कथा

वन्ही

Submitted by रैना on 21 January, 2010 - 06:09

कजरारी अखियाँ रह गयी रोती
नथली से टुटा मोती रे.. (पारंपारिक)

"राधिका आप असाईनमेंट कर लिये हो का?" असं त्यांनी घाम पुसत पुसत खुर्चीत टेकता टेकता त्यांच्या नेहमीच्या खास बिहारी शैलीत विचारलं.

गुलमोहर: 

आता तुझी पाळी

Submitted by जागोमोहनप्यारे on 19 January, 2010 - 08:34

'चला, कणकवली. कणकवलीवाले उतरून घ्या. गाडी दहा मिनिटे थांबेल.'
कंडक्टरच्या आवाजाने तंद्रीतून जागा झालो. घड्याळ पाहिलं-दुपारचे दोन. हात वर करुन एक आळस दिला.
अजून चार तासात कोल्हापूर. तिथून सांगली दोन तास. तिथून औदुंबरला जायला असा किती वेळ लागतो? अंग घामाने भिजलेले होते. कपडे तसेच चिंब भिजून अंगाला चिकटलेले. आधीच कोकण्-त्यात मार्च महिना- त्यातच हा लांबवरचा प्रवास्-दोडामार्ग ते कोल्हापूर- अंगभर घामाचे झरे पाझरणार, नाही तर काय होणार?

गुलमोहर: 

तो गेला पण तीला अश्रु देवून

Submitted by nameajay on 17 January, 2010 - 08:34

निल हा अतीशय साधा, सरळ आणि हूशार मुलगा होता, पण निसर्गाने असा काही खेळ केला की ना त्याला आईची माया मिळाली ना वडीलांची तो जन्मताच त्याचे आई आणि एका अपघातात वारले त्यामुळे तो तीच्या मावशीकडे वाढला. व मावशीनेही त्याला आई वडीलांची कमी भासू दीली नाही. वयाच्या १७व्या वर्षी अपघात झाल्यामुळे त्याचा एक पाय अधु झाला,तरीही काही तरी करुन दाखवण्याच्या उम्मेदीने त्याने काँलेजला प्रवेश घेतला खरा पण तेथे टिकु शकला नाही कारण सर्वच त्याची पांगळ्या लंगड्या म्हनुन थट्टा मस्करी करीत,

गुलमोहर: 

प्रवासी

Submitted by टवणे सर on 17 January, 2010 - 02:26

हिरवेकच्च टपोरे झाडदेखील भेसूर राखाडी दाखवणार्‍या संध्याकाळच्या अंधार्‍या प्रकाशात तो त्या विस्तीर्ण माळावर थकून खाली बसला. दूर नजर पोहोचेल तिथवर खुरटी काटेरी झुडुपे आणि सगळीकडून थुलथुलीत सुटलेल्या भोंगळ बाईप्रमाणे दिसणारे मातीचे उंचवटे पसरले होते. थोड्याच वेळापूर्वी डोक्यावर ऊन बडवत असताना लागलेली जबर तहान खोल गाढ विहिरीत आवाज विरुन जावा त्याप्रमाणे लुप्त झाली होती. भुकेने तर कधीचीच साथ सोडून दिलेली होती. रोजच्या रोज पोटभर अन्न मिळालेल्या आतड्यातल्या पेशींनी पहिले काही दिवस थयथयाट केला व त्या थयथयटालादेखील बधत नाही म्हटल्यावर पोटातील अवयवांनाच भक्ष बनवून काही दिवस काढले.

गुलमोहर: 

"मानसी!!" (रेईको लॉजः भाग २)

Submitted by ऋयाम on 15 January, 2010 - 08:54

"रेईको लॉज"चा पुढचा भाग.

(पहिला भाग इथे आहे: - http://www.maayboli.com/node/13049 )

"...अशी वेळ आयुष्यात कधी येते का कोणाच्या?", अमित विचारात पडला होता..
लहानपणी ऐकलं होतं, 'कोकणात आजीनं तिच्या तरुणपणी असंच काही भुत पहिलेलं ती सांगायची....'
तेव्हा वाटायचं, "सगळ्या थापा आहेत... "
"तेव्हा दिवे नसायचे.. अंधारात काहीतरी सावल्या पाहुन लोकं घाबरायची, झालं...
खरोखर थोडीच काही असतं??"

पण आज? आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं... सारंच अतर्क्य...
ती 'हेल्पर बाई'.... ती आलीच नव्हती.... मग आपल्याला भेटली ती?
नकळत अमितने करकचुन ब्रेक लावला.... नशीब मागे दुसरी कुठली गाडी नव्हती..

गुलमोहर: 

मृगजळ

Submitted by Girish Kulkarni on 11 January, 2010 - 01:43

****************************************************
****************************************************

नमस्कार मंडळी...मी या कथेचा सुत्रधार्...कथा कसली चांगल्या तीन कथा सांगणारय -एकमेकांशी नात सांगणार्‍या....एकाच सुत्रात गुंतलेल्या......समाजाच्या तीन वेगळ्या थरात अन वेगळ्या जाणीवांच्या पसार्‍यात घडत असलेल्या या वास्तविका आहेत.......सुरुवात कुठुन करायची हा विचार करत होतो......मला वाटत गौतमपासन सुरुवात करुया.....

**********************************************
:१:

गुलमोहर: 

चिखलफेक

Submitted by तुषार जोशी on 9 January, 2010 - 23:14

हसून हसून तिची पुरेवाट झाली होती. चिखलात पडलेल्या अरविंदाची अवस्था पाहून ते स्वाभाविकही होते.
खरी गम्मत त्या दोघांना पाहणाऱ्यांची झाली होती. लोकांना दिसत होते दोन काळया कुट्ट चिखलाने
माखलेल्या आकृत्या. निशाचे हसणे अजुनही थांबलेले नव्हते. खरे तर ती काय कमी माखलेली नव्हती.

गुलमोहर: 

विनोदी कथा: स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई !!!

Submitted by निमिष_सोनार on 3 January, 2010 - 23:16

मुंबई. शनिवारची दुपार. मरीन ड्राईव्ह जवळच्या एका कंपनीच्या ऑफिसमध्ये दुपारचे जेवण सुरू होते. रामनाथन यांना जास्त भुक नसल्याने ते फक्त आज इडली सांबार खात होते. कुळकर्णी बाई चपाती भाजी खात होत्या. तर गुप्ताजी हिशेबात मग्न होते. त्यांना जेवायची सवड नव्हती. राजू शिपाई बाहेर बाकड्यावर बसून धूम मचाले हे गाणे ऐकत होता. बॉस विरेंद्र शाह जेवण आटोपून फोनवर काहितरी बोलत होते.

गुलमोहर: 

विश्वास - अविश्वास

Submitted by सुनिल परचुरे on 2 January, 2010 - 04:57

विश्वास - अविश्वास
``काय आजि ? झाल कां जेवण ?``
``हो, मगाशीच. मी तर काही रात्री जेवत नाही. ह्यांनी थोडासा भात खाल्ला. तुमच झाल कां?"
``अहो किति वेळा मी सांगितल की मला अहो जाहो करु नका म्हणून``.
`` बर .आत तर या. आजच सकाळी आमच्यात बोलण झाल की ह्या टुरचा हा शेवटचा दिवस आहे. तर जेवण झाल्यावर थोडावेळ गप्पा मारायला तुम्हाला, नाही तुला बोलवाव म्हणुन."
``आलोच ह दोन मिनिटात`` अस म्हणून डॉ. आनंद कुलकर्णी आपल्या रुमवर गेले.

गुलमोहर: 

मला भेटलेला कसाब आणि त्याची बुलेट …..!

Submitted by वरुण on 1 January, 2010 - 01:29

मला भेटलेला कसाब आणि त्याची बुलेट …..!

An experience by-

डॉ.वरुण रानडे , चिंचवड, पुणे.

indiafivestar@gmail.com

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा