वारीचे वेध लागले की मला आठवतो तो जुना 'संत तुकाराम' पिक्चरमधला शेवटचा प्रसंग ! तुकारामाना न्यायला विमान आलेय आणि ते त्यात बसून ते वैकुंठाला सदेह जातात. लहानपणी अगदी लक्षात राहिलेला प्रसंग !
पण अगदी तस्साच प्रसंग पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात आला असे सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवाल ? सांगतो ऐका.
माझ्या कंपनीत एक डायरेक्टर होता - टेरी मॅक्स्ट्राव्हिक त्याचे नाव -आपण त्याला फक्त टेरी म्हणू.तर हा बाबा बॉर्न इन पोर्तुगाल्,स्टडीड इन इग्लंड,वर्क्ड इन हॉलंड अण्ड डाइड इन इंडिया अण्ड बरीड इन लंडन. असा सारा प्रवास एका वाक्यात सांगता येइल. याचे आणि माझे मैत्र जुळले एका प्रोजेक्ट मुळे. कलंदर व्यक्तीमत्व म्हणून.
टेरी चा एक पाय त्यावेळी इंडियात तर दुसरा हॉलंड मधे असायचा. उंची ६ फूट्,वजन ९५ किलो. त्याचे कॉकनी इंग्लिश त्यामुळे तो काय बोलतोय हे समजायला सर्वानांच एक-दोन सेकंदाचा डिले असायचा. तरीही मला त्याच्याशिवाय आणि त्याला माझ्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे भा.पो. असाच काहीसा प्रकार असायचा. तो ऑफिस मधे आला की वेळीअवेळी चहा मागणार आणि मी चिडणार - मनातल्या मनात कारण त्यावेळी त्याला चालेल असा चहा बनवणारी व्यक्ती साईटवर मिळणार कोठुन ? मग काय आमची हाउसकीपर कम झाडूवाली कम .. अशी एक मावशी होती. तिला चहा बनवण्यास सांगितला की ती एक उकळा बनवायची.तो त्याला कसा द्यायचा ही माझी पंचाईत. पण तरीही टेरी तो चहा 'गोड' मानून घ्यायचा.पुढे दोस्ताना वाढल्यावर मी टेरी ला विचारले अरे बाबा तू एक चहा मागतोस आणि मला घाम आणतोस,तू एअरपोर्टरून येतानाच का चहा घेउन येत नाहीस ? त्यावर त्याचे उत्तर ऐ़कून मी सर्दच झालो. तो म्हणाला , मित्रा चहा तर हा कुठेही मिळेल. पण तो सर्व्ह करताना त्या स्त्रीच्या डोळ्यातील आपुलकीचा भाव पाहिलास का ? तशी आपुलकी हॉटेलमधे नाही ना मिळत. त्यासाठीच मी तो चहा 'अगोड' मानून घेतो. मग मी तो चहा विदाऊट शुगर द्यायला सुरूवात केली हा भाग वेगळा.
नंतरचा किस्सा तर आणखीच मजेदार आहे. साईटवर बांधकाम सुरू होते. तो रोज साईट्ला भेट द्यायचा आणि त्याचे अवजड धूड स्कॅफोल्डींगवर चढायचे फोटो काढायचे. ते करत असताना मजूरांची मुले जमायची. एकदा एका मुलाने धाडस केले आणि फोटो फोटो असा गलका केला. झाले. टेरी ने मला विचारले 'जोग त्याना काय पाहिजे?' मी सांगितले -' त्याना फोटो काढुन पाहिजेत'. झाले स्वारीने पाच पन्नास फोटो काढलेत आणि डेव्हलपिंग करुन वाटायला मला सांगितले. मी ते विसरुनही गेलो. दुसर्या आठवड्यात त्याने स्वतः काढुन त्याच्या कॉपीज काढुन त्या सार्यांना दिल्या. असे एक ना अनेक किस्से टेरीचे होते. त्यातील शेवटचा किस्सा मात्र ह्रुदयद्रावक आहे अजूनही ......
त्याचे झाले असे. टेरीला इंडियातच हार्ट अॅटॅक आला आणि स्वारी देवाला प्यारी झाली.एवढयावर झाले तर तो सुटला आणि मीदेखील.. पण कसचे काय आणि ...
तर टेरी गेला आणि माझे काम वाढ्ले.त्याला "पोचवायचे".
चवकशी केली तर त्याला इंग्लंड मधील कबरस्थानात जेथे त्याच्या आईने विश्रांती घेतली तेथेच चिरविश्रांती घेण्याची इछा होती.ल झाले त्याच्या बायकोला कळवले ती आली तीच मुळी इंडिया पहायला आल्यासारखी. आल्याआल्या तिने विचारले शॉपिंग मॉल कुठे ? मी आधीच गार ह्या प्रश्नाने आणखीच गारेगार.
पुढे डेड बॉडी पाठवण्याची चोकशी केली तर ब्रिटीश एअरवेज ने उत्तर दिले .. ४८ कुलींग टाइम आहे नंतर पाहू. आता मेल्यावर बॉडी पाठवायला कुलींग लागतो हे कुणा लेकाला माहित. आमच्या अख्या घराण्यात कधी परदेशात मेले नाही आणि मेले असतील तर एवढा वेळ घालवण्यापेक्षा तिकडेच काळे करा असा संदेश त्यावेळ्च्या नातेवाईकांनी दिला असता.असो. म्हट्ले चला कुलिंग तर कुलिंग . तर म्हणे बामिंग केले का ? आता बामिंग म्हणजे काय असा एक अडाणी प्रश्न पण करणार काय. त्यांनी मखख चेहर्याने सांगितले की [बहुधा त्यांना माझी कींव आली असावी] बॉडी ड्रेन करा आणी त्यावर केमिकल प्रक्रिया करा या सार्या उपद्व्यापाला बामिंग म्हणतात. मी समजल्याचा आव आणत चेहरा गंभीर करत ऐकले. खरंतर मी जाम बोअर झालो होतो कारण तो काळ होता १९९३ चा ज्यावेळी मोबाईल्,फॅक्स प्रचलित नव्हते. बॉडी पुण्यात आणि चोकशी मुंबईत. शेवटी बी.जे. मेडीकल चे डीन आणि ससून चे सर्जन यांना विनंती करून 'ती' प्रक्रिया देखील उरकली. पण हे अजस्र धूड पॅक करायला एक्स्ट्रा लार्ज शवपेटी कुठेय. शेवटी ती देखील मेड टू ऑर्डर तयार करून घेतली. एव्हढं सारं झाले तर कुणीतरी कान फुंकले {अर्थात माझेच} की डेड बॉडी पुण्याबाहेर पाठवण्यासाठी पोलीस परवानगी लागते. झालं पोलीस हे नाव उच्चारल्यावर मला घाम फुटला. बी.ए.ला मराठी घेऊन पास झालेला मी पोलीस म्हटल्यावर जाम टाईट {?}असो. पुन्हा पोलीस कमिशनर ऑफीस ला भेट ! ''तो' आला तेम्व्हा नोंदणी केली होती का ? ' "नाही" मग कसं काय करणार? "अहो,त्याची बायकापोरं!" आमी काय सांभाळू का काय ?"
तसं नव्हे पण. {खरंतर टेरीची बायको कँप् मधे आरामशीपणे शॉपिंग करत होती.{शपथ्थ} खोटं वाट्तय ना?} आणि मी त्याला 'पोचवायची' तयारी करत होतो. शेवटी ती पण मिळाली.झाली 'वरात' निघाली मुंबईला.
एवढयात ब्रिटिश एअरवेज ने सांगितले की फ्लाईट फुल्ल आहे. ४८तास थांबा. एम्डी म्हणाले जोग तू बरोबर जा म्हणजे लगेज म्हणुन पाठवता येइल. इतकी वर्षे पिक्चर मधे पहात होते की स्मगलर्स बॅगेत बिस्किटे आयात करतात. पण आता मी माझ्या पहिल्या {आणि बहुधा शेवटच्या प्रवासात काय नेत होतो तर डेड बॉडी?} ब॑रं हे कौतुक कोणाला सांगण्यासारखे ही नव्हते - सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही.
शेवटी कंपनीच्या लक्षात आले की हे एकट्यादुकट्याचे काम नाही . तेथे पाहिजे जातिचे. मुंबईत हे केवळ हेच काम करणारी एक एजन्सी आहे. -मायकेल पिंटो. त्याचे चक्क होटेल सारखे मेन्यु कार्ड आहे. त्याने 'पुढ्ची' जबाबदारी उचलली. आणि टेरी महाराज पुन्हा कागदोपत्री मुंबई येथे म्रूत्यु पावले.
थांबा कथेत पुन्हा एक ट्वीस्ट आहे. तिकडे लंडनला पाद्री महाशयांना फोन केला 'एक बॉडी पाठवत आहे. ते कुरकुरले - आज वीकएंड आहे.सोमवारी फोन करा" झालं का? सगळं मुसळ -सॉरी प्रेत केरात?
असा प्रवास करत टेरी महाशय मंगळवारी लंडनला पोचले. नातेवाईकाना २ दिवस ' दाखवण्यासाठी ' ठेवण्यात आल्यानंतर त्याच्या इछेनुसार त्याचे दफन करण्यात आले. आणि माझे सुतक संपले. टेरी म्रुत्यु पावल्यापासून दफन पावेतो ६ दिवस संपले आणि माझे सुतकही. तर मंडळी मला त्रास झाल्याचे फारसे दु:ख नाही. हा महात्मा कोणासाठी कुठे जन्मला आणि कुठे मरण पावला आणि कुणासाठी जगला? अजून आच्शर्य वाटते. मग आहे की नाही तुकारामासारखे 'सदेह वेकुंठागमन' आणि काय योगायोग आहे पहा आजच पालखी निघाली पंढरपुराकडे. शुभास्थे पंथान टेरी.
काही वेळा लग्न ही नवरा किंवा
काही वेळा लग्न ही नवरा किंवा बायकोची प्रॉपर्टी मिळवण्यासाठीच टिकवली जातात त्यातला हा प्रकार म्हणायचा. बाकी कथा वाचनीय आहे.
(No subject)
(No subject)
साधारणत किति खर्च आला?
साधारणत किति खर्च आला?
सुनिल जोग साधी पुजा घ्या .
सुनिल जोग
साधी पुजा घ्या . मान पुरुषाला आणि स्त्रिने फक्त 'मम' म्हणायचे. कधी बदलणार आहोत आपण?
- sorry. पण त्यासाठी योग्य अस कारण आहे.
जोग क्षमा असावी पण लेख अजिबात
जोग क्षमा असावी पण लेख अजिबात आवडला नाही.
तुमच्या लेखात आधी म्हणल्याप्रमाणे टेरी हा एक चांगल्या मनाचा माणूस होता. भले तुमचे आणि त्याचे रिलेशन व्यावसायिक असो (आणि त्याच्या बायकोचे आणि त्याचे नातेही चमत्कारीक असो) तो एक सहकारी होता तुमचा. त्याच्या मृत्युबद्दल इतक्या विनोदी अंगाने लिखाण पटत नाही. तुम्हाला बराच त्रास सहन करावा लागला हे मान्य आणि तेवढेच पोस्टले असतेत तर ठिक वाटले असेत. पण
<<<तर टेरी गेला आणि माझे काम वाढ्ले.त्याला "पोचवायचे".>>>
<<<खरंतर मी जाम बोअर झालो होतो >>>>
<<<<ब॑रं हे कौतुक कोणाला सांगण्यासारखे ही नव्हते - सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. >>>
ही वाक्ये खटकतात.
ashuchamp | 7 July, 2010 -
ashuchamp | 7 July, 2010 - 07:43 नवीन
जोग क्षमा असावी पण लेख अजिबात आवडला नाही.
तुमच्या लेखात आधी म्हणल्याप्रमाणे टेरी हा एक चांगल्या मनाचा माणूस होता. भले तुमचे आणि त्याचे रिलेशन व्यावसायिक असो (आणि त्याच्या बायकोचे आणि त्याचे नातेही चमत्कारीक असो) तो एक सहकारी होता तुमचा. त्याच्या मृत्युबद्दल इतक्या विनोदी अंगाने लिखाण पटत नाही. तुम्हाला बराच त्रास सहन करावा लागला हे मान्य आणि तेवढेच पोस्टले असतेत तर ठिक वाटले असेत. पण
<<<तर टेरी गेला आणि माझे काम वाढ्ले.त्याला "पोचवायचे".>>>
<<<खरंतर मी जाम बोअर झालो होतो >>>>
<<<<ब॑रं हे कौतुक कोणाला सांगण्यासारखे ही नव्हते - सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. >>>
ही वाक्ये खटकतात.
तुम्हाला खटकतात कारण बहुदा तुम्ही फार कमी वेळा तुम्ही स्मशानात गेला असावात. जे जवळचे असतात ते रडुन कोरडे झालेले असतात. इतर जे रक्ताचे नसतात आणि फॉरमॅलीटी म्हणुन येतात त्यांचे जोक कधी ऐका. याच कारण एकच. सर्वसामान्य माणुस फार काळ दु:खी राहु शकत नाही. ( जे सदान कदा दु:खी असतात हा अपवाद सोडुन ) स्मशान आणि त्यातले विधी यावर आज पर्यत अनेक नर्मविनोदी लिखाण मी वाचलय. मला तरी ते खटकल नाही.
नितीनजी...मी गेलोय अनेकदा
नितीनजी...मी गेलोय अनेकदा स्मशानात आणि तिथे हजर असलेल्यांच्या गप्पाही ऐकल्या आहेत. पण मला त्या संदर्भात म्हणायचे नव्हते. माझे हे म्हणणे होते की लेखाची सुरूवात ज्या पद्धतीने होते त्याला अचानक छेद देत असे विनोद सुरू होतात त्याला माझा आक्षेप होता एक वाचक म्हणून.
अर्थात काय पद्धतीने लिहायचे हे स्वातंत्र्य लेखकाला आहे. पण वाचकाला काय वाटले हे सांगायचे स्वातंत्र्य मलाही आहे. नाही का.
आणि माबोवरचा माझा अनुभव असा की आपण सर्वजण वैयक्तिक मत देतो कोणत्याही लेखावर. त्यामुळे जे मला खटकले ते प्रत्येकालाच खटकावे असा आग्रह नाही.
kaka katha khupach changli
kaka katha khupach changli aahe... lokanche matbhed astil pan mata astil tarch matbhed hotat....
,,,
,,,
प्रेतावर रासायनिक प्रक्रिया
प्रेतावर रासायनिक प्रक्रिया आपल्याकडेही करावीच लागते! माझे सासरे जग्गनाथपुरीला वारले. (त्या भागात फिरायला गेले होते) त्यांचे अंत्यसंस्कार जेव्हा मुळ गावी करायचे ठरले तेव्हा त्याना विमानाने आणले. त्यावेळी रासायनिक प्रक्रिया करणे बंधनकारक होते! आशुचॅम्प यांना अनुमोदन!
एक किस्सा म्हणून सुरूवात न
एक किस्सा म्हणून सुरूवात न होता, कुणी एका चांगल्या मनाच्या माणसाचं व्यक्तिचित्रं म्हणून सुरुवात झालेली ही "कथा" विनोदी अंगाने वळली. दुर्दैवाने एका "चांगल्या" माणसाच्या "मृत्यूवर" केलेली ही "थट्टा" आहे.
मलाही खटकली.
पण एक किस्सा म्हणून चांगली आहे.. पंचेस चांगले वापरलेत.