आमोद शी काय पण नाव आहे. तीच्या मनात विचार आला,आणि ह्या विचारासरशी तिला आठवला तिला आवडणार नाव आणि त्या नावाचा मालक "रुसन!"
---------------------------------------------------------------------------------------------------------
जेव्हा पहिल्यांदा माधुरीने त्याला पहिला तेव्हापासून तिला रुसन फार आवडला होता. पण तो फारच एकाकी एकटा राहणारा कोणाशी फार ना बोलणारा असल्याने तिच्या कुठल्याही प्रयत्नाला त्याने प्रतिसाद दिला नव्हता. त्याचे सुंदर निळे डोळे आणि सोनेरी केसांचं अप्रूप तिला हि होतं. अर्थात त्याच्यावर जीव टाकणाऱ्या मुलीही काही कमी नव्हत्या मात्र तो त्याच्या मित्रान मधेच रमलेला असे. जर कधी त्याने डेट साठी विचारलाच तर काय काय करायचं हे देखील तीने ठरवून ठेवला होतं. मात्र तो नजर वर करून बघेल तर शप्पथ. लाजाळू तर म्हणता येणार नाही, बेसबॉल तें चा कॅप्तैन आणि लाजाळू? छे! काहीही होऊदे त्याची डेट मिळवायचीच हा निश्चय करून माधुरी पाहुण्यांची वाट बघणाऱ्या आईकडे गेली.
आमोद! नावाप्रमाणेच पेहेराव, पूर्ण भारतीय! माधुरीला त्याला पाहताक्षणीच तो आवडला नाही. पण आई बाबांच्या पुढे तीने अगत्याचे आणि गुड गर्ल असल्याचे नाटक सुरु ठेवले. बाबांच्या छान गप्पा रंगल्या होत्या आणि स्तुतीमुळे खुश होऊन आई पाहुण्यांना खायचा आग्रह करत होती. त्यांचे लक्ष नाही बघून माधुरी सटकायाच्या बेतात असताना आईने तिला बघितले आणि हाक मारून अमोदला घर दाखवायला सांगितले.
तिचे वाकडे तोंड बघून आमोद राहू देना असे म्हणत होता पण आईने काही लक्ष न देता आपलेच घोडे दामटले. नाईलाजाने माधुरी त्याला वर घेऊन गेली. छान आहे तुझी रूम तो म्हणाला माधुरी परत एकदा फक्त हुंकारली. "तू काही बोलत का नाहीस? मला तुक्ष्यशि काही बोलायचं आहे." तो म्हणाला. काय बोलायचंय? बोल न आत्ताच? माधुरी वैतागतच उत्तरली. इथे नाही उद्या भेटशील? माझ्या घराजवळ एक कॅफे आहे तिथे भेटू, पत्ता देतो तुला, चालेल? हा मला बाहेर घेऊन जायला बघतोय केवळ अर्ध्या तासात? आणि रुसन तो तर नावच काढत नाही. असू दे मीच विचारेन त्याला पण आता ह्याचा काय करावं? इतक्यात तोच म्हणाला "प्लीज नाही म्हणू नकोस, एकदाच फार महत्वाचा बोलायचा आहे तुझ्याशी. तुला माहितीये का? आज आम्ही इथे का आलोय म्हणून?" आपले आई बाबा आपल्या लोग्नाचे बेत ठरवतायत, त्या आधी आपण बोलला पाहिजे. तिच्या उत्तराची वाट न पाहताच तो पुढे म्हणाला प्लीज उद्या ६ वाजता नक्की! आणि खाली निघून गेला. कटकटच आहे माधुरी पुटपुटली पण तीने विचार केला ह्याला भेटतोय म्हणल्यावर कदाचित आई बाबा खुश होऊन पुढच्या आठवड्यात जॉन कडे पाठवतील हि पार्टीला तिथे रुसन हि येणार आहे म्हणाला तो बघू काय होतंय?
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कॅफे मध्ये गेली असताना तो आलं होताच तिथे. बोल मला लवकर जायला हवा फार वेळ नाहीये ती बसता बसताच म्हणाली. आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, लग्नाच्या बाबतीत तुझी मतं काय आहेत? माहित नाही कधी विचारच केला नाही ती उत्तरली. पण आई बाबांकडे बघून वाटतं फार काही वाईट नसावं, पण तू हे का विचारतोयस? काही नाही पण तुला मी आवडलो का? काय विचित्र मुलगा आहे इतक्या लगेच काही कोण कोणाला ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं का? पण ठीक आहे आता सांगतेच. तू विचारतोयस म्हणून सांगते मला काही तू फार आवडला नाहीस आणि लग्नाचा तर विचारहि मी करणार नाही. इतके बोलून ती थांबली, त्याचा अंदाज घेत.
पण त्याच्या चेहेऱ्यावर तर आता चक्क हसू फुललं होतं.' मला तुझ्या कडून ह्याच उत्तराची अपेक्षा होती'. म्हणून तर काल असा बावळटा सारखा आलो होतो असा तो म्हणल्यावरच माधुरीने त्याला निरखून पहिला आणि एक क्षण भरात तिच्या लक्षात आले कि कालच्या भारतीयत्वाच्या खुणा आता अजिबातच दिसत नसून आज तो भलताच स्मार्ट दिसतोय. "वेल मला हे ऐकून छान वाटला मग आता ह्या भेटीमागचा हेतू कळेल का" माधुरी जरा वैतागून बोलली नाहीतरी तू मला आवडत नाही म्हणाल्यावर हसणारा हा पहिलाच असावा.
"वेल माझी एक मैत्रीण आहे स्टेला आणि आम्ही लवकरच एकत्र मूव्ह होत आहोत मात्र हे बाबांना अजून माहिती नाही पण माझ्या जोब चा महिनाभरात कळल्यावर आम्ही त्यांना सांगू" आमोद उत्तरला. म्हणजे तू लग्न नाही करणारेस तर? माधुरीने विचारले. नाही स्टेलाचा लग्नावर विश्वास नाही आणि आम्ही तसेच एकत्र राहणार आहोत लिव्ह इन रिलेशनशिप म्हण हवा तर. पण आमचा एकमेकांवर फार प्रेम आहे आणि आम्हाला लग्नाच्या बेदीची आवश्यकता नाही हे वाक्य त्याने जरा जास्तच ठासून म्हणले.
ती भेट संपवून घरी येताना तिच्या डोक्यात विचार चालू होते आई बाबांना सगळ खरा सांगायचं म्हणजे आपण एका प्रकरणातून सुटलो पण आमोद तिला मित्र म्हणून चांगला वाटला होता आणि दोघांनीही एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे तिने अमोदने त्याच्या घरी सांगितल्यावर आई बाबांना कळेल आपसूक तो पर्यंत निदान त्याचा नावाखाली फिरता तरी येईल असा विचार तिने केला. ती हि अमोदला मदत करणारच होती त्या बदल्यात तो हि हे करेलच की!
चाल एक अध्याय छान पार पडला आता मिशन रुसन!
क्रमशः
वेगवान!
वेगवान!
आदि, १९ इअर्स ची ना ती... अणि
आदि,
१९ इअर्स ची ना ती... अणि लग्न??
छान कथा आहे. येथील
छान कथा आहे.
येथील प्रतिक्रिया काढुन टाकली आहे.
मनस्मी... तुम्हीच लिहा कथा
मनस्मी... तुम्हीच लिहा कथा आता..
गोष्टीतल्या सगळ्याच गोष्टी पटल्या नाहित.. पण वेग चांगला आहे.. पुलेशु..
सगळे शेवट प्रेडिक्टेबल. अतीव
सगळे शेवट प्रेडिक्टेबल.
अतीव गुळगुळीत कथा
पराग
पराग
मनस्मी तुम्ही सर्वज्ञ आहात
मनस्मी तुम्ही सर्वज्ञ आहात का?
कथेच्या शेवटी माधुरी दोघांच्या प्रेमात देखिल पडु शकते.
रुसन किती रुसंल?
रुसन किती रुसंल?
कथेच्या शेवटी माधुरी
कथेच्या शेवटी माधुरी दोघांच्या प्रेमात देखिल पडु शकते. >>> म्हणजे आधुनिक द्रौपदी का ?
आधुनिक शेवट हवा असेल तर आमोद
आधुनिक शेवट हवा असेल तर आमोद आणि रुसनलाच एकमेकांच्या प्रेमात पाडा आणि माधुरीवर अन्याय नको असेल तर मग तिला आणि स्टेलाला एकत्र आणा. आणि दोन्ही कपल्स गुण्यागोविंदाने कॅलिफोर्नियात शेजारी शेजारी नांदतायत असं ही दाखवा.
च्यायला, या सगळ्या झमेल्यात
च्यायला, या सगळ्या झमेल्यात "अमेरीकन स्वप्न" कुठं आहे?
पण जर प्रॅ़क्टिकल तडजोड
पण जर प्रॅ़क्टिकल तडजोड करायची असेल तर स्टेला रुसन ला द्यायला हवी आणि मग हे दोघं देशी एकत्रं :).
म्हणजे आधी डबल डेट ला दोन्ही कपल्स एकत्र भेटणार मग क्रॉस कनेक्शन होणार आवडी निवडीं प्रमाणे.
मग माधुरी ला अमेरिकन देसी अमोद च आवडणार.
.
.
"अमेरीकेतल्या सर्व तरुण
"अमेरीकेतल्या सर्व तरुण पिढीचा लग्न बिग्न अशा जुनाट आणि खुळ्चट कल्पनांवर अजिबात विश्वास नाही" असा एक फुकटचा गैरसमज भारतात सर्वांनी (सामान्यांपासुन करण जोहर सारख्या डायरेक्टर लोकांपर्यंत) का करुन घेतलेला आहे.....
इथेही ख्रिश्चन कंझर्वेटीव लोकांमधे लग्नाबद्दलची विचार सरणी अजुनही जुन्या वळणाचीच आहे. परवाच एका व्हाइट अमेरिकन मैत्रीणी बरोबर जेवायला गेलो होतो तेव्हा माझ्या बरोबरच्या काही लोकांबरोबर झालेल्या वाद्/चर्चेतुन मला जाणवलं की तिचे विचार आपल्या पेक्षाही कंझर्वेटीव आहेत्....असो
कथा म्हणुन ठीक वाटली....पुलेशु....
अरे अरे! थांबा! तिला काहीतरी
अरे अरे! थांबा! तिला काहीतरी 'काव्यात्म न्याय' द्यायचा असेल पात्रांना! सगळे तर्क लढवून मोकळे झालेत....एक छानसा मराठी चित्रपट काढता येईल की त्यावर...मुलगा-मुलगी पैकी एकाचे वडील म्हणून अशोक सराफ आले की धमाल होईल.....
कदंब सहमत ! अरे तिला पूर्ण तर
कदंब सहमत ! अरे तिला पूर्ण तर करू दे. बिचारी आता विचारात पड्ली असेल... आता काय शेवट करायचा म्हणून !
तुम्ही लिहिलेली कथा अप्रतिम
तुम्ही लिहिलेली कथा अप्रतिम आहे. तुमच्यासारखं दुसरं कोणी नाहीच.
ग्रेट!
महान!
वा मस्त!
छान लिहिलंय!
अगदी भिडली कथा!
आता झाला ना तुम्हाला हवा तसा प्रतिसाद!
.बाकी अदिति तू पुढे लिहत रहा.
.बाकी अदिति तू पुढे लिहत रहा. आम्ही वाचतोय.
नमस्कार, आपणा सर्वांना
नमस्कार,
आपणा सर्वांना धन्यवाद! (विविधरंगी अभिप्रायासाठी). आता हि कथा पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा अनुभवी अन प्रतिभाशाली लोकांवर सोपवते. तुम्हीच तिला योग्य न्याय देवू शकाल या बाबतीत माझ्या मनात तिळमात्रहि शंका नाही.
आपली आदिती.
अग आदिती राग मानू नकोस. ह्या
अग आदिती राग मानू नकोस.
ह्या सर्वाना सवयच आहे असल्या खोचट प्रतिसादाची.
कोणि नविन आल आपली कथा लिहायला मा.बो. वर की त्या व्यक्तिला असे प्रतिसाद द्यायचे कि तो पुन्हा कधी कथा मा.बो. वर आपपोस्ट करणारच नाहि.
ह्याचा खुप छान अनुभव आहे मला.
खरच या सगळ्यात मला रेइको लोज च्या लेखकाच्या प्रतिसाद आवड्तो,
आपण काय हौशी मन्डळी चुका करुनच शिकु.
इथे सगळेच नेह्मिच खोडी शोधण्यात मग्न असतात. पण चुका सुधारुण देणे कोणालाच जमत नाहि.
वरील सर्व मा.बो. जर इतकी हौस असेल कथा लिहायचि तर स्वतचि स्वत्न्त्र कथा लिहा ना.
ह्या नवख्या मुलिला क होपलेस करत आहात.
तीने सुरुवात केलि आहे तर तिलाच सम्पवु देत ना कथा.
जर सगळ्च खर लिहिल तर ती कथा नाहि बातमि होइल.
आणी वरिल पैकी जो कोणीहि तन्तोतन्त कथा एकहि चुक न करता किन्वा काहिही खोट न लिहिता खर खर लिहुन दाखवेल तोच खरा कोणालाहि जस्टिफाय करु शकेल नाहीतर कोणाला हि काहि हक्क नाहि आदितीला अस होपलेस करण्याचा.
बाकि मला तर वाट्तय आदिती कि हि कथा तुझि आहे आणि तुच ती पुर्ण करु शकशिल.
तुला पु.ले.शु.
अशिच चालु राहु दे अमेरिकन स्वप्न!
अमेरिकन स्वप्न! काय आहे ते पुढे येइलच सगळ्याच्या ध्यानत.
धन्स.............
its good story. pls ignore
its good story. pls ignore some comments. go ahead. hya lokanni naav thevla tari katha tar vachanarach.
तृष्णा ला अनुमोदन.. तू छान
तृष्णा ला अनुमोदन..
तू छान लिहीतेयस. जोवर आपण स्वत्।च्या मेहनतीने आणि साफ अंतकरणाने लिहीत असतो तोवर अश्या प्रतिसादांकडे लक्श देउ नकोस ..
पुलेशु..
आदिती, कृपया कथा पुर्ण करा.
आदिती,
कृपया कथा पुर्ण करा.
एक गंमत म्हणुन मी लिहिले होते त्यात तुम्हाला "डिस्करेज" करणे वगैरे काही हेतु नव्हता. ती प्रतिक्रिया मी काढुन टाकली आहे. तुम्हाला यामुळे त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व!
नीधप अस नको करुस ग. मला खरच
नीधप अस नको करुस ग.
मला खरच नाही तुला दुखवायचे आहे नाहि आदितीला.
प्रतिसाद नेहमी चान्गला असावा असा कान्गावा नाही आहे ग माझा पण आदिती दुखावली गेली म्हणुन जे खर आहे ते दाखवुन दिल.
बाकि तुझी इच्छा.
तु काय प्रतिसाद द्यावा आणी नाही हे नक्किच तुझ्याशिवाय चान्गल कोणाला माहिती नसेल.
मलाही नाहि.
धन्स.................
खरं हेच आहे ना की कथा अप्रतिम
खरं हेच आहे ना की कथा अप्रतिम इत्यादी आहे. तर लिहिलं ना तसं आता काय तक्रार आहे?
काही तक्रार नाही आहे. फक्त
काही तक्रार नाही आहे.
फक्त कोणाला दुखवु नकोस हिच आशा आहे.
कथा कशी आहे हे पुर्ण झाल्यावर सर्वानाच समजेल कि,
आपल्याला थोडी काहि स्वप्न पड्ल आहे कि कथा
ग्रेट!
महान!
वा मस्त!
छान लिहिलंय!
अगदी भिडली कथा!
अशीच आहे अस.
असो.
ठेविले अनन्ति त्यसेचि रहावे.
धन्स..........
फक्त कोणाला दुखवु नकोस हिच
फक्त कोणाला दुखवु नकोस हिच आशा आहे.<<
याला कांगावा म्हणतात तो करू नये. कारण मी असं काही बोललेले नाही.
कांगावा करताना आपण कुणाला दुखवतोय याचं भानही नाहीये तुला किंवा तू दुर्लक्ष करतेयस.
आणि मुद्दामून आग लावायचा सतत प्रयत्न करतेयस.
आता कोणाकोणाची एन्ट्री होईल यापुढे हे ही माहीतीये.
काडेपेटी पाठवून देऊ का?
प्रिय नीधप, तुझी काडेपेटी आणि
प्रिय नीधप,
तुझी काडेपेटी आणि माचिसहि तुलाच मुबारक.
हा माझा तुला समजवण्यासाठी शेवट्चा प्रतिसाद होता.
तुझे विचार महान जर तुला काही समजुन घ्यायचच नाहि आहे तर पुढे तुझ्या कोणत्याही प्रतिसादाला मी प्रतिउतर देणार नाही.
आदिती, आपली प्रत्येक आधीची
आदिती, आपली प्रत्येक आधीची कथा ही पुढच्या त्यापेक्षा better कथेसाठी असते..
विचारपूर्वक - योग्य कष्ट घेऊन जितके जास्त लिहित राहू - तितकी सफाई जास्त येत जाईल (असं मला वाटतं)
त्यामुळे इतर कुणाकरता नको, तुझ्या स्वतःकरता लिहित रहा..
नानबा ला अनुमोदन, मलाहि अस
नानबा ला अनुमोदन, मलाहि अस वाटतय इथे जरा 'मस्करिचि कुस्करि' झालिय. प्रतिसाद कमि आलेत किंवा आलेच नाहित तर लेखक/लेखिका त्यातुन योग्य तो बोध घेतिलच मग त्यांचि अशि जाहिर टवाळि कशासाठि? प्रामाणिक असतिल तर "मला तुमचि कथा/कादंबरि/लेख्/ललित आवडल नाहि कारण......." अश्या प्रकारच्या प्रतिक्रियांच जरूर स्वागत करतिल नाहि केल तर त्यांच्या पुढच्या लिखाणाला अश्या प्रतिक्रिया द्यायच्या का (मुळात प्रतिक्रिया द्यायचि का) हे ज्याला त्याला ठरवता येइलच कि.
मी ह्या कथेचे दोन्हि भाग वाचलेत, मला स्वतःला कथा फारशि आवडलि नाहि पण मला आवडलि नाहि हि माझि वैय्यत्तिक आवड झाली. कदाचित लेखिकेचि पुढचि कथा मला आवडेल कदाचित नाही. पण इथेहि काहि झणांना ती आवडलिच आहे, त्यांच्यासाठि माझ्यासारख्या पाटी कोरि ठेवुन वाचणार्यांसाठि आणि मुख्य म्हणजे लेखिकेच्या स्वतःच्या आनंदासाठि तिने लिहत रहाण आवश्यक आहे. म्हणुन तिचि उमेद खचुन जाईल असे हार्श प्रतिसाद मला योग्य वाटले नाहित.
Pages