टॅक्सीवाले काका हरवलेला मोबाइल परत करतात तेव्हा...

Submitted by ठमादेवी on 11 April, 2010 - 07:44

परवाचा दिवस तिच्यासाठी काहीतरी विचित्रच उगवला होता... सकाळपासून सायलीला ताप आणि सन्ध्याकाळी शाळेत कार्यक्रम... ताप उतरला म्हणून डान्सची तयारी केलेल्या सायलीला घेऊन ती निघाली... घरापासून शाळेच अन्तर थोड जास्त म्हणून टॅक्सीने निघाली... थोड अन्तर जातात तोच या टॅक्सीने समोरच्या गाडीला जोरदार धडक दिली... ती धडक एवढ्या जोरात होती की या दोघी घाबरूनच गेल्या. थोडाफार मारही लागला. दुसर्‍या टॅक्सीत बसल्यावर आपल्या घाबरलेल्या मुलीला शान्त करून तिचा मेकअप ठीक करेपर्यन्त शाळा आली आणि त्या दोघी उतरून गेल्याही...
पण या सगळ्या गडबडीत तिला आपला मोबाइल टॅक्सीत राहिल्याचा कळलही नाही. नन्तर खूप उशीर झाला होता... ती शाळेतून बाहेर येईपर्यन्त टॅक्सीवाला निघून गेलाही होता... आता काय कराव, तिला काही कळेना... आज काय पनवती लागली असा विचार करूव तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागले... शेवटी आपल्या एका मित्राच्या फोनवरून तिने आपल्या मोबाइलवर कॉल करायला सुरुवात केली... कितीतरी वेळ कुणीच फोन उचलला नाही... मग मात्र तिचे धाबे दणाणले... आता फोन गेला... पत्रकार असल्याने किमान हजारेक नम्बर तरी त्यात होते... पण तेवढ्यात त्या मित्राचा फोन वाजला... तिच्या नम्बरवरून कॉल होता... मी इर्शादभाई बोलतोय... तुम्हारा फोन मेरे पास है... चिन्ता मत करो... अपना पता बताओ, ले आउन्गा...
रात्री उशीरा तो तिचा फोन घेउन आला... टॅक्सीत बसलेल्या दुसर्‍या प्रवाशाने फोन घेतला म्हणे... माझा आहे असे सान्गणार्‍या त्या प्रवाशाला याने सान्गितले... मी फोन समोर ठेवतो... तू त्यावर रिन्ग कर... वाजला तर तुला देईन... पण तो वाजलाच नाही... आणि योग्य मालकाला परत मिळाला... बक्षीस देउ करणार्‍या तिचे पैसे ही इर्शाद ने साफ नाकारले... तुम्हारी अमानत है... तुम्हे मिल गयी... इस मे उपकार कैसा म्हणत तो हसत निघून गेला... तिला तेव्हा तो एखाद्या देवदूतासारखाच वाटला...

गुलमोहर: 

छान....
असच काहिस आमच्या मावशींबद्द्ल ( आमच्या अहोंच्या मावशी ) घडलेले.
ते असे झाले की काही कामानिमित्त त्या आमच्याकडे परळला आलेल्या, त्यांच्या हातात नेहमी बाहेर जाताना पर्स असते. त्या दिवशी खरेदी केल्यामुळे त्यांच्या हातात एक पिशवी होती, घाईघाईने बस पकडण्याच्या नादात त्यांच्या हातातली पर्स पिशवीत टाकता टाकता कधी खाली पडली ते त्यांना कळलेच नाही, घरी अंधेरीला गेल्यावर त्यांना पर्स सापडली नाही म्हणून त्यांनी आमच्याकडे फोन केला. शोधाशोध झाली पण पर्स काही सापडत नव्हती. काहि वेळाने अंधेरीला एका माणसाचा फोन आला की आम्हाला एक पर्स सापडली आहे त्यात मिळालेल्या फोन डायरित हा नंबर मिळाला, नंतर आमच्याकडे फोन केला तर ती पर्स ज्या बस स्टॉपवरुन बस पकडली होती तिथेच मिळाली, म्हणजे परळलाच टाटा हॉस्पीटलच्या ईथे. ती माणसे परळलाच राहणारी होती , आम्हि आमचा पत्ता दिल्यावर ते दोघे पर्स घेऊन आले. बिचारी फार साधी माणसे होती, त्या पर्स मधले एकन एक वस्तू जिथेच्या तिथेच होती, मुख्य म्हणजे त्या पर्स मध्ये, ए.टि. एम कार्ड, क्रेडिट कार्ड, काही रुपये, आणि एक मंगळसुत्र होते. मंगळसुत्र खोटे होते, पण त्या माणसांना ते खरे वाटले , खरच त्या माणसांचा हेवा वाटला, त्यांनी जे फोन केले होते त्याचे पेसे पण नाही घेतले त्यांनी.

खरच आहे... माणुसकी जिवन्त असलेली माणसे अजूनही आसपास आहेत... आणि खूप आहेत... म्हणूनच कुठेही काहीही घडले तरी लोक मदतीचा हात पुढे करतात...