अमेरिकन स्वप्न! (भाग २)

Submitted by Aditiii on 4 May, 2010 - 06:11

आमोद शी काय पण नाव आहे. तीच्या मनात विचार आला,आणि ह्या विचारासरशी तिला आठवला तिला आवडणार नाव आणि त्या नावाचा मालक "रुसन!"
---------------------------------------------------------------------------------------------------------
जेव्हा पहिल्यांदा माधुरीने त्याला पहिला तेव्हापासून तिला रुसन फार आवडला होता. पण तो फारच एकाकी एकटा राहणारा कोणाशी फार ना बोलणारा असल्याने तिच्या कुठल्याही प्रयत्नाला त्याने प्रतिसाद दिला नव्हता. त्याचे सुंदर निळे डोळे आणि सोनेरी केसांचं अप्रूप तिला हि होतं. अर्थात त्याच्यावर जीव टाकणाऱ्या मुलीही काही कमी नव्हत्या मात्र तो त्याच्या मित्रान मधेच रमलेला असे. जर कधी त्याने डेट साठी विचारलाच तर काय काय करायचं हे देखील तीने ठरवून ठेवला होतं. मात्र तो नजर वर करून बघेल तर शप्पथ. लाजाळू तर म्हणता येणार नाही, बेसबॉल तें चा कॅप्तैन आणि लाजाळू? छे! काहीही होऊदे त्याची डेट मिळवायचीच हा निश्चय करून माधुरी पाहुण्यांची वाट बघणाऱ्या आईकडे गेली.

आमोद! नावाप्रमाणेच पेहेराव, पूर्ण भारतीय! माधुरीला त्याला पाहताक्षणीच तो आवडला नाही. पण आई बाबांच्या पुढे तीने अगत्याचे आणि गुड गर्ल असल्याचे नाटक सुरु ठेवले. बाबांच्या छान गप्पा रंगल्या होत्या आणि स्तुतीमुळे खुश होऊन आई पाहुण्यांना खायचा आग्रह करत होती. त्यांचे लक्ष नाही बघून माधुरी सटकायाच्या बेतात असताना आईने तिला बघितले आणि हाक मारून अमोदला घर दाखवायला सांगितले.

तिचे वाकडे तोंड बघून आमोद राहू देना असे म्हणत होता पण आईने काही लक्ष न देता आपलेच घोडे दामटले. नाईलाजाने माधुरी त्याला वर घेऊन गेली. छान आहे तुझी रूम तो म्हणाला माधुरी परत एकदा फक्त हुंकारली. "तू काही बोलत का नाहीस? मला तुक्ष्यशि काही बोलायचं आहे." तो म्हणाला. काय बोलायचंय? बोल न आत्ताच? माधुरी वैतागतच उत्तरली. इथे नाही उद्या भेटशील? माझ्या घराजवळ एक कॅफे आहे तिथे भेटू, पत्ता देतो तुला, चालेल? हा मला बाहेर घेऊन जायला बघतोय केवळ अर्ध्या तासात? आणि रुसन तो तर नावच काढत नाही. असू दे मीच विचारेन त्याला पण आता ह्याचा काय करावं? इतक्यात तोच म्हणाला "प्लीज नाही म्हणू नकोस, एकदाच फार महत्वाचा बोलायचा आहे तुझ्याशी. तुला माहितीये का? आज आम्ही इथे का आलोय म्हणून?" आपले आई बाबा आपल्या लोग्नाचे बेत ठरवतायत, त्या आधी आपण बोलला पाहिजे. तिच्या उत्तराची वाट न पाहताच तो पुढे म्हणाला प्लीज उद्या ६ वाजता नक्की! आणि खाली निघून गेला. कटकटच आहे माधुरी पुटपुटली पण तीने विचार केला ह्याला भेटतोय म्हणल्यावर कदाचित आई बाबा खुश होऊन पुढच्या आठवड्यात जॉन कडे पाठवतील हि पार्टीला तिथे रुसन हि येणार आहे म्हणाला तो बघू काय होतंय?

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कॅफे मध्ये गेली असताना तो आलं होताच तिथे. बोल मला लवकर जायला हवा फार वेळ नाहीये ती बसता बसताच म्हणाली. आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, लग्नाच्या बाबतीत तुझी मतं काय आहेत? माहित नाही कधी विचारच केला नाही ती उत्तरली. पण आई बाबांकडे बघून वाटतं फार काही वाईट नसावं, पण तू हे का विचारतोयस? काही नाही पण तुला मी आवडलो का? काय विचित्र मुलगा आहे इतक्या लगेच काही कोण कोणाला ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं का? पण ठीक आहे आता सांगतेच. तू विचारतोयस म्हणून सांगते मला काही तू फार आवडला नाहीस आणि लग्नाचा तर विचारहि मी करणार नाही. इतके बोलून ती थांबली, त्याचा अंदाज घेत.

पण त्याच्या चेहेऱ्यावर तर आता चक्क हसू फुललं होतं.' मला तुझ्या कडून ह्याच उत्तराची अपेक्षा होती'. म्हणून तर काल असा बावळटा सारखा आलो होतो असा तो म्हणल्यावरच माधुरीने त्याला निरखून पहिला आणि एक क्षण भरात तिच्या लक्षात आले कि कालच्या भारतीयत्वाच्या खुणा आता अजिबातच दिसत नसून आज तो भलताच स्मार्ट दिसतोय. "वेल मला हे ऐकून छान वाटला मग आता ह्या भेटीमागचा हेतू कळेल का" माधुरी जरा वैतागून बोलली नाहीतरी तू मला आवडत नाही म्हणाल्यावर हसणारा हा पहिलाच असावा.

"वेल माझी एक मैत्रीण आहे स्टेला आणि आम्ही लवकरच एकत्र मूव्ह होत आहोत मात्र हे बाबांना अजून माहिती नाही पण माझ्या जोब चा महिनाभरात कळल्यावर आम्ही त्यांना सांगू" आमोद उत्तरला. म्हणजे तू लग्न नाही करणारेस तर? माधुरीने विचारले. नाही स्टेलाचा लग्नावर विश्वास नाही आणि आम्ही तसेच एकत्र राहणार आहोत लिव्ह इन रिलेशनशिप म्हण हवा तर. पण आमचा एकमेकांवर फार प्रेम आहे आणि आम्हाला लग्नाच्या बेदीची आवश्यकता नाही हे वाक्य त्याने जरा जास्तच ठासून म्हणले.

ती भेट संपवून घरी येताना तिच्या डोक्यात विचार चालू होते आई बाबांना सगळ खरा सांगायचं म्हणजे आपण एका प्रकरणातून सुटलो पण आमोद तिला मित्र म्हणून चांगला वाटला होता आणि दोघांनीही एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे तिने अमोदने त्याच्या घरी सांगितल्यावर आई बाबांना कळेल आपसूक तो पर्यंत निदान त्याचा नावाखाली फिरता तरी येईल असा विचार तिने केला. ती हि अमोदला मदत करणारच होती त्या बदल्यात तो हि हे करेलच की!

चाल एक अध्याय छान पार पडला आता मिशन रुसन!

क्रमशः

गुलमोहर: 

अदिती
शुद्धलेखन, पूर्णविराम , स्वल्पविराम, संवादांकरता अवतरण चिन्हे याकडे थोडं लक्ष द्या.

पण तो फारच एकाकी एकटा राहणारा कोणाशी फार ना बोलणारा असल्याने तिच्या कुठल्याही प्रयत्नाला त्याने प्रतिसाद दिला नव्हता. त्याचे सुंदर निळे डोळे आणि सोनेरी केसांचं अप्रूप तिला हि होतं. अर्थात त्याच्यावर जीव टाकणाऱ्या मुलीही काही कमी नव्हत्या मात्र तो त्याच्या मित्रान मधेच रमलेला असे.
>>एकटा एकाकी रहाणारा होता की मित्रांमधे रमणारा होता ? मुलींना भाव देत नसेल तर त्याला एकाकी रहाणारा कसं म्हणता येईल.

बेसबॉल टीमला सहसा कॅप्टन्स नसतात. मॅनेजर असतात, कोच असतात पण खेळाडूंची नुस्तीच टीम असते. शिवाय कॉलेजमधे बेसबॉलपेक्षा इतर खेळांचं व खेळाडूंचं कौतुक जास्त असतं . अमेरिकेत 'घराजवळ कॅफे ' वगैरे वाक्प्रचार फारसे प्रचलित नाहीत , निदान इथे वाढलेल्या मुलामुलींमधे तरी नाहीत. लेट्स मीट फॉर कॉफी म्हणतील फारतर.

एकेक भाग लिहून झाल्यावर, प्रसिद्ध करण्याआधी कोणाकडून तपासून घेतल्यास अशा चुका सुधारता येतील.

पहिल्या दोन्ही भागांमधे एकदम बर्‍याच घटना एका मागे एक घडताहेत. पात्रांची ओळख सुद्धा एकदम फास्ट अन जुजबी वाटते आहे. खरं तर इथे वाढलेली मुले, त्यांचे लग्नाविषयी विचार, जोडीदाराची निवड हा अतिशय पोटेंशियल असलेला विषय आहे. इथे वाढलेल्या सर्वच मुलांना तथाकथित भारतिय संस्कृती, फॅमिली व्हॅल्युज इत्यादींचं संपूर्ण वावडं असतं अशा भावनेतून सर्व पात्रं बटबटीत, ठळक रंगवली तर कथेमधे स्वभावाचे , विचारांचे बारकावे भरायला वाव रहाणार नाही.

हिंदी किंवा मराठी सिरियल्समधे माणसं पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट रंगवतात. प्रत्यक्ष परिस्थिती मात्र बरीच वेगळी असते. यावर थोडा विचार करून पात्रांची निर्मिती केलीत तर तुमची कथा जास्त परिणामकारक होईल.

सॉरी अदिती, तू इथल्या प्रतिक्रिया मनाला लाऊन लेखन थांबवशिल असं मनात आलं असतं तर मी असं म्हटलं नसतं, आधिही म्हटल्याप्रमाणे पुन्हा म्हणते..लेखन पुर्ण कर!

Well put! शोनु. अदिती तुम्ही लोकांचे चेष्टेचे प्रतिसाद कसे घेता तो तुमचा प्रश्न आहे पण मेधाच्या प्रतिसादातल्या मुद्द्यावर नक्की विचार करा. Happy

आदिती, पहिलाच प्रयत्न दिसतोय तुमचा.
मेधाच्या पोस्टचा नीट विचार करून पुढचे लेखन करा. लोकांनी चेष्टा केली म्हणून लिखाण न थांबवता पॉझिटीव्हली घ्या आणि पुढील लिखाणात चुका टाळायचे प्रयत्न करा. नानबाने म्हटल्याप्रमाणे लिखाणापरत्वे सफाई येईल लिहिण्यात.

पुलेशु. Happy

नमस्कार,

माझे असे मत नाही की मी खूप चांगली लेखिका आहे, पण मी इथे लिहिण्याचा निर्णय केवल स्वानंदासाठी घेतला होता. मला अजुन खूप सुधारणा करावी लागणार आहे. मी नक्कीच प्रयत्न करेन. तुम्ही सर्वांनी मला धीर दिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा! मी लिखाण सोडणार नाही पण त्याचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न जरूर करेन!

आपली आदिती

thanks aditi. to continue the writing.
we like to read the whole story.
medha saying very right & softly.
this is the way of talking with anyone in this site.
all the best for this & future stories.

सगळ्याच कथा अप्रतिम असव्यात असा मायबोली वर नियम अस्तित्त्वात नहियाय.... तेव्हा जे आहे ते स्विकारा नहितर स्वतःच्या अप्रतिम कथा पाठवा....
आदिती, कृपया कथा पुर्ण करा. वाट पाह्तेय...........

श्वे अनुमोदन...

आदिती... मीपण खरंतर मा. बो. वर नुसत्याच प्रतिक्रिया छापतेय आतापर्यंत... कथा (मग ती चांगली असो वा वाईट, लॉजीकल वा ईलॉजीकल...) लिहीण्याचे धाडस खुप कमी जण दाखवतात... ही तर सुरूवात आहे, अजून मोठा पल्ला गाठायचा आहे तुम्हाला... इथे बोचर्‍या प्रतिक्रिया मिळतात तसंच प्रोत्साहनेही मिळतात... हे अनुभवातून शिकल्याच असाल... असो 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे म्हटले जाते... तरच तुमची प्रगती होते ना...

काही प्रतिक्रिया त्यांच्या स्वतःच्या आणि आमच्यासारख्या फक्त प्रतिक्रिया छापणार्‍यांच्या मनोरंजनासाठी आहेत असं समजून दुर्लक्ष करा... आणि मेघा, तृष्णा, प्राची, वैद्यबुवा आणि इतरेजनांच्या प्रतिक्रियांवर गांभीर्याने विचार करून सुधारणा करा... फायदा तुमचाच आहे... जर लेखन थांबवलंत तरी नुकसानही तुमचंच आहे...नाही का?

aashu29, चूक कबूल करण्याचा प्रांजळपणा खूप कमीजणांमध्ये असतो (माझ्यात नाहीये बुवा Happy ) अभिनंदन आणि आभार एका नवोदित लेखिकेला प्रोत्साहन दिल्याबद्दल, कोणी सांगावं... या नवोदित लेखक-लेखिकांमध्येच एक यशस्वी साहित्यिक लपलेला/ली असेल आणि मा. बो. भविष्यात त्याला मुकू शकतील... Happy

गोष्ट आवडली नाही,सरधोपट वाटली आणि सामान्यही.
आता माझ्या या प्रतिक्रियेला खवचट,बोचरी,हार्श इ.इ. म्हणता येईल का ते मला माहिती नाही.काही लोकांनी वरती सुधारणेसाठी काय करता येईल ते लिहीले आहे,मला तसेही लिहीता येणार नाही कारण अशा सूचना मला सुचत नाहीत.आपल्या लेखनात सुधारणा आपल्याच चिंतनातून येते लोक फार तर रिफाइनमेंट करु शकतील पण मूळ गाभा उत्तम करणे हे सर्वस्वी लेखकाच्याच हातात आहे,हे माझे मत.उगीच काहीतरी 'पोलिटीकली करेक्ट' पण खोटी प्रतिक्रिया का द्यावी? त्याने लेखकाचे नुकसानच होण्याचा संभव अधिक.
केवळ मायबोलीच नव्हे तर आंतरजालावर कोठेही कसलेही लिखाण करताना सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणार,त्याला सामोरे जाण्याचा खंबीरपणा (यालाच काहीजण जाड कातडीही म्हणू शकतात) हा हवाच.या माध्यमाचा तो दोष समजा अथवा गुण. वाईट प्रतिक्रिया आल्या की 'इथे कुणाला लिहूच देत नाहीत', 'असे करणार्‍यांचा एक कंपू आहे' असला कांगावा करुन काय उपयोग?

वाचतोय...
कथा लवकर पूर्ण करा. टेक्निकली बारीक सारीक तपशील नक्की सुधारता येतील. कथा जेव्हा स्थळ्-काळ यांसोबत फुलत असते तेव्हा ती सहज वाटायला हवी खरीखुरी वाटायला हवी. थोडक्यात कथेत- "कोकणात दोघे R-Mall ला भेटुया म्हणले" असा उल्लेख आला तर अगदीच धक्का बसेल, मग ते कुठे भेटले अन काय घडलं हे तितकं रियल रहात नाही (अजून पाच दहा वर्षांनी वाटेल?). तसच काहीसं.

बाकी लिखाण अन प्रयत्न कौतुकास्पद आहेत... अधिक लिहीत रहा.

पुढे काय झाले ?
...........................
...............................
....................................
..........................................
What's the end?

Pages