कथा

खरच हे शक्य आहे ?

Submitted by कवठीचाफा on 31 December, 2009 - 03:03

इथुन सुरुवात झाली http://www.maayboli.com/node/12190
आणि हे आमचे प्रेरणास्थान http://www.maayboli.com/node/12752

*******

त्या दुपारी विशालचा फ़ोन आला तेंव्हा मी एका मित्राबरोबर ‘मेट्रीमनी’वर धडपडत होतो. हं.. हं .. माझ्यासाठी नाही, माझ्या मित्रासाठी. तिशी पार केली तरी बिचार्‍याचं लग्न जुळत नाहीये. अर्थात तो बिचारा आहे हे त्याचं मत, कारण माझ्या मते जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत बिचारा या शब्दाचा अर्थच कळत नाही..... तर असो.
विशालचं नाव बघुन मी ताबडतोब फ़ोन उचलला.
" काय राजे ? आज कशी आठवण काढलीत?" नेहमीचा चेष्टेचा सुर.

गुलमोहर: 

'आय' आणि 'कर'

Submitted by tilakshree on 30 December, 2009 - 15:26

'या खटल्या दरम्यान सरकार पक्षाने सादर केलेले साक्षी, पुरावे आरोपी सुनील आपटे यांना दोषी ठरवण्यास पुरेसे नसल्याने हे न्यायालय आपटे यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करीत आहे.'
न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. आयकर अधिकारी सुनील आपटे आरोपीच्या पिंजर्‍यातून खाली उतरले आणि पुढच्या कायदेशीर औपचारिकतेबाबत चौकशी करण्यासाठी वकील आणि पोलिस अधिकार्‍यांकडे वळले. न्यायालयात निर्दोष शाबीत होऊनही आपट्यांचा चेहेरा आनंदाने, समाधानाने फुललेला नव्हता; तर चेहेर्‍यावर होता केवळ एक विषण्ण भाव! एक विषाद!!

गुलमोहर: 

चक्र/वर्तुळ भाग ३

Submitted by कविन on 25 December, 2009 - 02:06

 http://www.maayboli.com/node/4994 चक्र/वर्तुळ भाग १
http://www.maayboli.com/node/5680 चक्र/वर्तुळ भाग २

------------------------------------

"Passengers your attention please....."
"यात्रीओसे निवेदन है..."
"प्रवाशांनी कृपया इथे ..."
अस तीन भाषांतुन ओरडत निवेदिका, गाड्या आज पण लेट असल्याच अनाउंस करत होती.....आणि मी वेडया सारखी स्मी ची वाट बघत उभी होते.."

आत्त्ताच ह्या स्मी चा फोन बंद पडयला हवाय...?

नशीब लागला एकदाचा..हॅलो...

"स्मि.. कुठे आहेस?

"गाड्या लेट आहेत... ऐकु येत नाहीये मोठ्याने बोल्..."

गुलमोहर: 

दुस्तर

Submitted by हायझेनबर्ग on 22 December, 2009 - 20:43

सदोदित अंधार भरून राहिलेल्या धान्याच्या खोलीतला दिवा लाऊन कुठल्याश्या तंद्रीतच तांदुळाच्या गोण्या ठेवायच्या कोपर्‍याकडे ती वळली आणि क्षणभर तिच्या छातीत धस्स झाले. रोज दिवेलागणीला देवघरातल्या समईत तेल घालून वात मोठी करून देवाला हात जोडायचे आणि उपड्या कांडणाच्या उखळावर ठेवलेली, माईंच्या हातची, वजनाला चांगली सव्वाकिलो तरी भरेल अशी पितळेची परात घेऊन धान्याच्या खोलीतून संध्याकाळच्या रांधण्यासाठी पसाभर तांदूळ घेऊन यायचे, हा क्रम जणू शरीरधर्माचा एक भाग असल्यासारखाच तिच्या अंगवळणी पडला होता.

गुलमोहर: 

या चाफ्याचं काय करू ?

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 December, 2009 - 06:27

(आमची प्रेरणा - एक प्लान.... खुनाचा http://www.maayboli.com/node/12190)

"च्यायला विशल्या, पण जाम तंतरली होती रे माझी. सॉलीड घाबरलो होतो. ऐनवेळी माझ्यातल्या रहस्यकथा लेखकाने हात दिला म्हणून थोडा सावरलो. त्यात चाफ्याच्या ' त्या कॉलने' कृपा केली आणि मी कसंबसं धीर एकवटून तो फटका मारला." हातातला कॉफीचा कप खाली ठेवत कौतुक स्वतःशीच हसला आणि मी खुसखुसायला लागलो.

गुलमोहर: 

मुद्रिका (संपुर्ण)

Submitted by कौतुक शिरोडकर on 18 December, 2009 - 03:34

२०१० मधल्या सरत्या मे महिन्याची ती एक नेहमीची संध्याकाऴ होती. 'वर्किग डे' होता. रस्ते ओसंडून वहात होते. गाड्यांची वर्दळ नेहमीचीच. तो त्या प्रवाहात सिग्नल ग्रीन होण्याची वाट पहात होता.

गुलमोहर: 

संस्कार

Submitted by सुनिल परचुरे on 18 December, 2009 - 02:36

संस्कार
``साहेब आत बॉडी ढकलु कां ?“
डॉ. आनंदने मानेनेच होकार दिला. बॉडीला स्ट्रेचरवरुन हळूच धक्का दिल्यावर ति सेकंदातच आत इलेक्ट्रीक भट्टीत गेली. जातानाच भर्र भर्र आवाज करत बॉडीवरचा पांढरा कपडा पेटु लागला.
``आईss ग “ अस म्हणत आनंदच्या बायकोने आपले डोके त्याच्या छातीवर ठेऊन अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.
``अस्थि न्यायला कधी येणार ?“
``कधि मिळतील ?“
``आता वेळ असेल तर तास-दिड तास थांबा. लगेच देतो“
``आम्ही थांबतो, घेऊनच जाऊ“.

गुलमोहर: 

मैत्री- भाग २

Submitted by सुमेधा आदवडे on 17 December, 2009 - 13:54

मैत्री भाग १ इथे वाचा---> http://www.maayboli.com/node/12629

शैलजा,आदित्य,रुना आणि अमित- चार जीवलग मित्र. शैलजा आणि आदित्यचं लग्न ठरल्यावर साखरपुड्याच्या ऐन काही दिवसांआधी आदित्य जोरदार अपघात होतो. हॉस्पिटलमधे नर्सने चुकीचे प्रीस्क्रीप्शन फॉलो करुन दिलेल्या एका इंजेक्शनमुळे आदित्यचा म्रूत्यु होतो. आदित्यवर उपचार करणार्‍या डॉ.पुराणिक यांचा मेडीक्युअरचा अकाऊंट कोणीतरी वापरुन हे चूकीचे प्रीस्क्रीप्शन्स टाकल्याचं उघडकीस येतं. आता पुढे...
*************************************

गुलमोहर: 

भक्षक...!

Submitted by विशाल कुलकर्णी on 14 December, 2009 - 07:11

********************************************************************
"ए रम्या, कशापायी भाव खातुस? सांग की काय झालं हुतं त्ये? "

गोपाळनं रम्याच्या पाठीत एक दणका घातला. तसा सगळ्यांनीच गलका केला. संज्या, नान्या, पाठकाचा औध्या, म्हटलच तर कुलकर्ण्याचा जन्या.... सगळेच रम्याच्या मागे लागले.

"सांग ना बे, कशाला भाव खातो फुकटचा?"

"आरं... आरं... वाईच, चा तरी पिऊ देशीला का न्हायी?"

रम्यानं चहाचा कप संपवला. मिशीला लागलेले चहाचे कण उलट्या मुठीने निपटून काढले. औध्याकडनं तंबाखु मागुन घेतली. चुना लावून व्यवस्थीत चोळली. कचरा काढून टाकत भुकटी ओठांच्या कोपर्‍यात सरकवली. हात झटकले आणि सावरुन बसला...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा