आज माझ्या आयुष्यातला बर्याच दिवसांनी आलेला आनंदाचा दिवस होता. चक्क माझ्या आवड्त्या गावी सातार्याला माझी बदली झाली होती. ती ही प्रमोशन वर रिकव्हरी मॅनेजर म्हणुन. मी तर परत सातार्याला बदलीची आशाच सोडली होती. ही माझी पहिली नोकरी. बहुदा मी इथुनच रिटायर्ड होणार. जन्मापासुन मी सातार्याला राहिलो होतो. ही पहिली नोकरी वशिल्याशिवाय मिळाली म्हणुन अभिमान होता. हेच कारण मला जागोजागी फिरवेल अस मात्र वाटल नव्हतं.
मी सातार्यात लहानाचा मोठा झालो, पुढे सातारा सहकारी बँकेत नोकरीला लागलो. बँक नुकतीच शेड्युल बॅंक झालेली. सातारा, सांगली, कोल्हापुर आणि पुणे जिल्ह्यात मिळुन जवळपास २२ शाखांच जाळ बॅंकेने निर्माण केल होत. बॅंकेची मॅनेजमेंट मोठीच हिमतीची त्यात ग्लोबलाय्झेशनच वार वाहु लागल. रिझर्व बँक छोट्या मोठ्या सहकारी बॅंकांच्या फारशी किंमत न देता मोठ्या खाजगी बॅंकांच्या व नाईलाजाने फार मोठ्या सहकारी व शेड्युल हा दर्जा असलेल्या बॅंकांच्या बाजुने धोरण आखणार असा होरा होता. याच मुळे मॅनेजमेंट आपला पसारा वाढवायच्या उपक्रमात वेगवेगळ्या गोष्टी करत होती. यात एक गोष्ट आजारी सहकारी बँका ताब्यात घेण्याची होती.
कल्याण सहकारी बँक आमच्या बँकेने ताब्यात घेतली मात्र तेथुन आमची साडेसाती सुरु झाली ती कधी संपलीच नाही. दर तीन वर्षानी बदली. पहिली बदली कल्याणला झाली. कल्याण, डोंबिवली, ठाणे येथील नऊ शाखा असलेली बँक ताब्यात आली. माझी बदली कल्याणला झाली कारण मी वशिल्याशिवाय लागलेलो. बाकीचे सर्व प्रोबेशनर्स कुठ्ल्यातरी डायरेक्टर च्या वशिल्याने लागलेले. फक्त माझीच बदली झाली. मला ही आपत्ती वाटली. फुटक तळ, सातारी कंदी पेढे, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड याशिवाय समोरच नव्याने रहायला आलेली ती सगळ सोडुन कल्याणला याव लागल.
तशी माझी काही प्रॉपर्टी नव्ह्ती सातार्याला. पण जवळ जवळ तेवीस वर्षे तेथे राहील्याने ते सोडवत नव्हते. सावंतांच्या वाड्यात आम्ही रहात होतो. सावंतांचा मुलगा सचिन, मी प्रसाद सोनार, राजेश ताम्हाणे घट्ट मित्र. एकमेकांच्या घरात, त्यांच्या पै पाहुण्यात, नातेवाईकात परिचीत. पोहायला जाणे, कमी वयात मोठ्यांचा सिनेमा पहाणे. ताम्हाणे काकांची सिगारेट लांबवुन गावाबाहेर ओढ्णे यात कोणीच कमी जास्त नव्हते. सचिन आणि राजेश यांना सातार्यालाच नोकर्या मिळाल्या. मला बाहेरगावी जावे लागले.
कल्याण, डोंबिवली, ठाणे इथे डायरेक्टर स्वतः व त्यांचे नातेवाईक यांच्या नातेवाईक यांना बरेच कर्जवाटप झाले होते. कुलकर्णीसाहेबांची सुध्दा कल्याणला बदली झाली होती. त्यांच्या मार्गदर्शानाखाली आमची टीम वसुलीच्या कामात तरबेज झाली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बदली एक आपत्ती ही भावना संपुन बदली ही एक इष्टापत्ती अशी मनोधारणा कुलकर्णीसाहेबांमुळे तयार झाली. मी व कुलकर्णीसाहेब यांचा डबा एकाच खानावळीतुन यायचा. मी या जेवणावर नाखुश होतो. जेवण फारच जळजळीत आहे ही माझी तक्रार होती. कुलकर्णीसाहेबांनी याव पर्याय म्हणुन मला जेवल्यावर केळी खायची सवय लावली. त्यांचा एक साधा सिध्दांत होता. जर परिस्थीती बदलता येत नसेल तर तीच परिस्थीती सुसह्य कशी होईल ते पहावे.
कुलकर्णीसाहेबांनी शिकवलेले सिध्दांत आचरणात आणत मी नोकरी करत राहीलो. यामुळे माझी प्रगतीच झाली. कोणतेही काम मी टाळत नसल्याने जवळ जवळ बँकेच्या सर्व कामकाजाची माहिती होत वेळोवेळी प्रमोशन झाली. मला जाणवले की मी माझ्याबरोबर बँकेत नोकरीला लागलेल्यांच्या पेक्षा सर्वात पुढे आहे. कल्याणहुन डोंबिवली व पुढे ठाणा अश्या बदल्या होत मी जवळ जवळ मुंबईकर झालो. वडील रिटार्यड झाले मग भाड्याचे सातार्याचे घर सोडुन ते पण माझ्या बदलीच्या गावी आईसोबत येऊन राहु लागले. माझे लग्न देखील मुंबईच्या मुलीशी झाल्याने माझा सातार्याचा संपर्क तुट्ला.
बदली कुठे हवी आहे याबाबत पर्याय मला विचारले गेले नव्हते. बहुदा याचे सातार्याला धरदार असावे असे समजुन मला बदली दिली गेली. सातार्याला बदली हे स्वप्नातदेखील पाहिले नसल्याने मला काय करु अन काय नको असे झाले. काही मिनीटांनी मी जेव्हा या आनंदातुन बाहेर आलो तेव्हा वास्तवाची जाणीव झाली. डोंबिवलीतला मी फ्लॅट घेतला होता. तो भाड्याने आमच्यात बँकेतल्या बाहेरगावाहुन आलेल्यांना देता आला असता. पण सातार्यात व्यवस्था करणे आवश्यक होते. महत्वाचे म्हणजे आई, वडील व पत्नी यांना देखील हे आवडेल की नाही याची कल्पना ऑफिसमध्ये करणे शक्य नव्हते.
घरात पाऊल टाकले ते मनाशी ठरवुनच जर माझ्याशिवाय बाकीच्यांना नको वाटले तर बदली रद्द करुन घ्यायची. पण झाले उलटेच, माझी बदलीच्या गावी जायची कल्पना सगळ्यांना आवडली. सुप्रिया माझी पत्नी जन्मापासुन मुंबईकर, मला वाट्ल ती तरी नाखुश असेल. ती म्हणाली जर तुम्हाला सातारा येव्हड आवडत असेल तर जाऊ तिकडे. मला पाचगणी महाबळेश्वर खुप आवडत. मनाला येईल तेव्हा तीथे जाता येईल. ही पण गोष्ट अगदी मनासारखी घडल्याने सातार्याचीच स्वप्ने रंगवित मी झोपलो.
सातार्याला मी रुजु झालो. सावंतांनी आता वाडा पाडुन फ्लॅट विकसीत केले होते. त्यांच्या नावावर दोन फ्लॅट होते. एका मोठ्या फ्लॅटमध्ये सचिन रहात होता. दुसरा जणु माझ्यासाठीच रिकामा होता. नुसता विषय मी काढायचा आवकाश सचिनने किल्या माझ्या़कडे दिल्या. मग पुन्हा मी, सचिन व राजेश यांच्या गप्पा रंगु लागल्या.ऑफिसचे काम मार्गी लागले. एकंदरीत सर्व काही छान जमले.
रिकव्हरी विभागात आल्या आल्या मी जरुरी व अत्यंत तातडीच्या कामात पहिले महिनाभर वेळ घालवला. त्यानंतर मात्र मी जुन्या केसेस बाहेर काढण्याचे ठरविले. सर्वात जुनी फाईल मी पाहिली. ती होती आमच्याच शाळेच्या शिक्षकांची. त्यांनी दहा वर्षांपुर्वी वैयक्तिक कर्ज घेतले होते. याच्या जामिनदारांना नोटीसा देऊन उपयोग नव्हता. हे जामिनदार एकतर रिटायर्ड होते किंवा ते गाव सोडुन गेल्याने त्यांचा पत्ता लागत नव्हता. स्वत: कर्जदार बँकेला गुंगारा देत होते. त्यांचा पगार आमच्या बँकेतुन होत नव्हता. शाळा कर्जवसुलीस कायदेशीर कारवाईशिवाय सहकार्य देत नव्हती. एकदा वसुलीची ऑर्डर सहकार न्यायालयाकडुन मिळाली पण त्यावर या शिक्षकाने स्टे मिळवला.
