कथा

गणित

Submitted by आशूडी on 17 May, 2010 - 02:43

उठल्या उठल्या तिनं नेहमीच्या सवयीनं हातातल्या घड्याळात पाहिलं. आजही तिचा अंदाज चुकलेला नव्हताच. जाग येता येता किती वाजले असतील याचा अंदाज बांधायचा आणि मगच घड्याळात पाहायचं हा तिचा आवडता खेळ. कधी हार कधी जीत. आताही पावणेसहा वाजले होते. दुपारी आमरसपुरीचं जड जेवण झाल्याने जी काय ग्लानी आली होती त्याची धुंदी अजून डोळ्यावरुन हटत नव्हती. ती उठून मांडी घालून तशीच डोळे मिटून बसून राहिली. ही तिची सर्वात आवडती अवस्था. म्हटलं तर जागी, म्हटलं तर निद्रिस्त. आपल्याला हवे ते आठवण्याचे, कल्पना करत बसण्याचे हेच ते फक्त तिचे क्षण! आता या क्षणांचाही अल्बम तयार झालाय. अशाच क्षणी उघडून पाहात बसावा असा.

गुलमोहर: 

चला चला गावाकडे पळा... भाग-२

Submitted by kunjir.nilesh on 14 May, 2010 - 08:07

लालसर मातीचा गंध मनात दरवळतो... पायवाटेला खेटून उभी असलेली झाडी आणि हवेतला गारवा सार सार हवहवसं वाटणार.... ....आंब्याच्या झाडावरून कोकिळेचे मधुर स्वर.....चिंचेची उंच उंच झाडे एकापाठोपाठ एक दिसू लागतात....
बाजूलाच दूरवर पसरलेल्या शेताकडे नजर जाते आणि सोनेरी पिवळी कणसे आपल्या येण्याने आनंदित होऊन डोलतात की काय असा भास होतो.... आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैर्‍या पाहून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही....
त्या तोडण्याचा मोह ' आपण नंतर येऊन तोडूया ' असा विचार करून त्या क्षणी का होईना आवरतो...

गुलमोहर: 

चला चला गावाकडे पळा...भाग-१

Submitted by kunjir.nilesh on 13 May, 2010 - 05:09

उन्हाळ्याच्या सुट्टी लागली रे लागली की .....ह्युरे चला चला गावाकडे पळा....बालपणीचा हा आनंद आजही तितकाच ताजा आणि सच्चा वाटतो.... आपण कितीही मोठे झालो ना तरीही त्या आठवणी अजुनही तश्याच्या तश्या मनाच्या कोपर्‍यात घर करून असतात...असेच काही क्षण माझ्या आठवणीतले... कदाचित ते तुम्हाला तुमचेही वाटतील...

गुलमोहर: 

कोवळी कळी

Submitted by Aditiii on 11 May, 2010 - 05:14

कोवळी कळी

कॉलेजचा पहिला दिवस ! मनु काय सुरेख ड्रेस घालून आलीये. अर्थात तिला काय कमी? आणि आमच्या सारख्या गर्ल्स स्कूलवाल्यांनाच कॉलेजच आकर्षण. काय छान वाटतंय आज, मोकळं, स्वतंत्र! बस. चला, लेक्चर अटेंड करायला हवं.

गुलमोहर: 

रक्ताळलेला हात

Submitted by नितीनचंद्र on 9 May, 2010 - 08:54

ही कथा काल्पनिक आहे. याचा संबंध प्रत्यक्ष घडणार्‍या घटनांशी नाही. असल्यास तो एक योगायोग मानावा.
----------------------------------------------------------
माबोकरांनो मी प्रथमच पोलीस चातुर्य कथा लिहीत आहे. पोलीस चातुर्यकथा फारश्या लोकांना आवडत नाहीत. त्यातुन कथेचा काही भाग हा बिभत्स या रसाच्या अमला खाली गेल्याने आणखीनच वाचक वर्ग कमी होतो परंतु मला स्वतःला हा कथाप्रकार आवडत असल्यामुळे या कथेची निर्मीती झाली आहे. सांगा कशी वाटली ही कथा.
---------------------------------------------------------

गुलमोहर: 

नजर लागी राजा...

Submitted by नंदिनी on 9 May, 2010 - 07:03

घण घण घण्..
हातोडीचे घाव बसत होते. एक दोन तीन चार पाच कामगार होते. काळेकभिन्न कामगार. एखाद्या यमदूतासारखे. दुपारच्या बाराचं ऊन तापत होतं.. डांबरी रस्ता चरचरीत तापला होता.. बिनाचपलांचे त्याचे पाय पोळत होते. पण समोर घाव चालूच होते. त्याच्या बंगल्यावर.

घण घण घण...
ती श्यामलची खिडकी होती. रोज संध्याकाळी तिथे बसून त्याची वाट पहायची. हसर्‍या, गोबर्‍या गालाची श्यामल. कुरळ्या केसाची, करवंदी डोळ्याची श्यामल. त्याच्यासारख्याच नजरेची श्यामल. सुभद्रेच्या रक्ताची श्यामल. मागच्याच वर्षी भेटून गेली . "मला तुला बाप म्हणायची लाज वाटते" असंच ओरडली होती ना त्याच्यावर.

गुलमोहर: 

जिद्द - गरूडझेप एका चिमणीची..

Submitted by suryakiran on 9 May, 2010 - 03:01

काल दूपारी , मोबाईल मधले सगळे कॉन्टॅक्ट्स डायरीत उतरवून घेत होतो, तेव्हा एक नं दिसला "आयडिया" म्हणून सेव्ह केलेला. काही कळतचं नव्ह्तं कोणाचा आहे ते,म्हणून ऑफिसातून लगेच डायल केला तर ओळखीचा आवाज वाटला."ओळखलेस का मला"? , नाही ओळखले आपण कोण?"आठव जरा म्हणजे नक्की आठवेन" बिचारी आठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती, मग मी हिंट दिली "चिंचवड वरून बोलतोय, ओळखलं नसेल तर सॉरी अन ठेवतो फोन" तेवढ्यात ती हलक्या स्वरात म्हणाली. "नको ठेवूस थांब,मी बाईक साईड ला घेते.

गुलमोहर: 

बिलंदर : भाग ५

Submitted by विशाल कुलकर्णी on 5 May, 2010 - 06:27

बिलंदर भाग १ ते ४ : http://www.maayboli.com/node/15571

आता पुढे ....

तीने डोळे उघडले आणि आजुबाजुला नजर टाकण्याचा प्रयत्न केला. पण सगळीकडे अंधार पसरला होता. एक प्रकारची भयाण शांतता वातावरणात व्यापून राहीली होती. आणि वर प्रचंड उकाडा जाणवत होता. तीने हात पाय हलवायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की आपले हात पाय पक्के जखडलेले आहेत.. तशी ती शिरा ताणून ओरडली...

"वाचवा...वाचवा......!"

तिचा आवाज मध्येच कुठेतरी अडवल्यासारखा दाबला गेला आणि अंधारातून कुणीतरी प्रसन्नपणे हसल्याचा आवाज तिच्या कानावर पडला....

"कोण आहे? कोण आहे तिकडे?" ती घाबरून ओरडली.

गुलमोहर: 

अमेरिकन स्वप्न! (भाग २)

Submitted by Aditiii on 4 May, 2010 - 06:11

आमोद शी काय पण नाव आहे. तीच्या मनात विचार आला,आणि ह्या विचारासरशी तिला आठवला तिला आवडणार नाव आणि त्या नावाचा मालक "रुसन!"
---------------------------------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा