कथा

सैनिकाच्या गोष्टी - मी अनुभवलेलं सिक्किम (१)

Submitted by शरद on 23 June, 2010 - 06:16

तर त्या काळात मी सिक्किम इथे होतो. धरतीवरचा स्वर्ग कुठे असे कुणी विचारले तर मी "सिक्किम' असेच उत्तर दिले असते; अजूनही देतो. म्हणजे आमीर खुसरो जर काश्मीरच्या ऐवजी सिक्किमला आला असता तरी हेच म्हटला असता, "अगर फिरदौस बा रुह जमिनस्त, हमीनस्तो, हमीनस्तो, हमिनस्त!!" (हे तो काश्मीरच्या बाबतीत म्हटला होता म्हणे! - "पृथ्वीवर स्वर्ग जर कुठे असेल, (तो) इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे!!" काश्मीर, स्वित्झरलँड यांचे सौंदर्य त्यांच्या त्यांच्या जागी. पण सिक्किम म्हणजे सिक्किम. म्हणजे मी १९८३-८४ सालची गोष्ट करतोय. आताही त्यात फारसा बदल झालाय असे वाटत नाही.

गुलमोहर: 

विहीर

Submitted by साजिरा on 23 June, 2010 - 05:26

परीक्षेचा शेवटचा पेपर संपला आणि रस्त्याने पायी घरी येताना मला अगदीच सुनं सुनं वाटू लागलं. हे नेहेमीचंच. पेपर लिहून घरी आलं की, प्रचंड पोकळपोकळ वाटायचं. डोकं रिकाम्या घड्यागत आणि पायात कुणीतरी जड लोखंडाच्या वस्तू अडकवल्यागत. समुद्रात किल्ला बांधताना शिवाजी महाराजांचे लोक तळाशी जडभदक शिसं का काय ते ओतायचे आणि त्यात किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंती रोवायचे म्हणे. तर त्या भिंतींना नंतर आयुष्यभर जे काय वाटत असेल, तस्संच मला त्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी वाटायचं. पुस्तकांतून घोकून डोक्यात छापून टाकलेल्या इतक्या त्या धड्यांचं आणि प्रश्नोत्तरांचं आता काय करावं हेच कळायचं नाही.

गुलमोहर: 

सदेह वैकुंठागमन

Submitted by सुनिल जोग on 23 June, 2010 - 00:43

वारीचे वेध लागले की मला आठवतो तो जुना 'संत तुकाराम' पिक्चरमधला शेवटचा प्रसंग ! तुकारामाना न्यायला विमान आलेय आणि ते त्यात बसून ते वैकुंठाला सदेह जातात. लहानपणी अगदी लक्षात राहिलेला प्रसंग !

पण अगदी तस्साच प्रसंग पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात आला असे सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवाल ? सांगतो ऐका.

गुलमोहर: 

पूर्वनियोजीत : भाग २

Submitted by विशाल कुलकर्णी on 22 June, 2010 - 03:43

पूर्वनियोजीत : भाग १

"गर्दनच उडवलीया धाकल्या राजांनी ... वैनीसायबांची.....! त्येंच्यासाठी खायाला खिर करत व्हत्या वैनीसायेब, अचानक माणिकरावराजांनी कोपर्‍यातली इळी उचलली आन वैनीसायबांच्या मानंवरच घाव घातला की..........! वैनीसायेब जागच्या जागेवर ..............!"

सुभेदार वेगाने आतल्या खोलीत धावले.

त्यांच्या पत्नी, वाड्याच्या वैनीसाहेब रक्तबंबाळ अवस्थेत स्वयंपाकघरात पडल्या होत्या, त्यांची अर्धवट तुटलेली मान एका बाजुला लोंबत होती. आणि अकरा-बारा वर्षाचे माणिकराव त्यांच्या मृत कलेवराला मिठी मारुन टाहो फोडीत होते................

गुलमोहर: 

वादळ

Submitted by सुनिल जोग on 19 June, 2010 - 04:54

आरशासमोर शीळ घालत भांग पाडण्याची सवय पीटरच्या इतकी अंगवळणी पडली होती की शीळ आधी की भांग आधी - केंव्हा कुठच्या गाण्याची शीळ वाजवायची हे सारं न ठरवताच सवयीनं आपोआप घडत असे. आज भांग पाडत असतांना केसात डोकावू लागणार्‍या तुरळक रुपेरी कडांकडे त्याचं नकळत लक्ष गेलं आणि त्याच्या स्पोर्टीव्ह मूडने वास्तवावर लँडिंग केलं.

गुलमोहर: 

पूर्वनियोजीत...

Submitted by विशाल कुलकर्णी on 14 June, 2010 - 03:10

स्थळ : कुंतलानगरी

काळ : अज्ञात... कदाचित काही हजार वर्षांपुर्वी....

"महावीर, महाज्ञानी, महादानी, अतुल पराक्रमी, क्षत्रीय शिरोमणी, राजराजेश्वर कुंतलाधिपती श्री श्री श्री मुकुलसेन महाराजांचा विजय असो"

भालदार - चोपदारांनी भुदेवांच्या आगमनाची वार्ता दिली तसे सगळा दरबार स्तब्ध होवून उभा राहता झाला. आपल्या लाडक्या महाराजांचे अभिवादन करण्यासाठी दरबारात उपस्थित असलेले सर्व प्रजाजनही आदराने उभे राहून मुख्यद्वाराकडे उत्सुकतेने पाहू लागले. साधारण एक मासापुर्वी मृगयेला म्हणून कंधारकाननी गेलेले मुकुलसेन महाराज आज पुन्हा दरबारात परतत होते. आपल्या राजाचे स्वागत करायला सारी जनता उत्सुक होती.

गुलमोहर: 

बिलंदर : अंतीम

Submitted by विशाल कुलकर्णी on 10 June, 2010 - 03:40

रावराणे साहेब तसेच बाहेर पडून ८०१ कडे पळाले. दार जोरात ढकलून त्यांनी आत प्रवेश केला. समोर दोन तरुण उभे होते. त्यातल्या एकाकडे बघून त्यांना शॉकच बसला........

"तू.......? हे सारं तू केलंस? मला विश्वास बसत नव्हता. याने जर सारे पुरावे दिले नसते तर मी विश्वास ठेवुच शकलो नसतो."

बोलता बोलता त्यांनी दुसर्‍या तरुणाकडे हात केला. तो शांतपणे त्या दोघांकडे पाहात होता. त्याच्या डोळ्यात मात्र काही वेगळेच भाव होते. क्षणभर रावराणेंना त्याच्या डोळ्यात अश्रु तरळल्याचा भास झाला.......

बिलंदर : भाग १

गुलमोहर: 

निर्धार

Submitted by नितीनचंद्र on 8 June, 2010 - 01:13

काळ्या रंगाची वायल,मॅचिंग सर्वकाही, माफक परंतु उठावदार असा मेकअप करुन रुपाली चिंचवड - पुणे मार्गाने जाणार्‍या बसेसच्या १६ नं बस स्टॉपवर उभी होती. लोक तिच्या सौंदर्याकडे तर ती लांबुन येणार्‍या बसकडे पहात होती. आपली बस तिने लांबुनच ओळखली आणि आट्यापाट्या करायला पोझिशन घेतली. बस बसस्टॉपवर थांबवायची नसते, एकतर ती खुप पुढे नाहीतर मागे थांबवयची हा पि. एम. पी. एम एल. वाल्यांचा अलिखीत नियम आता तिला पाठ झाला होता. स्टॉप वर सकाळच्यावेळी उभे राहुन लोकांना मार्गदर्शन करणे, बस योग्य जागी थांबवणे, म्हातारे, लेकुरवाळ्या बायका यांनी चढायचा आधीच बस सुरु होऊ न देणे इ.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा