ही कथा काल्पनिक आहे. याचा संबंध प्रत्यक्ष घडणार्या घटनांशी नाही. असल्यास तो एक योगायोग मानावा.
----------------------------------------------------------
माबोकरांनो मी प्रथमच पोलीस चातुर्य कथा लिहीत आहे. पोलीस चातुर्यकथा फारश्या लोकांना आवडत नाहीत. त्यातुन कथेचा काही भाग हा बिभत्स या रसाच्या अमला खाली गेल्याने आणखीनच वाचक वर्ग कमी होतो परंतु मला स्वतःला हा कथाप्रकार आवडत असल्यामुळे या कथेची निर्मीती झाली आहे. सांगा कशी वाटली ही कथा.
---------------------------------------------------------
चोपडांच्या दारात बसलेल्या अल्सेशन कुत्र्याला त्याने काय गोंधळ घातलाय समजायचा मार्ग नव्हता. आधीच घरातले सगळे कुत्रा सांभाळण्याच्या विरोधात होते. शांतीलालशेठ चोपडा या बुजुर्ग व्यक्तिच्या विरोधाला न जुमानता हा कुत्रा त्यांच्या मुलाच्या मुलाने म्हणजे सागर याने घरी आणला. सुरवातीला त्याला विरोध करणारे शांतीलाल आता रोज त्याला सकाळी त्यांच्या बरोबर फिरायला घेऊन जाऊ लागले होते. गेले दोन दिवस ते बाहेर गावी गेल्याने हा कुत्रा त्याच्या सवयीने मोकळ्या प्लॉटवर त्याचे विधी उरकुन येताना त्याला एक वस्तु दिसली. या वस्तुचा वास त्याला आवडत होता. चाटल्यावर चवही चांगली वाटली पण बाहेरची वस्तु खाण्यायोग्य कि नाही हे न समजल्यामुळे त्याने ती वस्तु अलगद धरुन आणली आणी चोपडांच्या बंगल्याच्या बाहेर व्हरांड्यात त्या वस्तुकडे तो पहात बसला होता. जैन समाजाच्या घरात त्या कुत्र्याला नॉनव्हेज माहित नव्हते पण या वस्तुचा वास तर आवडत होता.
निर्मलाभाबी म्हणजे शांतीलालशेठ्च्या पत्नी सहजच बाहेर आल्या आणि कुत्र्याच्या तोंडातली ती गोष्ट पाहुन किंचाळल्या. ते किंचाळण येव्हड जबरदस्त होत की त्यांच्या बंगल्यातच काय आजुबाजुच्या बंगल्यात तो आवाज पोहोचला. घरातले सगळे " कई हुवे कई हुवे " करत बाहेर आले आणि पहातात तो काय त्यांच्या कुत्र्याच्या तोंडाजवळ एक मानवी हात होता. साधारण कोपाराच्या खाली वेडावा़कडा तुटलेला रक्ताळलेला तो हात काही भयंकर घडल्याची साक्ष होता. जे घडल होत ते इतक विपरीत होत की कोणाहाती उचलुन फेकुन देऊन मोकळ होता येत नव्हत. कारण आता त्याच्या आईने मारलेल्या किंचाळीने शेजारचे लोक जमले होते. शांतीलालजींचा मुलगा नरेश आता काय कराव याच्या विचारात पडला होता.
जरा सावध झाल्यावर नरेशने त्याचे मामा व जालना तालुक्यातले आमदार रतन गांधींना फोन लावला. त्यांनी ताबडतोब त्यांना १०० ला फोन लाऊन खबर द्यायचा सल्ला दिला. घरातुन बोलताना नरेश इतका घाबरला होता की त्याला आलेली खंडणीच्या धमकीचाच हा भाग असावा असा त्याचा समज झाला. रतन गांधी विरोधी पक्षाचे जागरुक आमदार होते. जेव्हा त्यांचा भाचा त्यांना खंडणीच्या फोनची गोष्ट आणि आज घडलेली घटना जुळवुन सांगता झाला तेव्हा त्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
"काही काळजी करु नको तु १०० ला फोन कर आणि निर्धास्त रहा मी गृहमंत्र्यांशी बोलतो आणि तसच काही असेल तर तुला प्रोटेक्शन द्यायला सांगतो. "असे जेव्हा मामा बोलले तेव्हा नरेशचा जीव भांड्यात पडला. घराच्या बाहेर येत त्याने चार लोकांच्या समोरच १०० ला फोन करुन मदत मागीतली. कंट्रोल रुम मधल्या पोलीसांनी कुत्र्याला शक्य असल्यास बांधुन त्या हाताला स्पर्श न करण्याची सुचना केली.
काही मिनीटात वेगाने पोलीसांच्या गाड्या हजर झाल्या व मुंबई पुणे हायवेपासुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगावाच्या त्या कॉलनीत आता प्रत्येकाला काही विपरीत घडल्याचे समजले होते आणि घराच्या बाहेर येऊन प्रत्येक जण दबक्या आवाजात चर्चा करत होते. सुरवातीला महामार्ग पोलिस हजर झाले. त्यांनी सारा प्रकार पाहुन पुणे ग्रामीणचे वडगाव पोलीस यांना माहिती दिली. आता मदतीची आवश्यकता नसुन पंचनामा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी कंट्रोल रुमला कळवले. वडगाव ग्रामीण पोलीस पण तातडीने हजर झाले. त्यातुन इन्सपेक्टर जाधव यांनी स्वतः घटना स्थळी येतो असे सांगीतल्याने कॉन्स्टेबल चोपडांच्या बंगल्याबाहेर पहार्यासाठी उभे राहीले.
जाधव येताच त्यांनी जवळजाऊन त्या हाताचे निरीक्षण केले. हाताचा पंजा नाजुक नव्हता. चांगला थोराड होता. नखांवर नेलपॉलिश अथवा मेंदी नव्हती यावरुन जाधवांना हा हात पुरुषाचा आहे हे ओळखण्यास फारसा अवधी लागला नाही. वेगवेगळ्या अॅगल मधुन फोटो काढल्यानंतर त्यांनी लोकांना पंचनाम्यासाठी पंच म्हणुन बोलावले. बघ्यांची गर्दी पांगली. त्यातुन दोनचार लोक पुढे आले आणि पंचनामा संपला. अजुन काही रक्ताचे डाग अथवा तत्सम अवशेष कुत्रा ज्या ठिकाणी फिरायचा त्या ठिकाणी शोधायचा आदेश त्यांनी आपल्या सहकार्यांना दिला. त्याच बरोबर तो हात योग्य त्या काळजीने त्यांनी पुढील तपासासाठी उचलुन व्हरांडा साफ करुन घ्यायच्या सुचना चोपडांच्या घरच्या लोकांना दिल्या.
आता जाधवांनी नरेशला धीर दिला. चोपडासाहेब आम्हाला सुचना आहेत. तुम्ही घाबरु नका. तुम्ही आम्हाला कळवल हे फार चांगल केल. लचांड नको म्हणुन तुम्ही हा हात कुठे फेकला असता तर अजुन गोंधळ वाढला असता. त्यांच्या नावाची प्लेट वाचत नरेश म्हणाला जाधवसाहेब येव्हड धैर्य आमच्यात कुठुन येणार? आम्ही आमच्या मामांचा सल्ला घेतला जे जालना जिल्हयात आमदार आहेत. त्यांनीच आम्हाला १०० ला खबर करायचा सल्ला दिला. आत्ता जाधवांची ट्युब पेटली की सकाळी सकाळी ही माहिती पुणे ग्रामीणच्या अधिक्षकांपर्यत कशी पोचली ? आजपर्यत घरात कुणालाही आपल्याला खंडणीचा फोन आल्याची चर्चा नरेशने केली नव्हती. फक्त मामांना तेही आत्ताच हा प्रकार घडल्यावर त्यांनी सांगीतले होते.
जेव्हा घरातल्या सगळ्यांना आत जायला सांगुन नरेशने जाधवांना घरात दबक्या आवाजात खंडणीच्या फोनची धमकी आठच दिवसापुर्वी आली होती. बिल्डरना अश्या धमक्या येतातच हे ओळखुन त्यांनी दुर्लक्ष केल होत असे सांगीतले. जाधव म्हणाले तुम्हाला अस म्हणायच आहे का की या धमकीचा पुढचा भाग म्हणुन हा कापलेला मानवी हात तुमची भिती वाढवण्यासाठी कोणीतरी मुद्दाम तुमच्या व्हरांड्यात टाकला असावा ?
नरेश म्हणाला तस नेमक सांगता येणार नाही. तुमच्या तपासाला दिशा मिळावी म्हणुन मी तुम्हाला हे सांगीतले. इन्सपेक्टर जाधवांनी हम.. असा आवाज केला व लगेच म्हणाले माझ्या माहितीप्रमाणे ही खंडणी मागणार्यांची पध्दत नाही. ते शक्यतो पुढे न येता फोन का करतात ? तुम्ही त्यांची नावानिशी आमच्याकडे तक्रार करु नये म्हणुन. असली भिती निर्माण करायला माणुस शोधायला हवा, त्याचा हात कापेपर्यत तो काय गप्प राहील ? आणि तो या सगळ्याप्रकारात समजा तो मेला आणि त्याची बॉडी गायब झाली तर त्याचे नातेवाईक काय गप्प राहतील ? मग तो हात नेमका तुमच्या दरवाज्यात टाकताना कोणी पाहिल तर सगळच संपल की. चोपडा साहेब तुम्ही तुमच्या जबाबात हव तर लिहा पण मी मला वाटते की तुम्हाला आलेल्या खंडणीच्या धमकीचा आणी या प्रकाराशी काहिही संबंध नसावा.
हा तर्क नरेशला पटला आणि त्यांनी दोन वेगवेगळे जबाब लेखनिकाच्या मदतीने लिहुन पोलिसांना दिले. इन्सपेक्टर जाधव जेव्हा पोलीस स्टेशनला गेले तेव्हा त्यांच्या हुशार साथीदारांनी मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर तळेगावच्या जवळ रस्त्यावर रक्ताचे डाग, वाळलेले मांस व कातडीचे तुकडे, एक दोन बारीक हाडांचे तुकडे इ चा शोध लावला होता. हा पुरावा आता नष्ट होऊ नये म्हणुन त्यांनी रस्त्याचा तो भाग बॅरिकेट लाऊन सुरक्षीत केला होता. हा पुरावासुध्दा इन्सपेक्टर जाधवांनी पंचनाम्याआधी डोळ्याखालुन घातला. त्यांची खात्रीच झाली की हा प्रकार महामार्गावर घडला असावा आणि तो तुटलेला हात चोपडांचा पाळिव कुत्रा घरी घेऊन आला असावा.
इन्सपेक्टर जाधवांनी जमा केलेला हात, त्याचे रक्त व रस्त्यावरले रक्त एकाच गटाचे आहे का ते पहायला सांगीतले तसेच सकाळी फिरायला जाणार्यापैकी कुत्र्याला हात उचलुन आणताना कोणी पाहीलेका याचा तपास करायचा आदेश त्यांच्या सहकार्यांना दिला. पुणे ग्रामीण अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना हे सर्व सांगीतले. त्यावर पुणे ग्रामीण अधीक्षक भांगरे पाटील यांनी तपास वेगाने करायच्या सुचना दिल्या. दोन दिवसांनी विधानसभेचे आधिवेशन सुरु होत आहे. जर रतन गांधींनी शुन्य प्रहरात जर कायदा व सुरक्षीतेचा प्रश्न उपस्थित केला तर गृहमंत्रांना निवेदन द्यावे लागेल आणि त्यासाठी हा प्रार्थमिक तपास हा वेगाने पुर्ण करावा. पुणे ग्रामीण अधीक्षकांची मुलाखत संपताना त्यांना टाचा जुळवुन सॅल्युट करुन त्यांनी हे प्रकरण स्वतः हाताळण्याची ग्वाही इन्सपेक्टर जाधवांनी दिली.
दुपारी ४ वाजेपर्यत इन्सपेक्टर जाधव यांच्या हातात "त्या हाताचे" वेगवेगळ्या कोनतुन काढ्लेले फोटो हातात पडले होते. प्रथम दर्शनी रस्त्यावर सापडलेले रक्त आणि हातावरचे रक्त यांचे ब्लड ग्रुप ही जुळले असल्याने हा प्रकार रस्त्यावरच घडला आणि कुत्र्याने तो हात चोपडांच्या घरी आणला हे त्यांनी जाणले. अस आहेतर ज्याचा हात कापला गेला तो माणुस कोठे आहे याचा शोध त्यांनी सुरु केला. सर्व पोलिस स्टेशन्सना याची खबर दिली गेली व कोणत्या हॉस्पीटलमधुन हात तुटलेल्या माणसावर उपचार झाल्याची खबर येते का ते पाहिले गेले त्याच बरोबर अन्य पोलीसठाण्यांच्या हद्दीत बेवारस प्रेत सापडले आहे का याची ही माहिती घेतली गेली.
तो कापलेला हात मिळुन २४ तास उलटले तरी तपासात फारशी प्रगती न झाल्याने इन्सपेक्टर जाधव अस्वस्थ होते. उद्या वरिष्ठांना काय सांगायचे या काळजीत "त्या हाताचे" ते फोटो पुन्हा एकदा निरखुन पहाताना त्यांना त्या हाताच्या मनगटावर एक रेषा दिसली. याच हाताची दुसर्या अॅगलने काढलेले, हात पालथा, उलथा ठेऊन काढलेल्या सर्व फोटोमध्ये हातात ज्या प्रमाणे कडे असावे अशी रेषा त्यांना दिसत होती. ह्या हातावर आधी काही शस्त्रक्रिया झाली असावी असा त्यांना संशय आला. ही रेषा म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान केलेली टाक्यांची शिवण असावी असा त्यांचा कयास झाला.
इन्सपेक्टर जाधव फोटो घेऊन उठले व जवळच्या हॉस्पीटलमध्ये एका ओळखीच्या सर्जनला भेटले. त्यांना फोटो दाखवल्यानंतर ही रेषा या हातावर केलेल्या शस्त्रक्रियेचीच खुण असुन ही टाक्यांची शिवणच आहे हे त्यांनी सांगतले. आणखी एक गोष्ट सर्जन यांनी महत्वाची सांगीतली ती अशी की हात त्या शिवणीच्या जागी किंचीत वाकडा झालेला असुन अपघातात तुटलेला हात जोडावा अशी ही शस्त्रक्रिया आहे. याबाबत पुण्याला डॉ. पाटील हॉस्पीटल फेमस असुन औद्योगीक अपघातातल्या अश्या शस्त्रक्रियेत डॉ. पाटील यांचा हात कोणी धरु शकत नाही.
इन्सपेक्टर जाधवांनी आता पुण्याचा रस्ता धरला. युनीफॉर्म तसाच ठेऊन ते त्यांच्या एका सहकार्यासोबत डॉ. पाटील यांच्या हॉस्पीटलमध्ये प्रवेश केला. डॉ. पाटील नुकतीच एक तुटलेल्या बोटावरची अवघड शस्त्रक्रिया आटोपुन बसलेले होते. रिसेप्शनिस्टने इन्सपेक्टर जाधव भेट घेऊ इच्छीतात असे सांगताच त्यांना आत पाठवायला सांगुन डॉ. पाटील सावरुन बसले. इन्सपेक्टर जाधव आत येऊन नमस्कार होऊन त्यांना बसायला सांगुन डॉ. पाटीलांनी चहा सांगीतला. आता बोला असे डॉ. पाटील म्हणताच "त्या हाताचे" फोटो दाखवत इन्सपेक्टर जाधव म्हणाले " ह्या हातावर तुम्ही शस्त्रक्रिया केलेली आहे का ? असल्यास याच काही रेकॉर्ड मिळेल का ?
ते फोटो पाहताच डॉ. पाटील यांनी वर्तमानपत्राची कात्रणे असलेली फाईल मागवली. पाचच मिनीटात त्यांनी मनगटापाशी संपुर्ण तुटलेला हात, त्यावरची शस्त्रक्रिया केलेला कामगार याचा व त्याच्या जोडलेल्या हाताचा फोटो असलेली बातमी शोधुन काढली. साधारण महिना व साल सापडल्यानंतर पाच वर्षांपुर्वीची संपुर्ण केसच त्यांनी रेकॉर्ड रुम मधुन काढली.
दामु देवकर हे त्या कामगाराच नाव होत. भोसरी इथल्या छोट्याश्या कारखान्यात प्रेस मशीनवर अपघात होउन त्याचा डावा हात मनगटापासुन संपुर्ण तुटला होता. तासाभरात त्याला तुटलेल्या हातासह कारखाना मालकाने डॉ. पाटील यांच्या हॉस्पीटलमध्ये आणल्याने अश्या प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया डॉ. पाटील यांनी केली. महत्वाच म्हणजे ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊन तीन चार महिन्यात दामुचा हात पहिल्यासारखा काम करु लागला होता. एक वेगळी केस म्हणुन जेव्हा दामु पुन्हा त्याच कारखान्यात जाऊ लागला व पर्यायी काम प्युन म्हणुन काम करु लागला त्याचे फोटो डॉ. पाटील यांनी त्या कारखान्यात जाऊन काढले होते.
" तो हात " ही डावा, पुरूषाचा व कारखान्यात काढलेले शस्त्रक्रियेनंतरचे हाताचे फोटो व पंचनाम्यादरम्यान काढलेले फोटॉ मॅच झाल्यानंतर आता याच मार्गाने दामुला शोधावे हे इन्सपेक्टर जाधव यांनी ठरवले. आज सकाळी दिशा मिळालेली पाहुन इन्सपेक्टर जाधव खुष झाले. डॉ. पाटील यांच्याकडुन त्यांनी त्यांच्या सहकार्याला हातचे फोटो व इतर कागदपत्रांच्या प्रती घ्यायला सांगुन इन्सपेक्टर जाधवांनी भोसरीतल्या त्या कारखान्याकडे जीप घ्यायला ड्रायव्हरला सांगीतले.
तो छोटासा कारखाना भोसरी इंडस्ट्रीयल एरीयात शोधायला इन्सपेक्टर जाधवांना फारसा वेळ लागला नाही. युनीफार्ममधला इन्सपेक्टर पहाताच सिक्युरीटीची धावपळ उडाली. कोण पाहिजे असे विचारुन त्यांना वेटींग हॉल मध्येच थांबवुन धरले. कारखान्याचे मालक श्री पद्मनाभन स्वतः इन्सपेक्टर जाधवांना न्यायला वेटींग हॉलमधे आले. ह्स्तांदोलन झाल्यावर इन्सपेक्टर जाधवांना आपल्या केबीनमध्ये घेऊन गेले. समोर फोटो ठेवताच पद्मनाभन आपल्या मोडक्या तोडक्या मराठीत बोलु लागले
" येव्हड्या छोट्या कामाला आम्हाला बोलवयच होत साहेब".
"जरा अर्जंट आहे म्हणुन स्वतःच आलो "इन्सपेक्टर जाधव म्हणाले.
" काय आहे साहेब दामु ने एक वर्षापुर्वी आमची नोकरी सोडली आहे. त्याचा ठाव ठिकाणा त्याच्या पर्सनल फाईल मधे मिळेल. काय वेडा आहे हा माणुस. याचा पी.एफ.चा फॉर्म, ग्रॅच्युटी न घेताच गायब झाला. राजीनामा एकाच्या हाती पाठवुन दिला. स्वतः भेटायला पण नाही आला.
श्री. पद्मनाभन यांनी दामुची पर्सनल फाईल मागवली. त्यातला घरचा पत्ता इन्सपेक्टर जाधवांनी लिहुन घेतला.
"मी इथे याच्यासाठी आलो होतो हे गुप्त ठेवा पण तुम्हाला दामुची काही माहिती मिळालीतर मला माझ्या मोबाईलवर कळवा." खास पोलीसी भाषेत त्यांनी पद्मनाभनला सांगीतले. आपल व्हिजीटींग कार्ड त्याच्या हातात देऊन नजर मिळवताना त्यांना पदमनाभन उगाचच गोड बोलतोय हे जाणवल. कदाचीत ही अॅक्सीडेंट्ची केस पुन्हा पोलीसांनी ओपन केली की काय याची माहिती काढण्याचा त्याचा प्रयत्न असावा
"काय साहेब भानगड काय ?" पद्मनाभन ने तरीही अजिजीत विचारले.
"सध्या इतकच तुम्हाला माहित असण पुरेसे आहे" इन्सपेक्टर जाधव पद्मनाभनला तोडत हसत म्हणाले आणि उठले.
हे सर्व होईस्त्वर दुपारचे दोन वाजले होते. पोटात कावळे ओरडत होते पण इन्सपेक्टर जाधव आता सोडायला तयार नव्हते. न जाणो एका मिनीटाकरता एखादा पुरावा निसटला तर आपल्या करीयरला घातक ठरायचे. अश्या केसेस काय पुन्हा पुन्हा मिळत नसतात. त्यांनी ड्रायव्हरला पत्ता सांगत जीप त्याच्या घराच्या पत्यावर वळवली. भोसरी इंडस्ट्रीयल एरीयात अनेक लहान मोठ्या कामगार वस्त्या होत्या. त्यातल्या एका वस्तीत गाडी घुसताच पैसे लाऊन पत्ते खेळणार्यांची धावपळ झाली. मटकेवाला बुकी सलमान ही सावरुन बसला. ह्प्ता गोळाकरायला पोलीस रिक्षातुन येतात त्यातुन ही गाडी ग्रामीण पोलीसांची काही भानगड कळेना. शेवटी पुढे होऊन त्यानेच सलाम करत विचारले
"काय शोधता आहात साहेब ? "
इन्सपेक्टर जाधव त्याच्याकडे पहात म्हनाले दामु देवकर नावाचा कामगार गव्हाणे चाळीत रहातो त्याला शोधतोय. सलमान ने त्याच्या पंटरला विचारले कोन रे ये दामु ? त्याचा पंटर म्हणाला "वो नही क्या उस्की बहेन वापस आयी थी." आजकल वो इधर रहता नही. वो अभी ड्रायव्हर बनेला है. एक बार पुनामे देखा था उस्को. रेबन का गॉगल डाल के बडे थाट मे था. गाडी किसकी चला रहा है करके देखा तो वहीच उसकी बहेन वो भी बडे थाट मे थी. अपुनको पहेचान्नेको भी तय्यार नही था. किधर हात मारा साले ने कुछ पता नही चला."
"दामु कबसे तुम्हारा साला हुवा ?" दुसरा एक पंटर त्याच्या टिप्पनीवर तुटुन पडला. " दामु तो बडे आदमी का साला बन गया था. मतलब उसके बहेन ने वो बडे आदमी के साथ शादी नही बनायी थी. वो ऐसेच रहती थी. उसकी बहेन को शिवाजीनगर मे अल्लग फ्लॅट और मारुती भी दिया है वो बडे आदमी ने . दामु अपनी बहेनका ड्रायव्हर बन गया था. इसलियेच पर्मनंट नोकरी छोडी थी. एक ही बात का गम था उस्कु, उस्की बहेन रखेल थी बडे आदमी की.लेकीन क्या थाट था उसका. मेरेको इंग्लीश पिलाई थी उसने. बडे बार मे उसका अकाऊंट था.
"तु शेवटी कधी भेटलास दामुला? "इन्सपेक्टर जाधवांनी त्या पंटरला बाजुला घेत विचारले.
साहब एक महिना हुवा होगा. बडा ही दुखी था. शराब तो ऐसी पी रहा था की जैसे शराब का दिवाना हो. उसकी बहेन मर गयी. फिर बडे आदमीने उसको गाव जाकर खेती संभालने कि बोला. उसको वो जमा नही फिरसे पुना आया. कही काम कर रहा था. इस बार वो बार का उसका अकाउंट बंद हो गया था. मुझे नही लगता वो जादा दिन जियेगा. दारुने उसको खा लिया था.
" चल बस गाडीत दाखव मला तो बार " इन्सपेक्टर जाधवांनी त्याला काखोटीला घरले. " छोडो साहब गरिब को कहा फसा रहे ?" पंटर गयावया करु लागला.
"काही नाही रे तु चल फक्त मला बार दाखव आणि परत ये." इन्सपेक्टर जाधवांनी खुण करताच एका पोलीसाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याला उचलले आणि जीप मध्ये घातले.
"साला फस गया" सलमान गाडी जाताच पुटपुटला. " बहोत लंबी जबान इसकी, कितनी बार समझाया बुकींग ले और खिसक्ते जा. लेकीन नही. दामु की बहेन वो पार्टी के लीडर रखेल थी ये तो सारे दुनीयाको पता था. हमने काय को जबान नही खोला ? हमको मालुम है. ये पोलीसलोग अपने पंटर को अब नही छोडेंगे."
गाडी आता शिवाजीनगर कडे चालु लागली होती. दुपारचे तीन वाजले होते. मध्येच एका पोलीस स्टेशनला गाडी थांबली आणि इन्सपेक्टर जाधव यांच्या सकट सर्वांनी युनीफॉर्म काढुन सिव्हील ड्रेस धारण केले. पंटरला लक्षात आले की आता गेम होणार. गाडी पण बदलली गेली आणि आता पोलीस व्हॅन ऐवजी साध्या कारमधुन वाकडेवाडी जवळच्या बार जवळ गाडी आली. लांबुनच बार दाखवल्यावर पंटरची सुटका होईल असे वाटत असताना इन्सपेक्टर जाधवांनी तो रहात कुठे होता त्याची चौकशी सुरु केली.
बिबी बच्चोकी कसम मै कभी दामु के घर नही गया म्हणुन पंटर रडु लागला. साब मुझे छोडो. मै दामुकी खबर मिलतेही आपको इतला कर दुंगा. पंटरच काम आटपल होत. त्याला सोडुन देऊन त्यांनी आणखी स्टाफ मागवला. यात मोठी व्यक्ती गुंतली आहे म्हणल्यावर दामु किडनॅप होण्याची शक्यता दिसत होती. कदाचित दामुचा खुन सुध्दा होण्याची शक्यता दिसत होती. शिवाजीनगर पुणे इथल्या पोलीसस्टेशनच्या मदतीने त्यांनी आणखी दोन हुशार कॉन्स्टेबल्स घेतले ज्यांना या एरीयाची खडानखडा माहिती होती. वडा पाव खात खात बार मधे कसे घुसायचे, कोणाला जाळ्यात प़कडायचे आणि माहीती घ्यायची याचा गेम प्लॅन झाला.
संध्याकाळचे सात वाजले, बार नुकताच सज्ज झाला होता. साधारण मध्यमवर्गिय लोकांचा हा आवडता बार होता कारण इथे पेग सिस्टिम नव्हती तर निप सिस्टिम होती. त्याच बरोबर बर्यापैकी नॉन व्हेज मिळत असल्यामुळे या बारची चलती होती. सर्व वेटर आता सज्ज होते. जाधव साहेब आणि स्टाफ कारमध्ये ड्रायव्हरला तयार रहायला सांगुन बार मधे घुसला. त्यातल्या त्यात गरीब दिसणार्या वेटरकडे त्यांनी दामुचा फोटो दाखवुन विचारणा केली. साहेब मला यावी फार माहिती नाही तुम्ही पन्नालाल ला विचारा. तो बघा समोर उभा आहे.
पन्नालाल तयारीचा होता. त्याने कानावर हात ठेवले. गेल्या आठ दिवसात दामु आला नसल्याची माहिती त्याने दिली. आजकाल त्याच्याकडे पैसे नसायचे त्यामुळे फार कम वेळा तो इकडे यायचा.
"किती पैसे उधार घेतले होते दामुकडुन "जाधव साहेबांनी एक गुगली टाकला. वेटर लोकांची नेहमीच्या ग्राहकाकडुन उसने पैसे घेण्याची सवय लक्षात ठेऊन फेकलेल जाळ होत ते.
"फार नाही साहेब फक्त २० हजार बाकी होते साहेब. पण तुम्हाला काय माहित हे ?" आता पन्नालाल घाबरला होता.
एक डेड बॉडी सापडली आहे. त्यातल्या चिठ्ठीत तुझ नाव आहे. उसने पैसे परत न मिळाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे असा मजकुर आहे. चला डेड बॉडीची ओळख पटवुया, कॉन्स्टेबल शिंदेने पन्नालालच चेहरा वाचत न लिहीलेली सुसाईड नोट वाचली. पन्नालाल घाबरला " साहेब मला फसवल गेलय. दामुने कधीच मला आत्महत्येची धमकी दिली नव्हती. तो पिल्यावर इथे गोंधळ घालायचा पण मला कधीच काही बोलायचा नाही.
चल पोलीसस्टेशनला जाऊ बाकीची माहीती तिथे घेऊ. जाधवसाहेबांसहीत चार जण पन्नालालला घेऊन बाहेर पडले. एक किरकोळ वाटणारा हवालदार तिथेच कॅशीयर समोर बियरची ऑर्डर देऊन बसला. कॅशीयरच्या चेहेर्याचे हाव भाव पहात. यात अजुन काही लोक गुंतले असणार याची खात्री असल्याने जाधवसाहेबांनीच त्याला मागाहुन बार मधे यायला सांगीतले होते.
पन्नालालला बोलता करायला वेळ लागला नाही. दामुचे म्हणणे होते की त्याच्या बहिणीने आत्महत्या केलेली नव्हती तर तीचा खुन झाला होता. दारु चढली की हेच तो मोठ्या मोठ्याने बडबडु लागे. यास्तव त्याचा काटा काढला गेला असणार. दोनच दिवसापुर्वी तो बार मध्ये आला होता. पोलीसांच्या भितीमुळे त्याने आठ दिवसापुर्वी आल्याचे सांगीतले. त्याही दिवशी त्याला चढली होती. काही लोकांनी त्याला आणखी पाजली. ते लोक फारसे ओळखीचे नव्हते. चल तुला घरी सोडतो म्हणुन ते त्याला घेऊन गेले.
इ़कडे कॅशीयरने कोणाला तरी फोन केला व काही गुप्त बोलणे झाले. बार मध्ये पोलीस येऊन गेल्याचा तो इशारा संबधीतांना होता. कॅशीयरने हे बोलणे कोणाशी केले हे समजायची सोय नव्हती पण त्याने लॅड लाईनवरुन बोलणे केले होते त्यामुळे हे शोधणे आता सोपे झाले होते.
बार मध्ये बसलेल्या हवालदाराने ही माहीती जाधव साहेबांना पुरविली आणि आणखी एक टिम आत बी. एस. एन. एल. च्या ऑफिसमध्ये गेली. बारच्या लॅड लाईनवरून कोणाला कॉल झाले ते नंबर आता उघड झाले.
पन्नालालला आणखी घोळल्यानंतर त्या लोकांपैकी एकाचे नाव सांगीतले. सदा सराईत गुन्हेगार आहे हे ओळखल्यानंतर जाधवांच्या टिम पैकी स्थानीक पोलीसांची टिम या गुन्हेगाराच्या शोधात निघाली. यांना त्याचा ठाव ठिकाणा कसा शोधायचा माहीत असल्यामुळे रात्री बाराला सदा त्याच्या गँगमधील साथीदारांसह पुण्याजवळ वाघोलीला जेरबंद झाला.
एकेकाला वेगळे घेत जी स्टोरी कळली ती धक्का दायक होती. सदाला या कामाची सुपारी मिळाली होती. अतिशय निष्काळजी पणे त्यांनी दामुला बार मधुन उचलला होता. त्यांचा प्लॅन असा होता की पुण्यापासुन दुर दामुला व्हॅन मधुन असा धक्का द्यायचा की तो हायवेवर ओव्हरटेक करणार्या ट्र्क खाली यावा. सध्या त्याचे कोणी नातेवाईक नसल्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार होणार नाही. आणि झालीच तर दारू पिऊन गाडी खाली आला असे नोंद होईल. मुद्दाम सदाने दामुला व्हॅनच्या कडेला बसवले व रात्री ३ वाजेपर्यत इकडे तिकडे फिरवले. आणखी दारु पाजली. आता जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरुन पुढे उर्से टोलनाक्यावरुन मुंबईकडे जायचा त्यांचा प्लॅन होता. जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरुन जाताना दामुने सिगरेट पेटवीली. सिगारेट पेटवीलेली काडी बाहेर टाकताना त्याने आपला डावा हात व्हॅनच्या बाहेर काढला. त्याच वेळी व्हॅन एका वाहनाला ओव्हर टेक करत होती. समोरुन अचानक वहान आल्यामुळे व रस्ता लहान असल्यामुळे ओव्हरटेक करताना व्हॅन डावीकडे आली व दामुचा हात दोन वाहनांच्या मधे येऊन तुटला. हे लक्षात येई पर्यत गाडी अर्धा किलोमीटर पुढे आली होती.
दामुची नशा उतरली तो बोंबलु लागला आणि सारा प्लॅन ऐन वेळी बदलावा लागला. याला जुन्या प्लॅन प्रमाणे याला गाडी खाली ढकलला तर याच्या तुटलेल्या हाताची बॉडी आणी उद्या रस्त्यावर सापडलेला हात याची लिंक लागेल अशी भीती सदाला वाटली. यामुळे त्याने गाडी उर्से टोलनाक्याकडे घेण्याऐवजी चाकण रोड्ला घ्यायला सांगीतली. एकदा तळेगाव पास झाले की चाकण पर्यत हा रस्ता सुनसान असतो.
या सुनसान रस्त्यावर नेमका रस्त्याच्या बाजुला एक खड्डा खोदलेला मिळाला. बाजुला मातीही बरीच होती. दामुच काम तमाम करुन त्याला खड्यात पुरून सदा आणि मंडळी वाघोलीला लपुन बसली. दोन दिवस तरी काहीच चर्चा न झाल्याने खुन पचला या आनंदात होती कारण दामु लापता आहे याची खबर देणारे त्याच्या कुटुंबात कोणच नव्हते.
----------------------------------------------------------
तिसरा दिवस, जाधवांना गुन्हा घडला ती व्हॅन व दामुचे प्रेत शोधायचे होते. अचानक त्यांना पुणे ग्रामीण अधीक्षकांचे बोलावणे आले. जाधव तिथे जाताच भांगरेपाटील साहेबांच्या समोर पुणे शहरचे अधीक्षक बसलेले दिसले. त्याच्या बरोबर शिवाजीनगरचे पोलीस इन्सपेक्टर ही दिसत होते. भांगरेपाटील साहेब म्हणाले "या गुन्ह्याची सुरवात पुणे शहरात झाल्यामुळे हा केस आपण पुणे शहर पोलीसांना द्यावी अस ठरलय तेव्हा सगळी कागदपत्रे देऊन टाका. यांनी काही सहकार्य मागीतलेतर तुम्ही द्या असा माझा आदेश आहे."
इन्सपेक्टर जाधवांना "येस सर" म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. जेव्हा सदाचा संबध या केस मधे आला तेव्हाच ते समजले होते की ही केस हाततुन जाणार. इतका तपास करुन या केसच काय होणार त्यांना तेव्हाच समजल होत जेव्हा सदाची तडीपारीची ऑर्डर रद्द झाली होती हे समजले होते . या केस मधे सदाच नाव येण म्हणजे तडीपारीची ऑर्डर योग्यच असे सिध्द होणे होते. ज्यांच्या करता सदाने हे सर्व केल ती मोठी व्यक्ती गप्प रहाण अशक्यच होत.
----------------------------------------------------------
रतन गांधींनी दोन दिवसात काहीच न कळल्यामुळे विरोधी पक्ष नेत्याला फोन लाऊन भेटीची वेळ मागीतली होती. त्यांच्या कडुन भेट मिळायच्या ऐवजी गृहसचिवांचाच त्यांना फोन आला. गृहखात्याकडे तुम्हाला अपेक्षीत केसचे असे रिपोर्ट आलेले असुन ते पहावेत असे सांगीतले गेले. विधानसभेत आपण पुण्याच्या कायदा व सुरक्षीततेचा प्रश्न उपस्थित करु नये असा जणु इशाराच विरोधी पक्षनेत्याने आपल्याला दिल्याचे हे संकेत होते हे रतन गांधीनी जाणले.
या तुटलेल्या हातच्या मागे अनेक मोठ्याचे हात पोळणार म्हणुनच ही व्युहरचना असल्याचे त्यांना कळले.
गप्प रहातील ते गांधी कसले ? त्यांनी आपल्या एका वृत्तपत्राच्या समुहाच्या प्रमुखाला फोन लावला. पुढचे काही दिवस काहीच वर्तमानपत्रे पुण्यातील गुन्हेगारांच्या तडिपारी रद्द कश्या झाल्या यावर आग ओकत राहीले. आणखी काही दिवसांनी हे शांत होणार हे नक्की पण आपली किंमत दाखवल्याशिवाय राजकारणात तरणोपाय नसतो हे पण आमदार रतन गांधीना पक्के माहित होते.
पहिलाच प्रयत्न चांगला जमलाय
पहिलाच प्रयत्न चांगला जमलाय
पण शेवट जरा गुंडाळल्यासारखा वाटतोय.
पु ले शु
छान लिहिलयं.. आवडली कथा..
छान लिहिलयं.. आवडली कथा..
छान कथा.. सुरवातीपासुन जरा
छान कथा.. सुरवातीपासुन जरा वेधक पण शेवट तेव्हढा पोलीसांनी चातुर्य दाखवुन गुन्हेगारांना शासन केले कि नाहि किंवा कसे हे समजले नाहि. मोठे लोक असले म्हणुन काय झालं कायदा सगळ्यांना सारखाच ना?
लाजोला अनुमोदन. शेवट जरा
लाजोला अनुमोदन. शेवट जरा विस्तारीत लिहिला आला असता, असो बाकि शैली छानच.
वाचायच्या आधीच... पोलीस
वाचायच्या आधीच... पोलीस चातुर्यकथा फारश्या लोकांना आवडत नाहीत. >> नाही हो, चवीने पोलीस टाईम्स वाचणारे तर कित्येक बघितलेत.. आणि "CID" lovers तर अगणित... ऑफीसात चर्चा झडतात दया, अभिजीत, ACP आणि teamच्या...
व. कृ. जोशीच्या पोलीस कथा, जेम्स हॅडले च्या पोलीस आणि गुप्तहेर कथा म्हणजे मेंदूला खाऊ...
---क्रमशः
कथा वाचल्यावर उर्वरित...!!!
ह्म्म्म.. शेवटी गुंता नीट
ह्म्म्म..
शेवटी गुंता नीट नाही उकलला , त्यामुळे कथा अपुरी राहील्यासारख वाटतयं.
मलाही इन्टरेस्टिंग वाटली.
मलाही इन्टरेस्टिंग वाटली. शेवट अजून रंगवता आला असता का?
छान.
छान.
सुरूवात उत्कंठावर्धक... शेवट
सुरूवात उत्कंठावर्धक... शेवट अधांतरी... पण प्रयत्न छान आहे.. अजून काहीतरी जास्त 'शोधकथा' (फक्त पोलीसकथा नव्हे :), गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचून गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहीजे... )
मोठे लोक असले म्हणुन काय झालं कायदा सगळ्यांना सारखाच ना?>> भारतीय कायदा सर्वांना सारखा नसतो... न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी असते ते नि:पक्ष न्याय करण्यासाठी नव्हे... डावं उजवं झालं तर डोळ्यांवर पट्टी आहे चा बहाणा मिळावा म्हणून!
नाहीतर भारतासारख्या देशात कोट्यावधी रूपयांचे लाचलुचपत करणारे आणि 'गरीबांच्या तोंडचा घास' काढून त्यावर कित्येक करोडोंची उलाढाल करणारे तथाकथित 'व्हाईट़कॉलर' राजकारणी, मंत्रीमंडळात उजळमाथ्याने बसले नसते...
गुन्हेगार शोधला म्हणजे त्याला
गुन्हेगार शोधला म्हणजे त्याला शिक्षा झालीच पाहिजे अस आपल्याला वाटत. प्रत्यक्षात अस घडतच अस नाही. गुन्ह्याचा तपास योग्य झाला की त्यात काही हस्तक्षेप झाला यावर बरच काही अवलंबुन असते. ही पोलीस चातुर्यकथा जेव्हा इन्सपेक्टर जाधवांकडुन केस दुसर्याकडे जाते तेव्हाच संपते. नंतरचा भाग हा त्याला जोडला जाणारा अपरिहार्य भाग रहातो.
शेवट पुर्णपणे गून्डाळला आहे.
शेवट पुर्णपणे गून्डाळला आहे. कोण मोठा? कोणाचे हात पोळणार?
कथा अर्धवट सोडल्यासारखी जाणवते.
प्रॅक्टिकल कथा. मस्तच.
प्रॅक्टिकल कथा. मस्तच.
कथा खुप छान आहे...पण मलाही
कथा खुप छान आहे...पण मलाही शेवट अपुर्ण वाटला..
हम्म. जमली आहे...
हम्म.
जमली आहे...
तुमच्या सगळ्यांच्या
तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर याचा उत्तरार्ध लिहिता येतोय का पहातो ज्यात विस्ताराने लिहीता येईल.
आवडली!
आवडली!
नितीन अभिनंदन...पहिलीच पोलीस
नितीन अभिनंदन...पहिलीच पोलीस कथा इतकी चांगली आणि वास्तववादी ? मस्त रे... मला आवडली कथा..काही केसेस मधुन पोलीसांना सुद्धा कसे सराईतपणे बाजुला सारले जाते हे मला माहीत आहे...मी गेलोय त्यातुन...
माबोकरांनो मी प्रथमच पोलीस
माबोकरांनो मी प्रथमच पोलीस चातुर्य कथा लिहीत आहे. पोलीस चातुर्यकथा फारश्या लोकांना आवडत नाहीत. त्यातुन कथेचा काही भाग हा बिभत्स या रसाच्या अमला खाली गेल्याने आणखीनच वाचक वर्ग कमी होतो परंतु मला स्वतःला हा कथाप्रकार आवडत असल्यामुळे या कथेची निर्मीती झाली आहे. सांगा कशी वाटली ही कथा. >>
मला पोलिसा चातुर्याच्या कथा सुद्धा खुपाच आवडतात. तुम्ही आशा प्रकारच्या कथा सुद्धा लिहाव्या ही विनंती. लिहिता रहा. शुभेच्छा .
dreamgirl >> सहमत
dreamgirl >> सहमत
नितीन चांगली जमलीये कथा...
नितीन चांगली जमलीये कथा... आणि त्यात आलेला सध्याचा मुद्दापण चांगला आहे.. वरुन दबाव आल्यामुळे केस दुसर्या अधिकार्याकडे जाणे किंवा बंदच होणे असे प्रकार बर्याच वेळेस होत असणार..
तसेच सध्या कोर्टाच्या आदेशाच्या तडिपारी रद्द करणे हा प्रकार तर सर्रास चालू आहे पुणे पोलिसांत.. त्यामुळे काही वाईट घटना पण नुकत्याच घडल्यात..
नितिन, कथा उत्तम आहे पण शेवट
नितिन,
कथा उत्तम आहे पण शेवट जरा नीट करता आला तर पहा.
पोलीस चातुर्यकथा फारश्या लोकांना आवडत नाहीत>>>>मला नाही असे वाटत. उलट या कथा आवडीने वाचल्या जातात.
पुलेशु.
हातावर शिक्का मारला की असं
हातावर शिक्का मारला की असं होत असावं...
मला तर आवडली बाबा टाकत जा ओ,
मला तर आवडली बाबा टाकत जा ओ, सुरेश शिंदे च्या निदानचातुर्य कथे सारखीच पोलीसिचातुर्य कथा वाचायला आवडेल आम्हाला