कथा

निर्णय

Submitted by नितीनचंद्र on 27 February, 2010 - 02:11

आज माझ्या आयुष्यातला बर्‍याच दिवसांनी आलेला आनंदाचा दिवस होता. चक्क माझ्या आवड्त्या गावी सातार्‍याला माझी बदली झाली होती. ती ही प्रमोशन वर रिकव्हरी मॅनेजर म्हणुन. मी तर परत सातार्‍याला बदलीची आशाच सोडली होती. ही माझी पहिली नोकरी. बहुदा मी इथुनच रिटायर्ड होणार. जन्मापासुन मी सातार्‍याला राहिलो होतो. ही पहिली नोकरी वशिल्याशिवाय मिळाली म्हणुन अभिमान होता. हेच कारण मला जागोजागी फिरवेल अस मात्र वाटल नव्हतं.

गुलमोहर: 

कुर्यात सदा दंगलम.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 25 February, 2010 - 07:16

"शुभे... माझा रुमाल कुठे आहे? डबा भरलास का?"

मोजे घालता घालता राजनने स्वयंपाकघराकडे बघत नेहमीची हाक मारली.

"कॉटवरच आहे बघ. तुझं पाकीटही तिथेच आहे आणि लोकलचा पास, घराची चावी सगळे घेतले आहेस ना. मला यायला आज उशीर होइल. आज देशपांडेकाकांकडे जायचे आहे ना. सुबोध वाट बघत बसेल माझी. कॉटवरच ती फुलाफुलांची पिशवी पण काढून ठेवलीय. आज येताना दादरला उतरुन भाजी घेवून ये. आणि हो रानडे रोडवरच्या त्या मोतीवाले बंधूंकडे माझा मोत्याचा सर पॉलीश करायला दिलाय, तेवढा घेवून येशील आज?"

शुभाने स्वयंपाक करता करताच उत्तर दिले.

मोजे घातले, रुमाल आणि पैशाचं पाकीट खिशात टाकलं आणि तो आरशासमोर उभा राहीला.

गुलमोहर: 

फक्त माणूस म्हणून जगायची संधी मला मिळेल कधी?

Submitted by नानबा on 18 February, 2010 - 15:39

गोष्ट तशी जुनी. फारा वर्षांपूर्वीची. जेव्हा भारतवर्षावर सवर्णांचं राज्य होतं. सवर्ण म्हणजे कोण? तर राज्यकारभार बघणारे क्षत्रिय आणि ब्राह्मण. जातीनुरुप समाजरचनेचा काळ होता. स्पृश्यास्पृश्य भेद होते, पण भरडल्या जाणार्‍या घटकालाही जाणीव नव्हती की तो भरडला जातोय! पूर्वसुकृत, प्रारब्ध अशा गोंडस नावाखाली प्रत्येकानं आपलं जगणं बिनभोबाट स्विकारलेलं (किंवा त्यांना स्विकारायला भाग पाडण्यात आलेलं)

गुलमोहर: 

बिलंदर : भाग १

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 February, 2010 - 01:45

पहाटे साधारण साडेसहा-पावणेसातच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस कल्याण स्टेशनावर थांबली. उतरणार्‍या प्रवाशांची घाई सुरू झाली, तशी तिथे दरवाजातच पोटाशी पाय घेवून झोपलेल्या शिर्‍याला जाग आली. जाग आल्याक्षणी आधी त्याने पोटाशी घेतलेली पत्र्याची ट्रंक आणि गळ्यात अडकवलेली शबनम तपासली. दोन्ही वस्तु जागच्या जागी आहेत हे बघितल्यावर शांतपणे एक सुस्कारा सोडत उतरणार्‍यांपैकी एकाला त्याने विचारलं..

"कोणतं स्टेशन आहे हो भाऊ? कल्याण आलं का?"

"कल्याण स्टेशन कल्याणलाच येतं!" उत्तर देणारा बहुदा पुण्याचा असावा.

गुलमोहर: 

अढळपद

Submitted by जागोमोहनप्यारे on 17 February, 2010 - 07:53

************* अढळपद ************

'अहो, जरा माझी धापेची गोळी आणि पाणी देता काय?'

हाक ऐकू आली आणि शांताबाई तंद्रीतून जाग्या झाल्या. 'आले, हं' त्या म्हणाल्या आणि लगबगीने सावरून उठून बसल्या. नाकाच्या शेंड्यापर्यंत ओघळलेला चश्मा त्यानी व्यवस्थीत डोळ्यावर सरकवला. मांडीवरचं पुस्तक त्यानी बाजूला ठेवलं.

पाणी आणि गोळी घेऊन त्या शामरावांच्या जवळ गेल्या. आलेली खोकल्याची उबळ तशीच दाबून शामरावानी गोळी घेतली. धापेचा पंप तोंडात धरून त्याचे दोन स्प्रे घेतले. थोडं बरं वाटताच हाश हुश करत ते म्हणाले, ' काय करत होता आत?'

गुलमोहर: 

भुल

Submitted by नितीनचंद्र on 16 February, 2010 - 00:18

अहमदनगरच्या एस.टी. स्टॅड वर औरंगाबाद -पुणे एशियाड थांबली. रात्रीचे सात वाजले होते. माझ्या शेजारची एक सीट रिकामी झाली. मी जरा आळोखे पिळोखे देत बसच्या दरवाज्याकडे पहात होतो. साधारण तीन तास पुण्याला पोचायला रात्री जेवण, हॉटेलमध्ये मुक्काम, मग उद्यापासुन पुढ्चा प्रवास. उद्या परवा पुण्याचे क्लायंट्स मग परत औरंगाबाद माझ्या मनाशी आखणी चालली होती. बसच्या दरवाज्यातुन एक स्त्री आत येत होती. मी तीला पाहिले मात्र, माझ्या काळजाचा ठोका चुकला. श्वसनाची गती वाढली. बरोब्बर पंचवीस वर्षानी स्मिता मला दिसत होती. तिच्या चेहेर्‍यावरचे भाव शुष्क होते, वाढत्या वयाचा पोक्तपणा दिसत होता.

गुलमोहर: 

वेडा

Submitted by नितीनचंद्र on 14 February, 2010 - 11:29

तो मुळचा कुठला, त्याच खर नाव काय गावात कुणालाच माहित नव्ह्त. आमच्या शंभर उंबर्‍यांच्या गावात हे शोधायाची आवश्यकता कधी कुणाला वाटली नाही. कुणी विचारलही असेल त्याला, पण तो माणसांच्या दुनियेत रहाणारा नव्ह्ता. भुक लागली की कुणाच्याही दरवाज्यात येऊन म्हणे " माय खायला दे " मग याला नाहीतर त्याला ज्याला लक्षात येई तो खायला वाढी. देवळाच्या ओसरीवर रात्री स्वारी आडवी होई. दिवाळी शिमग्याला कोणी देईल ते कपडे अंगावर चढवी. कायम अर्धी चड्डी आणि साधारण कोपरी सारखा सदरा हा त्याचा वेष. इतक असुन रोज अंघोळ मात्र नेमाने करी. वेडा माणसांशी फारसा बोलत नसे. पण मुके प्राणी त्याच्या आवडीचा विषय.

गुलमोहर: 

रानबाचा वारस

Submitted by नितीनचंद्र on 12 February, 2010 - 23:16

मी सांगीतलेले काम करायला रानबा पुढे कामाला लागेल असे वाटले किंबहुना बिघडेल हे मनात आलेच नव्ह्ते. रानबाचा रोजचा परिपाठ बिनातक्रार काम पुर्ण करण्याचा होता. दिलेले काम काळजीपुर्वक करुन त्याचा रिपोर्ट दिल्याशिवाय रानबा घरी जात नव्ह्ता. मी त्ये करनार नाय हा त्याचा आजचा पवित्रा मला अगदी नवीन होता. माझ्या सवयीप्रमाणे मी दबाव टाकताच रानबा "तुमी मला वंगाळ काम देता म्हणुन माझ वाटुळ झाल" म्हणुन धाय मोकलुन रडु लागला. खाजगी उद्योगात सुपरवायझरची आज्ञा टाळणे म्हणजे त्याचा घोर अपमान. त्यातुन रानबा साधा हेल्पर. हा माझ्या आदेशाची वासलात लावत असेल तर उद्या माझे कोण ऐकणार याविचाराने मी संतापलो होतो.

गुलमोहर: 

तिच्या हाताचे हाड .....!!

Submitted by Kiran.. on 12 February, 2010 - 22:54

हे बघ गड्या, गडबड नाय पायजे. कुनी बगितलं म्हंजी आपुन कामतून गेलू समज."

"नाय गडबड नाय हुनार. म्या डोळ्यानी बगितलय. मुसलमानाची बायकूच गेली. आन ती पोटूशी व्हती."

"लई ब्येस. आता त्वांड वाईच गप ठिवायचं. कुणाला कसला शकबी नाय आला पायजे.. काय ? " राम्याच्या या प्रश्नावर म्हाद्याने मान डोलावली. हल्ली रोज ते एकत्र दिसत. गावाबाहेरच्या माळावर तासनतास बसलेले असत. कधीकधी काळे कपडे घातलेल्या बाबांबरोबर दिसत असत. गाव म्हणत होते दोघे अघोर पंथाच्या नादाला लागलेत !!

गुलमोहर: 

ती

Submitted by बिपिन कार्यकर्ते on 12 February, 2010 - 15:37

अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा