माणसाच्या सदर्याचं मला सदैव नवल वाटायचं.