कथा

सारीपाट

Submitted by नितीनचंद्र on 23 March, 2010 - 10:43

काय रे प्रवीण, असा शांत, शांत का ? तुझी एखादी कविता होऊ दे.

प्रवीण, संजय, सुशांत, आणि अविनाश यांची मैफिल जमली होती. अविनाशच्या फार्म हॉऊसवर हे चार मित्र नेहमीच जमायचे. मग सार्वजनिक सुट्टीच्या आधिची रात्र रंगायची कधी वाईन तर कधी बिअरच्या संगतीने. कुणी शास्त्रिय संगिताची मैफिल रेकॉर्ड करुन घेऊन आलेल असायच. तर कोणी नुकताच प्रसिध्द झालेला गाण्यांचा अल्बम आणलेला असायचा.

मग आरामात चर्चा , वाद विवाद रंगायचे. सुशांतच बारीक लक्ष असायच. जर एखादा मित्र गप्प गप्प असेल तर चर्चा कधी कधी वैयक्तिक प्रश्नांवर पोहोचायच्या. मग कोण बरोबर कोण चुक याची चर्चा होऊन मित्रांना सल्ले दिले जायचे.

गुलमोहर: 

सैनिकाच्या गोष्टी - भाग १ [डॉक्टर श्रीधर वसंत कुरलपकर]

Submitted by शरद on 22 March, 2010 - 00:22

श्रीधर वसंत कुरलपकर! सॉरी, डॉक्टर श्रीधर वसंत कुरलपकर उर्फ डॉक्टर. मी त्याला फक्त डॉक्टर म्हणायचो. अत्यंत आनंदी, happy go lucky माणूस. तितकाच बुद्धीमान. आणि मनस्वीसुद्धा. त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. मी भेटलो तेव्हा त्याचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नानंतर महिन्याभरातच त्याचं पोस्टिंग सियाचीन मध्ये झालं होतं. मी सुद्धा तेथेच होतो. पण मी अर्जुन पोस्टवर आणि हा पिंपळ पोस्टवर होता. १९८८ चा जून महिना होता. अजून चांगलं आठवतंय मला. अर्जुन पोस्टचे महत्व कमी झाल्याने आणि पिंपळ पोस्टवरील अधिकार्‍याला अचानक रजेवर जावे लागल्याने माझी रवानगी पिंपळ पोस्टवर झाली होती.

गुलमोहर: 

अर्ध्या तासाचा फरक

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 March, 2010 - 10:38

साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद भवन, कुतुबमिनार, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती!

गुलमोहर: 

शीर्षक आणि शेवट सुचवा !!

Submitted by दिनेश. on 20 March, 2010 - 02:36

वर्षांपूर्वीच तर कॉलेजनंतर पहिल्यांदा भेटलो होतो. मुंबईला ब्रीच कॅंडीजवळच्या आइसक्रीम पार्लरमधे, रात्री दोन वाजता .मला बघितल्याबरोबर ओळखले त्याने. "निशा, काय मस्त फ़ॉर्म टिकवलायस अजून. अजून कॉलेज क्वीन दिसते आहेस. " सुरी ओरडलाच होता.

"अबे, तू पण चिकना दिसतोयस रे, यावेळी फ़िरलास या एरियात, तर एखादी शेठाणी तूला पळवून नेईल, लॉंग ड्राइव्हला." मी म्हणाले.

"वैसे आयडीया बुरा नही यार. तू नेतेस काय ? पण बाकी तू काय शेठाणी दिसत नाहीस. " तो म्हणाला. "काय करतात आपके मिया, निसरीनजी ?"

" अरे तेरेजैसा कोई मिलाही नही. अजून इंतजार करतेय. " मी म्हणाले.

गुलमोहर: 

डोसा

Submitted by हेरंब ओक on 18 March, 2010 - 23:47

भाग-१
http://harkatnay.blogspot.com/2010/03/blog-post_5826.html

पहिल्याच रिंगला मी मोबाईल उचलला आणि थोडंसं वैतागूनच विचारलं.

"अग आहेस कुठे? कधीची वाट बघतोय आम्ही.. पोरं तर बिचारी कंटाळून गेली."
"अरे काय सांगू. क्लायंट मीटिंग एवढी लांबली ना की बस. आणि त्यांना मिटींगमध्ये सांगितलेले चेंजेस आजच्या आज करून हवेत."
"काय आत्ता? तुझ्या साहेबाला घड्याळ कळतं ना?"
"प्लीज रागावू नकोस"
"सॉरी. उगाच चिडलो तुझ्यावर. पण मग आता काय करायचं?"

गुलमोहर: 

रान...

Submitted by विमुक्त on 17 March, 2010 - 00:57

"अरं ये अंत्या! कसली धावपळ चाल्लीय इतक्या रातच्याला?" राम्या
"अरं, आपला गण्या सकाळी गुरं चरायला घेऊन गेलता रानात... समंधी गुरं आली, पर गण्याचा काय पत्याच न्हाय अजून... आम्ही चार-पाचजण जरा बघून येतो रानात..." अंत्या

गुलमोहर: 

चुक

Submitted by नितीनचंद्र on 15 March, 2010 - 02:23

ईशा सेमी- प्रायव्हेट रुम मध्ये पेशंट्च्या बेडवर झोपली होती. काही वेळापुर्वी तिची डी.सी. क्युरेटीन करुन तिला रिकव्हरी साठी अ‍ॅडमिट केल होत. खुपच रक्तस्त्राव झाल्याने तिला अशक्तपणा आला होता. सलाईन चालु होत.लोकल अनेस्थिशिया चा अंमल असल्याने वेदना फारश्या नव्हत्या.

दोन पेशंट्च्या बेड मधला पडदे. पेशंट्सोबत रहाणार्‍यासाठीची बाजुची बेड, ट्युब लाईटस, सलाईन चा स्टॅड, पेशंट्च्या वैयक्तिक गोष्टी ठेवण्यासाठीचे स्टिल चे छोटे टेबल सर्व काही ईशाला पड्ल्या जागेवरुन दिसत होत.

गुलमोहर: 

बिलंदर : भाग २

Submitted by विशाल कुलकर्णी on 11 March, 2010 - 06:31

पुर्वार्ध : वडीलांच्या मृत्युनंतर गारगोटीचा शिरीष भोसले जगायला, पैसे कमवायला म्हणून मुंबईला राहणार्‍या आपल्या जिवलग मित्राकडे सतीशकडे येतो. इथे त्याची भेट सतीशचा रुम पार्टनर अवधुत कामत याच्याशी पडते. मुळातच दिलखुलास असलेला शिर्‍या काही क्षणातच अवधुतशी देखील मैत्रीचे पक्के नाते जुळवतो. आता पुढे ......

बिलंदर : भाग - १ : http://www.maayboli.com/node/14073

*******************************************************************************

"औध्या, तेवढा सत्याचा ऑफीसचा नंबर देतोहेस ना? फोन करुन कळावतो बाबा त्याला. नाहीतर पुन्हा फुलं पड्त्याल आमच्यावर."

गुलमोहर: 

बर्थ सर्टिफिकेट (लघुकथा/किस्सा)

Submitted by नानबा on 9 March, 2010 - 10:05

ते 'कथा एका मॅरेज सर्टिफिकेटची' वाचलं आणि मला माई आज्जीचा भारी किस्सा आठवला. ती आता नवद्दीच्या आसपास असेल. पण आहे एकदम डॉन! म्हणजे तिच्या वयाकडे बघून ती फिरकी घेईल हे कुणाच्या स्वप्नातही नसतं - आणि अशा वेळेस ती एकदम साळसूद चेहर्‍यानं गूगली टाकते!
एक एप्रिलला तिच्या घराच्या, आपल्याच फोनच्या आसपासही नाही जायचं - नाहीतर कितीही तयार असलात तरी तुमची विकेट गेलीच म्हणून समजा! तशी सटकफटक असली तरी स्वभावाला मात्र माईआज्जी एकदम गोड! लोकांना आवर्जून मदत करणार, ह्या वयातही लोकांना तर्‍हेतर्‍हेचे पदार्थ करून खावू घालणार (म्हणजे फक्त भारतीयच पदार्थ असं नाही बरं का!) वगैरे.

गुलमोहर: 

फिरुनी नवी जन्मेन मी...

Submitted by कविन on 9 March, 2010 - 02:47

 
रोजच्या सारखाच गजर वाजला तसा माझा दिवस सुरु झाला. नेहमी प्रमाणे मी स्वतःच आवरुन एकिकडे आधण ठेवल नी दुसर्‍या गॅस वर दुध तापत ठेवल. चहा-दुध होई पर्यंत फ्रिज मधे रात्री मळुन ठेवलेली कणीक, रात्रीच चिरुन  ठेवलेली भाजी, खोवलेल खोबर काढुन ओट्यावर ठेवल नी एकिकडे रेडिओच बटण सुरु केलं.

सायीच्या भांड्यात साय काढुन मनुच दुध गार करत ठेवलं नी रिकाम्या झालेल्या गॅस वर भाजीची कढई नी दुसरी कडे तवा टाकला.

"गुड मॉर्निंग मुंबाSSई.....स्पेशल हेल काढत VJ "Wish u all happy Woman's Day" म्हणुन दर दोन मिनिटांनी किंचाळत होती.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा