जिद्द - गरूडझेप एका चिमणीची..

Submitted by suryakiran on 9 May, 2010 - 03:01

काल दूपारी , मोबाईल मधले सगळे कॉन्टॅक्ट्स डायरीत उतरवून घेत होतो, तेव्हा एक नं दिसला "आयडिया" म्हणून सेव्ह केलेला. काही कळतचं नव्ह्तं कोणाचा आहे ते,म्हणून ऑफिसातून लगेच डायल केला तर ओळखीचा आवाज वाटला."ओळखलेस का मला"? , नाही ओळखले आपण कोण?"आठव जरा म्हणजे नक्की आठवेन" बिचारी आठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती, मग मी हिंट दिली "चिंचवड वरून बोलतोय, ओळखलं नसेल तर सॉरी अन ठेवतो फोन" तेवढ्यात ती हलक्या स्वरात म्हणाली. "नको ठेवूस थांब,मी बाईक साईड ला घेते. मी विचारलं कोणाच्या बाईकवर आहेस Wink ती अभिमानाने उत्तरली "माझीच आहे बाईक , "स्कूटी पेप". कधी घेतलीस ? माझा प्रश्न ती म्हणाली गुडीपाडव्याला. मग तीला विचारलं "अजून तिथेच जॉब करतेस का , पुन्हा ती अभिमानाने म्हणाली नाही रे, तुला सांगितलं होतं ना तसं मी माझं स्वतःचं घर नी पार्लर टाकलयं,माझा लगेच प्रश्न लॉटरी लागली की काय परीला , ती बोलली लॉटरी कसली अन लागली असती तरी ती मला नकोच होती कारण मला माझी स्वप्न माझ्या स्वतःच्या कर्तूत्वावर पुर्ण करायची होती अन ती मी केलीये अन पुढेही अशीच एक एक स्वप्न पुर्ण करत राहील". माझे डोळे भरून आले , कारण तिच्या आनंदात सामील होणं हे माझ्यासाठी एक भाग्यचं होतं कारण तीचं जीवन हे खूपच वेगळं आहे.

आई, बाबा ,एक भाऊ अन बहिण असं त्यांचं कुटूंब. घरात मोठी मुलगी असल्याने तिचं लग्न पहिलं होणार. मग तीचं लग्न ठरलं एका घरात , त्या घरातल्या लोकांनी हुंड्याची अपेक्षा केली. मध्यमवर्गीय असल्याने तीच्या बाबांना झेपणार नव्हतं तरी पहिल्याच मुलीचं लग्न म्हणून ती मान्यही केली. लग्नाची तारिख ठरल्याप्रमाणे लग्नाच्या दिवशी सगळे आनंदात होते.लग्न लागण्याच्या वेळी नवर्‍या मुलाने चार चाकीची अपेक्षा बोलून दाखवली अन नाही दिलं तर लग्न मोडलं समजा असा गोंधळ घातला. ऐन लग्नात सारवा सारव करायची म्हणून हो म्हणून सांगितलं अन लग्न पार पाडलं पण जेव्हा ती सासरी जायची वेळ आली तेव्हा त्या नालायक लोकांनी पुन्हा एक फ्लॅट हवा अशी निर्लज्जपणे अपेक्षा केली. तेव्हा परीच्या बाबाना काही सुचतचं नव्हतं इतकं कुठून आणणार? जे होतं ते सगळं दिलं होतं, अजून एका मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण याचा विचार करून त्यांना घाम फुटला,चेहर्‍यावरचं दुखः लपवायचा प्रयत्न करूनही त्यांना ते लपवता आलं नाही. मग काय परीला ते पहावलं नाही , आज पर्यंत आई बाबांनी आपल्यासाठी खूप केलयं अन आता त्याना हे क्षण दाखवायचे ? नाही तीने त्या नवर्‍या मूलाच्या अन त्याचा वडिलांच्या कानाखाली खेचली अन गळ्यातलं मंगळसुत्र फेकून दिलं अन चालते व्हा म्हणाली. एवढं धाडस आलं कुठून ह्या चिमणपरी मधे याचं सगळयांनाच आश्च् र्य वाटलं. एवढं निर्लज्जा वागूनही ते लोक निघुन गेले अन निरोप पाठवला पोर नांदवायची असेल तर पैसे धाडून द्या. सारं काही क्षणात उध्वस्त झालं.

आपलं भविष्य कसं अंधारातलं आहे याची जाणीव परीला होती अन त्याचे सल परीला बोचत होते. काही दिवस परी आई बाबांकडे राहिली. पण परीच्या अश्या परिस्थितीमूळे तिचे बाबा सतत टेन्शन मधे येवू लागले , आई तर काहीचं बोलत नसे. हे परीला सलत होतं. म्हणून परी एकटी आई बाबांन पासून राहण्याचा निर्णय घेतला. ह्या वयात एकटं रहायचं तेही अश्या परिस्थितीत , किती कठीण आहे याचा विचार करा. परीला तिच्या आई बाबांनी अडवलं. पण ती निघाली अन म्हणाली माझी काळजी करू नका , तुमचा एक मुलगा घराबाहेर पडतोय यशस्वी होऊनच येईन आशिर्वाद द्या. आई बाबा परीच्या हट्टापूढे हतबल झाले अन परी घराबाहे पडली. नोकरी शोधणे , घर शोधणे अन एकटी राहणे यासारखे बरेच डोंगर तिच्यासमोर होते. पण सुदैवाने तीला नोकरी मिळाली अन घर मिळालं. ती कमवू लागली , जे काही कमवेल ते ती सेव्हींग करायची.इकडे बाबा कर्जबाजारामूळे खचून चालले होते. पोरीची चिंता, मुलाचं शिक्षण , अन दुसर्‍या मुलीचं भविष्य यात त्यांना स्वतःकडे लक्षही देता येत नव्ह्तं. हे परीने जाणलं अन जे काही कमवायची त्यातलं अर्ध ती घरी द्यायची. परी एकटी राहतीये हे पाहून तो नराधम नवरा तीला त्रास द्यायचा प्रयत्न करायचा, यातून तीचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला, पण पुन्हा ती त्याच्या त्रासाला न जुमानता उभी राहीली त्याच्या वागण्याला प्रतिकार करू लागली अन अखेर तिने एक स्वतःचा पक्का स्टँड निर्माण केला स्वतःच्या आयुष्याचा. घरी मदत करू लागली, भावाची बहीणीची हौस ती पुर्ण करू लागली. तीच्या साठी तिने काहीच केलं नाही पण आई बाबा अन कुटूंबासाठी एक जबाबदार मुलगा ही करू शकणार नाही इतकं काही केलं अन त्यातुनही तिने तिच्या स्वप्नांना अस्तित्वाचे पंख दिले.

काही महिन्यापुर्वीच तिने स्वतःचं ब्युटीपार्लर सुरू केलयं अन अजूनही ती एकटीच राहते पण आता तिच्या चेहर्‍यावर कमालीचा आत्मविश्वास अन डोळ्यात आनंदाने आयुष्य जगण्याचे मोती चमकतायेत. तीच्या अश्या जिद्दिच्या जगण्याला ह्या मित्राचा खरचं सलाम. अखेर एका घायाळ चिमणीने जिद्दिने घेतलीच ना गरूडझेप.. तेव्हा तिच्या भविष्यातल्या आयुष्याला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा.

( परी - नाव बदलून. तीचे पार्लर पुण्यातच आहे. तीला तिच्या व्यवसायात, म्हणजे पार्लरविषयी काही टिप्स हव्या असल्यास नक्की मदत करा)

गुलमोहर: 

तीने त्या नवर्‍या मूलाच्या अन त्याचा वडिलांच्या कानाखाली खेचली अन गळ्यातलं मंगळसुत्र फेकून दिलं अन चालते व्हा म्हणाली........

खूप हिम्मतवाली आहे परी.. तिचं खूप खूप अभिनंदन

धन्यवाद, लाजो, मेधा, श्रद्धा , वर्षू़जी अन मृदूला .. तुमच्या अभिप्रायाबद्दल अन शुभेच्छांबद्दल धन्यवाद. लवकरचं परीला मा बो वरती घेवून येईल मग तुम्ही तिच्याशी थेट संवाद साधा. कारण खूप घाईत लिहिलं आहे , तेव्हा वेळ मिळेल तसं संपादन करून आणखी लिहिण्याचा प्रयत्न करेल. पण खरोखरच , परीच्या ह्या जिद्दिला सलाम.

परीने आज माझ्यासोबत एक धक्कादायक गोष्ट शेअर केली आहे,लवकरच ती या कथेत अपडेट होईल. ह्या गुरूवारी भेट होईल तिची. तेव्हा आणखी कळेल तिच्याबद्दल.

या परीचं कौतुक करावं तेवढं थोडंच ! परी कसली अरे ’दुर्गा’ आहे ती.
<<एका घायाळ चिमणीने जिद्दिने घेतलीच ना गरूडझेप..>>>> नाही रे बाबा, गरुडाचंच पिल्लु असणार ते, फ़क्त आपल्या पंखातल्या ताकदीची ओळख झाली नसेल तोपर्यंत. परीला पुढच्या संघर्षासाठी मनापासुन लक्ष लक्ष शुभेच्छा!
<<परीने आज माझ्यासोबत एक धक्कादायक गोष्ट शेअर केली आहे>>> तिची परवानगी जरूर घे, त्या आधी. एक लक्षात ठेव, स्वाभिमानाला दयेचं वावडं असतं. तिच्या स्वाभिमानाला धक्का लागणार असेल तर नको करुस अपडेट.

<<<<एका घायाळ चिमणीने जिद्दिने घेतलीच ना गरूडझेप..>>>> अनुमोदन..
तिच्या हिमतीची दाद द्यायलाच पाहिजे. तिच्या पुढिल आष्याला शुभेच्छा Happy

तिची परवानगी जरूर घे, त्या आधी. >> विशालला अनुमोदन...

. लवकरचं परीला मा बो वरती घेवून येईल मग तुम्ही तिच्याशी थेट संवाद साधा. >> नक्की... वाट बघतेय... तिचं प्रत्यक्ष अभिनंदन करता येइल ना..

विशाल तिची परवानगी आहे रे तशी. अन मी लिहिताना मर्यादेचं बंधन जरूर ठेवेल रे. तुझ म्हणनं पटलं मला तिच्या स्वाभिमानाला कसलाही धक्का पोहचणार नाही.

ड्रिमगर्ल , तिला मराठी टाईप करता येत नाही अजून तरीही ती इंग्रजी मधून इथे यायचा प्रयत्न करेन.

परीला माझ्याही खुप शुभेच्छा! तुम्हीही कथा चांगली लिहिली आहे. विशाल म्हणतात तसच,गरुडाचच पिल्लू असणार ते,तिच्या पंखांत अजून बळ येवो ही सदिच्छा!

परीला माझ्याही खुप शुभेच्छा!!!! तिच्या पंखांत अजून बळ येवो ही सदिच्छा!!!

आणि हो, तिच्या पार्लरचा पत्ता द्या.... Happy आम्ही तिला नक्की भेटू....

पने, नाही गं खेचू शकत ना कोर्टात सर्वसामान्यांच्या इब्रतीचा प्रश्न अन पैसा आणि त्यात आजकालची न्यायव्यवस्था माहितचं आहे ना तुला.. अन पैसा टाकला कि निर्णय लागतो जसा हवा आहे तसा.

<<<तिच्या त्या नालायक नवर्‍याला कोर्टात का खेचले नाही?>>> इतकं सोपं असतं का कोर्ट प्रकरण करणे?

शरद

परीचे अभिनंदन, स्वतःकडे कर्तुत्व नाही आणि सासरच्या लोकांकडे अपेक्षा नाही तर पठाणी वसुलीचे वर्तन करणारे वर ,वर पिते आणि त्यांच्या माता समाजात राहण्याच्या लायकीच्या नाहीत.

अगदी कडक सलाम तुमच्या मैत्रीणीला!!!! आणि कोटी कोटी शुभेच्छा!! लवकर येऊदे ती मा.बो वर.

परी सुटली का नवर्‍याच्या तावडीतून? म्हणजे तो तिला त्रास देत होता ना? घेतला का तिने घटस्फोट? वडिलांचा खर्च झालेला सगळा पैसा व्याजासकट वसूल केला पाहिजे तिने नवर्‍याकडून

Hats Off !!!

व्वा! शाब्बास परी! तुझ्या जिद्दीच खरच कौतुक. Happy

Perennial-Pleasures-Nursery-Custom-Services-Wedding-Flowers.jpg
तुला असेच प्रत्येक गोष्टीत यश मिळो, आणि तुझी मान अशीच स्वभिमानाने ताठ राहो, तुझ्या आई-बाबांना आनंद मिळो. शुभेछा! Happy

सुकि, इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद! Happy

आपल्या मैत्रिणीचे आणी आपल्या सारख्या खर्या मित्राचे खुप खुप अभिनन्दन ..........परी चा पता ई मेल केलात तर नक्की सगळ्या मैत्रिणीना सागेन तिच्या कडे जायला आणी मी पण पुण्यात गेले कि नक्की जाईन ...