खरंतर हे नेमकं कोण्त्या प्रकारात मोडतं हे मी सांगू शकणार नाही... पण ही व्यक्ती प्रत्यक्षात आहे... अलीकडेच तिने सर्वोच्च न्यायालयात दयामरणासाठी अर्ज दाखल केला... तेव्हा मला राहावले नाही... तेव्हा हे मी लिहिले होते...
गेली ३६ वर्षे ती शय्येवर पडलेली आहे. आजूबाजूच्या जगात कितीतरी गोष्टी बदलताहेत, पण तिच्या वर्षानुवर्षाच्या दिनचर्येत तसूभरही फरक पडलेला नाही. ती आहे तशीच आहे. नाही म्हणायला तिच्या एकेकाळी तरूण असलेल्या शरीरावर वार्धक्य दिसू लागलेय. तिचे केस पांढरे झाले आहेत, सुरकुत्यांची जाळी आलीय, तिचा श्वास आणि ह्रदय सुरू आहे... एवढीच तिची जिवंतपणाची ओळख, बाकी तिच्यासाठी काळ थांबलाय, १९७३ मध्ये... आता अरूणा शानबागची आठवण निघायचे काय कारण असावे? तिची मॅत्रीण पिंकी विराणी हिने तिच्या वतीने दयामरणाचा अर्ज दाखल केला तेव्हा आताच्या अनेक तरुणांना तिची ओळख झाली. कोण आहे ही अरुणा? तिच्या एका अर्जाने पेपरांचे रकाने का भरून जावेत? काय आहे तिची कथा?
"मी तिला भेटले तेव्हा ती कोमात जाऊन वीस वर्षे झाली होती. तिचा एकेकाळचा प्रियकर आणि भावी नवरा असलेल्या डॉक्टरने दुसरं लग्न केल होत. तिच्या नातेवाईकांनीही तिला सोडलं होत. तिच्यावर बलात्कार करून तिला या अवस्थेत आणून सोडणार्या सोहनलाल वाल्मिकीनेही आपली शिक्षा पूर्ण केली होती. दिल्लितल्या एका हॉस्पिटलमध्ये तो ऊजळ माथ्याने नोकरीही करू लागला होता. ती मात्र तशीच होती. सारं काही सुरळीत होईल, या प्रतीक्षेत... तिची ही प्रलीक्षाच मी पुस्तकरूपाने जगासमोर आणायचं ठरवलं.." असं पिंकी विराणी सांगतात. पुस्तकाचं नावही 'अरूणाज स्टोरी' असं ठेवलं. हेच पुस्तक मराठीत अक्षर प्रकाशनाने अरूणाची गोष्ट या नावाने आणलं. सुमारे बारा वर्षांपूर्वी हे पुस्तक आलं तेव्हा चांगलीच खळबळ उडाली... आता हे पुस्तक सहज मिळत नाही पण ज्यांनी ते वाचलं त्यांच्या मनावर ती कायमची कोरली गेली आहे.
कारवारमधल्या हल्दीपूर या छोट्या गावातून आलेली अरूणा लोकांच्या सेवेसाठी नर्स बनली. केईएममध्ये नोकरी करत असताना तिथल्याच एका डॉक्टरशी प्रेमसंबंध जुळले आणि लग्नही ठरलं. पण तिथेच नोकरी करणार्या सोहनलालनेही तिला लग्नासाठी विचारलं. तिने नाही म्हट्ल्याचा त्याला राग आला. त्याने तिच्या गळ्यात कुत्र्याची साखळी बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिच्या मानेतल्या नसा बंद झाल्या त्या कायमच्याच. तेव्हापासून तिची शक्ती, वाचा, द्रुष्टी, संवेदना सारं काही गेलं. शिल्लक राहिला तो तिचा कार्यक्ष्म (?) मेंदू आणि श्वास. सोहनलालला पुण्यात अटक झाली, शिक्षाही झाली... दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नासाठी... प्रत्येकी सात वर्षं आणि तीही एकत्र भोगायची. तो बाहेर आला आणि बदला घ्यायचा म्हणून केईएममध्ये दाखल असलेल्या तिच्या बेडची रेलिंगच काढून टाकली. खाली पडल्याने तिला जखमा झाल्या. तेव्हापासून ती वेगळया खोलीत "राहते" आहे.
ही कथा इथे संपत नाही तर सुरू होते. माणुसकीशून्य सोहनलालने केलेल्या या क्रुत्यानंतर सुरू होते ती माणुसकीचं दर्शन घडवणारी कथा. गेली ३६ वर्षं ती सुरूच आहे. केईएमच्या मॅनेजमेंट, डॉक्टरनी आणि सर्वांनीच तिला आपलं मानलं आहे. तिच्यावर एवढी वर्षं ऊपचार सुरू आहेत. पण त्यात उपकारांच्या भावनेचा लवलेशही नाही. अरूणाबरोबर काम करणार्या नर्सेस केव्हाच रिटायर झाल्या आहेत. पण नंतरच्या पिढीनेही तिचा प्रेमाने सांभाळ केला आहे. ती खोली गेली ३६ वर्षं राखीव आहे. तो डॉक्टरही रिटायर झाला आहे. तोही तिला भेटायला येत असतो. प्रेम, माणुसकी, आपुलकी या बळावर माणूस कितीही वर्षं जगू शकतो असे म्हणतात. अरूणा ही फक्त सोहनलालच्या माणुसकीशून्य वागणुकीची कथा नाही... ती कथा आहे तिच्या इच्छाशक्तीची... ती बरी होईल, या डॉक्टरांच्या आणि स्टाफच्या दुर्दम्य आशावादाची आणि अशा अवस्थेतही तिला भेटायला येणार्या 'त्या' डॉक्टरच्या निरलस प्रेमाची...
सुंदर परिचय!
सुंदर परिचय!
ही कथा पकाही महीन्यांपूर्वीच
ही कथा पकाही महीन्यांपूर्वीच मा.बो. वर वाचली आहे...
माणुसकीला काळीमा आणि खर्या
माणुसकीला काळीमा आणि खर्या माणुसकीचंही वेगळं तितकचं दुर्मिळ उदाहरणं.
@स्वप्नाली : असू शकेल.. पण हा
@स्वप्नाली : असू शकेल.. पण हा माझा लेख होता... अरूणाने अर्ज दाखल केल्यानंतरचा... तो छापूनही आला होता...
बाकी धन्यवाद... इथे फोनेटिक की-बोर्डवर टाइप करायची सोय आहे का? मला त्या की-बोर्डची सवय आहे... या की-बोर्डवर खूप वेळ लागतो
हो ते पुस्तक वाचणारा कोणीच
हो ते पुस्तक वाचणारा कोणीच कधीच अरुणाची कहाणी विसरु शकत नाही
ह्या सत्यकथेवर एक नाटकही आलं
ह्या सत्यकथेवर एक नाटकही आलं होतं.
मला वाटतं ह्या सत्यकथे वरूनच
मला वाटतं ह्या सत्यकथे वरूनच "अल्पविराम" का "स्वल्पविराम" अशा नावाची एक हिंदी मालिकाही आली होती. त्यात बलात्कारीत मुलीची भुमिका पल्लवी जोशी ने केली होती.
काय म्हणाव नियतीला ? सात वर्ष
काय म्हणाव नियतीला ? सात वर्ष सजा भोगुन तो पुन्हा समाजात गेला. अरुणाला खरच न्याय मिळाला का ? जर नाही मिळाला तर का नाही मिळाला ? अस जेव्हा होत तेव्हा एकच तत्वज्ञान याच समाधान कारक उत्तर देत. कर्माचा सिध्दांत. हा सिध्दांत ज्यांना थोतांड किंवा अंधश्रध्दा वाटते त्यांनी सांगव काय गुन्हा होता अरुणाचा ?जेव्हा समर्पक उत्तर मिळत नाही तेव्हा प्रारब्ध हा कर्माच्या सिध्दांताअंतर्गत उपसिध्दांताची पटतो. ( हे माझे मत आहे. यावर मला चर्चा करायची नाही. ) यावर आणखी वाचवे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी हरीभाई ठक्कर यांचे कर्माचा सिध्दांत हे पुस्तक वाचावे.
तिचं कर्म किंवा प्रारब्ध याचा
तिचं कर्म किंवा प्रारब्ध याचा विचार करताना समाजात इतक्या विक्रुत मनोव्रुत्तीच्या व्यक्ती असतात याची कल्पना केली तरी शिसारी येते...
अरुणाची गोष्ट पुस्तक वाचलय.
अरुणाची गोष्ट पुस्तक वाचलय. तिची गोष्ट कुणी नाहिच विसरु शकणार.
<<अस जेव्हा होत तेव्हा एकच
<<अस जेव्हा होत तेव्हा एकच तत्वज्ञान याच समाधान कारक उत्तर देत. कर्माचा सिध्दांत. हा सिध्दांत ज्यांना थोतांड किंवा अंधश्रध्दा वाटते त्यांनी सांगव काय गुन्हा होता अरुणाचा ?जेव्हा समर्पक उत्तर मिळत नाही तेव्हा प्रारब्ध हा कर्माच्या सिध्दांताअंतर्गत उपसिध्दांताची पटतो >>
मनाचे समाधान व्हावे म्हणुन ही एक पळवाट आहे असे मला वाटते. अशा अनेक अरुणा आपण आपल्या समाजात पहात आलो आहोत , प्रत्येकीची व्यथा वेगळी. आपली कमकुवत न्याय व्यवस्था , गुन्हेगारांना शिक्षा करण्यास असमर्थ समाज यास कारणीभुत आहे.
>> सोहनलालला पुण्यात अटक
>> सोहनलालला पुण्यात अटक झाली, शिक्षाही झाली... दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नासाठी.
आणि? बलात्काराबद्दल झाली नाही?
(No subject)
@स्वाती... नाही... कारण अरूणा
@स्वाती... नाही... कारण अरूणा तेव्हा कोमात गेली होती आणि हा गुन्हा त्यामुळे सिद्ध होऊ शकला नाही...
(No subject)
@स्वाती... नाही... कारण अरूणा
@स्वाती... नाही... कारण अरूणा तेव्हा कोमात गेली होती आणि हा गुन्हा त्यामुळे सिद्ध होऊ शकला नाही...
>>>>>>>> माफ करा पण मी असं वाचलं आहे कि अरुणाला मासिक पाळी असल्याने त्याने मागुन बलात्कार केला आणि तसा प्रकार कायद्याच्या बलात्काराच्या व्याख्येत बसत नाहि,म्हणुन त्याला त्याबद्दल शिक्षा नाहि झाली .
(No subject)
किती भयावह आहे हे सगळं..बाप
किती भयावह आहे हे सगळं..बाप रे!!!
मनाचे समाधान व्हावे म्हणुन ही
मनाचे समाधान व्हावे म्हणुन ही एक पळवाट आहे असे मला वाटते. अशा अनेक अरुणा आपण आपल्या समाजात पहात आलो आहोत , प्रत्येकीची व्यथा वेगळी>> अगदी अगदी.
अल्पविराम पाहताना माहिती
अल्पविराम पाहताना माहिती नव्हते कि हे खऱ्या कथेवर आधारित आहे, पण हे वाचून खूप विचित्र वाटले. सोहनलाल ला फाशी व्हायला पाहिजे होती. कुत्र्याची साखळी ?? तिने काय भोगले असेल त्या वेळी . कल्पनेने शहारे आले अंगावर .
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Aruna_Shanbaug
मी ही वाचलं आहे 'अरूणाची
मी ही वाचलं आहे 'अरूणाची गोष्ट'..
तिला विसरणं केवळ अशक्य..
खूप दिवसानी आले इथे...
खूप दिवसानी आले इथे... परीक्षा आणि नोकरी यातून वेळच मिळत नव्हता... अरूणाला भेटल्यावर मला खूप वाईट वाटल... तिची ती अवस्था पाहावत नव्हती... रैना तू खर म्हणते आहेस... काही अरूणा शरीराने अरूणा असतात तर काही मनाने... लवकरच मी अशा काही सत्यकथा इथे लिहिणार आहे... फक्त मला की-बोर्ड चा थोडा प्रॉब्लेम आहे... मला फोनेटिक मध्ये टाईप करायची सवय आहे... इथे जरा गडबड होते आणि खूप वेळ लागतो...
भयानक...डोळ्यात पाणी येतं
भयानक...डोळ्यात पाणी येतं वाचून...
vachun kata aala angawar
vachun kata aala angawar
<<सोहनलाल ला फाशी व्हायला
<<सोहनलाल ला फाशी व्हायला पाहिजे होत<<>> अगदी अगदी. पण हे मानवाधिकार वाले कसाब ला सुद्धा फाशी देउ नका म्हणतायेत तिथे सोहनलाल सारख्याला कुठे फाशी होणार. प्रत्यक्ष घटनेपेक्षा त्यानंतर victim ची अवस्था आणि गुन्हेगाराला जसे मोकळे सोडले जाते ते पाहुन जास्त संताप संताप होतो. तो सोहनलाल एक जनावर आहे मान्य पण त्याला योग्य शिक्षा कायद्यानेही होत नाही आणि समाजाकडुनही होत नाही याचे जास्त frustration येते. ( त्यातुन वर 'कर्माचा सिध्दांत ' ई. कल्पना डोक्यात भरवुन जे घडले ते तिच्या नशिबाबेच भोग म्हणले की सगळेच सुटले. तसेही भारतासारख्या देशात बाई म्हणुन जन्माला येणे हाच तिचा पहिला नशिबाचा भोग म्हणायला पाहिजे. त्यानंतर मग जर काही वाईट घडले तर अजुन जास्त भोग )
"तो सोहनलाल एक जनावर आहे
"तो सोहनलाल एक जनावर आहे मान्य पण त्याला योग्य शिक्षा कायद्यानेही होत नाही आणि समाजाकडुनही होत नाही याचे जास्त frustration येते. "
अगदी सहमत. अरुणासाठी दयामरणाचा अर्ज कोर्टात दाखल झाला तेव्हा २ लेख लोकसत्तामधे वाचले होते, एक पत्रकार महिलेचाआणि दुसरा डॉ.संजय ओक.
माफ करा पण मी असं वाचलं आहे
माफ करा पण मी असं वाचलं आहे कि अरुणाला मासिक पाळी असल्याने त्याने मागुन बलात्कार केला आणि तसा प्रकार कायद्याच्या बलात्काराच्या व्याख्येत बसत नाहि,म्हणुन त्याला त्याबद्दल शिक्षा नाहि झाली . >> पण आता तर तो कायदा आलाय ना... मग जरी करतेवेळी कायदा अस्तीत्वात नसला तरी अजून पीडीत तरूणी त्याचे परीणाम भोगतेय... या तत्वावर शिक्षा नाही होऊ शकत का?? कुठलाही वकील याबाबत काहीच करू शकणार नाही का? अपराध्याला शिक्षा झालीच पाहीजे... एखाद्याला जिवंतपणी मारणं यासाठी कायद्यात काहीच तरतूद नाहीये का?? तो बलात्कार जरी नसला तरी गळ्याभोवती साखळी गुंडाळून तिचा मेंदूचा रक्तपुरवठा थांबवला, म्हणून जिवे मारण्याचा प्रयत्न याखाली तरी शिक्षा हवी होती...