आधीच्या सहकार्याच्या रिपोर्टवरुन हा कर्जदार मोठा डांबरट वाटत होता. व्याजासकट जवळ जवळ एक लाखाच्या आसपास ही रक्कम निघत होती. मी पत्र पाठ्वुन त्यांना बॅंकेत भेटीसाठी बोलावले. जेव्हा मी त्यांना पाहिले, जुनी गोष्ट आठ्वली. कर्जदार म्हणजे पिंगळेसर आम्हाला समाजशिक्षणाच्या तासाला येत. जवळच्या गावांमध्ये समाजसेवा शिबीर भरवुन गावाची स्वछता करणे. त्यांना आरोग्य विषयक माहिती देणे यासारखे उपक्रम सर आम्हा नववी - दहावी च्या विद्यार्थी यांच्याकडुन करुन घेत.
सरांनी मला ओळखले नाही. ती केस आता बंद झाली असुन कर्जदाराला अशाप्रकारे बोलावणे म्हणजे कोर्टाचा अपमान आहे असे त्यांनी भासवले. माझी तर या प्रकाराने बोलती बंद झाली. मला वाटले काही कागद जे या कर्जप्रकरणात फाईल मधे असायला हवे होते ते बहुदा गहाळ असावेत. सर ज्या खात्रीने बोलत होते ते पहाता मला मी त्यांना भेटायला बोलावले हे चुकले की काय असे वाटु लागले. यावरचा खात्रीचा उपाय मी काढ्ला. ताबड्तोब चहा मागवला आणि माझी ओळख आता त्यांचा विद्यार्थी म्हणुन करुन दिली. यावर ते अजुनच भडकले. मला म्हणाले तुला मी विद्यार्थी मानतच नाही. हेच का शिक्षण तुला दिले. शिक्षकाचा अपमान करणे शोभते का तुला ? फार गोंधळ झाला. दिवसभर मी यामुळे बेचैन होतो.
खरतर याप्रकारचा अनुभव मला नविन होता. कर्जदार भेटायला आले तर फार नम्रतेने वागत किंवा भेट टाळत. कोर्टाच्या अवमानाबाबत कोर्टाकडे तक्रार करीन अशी धमकी देणारा हा पहिलाच अनुभव. सर गेल्यावर मी लगेच बँकेच्या वकिलांशी बोललो. ते म्हणाले काही कारणाने हे कर्ज प्रकरण मागे पडले आहे मात्र ही केस कोर्टाने डिसमीस केलेली नाही. मी माहिती घेऊन उद्या बोलेन.
संध्याकाळी जेव्हा सचिन व राजेश भेटले. मी त्यांना पिंगळेसरांबाबत सांगताच दोघे हसायला लागले. सचिन म्हणाला याला म्हणतात सातारी झटका. त्यांनी तुझी दिशाभुल केली. यापुढे तु त्यांना बोलावताना हजार विचार करशील. मी म्हणालो माझा अगदी साधा प्रस्ताव होता तड्जोडीचा. त्यांनी काही व्याज माफ करायला सांगितल असत तर त्याचा प्रस्ताव देता आला असता आमच्या मुख्य ऑफिसला. हे म्हणल्यावर दोघे आणखीच हसायला लागले. प्रसाद हसता हसता राजेश म्हणाला " असला प्रस्ताव ज्यांना खरोखर कर्ज फेड्ण्याची सवय किंवा इच्छा असते त्यांच्या साठी ठिक आहे. पिंगळेसरांना कर्ज फेड्ण्याची सवय किंवा इच्छा दोन्हीही नाही. त्यांनी आजवर अनेकांचे हात उसने घेतलेले पैसे बुडवले आहेत. अनेक कर्ज बुडविली आहेत. त्यात कुणी मागे लागले तर असा झटका ते देतात की कर्ज वसुली अधिकारी परत नादाला लागत नाही."
तुला आठ्वते का प्रसाद ? सचिन म्हणाला आपण नववीत असताना २६ जानेवारी शुक्रवारी, आणखी कसलीतरी सुट्टी शनिवारी आणि रविवार या तिन दिवसांचे समाजसेवा शिबीर पिंगळेसरांनी ठरवले. आपल्याला खर्चासाठी प्रत्येकी सहा रुपये आणायला सांगीतले होते. प्रत्यक्षात शिबीर एकच दिवस झाले. बाकीचे दोन दिवस शिबीर घ्यायला सरच कंटाळले. मग आपल्या हिशोबाने फक्त दोनच रुपये खर्च झाले. उरलेले चार रुपये सरांनी मार्च मधे देऊ असे सांगुन दिले नाहीत. घरी सगळ्यांच्या आई- वडीलांना वाटु लागले की चार रुपये मुलांनी परस्पर खर्च केले. शेवटी आपण सगळ्यांनी घेराव करुन मागितले तेव्हा सरांनी चार रुपये दिले त्याबरोबर दोन छ्ड्या मारल्या. मी विचारले " ते का ?" मला आठवत नव्हते.
सचिन म्हणाला "तु सुटलास लेका. तेव्हा टाईफाईड ने आजारी होतास. राजेश म्हणाला " आपण चार लोकात मागितले पैसे त्यामुळे त्यांचा अपमान झाला अस सर म्हणाले . यावर राग येऊन त्यांनी प्रत्येकाला दोन दोन छ्ड्या मारल्या.चांगल्या जोरात रे. दोन दिवस वळ गेले नाहीत हातावरचे. "खासा न्याय आहे" मी म्हणालो. "यावर सरांना गुरुदक्षिणा द्यायलाच हवी प्रसाद " राजेश म्हणाला. "बघुया" मी म्हणालो.
दुसर्याच दिवशी आमच्या बँकेच्या वकिलांनी अर्ज करुन कर्ज वसुलीची स्टे ऑर्डर रद्द करुन कर्ज वसुलीची प्रक्रिया पुढे चालु करण्याचा अर्ज जिल्हा सहकार न्यायालयात दाखल केला. याची नोटिस पिंगळेसरांना मिळताच काय प्रतिक्रीया मिळते याची मी वाट पहात होतो. माझ्या अपेक्षेप्रमाणे सर पुन्हा स्वतः येऊन आरडाअओरडा करणार व वाटाघाटी साठी संधी शोधणार अशी होती. चार पाच दिवसांनी वडील मला म्हणाले " काय रे तु म्हणे तुझ्या पिंगळेसरांना बोलावुन त्यांचा बँकेत अपमान केलास ?" मी म्हणालो " बाबा हे तुम्हाला काय माहित ?"
आमच्या पेन्शनर कट्ट्यावर भेटले ना कालच ते बोलले. ते म्हणाले तुला काही बोलु नका. "
मी म्हणालो "पण त्यांनी तुम्हाला कसे काय ओळखले की हेच आपल्या जुन्या विद्यार्थ्याचे वडील ? आपण जवळ जवळ पंधरा वर्षानी सातार्याला परत येतोय. तुमची त्यांची काही जुनी ओळख नाही."
बाबा म्हणाले " ते मला माहित नाही पण फारच दुखावलेत तुझ्या या वागण्याने. आमच्या जवळ बसले होते. सहज बोलता बोलता मी माझे नाव सांगीतले, त्यावर ते म्हणाले तुम्ही प्रसाद चे वडील का ? मी हो म्हणालो आणि आश्चर्यचकितच झालो. मी विचारल हे तुम्ही कस काय ओळखल ? त्यावर ते म्हणाले "प्रत्येक विद्यार्थी माझ्या चांगला लक्षात रहातो त्यातुन मीच तर प्रसादला या बँकेत नोकरी लावणयासाठी त्यावेळच्या संचालकांकडे शब्द टाकला होता. काळाचा महिमा आपली मुलेच आजकाल आई वडीलांना किंमत देत नाहीत. हा तर विद्यार्थी, त्यातुन आता मोठा अधिकारी. माझा विद्यार्थी अशी गुरुदक्षिणा देईल असे वाट्ले नव्ह्ते" असे म्हणुन त्यांनी रुमालने डोळे पुसलेरे प्रसाद. मला फारच वाईट वाट्ले."
मी म्हणालो " बाबा हे सर्व खोटे आहे. तुम्हाला माहित आहे या बँकेत मी मेरीटवर लागलो आहे. दुसरी गोष्ट ते डिफॉल्टर असल्यामुळे हा कांगावा करत आहेत.
ते आजवर कर्जेच काय हात उसने घेतलेले पैसे सुध्दा परत करत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे."
मला सांगा ज्याला खरेच कर्ज फेडायचे आहे तो जेमतेम दोन चार ह्प्ते भरुन ज्या बँकेत पगार आहे ती बँक बदलत नाहीत. अख्या शाळेतील शिक्षक याच बँकेतुन पगार घेतात फक्त पिंगळेसर नाही. जेणेकरुन कर्जाचा ह्प्ता परस्पर कापला जाऊ नये. माझ्या महितीत ते बँकेची ह्प्ता भरण्यासंबंधीची पत्रे पोस्ट्मनला हाताशी धरुन गायब करायचे व पुढे सहकारी कोर्टात मला कर्ज फेडण्याची इच्छा आहे पण कर्जवसुलीची पध्द्त चुकीची आहे. मला बँकेने नकळवताच खट्ला दाखल केला असे प्रतिपादन करुन त्यांनी त्याच्या वरच्या कोर्टाकडुन स्टे ऑर्डर मिळवली.
"बाबा पुढे काय करायच हेच विचारायला मी त्यांना बँकेत बोलावल होत."
वडीलांना हे समजले मग ते म्हणाले" पण तु त्यांचा अपमान करु नकोरे बाबा. या वयात फार जिव्हारी लागतात असे अपमान."
मगाशीच घरात येऊन थांबलेला सचिन हे सर्व ऐकुन म्हणाला. " काका अपमान कुठ्ल्याही वयात जिव्हारीच लागतो. ही त्यांच्या कर्माची फळे आहेत. आमचेच पैसे आम्ही त्यांनी परत देण्यास उशीर केला म्हणुन मागितले यात आमच काय चुकल ? आजही त्यांनी विनाकारण मारलेल्या छड्या आम्हाला आठवतात." सचिन शालेय जीवनतला सर्व इतिहास बाबांना सांगत होता. त्या छ्ड्यांच्या जखमा जणु त्यांच्या ह्रदयावर अजुनही कोरलेल्या होत्या.
आमच्या बँकेचे वकील यावेळेला गाफिल राहीले नाहीत. त्यांनी तांत्रीक चुकांच्या सर्व शक्यता ग्रुहीत धरुन नाकाबंदी केली. शेवट्च्या सुनावणीस पिंगळेसरांनी व त्यांच्या वकिलांनी तड्जोडीचा प्रस्ताव दिला. यात त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते मुद्दल फेड्ण्यास तयार होते पण व्याजापोटी येणारी सर्व रक्कमेची माफी मागत होते. हा प्रस्ताव पुढे येताच माझ्यापुढे अनेक प्रश्न उभे राहीले. पिंगळेसरांचा प्रस्ताव आहे तसा स्विकारुन बँकेचे नुकसान स्विकारणे. त्यांचा प्रस्ताव नाकारुन कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे वसुली करणे. यामधला मार्ग शोधुन बँकेचे हित व पिंगळेसरांचे हित शोधणारा मध्यम मार्ग काढणे. आता निर्णय मला घ्यायचा होता.
छान आहे पण शेवट्चा निर्णय
छान आहे
पण शेवट्चा निर्णय काय होता?
पुढे?
पुढे?
मस्त .कथा आवडली.
मस्त .कथा आवडली.
चांगली आहे कथा..
चांगली आहे कथा..
चांगली आहे कथा..
चांगली आहे कथा..
छान आहे..पण क्रमशः लवकर टाका
छान आहे..पण क्रमशः
लवकर टाका पुढचा भाग...
हो रे नितिन.. खूप मन लावून
हो रे नितिन.. खूप मन लावून वाचली, आवडली आणी शेवट न कळल्यामुळे चुटपुट लागलीये आता..पटकन कळव्..पिंगळे सरांना धडा शिकवला कि नाय????????
एकदम वेगळा विषय.. कथाही छान
एकदम वेगळा विषय.. कथाही छान आहे..
पण शेवट अर्धवट सोडल्यासारखा वाटतोय.. क्रमशः आहे का?
आवडली कथा निर्णय काय घेतला
आवडली कथा
निर्णय काय घेतला शेवटी ते ही येऊ दे.
कथा मस्तच आहे. माझा नवरा ७
कथा मस्तच आहे. माझा नवरा ७ वर्ष वसुली अधिकारी म्हणून काम करत होता, त्यामुळे तर फारच जवळची कथा वाटली. पण वसुली अधिकार्याच्या दु:खाची सह अनुभूती तुला कशी कायआली असावी ह मा प्रश्न पडलाय. एकदम realistic कथा!
शेवटाचे वेगवेगळे पर्याय देऊन खरा शेवट न दिलेलाच बरा. त्या अनेक पर्यायांपैकी काहीही घडलेलं असू शकतं. महत्त्वाचं म्हणजे त्या ‘शिक्षक’ असणार्या व्यक्तीचं हे ‘अशिक्षकी’ वागणं या कथेतून मांडलं जाणं.
मन:पूर्वक पुलेशु
अशाच अनंत कथा तुझ्या हतून लिहिल्या जावोत आणि वाचकांचे दिवस आनंदात जावोत
छान आहे.. पण कथा संपली का ?
छान आहे.. पण कथा संपली का ? की आहे अजून पुढचा भाग?
चांगली आहे कथा, विषय आवडला.
चांगली आहे कथा, विषय आवडला. तुमच्या कथांच्या विषयात खूप वैविध्य आहे. या कथेचा पुढचा भाग यायचाय असे गृहीत धरते, पिंगळेसरांना धडा शिकवला की नाही हे कळायला हवे ना...
छाने कथा निर्णय काय घेतला
छाने कथा
निर्णय काय घेतला ???
छान आहे कथा.. क्रमशः आहे का?
छान आहे कथा.. क्रमशः आहे का? असेल तर पुढील भाग लवकर येऊद्या.
असे बरेच लोक असतात नक्की.....
असे बरेच लोक असतात नक्की..... मग काय केलं शेवटी.....???
कथा चांगली आहे. मला शेवट (?)
कथा चांगली आहे. मला शेवट (?) आवडला. नुतन ला अनुमोदन. निर्णय काय असेल हा प्र्त्येकाने इमॅजिन करावा आपापल्या परीने. असं मला वाटत.
वाचक जन हो, कथा लिहीताना या
वाचक जन हो,
कथा लिहीताना या कथेचा शेवट काय असा प्रश्न कुणी विचारेल असे वाट्ले नव्ह्ते. मला आता ही कथा अशीच इथे संपवी असेच वाट्ते. याच कारण व्यक्तिरेखा कळाव्यात, ज्ञान मिळावे, मनोरंजन व्हावे हेच उद्दीष्ट कथा प्रामुख्याने कथा लिहीताना असते. यापुढे जाऊन कथा माध्यमातुन आपण कुणाला शिक्षा देण म्हणजे सुड घेण येव्ह्डच या कथेच्या संदर्भात वाटत. यामुळे आपल्या प्रतिसादाबाबत धन्यवाद.
नितीन, मस्तच फुलवली आहेस ही
नितीन,
मस्तच फुलवली आहेस ही गोष्ट! फारच छान!
हो, असतात अशी माणस ज्यांना
हो, असतात अशी माणस ज्यांना पैसे घेऊन बुडवताना काहीच वाटत नाही पण आपण मात्र त्यांना मदत करून आपलेच पैसे आपल्यालाच मागायची लाज वाटते.
यापुढे जाऊन कथा माध्यमातुन
यापुढे जाऊन कथा माध्यमातुन आपण कुणाला शिक्षा देण म्हणजे सुड घेण येव्ह्डच या कथेच्या संदर्भात वाटत.
>> याला काय म्हणावे? जो माणुस चुकीचा वागला (नेहेमीच) त्याला सहानुभुती न दाखवणे म्हणजे सुड घेणं कसंकाय? उद्या फाशीची शिक्षा झालेल्या अट्टल गुन्हेगाराचा दयेचा अर्ज फेटाळणार्या न्यायाधीशांना आपण सुडबुद्धीचे म्हणु का?
अजुन एकः कथानायकाला तर फटके खावे लागले नव्हते ना लहानपणी? मग त्याने आत्ता त्यांच्या बेपर्वा वृत्तीवर पांघरुण न घालणे सुडबुद्धीचे कसे?
तुम्ही फारच मृदु हृदयाचे दिसता.