वरचा मथळा वाचून बर्याच वाचकांची अशी नक्कीच समजूत होईल की आता हा माणूस स्वतःविषयी आत्मप्रौढीचे काहीतरी वर्णन करत बसणार. मी प्रांजळपणाने जे जसे घडले किंवा मला जसे आठवते तेच सांगणार आहे; काही गोष्टी माझा मूर्खपणासुद्धा दाखवून देतील. पण नक्कीच मी कशाचा विपर्यास करणार नाहीय.
हिसका
``हा स्टिलचा टिफिनचा डबा कसा काय वाटतो ?`` अरविंद डबा हातात धरुन नाचवत म्हणाला.
``स्टिलचा ? वा ! आणखी दुसरा कसला नको कां ? अरे बाबा तुला परत परत सांगते की ही मुंबई आहे. इथे माणसान `पुढच्याला ठेच मागचा शहाणा`` असे वागल पाहिजे. एवढ सांगुनही परत तुझ आपल तेच``. अरविंदची मावशी म्हणाली.
``अग पण ! आता एवढा ऑफिसर म्हणून जाणार आणि मग काय ऍल्युमिनियमचा टिफिनचा डबा नेऊ ?`` अरविंद त्रासिकपणे म्हणाला.
``हो हो तोच मी घेणार आहे. अरे हे बघ तु इथे नवीन आहेत. हे पहा , तो ऍल्युमिनियमचा डबा पाहु`` मावशी म्हणाली.
``अग पण -``
भाग १ ,
भाग २,
भाग ३ ....
आता पुढे.....
"गावडे, हा इरफान ...! जर मी चुकत नसेन तर त्या सतीश देशमुखने वर्णन केलेला इरफान हाच असावा. खरेतर माझ्याकडे कसलाच पुरावा नाहीये. अगदी त्या रोहीतला सांगितल्याप्रमाणे त्याचे कार्ड वगैरे काही इरफानजवळ मिळालेले नाहीये. मागे सतीशने हे कार्ड मला दिले होते, त्यानंतर सतीश लंडनला गेला आणि मग त्याच्याशी असलेला संपर्कच तुटला.....
सद्ध्यातरी मी हवेतच तीर मारलाय. बघूया काही हातात येते का ते?
वालीया उद्योगसमुहाच्या पुण्यातल्या वालीया इंजिन्समध्ये आज फारच गडबड चालली होती. वालीया उद्योगसमुहाच्या तरुण मॅनेजींग डायरेक्टरने - हर्षद वालीयाने कंपनीला भेट देण्याचे मान्य केले होते. कंपनीच्या मालकाने कंपनीला भेट देण्याचा हा योग अनेक वर्षांनी म्हणजे जवळ जवळ १७ वर्षांनी येणार होता.
''रेखे, पोचलीस का गं कॉफी शॉपमधे?'' सुमाचा आवाज ऐकून रेखाने आपला मोबाईल स्पीकर मोडवर ऑन केला.
''तुला काय वाटतंय? तूच ऐक आता... '' रेखाचे वाक्य संपते न संपते तोच मधू व साक्षी दोघींनीही ''सुमे, कुठं अडकली आहेस? अगं कित्ती उशीर लावशील? पोटात कावळे कोकलताहेत, लवकर ये... फाजीलपणा करू नको फार!!! '' अशा आवाजात एकच गजर केला. हसत हसतच कॉल संपवून त्यांनी रेखाकडे पाहिले. रेखा हसत होती खरी, पण त्यात नेहमीचा मोकळेपणा नव्हता. जणू सुमा यायचीच वाट की रेखाच्या मनात कोंडलेली वाफ बाहेर पडायच्या तयारीत होती.
रोजच्या प्रमाणेच , शितल अरूणला उठवायला त्याच्या बेडरूम मधे गेली. अरूण बिचारा मस्त साखरझोपेची स्वप्न पाहण्यात मग्न असावा, तेवढ्यात शितल त्याला ऊठवून म्हणाली आज ऑफिसला जायचं नाहीये का? आता पुरे झाली झोप ऊठा आता. तोंड जरासं वाकडं करून अरूण उठला, अन म्हणाला ऑफिस , बॉसची कटकट रोजचं तेचं काही नविन घडेल का गं आयुष्यात आपल्या? शितल हसली अन म्हणाली आयुष्याचं माहीत नाही पण आज घडेलं. अरूण म्हणाला आज काय आहे असं, शितलं हसली अन उरका लवकर म्हणून लाजून निघून गेली. अरूण आपला, वेड्यासारखं डोकं खाजवतं शितलच्या बोलण्यावर तर्क करू लागलां , काही सुचलं नाही अन लगेच अंघोळीला निघून गेला.
खरंतर हे नेमकं कोण्त्या प्रकारात मोडतं हे मी सांगू शकणार नाही... पण ही व्यक्ती प्रत्यक्षात आहे... अलीकडेच तिने सर्वोच्च न्यायालयात दयामरणासाठी अर्ज दाखल केला... तेव्हा मला राहावले नाही... तेव्हा हे मी लिहिले होते...
हलकासा धक्का जोरसे लगे
``रावसाहेब, आंत येऊ कां ?``
``कोण ? तुकाराम , आणि हे कोण बरोबर ?``
``रावसाहेब , गेल्या चार दिवसापासून ह्ये म्हातारे आजोबा रोज येतायत. आज बी सकाळपासून त्यांनी काय बी खाल्ल नाही. त्यांच एवढ जमिनिची काय काम आहे ते करुन टाका की ?``
``अस , तु कोण रे ? आं ? हे बघ एका कागदावर ऑर्डर टाइप कर. आणि तुझीच सही करुन ऑर्डर देऊन टाक यांना. काय झाल न मग कांम ? अरे येडा का खुळा ? किती वर्षे झाली तुझ्या सर्विसला ?``
``आता पुढल्या वर्षी रिटायर होणार मी साहेब``.
परवाचा दिवस तिच्यासाठी काहीतरी विचित्रच उगवला होता... सकाळपासून सायलीला ताप आणि सन्ध्याकाळी शाळेत कार्यक्रम... ताप उतरला म्हणून डान्सची तयारी केलेल्या सायलीला घेऊन ती निघाली... घरापासून शाळेच अन्तर थोड जास्त म्हणून टॅक्सीने निघाली... थोड अन्तर जातात तोच या टॅक्सीने समोरच्या गाडीला जोरदार धडक दिली... ती धडक एवढ्या जोरात होती की या दोघी घाबरूनच गेल्या. थोडाफार मारही लागला. दुसर्या टॅक्सीत बसल्यावर आपल्या घाबरलेल्या मुलीला शान्त करून तिचा मेकअप ठीक करेपर्यन्त शाळा आली आणि त्या दोघी उतरून गेल्याही...
"तुम्ही काही काळजी करू नका. दिवसाचा तर प्रवास आहे. पोहोचल्यावर लगेच फ़ोन करतेच मी तुम्हाला."
गाडी सुटता सुटता अनुराधाने पुन्हा एकदा सुभाषला सांगीतले. वेग घेणाऱ्या गाडीबरोबर धावणारा सुभाष तिला आणि सोनुला हात हलवून निरोप घेता घेता दिसेनासा झाला. त्याबरोबर आणखी वेळ न दवडता शेजारी बसलेल्या बाईने लगेच सोनुकडून आपली खिडकीची जागा मागून घेतली. मस्तपैकी मांडी घालून कोपऱ्याला रेलून तिने मासीकात डोके खुपसले.