२०१० मधल्या सरत्या मे महिन्याची ती एक नेहमीची संध्याकाऴ होती. 'वर्किग डे' होता. रस्ते ओसंडून वहात होते. गाड्यांची वर्दळ नेहमीचीच. तो त्या प्रवाहात सिग्नल ग्रीन होण्याची वाट पहात होता.
त्याने घड्याळाकडे पाहीलं. साडेपाच वाजले होते. त्याला उशीर झाला होता. गाडीत बसल्या-बसल्या त्याला ती समोरची हिरवट-निळसर काचेची भव्य इमारत स्पष्ट दिसत होती. नेहमीसारखा सरळसोट प्रकार न करता यात तिरपे, आडवे कोन तयार करण्यात आले होते. एखाद दुसरी बाजू इतकी झुकलेली होती, जणू काही तो काचेचा सांगाडा खालीच कोसळेल. वरच्या माळ्यांवरील मावळतीच्या सुर्यप्रकाशाचं रिफ्लेक्शन सुरेख वाटत होतं. मंदगतीने सरकरणार्या ढगांचा काचांवर प्रतिबिंबित प्रवास देखणा दिसत होता. शिवाय शेजारच्या इमारतीही त्यात दाटीवाटीने प्रतिबिंबित झाल्या होत्या. इमारतीचा खालचा अर्धा भाग मात्र शेजारच्या इमारतींमु़ळे सावलीत होता. त्याच्या पुढची गाडी हलताच सिग्नल ग्रीन झाल्याचं त्याला जाणवलं. त्याने गाडी दामटली. घड्याळाच्या काट्यावर जगणारे चाकरमानी आपापले ड्रॉवर बंद करून बॅगा सांभाळत निघाले होते. जवळजवळ अर्धी इमारत रिकामी झाली होती. उरलेल्या ऑफिसेस मध्ये शेवटचा अर्धा तास दिवसभराच्या कामावर व स्वत:वर हात फिरवण्यात व्यस्त होता. प्रत्येक माळा माणसांनी दाटला होता.
गाडी बेसमेंटमध्ये पार्क करून तो लिफ्टकडे धावला. पुढच्या दहा मिनिटात दहापैकी बंद असलेल्या दोन लिफ्टस, पुढे लागलेल्या रांगा, खचाखच भरलेली माणसं अशा अनेक अडथळ्यांना पार करून तो बाराव्या माळ्यावरच्या ऑडीटोरियममध्ये पोहोचला. त्या कॉरिडॉरमध्ये तो एकटाच मनुष्यप्राणी होता. लिफ्ट मागोमाग कॉरीडॉरमधल्या कॅमेर्यांची आपल्यावर नजर आहे हे घाईत त्याच्या लक्षातही आलं नाही. बंद होत असलेल्या दाराकडे तो वेगाने धावला. पुढच्याच क्षणी त्याचा उजवा पाय त्या बंद होणार्या दाराच्या फटीत होता. तो आत शिरताच दार बंद झाल. आतला गारवा त्याला जाणवला. त्या गारव्यातही आता एक उबदारपणा पसरला होता. ती उब तिथे खचून भरलेल्या माणसांची होती.
ऑडीटोरीयम नवीनच होता. मागच्या वर्षीच तर तयार झालेला. ग्रीक नाट्यगृहासारखा. उतरत्या पायर्यांचा. समोर गोलाकार रंगमंच. फक्त येथे बाल्कनी हा प्रकार नव्हता.
या फ्लोरवर कुणी सुरक्षा रक्षक का दिसला नाही ? लिफ्टजवळही कुणी नव्हते. गेटवर व बेसमेंटमध्ये मात्र जत्रा होती त्यांची. नेहमीप्रमाणे लगट करू पाहणार्या संशयाच्या जळवांना झटकून त्याने आत नजर फिरवली. तो दरवाजा माणसांनी बंद झाला होता. हातातलं पत्रकारीतेचं आय कार्ड सगळ्यांना दिसेल एवढ्या उंचावर पकडून तो आत शिरण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची राखीव सीट पुढे कुठेतरी असेल याची त्याला खात्री होती. तेवढ्यात पुढे उभ्या असलेल्या दोघांनी त्याला त्यांचे आय कार्ड दाखवले. आपल्यापेक्षा विख्यात वर्तमानपत्राचे वार्ताहर दरवाज्यात झुंजताना पाहून त्याने कार्ड खिशात टाकलं. आपल्याला बराच उशीर झालाय हे जाणवलं त्याला. ऑडीटोरीयम खचाखच भरलं होतं. यातले किती हौशी असतील ? किती जणांना या विषयात गती असेल ? किती जण घरी जाऊन बायकोशी वाद घालण्यापेक्षा 'हे बरं' म्हणून बसले असतील ? विनाकारण घोंगावणारे विचार. दोन पायर्या वर चढून त्याने स्वतःपुरती निवांत जागा मिळवली आणि शांतपणे खिशातले सिगारेटचं पाकीट काढलं. तोच कुणी खाकरलं. तो त्या दिशेला वळला. समोरच्या विरळ केसाच्या माणसाचा हात भिंतीच्या दिशेला होता. त्याने हाताच्या रेषेत नजर वळवली. 'नो स्मोकींग' चा बोर्ड दिमाखात झळकत होता. त्याने पुन्हा वळून त्या विरळ माथ्याकडे पाहीलं आणि समजल्यागत मान हलवली. हेल्थ मिनिस्टरला मनातल्या मनात शिवी हासडून त्याने सिगरेटचं पाकीट खिशात टाकलं. विरळ केसवाल्याने एक पत्रक त्याच्याकडे सरकवलं. त्याने ते हसून घेतलं आणि तेवढ्यात 'हॅलो फ्रेंडस' असा डॉ. अद्वैत सामंतांचा आवाज त्याच्या कानात शिरला. ऑडीटोरियममधली ध्वनीव्यवस्था छान आहे... त्याने प्रशस्तीपत्रक दिलं. कार्यक्रम सुरु झाल्याची ती नांदी होती. तो पुढे सरसावला. तो उभा होता तिथून त्याला खाली प्लॅटफॉर्मवर मांडलेल्या टेबलामागचे डॉ. सामंत त्या स्टेजवर असलेल्या प्रकाशझोतामुळे नीट दिसत होते. साधारण पावणेसहा फुटांची उंची, सशक्त बांधा, गौर वर्ण, उभट चेहरा, डाव्या बाजुला भांग पाडून फिरवलेले केस, चष्म्याआडचे मिश्किल डोळे, डार्क ब्ल्यु शेडचा सुट, बोलता-बोलता सहजच गळ्यातला टाय आणि चेहर्यावरचा चष्मा नीट करण्याची सवय. त्याने एका दृष्टीक्षेपात सामंताना त्याच्या नजरेसह कॅमेर्यात कॅच केलं. सामंत कदाचित चाळीसपर्यंत असतील, पण वाटत नाहीत, त्याच्या नजरेने त्याला दिलेला रिपोर्ट.
"मित्रहो, इतिहासाच्या एका अवर्णनीय घटनेवरून काळाचा पडदा दूर सारण्याच्या या महत्त्वाच्या संधीचा लाभ मला झाला हे मी माझं भाग्य समजतो. पाचशे वर्षापुर्वी हिमाचल प्रदेशातल्या एका दुर्लक्षित गावात एक विलक्षण गोष्ट घडली. भारतातील पहिली ममी. कदाचित पहिली नसावी. उत्तर प्रदेशात सापडलेली ममी तीन हजार वर्षांपुर्वींची आहे अस म्हणतात. पण ती खरी की खोटी हा एक वेगळा वाद. त्याचा मागोवा मी इथे घेत नाही. पण हिमाचल प्रदेशातली ही एक बौद्ध भिख्खुची ममी संशोधनाचा विषय झाली. हे आपल्यापैकी बर्याच जणांना ज्ञात असेलच. पण.... यस, हा 'पण' उपजला डॉ. चारुहास देवधरांच्या मनात आणि त्याने ठाण मांडलं त्यांच्या मेंदूत. यातून सुरु झाल पुन्हा नव्याने शोधकार्य, उत्खनन. कालांतराने काही अज्ञात कारणांमुळे हे काम स्थगित झाल. डॉ. देवधरांचे ते शोधकार्य माझ्या हाती लागलं आणि त्यांच्या परवानगीने आम्ही म्हणजे डॉ. कांचन चिटणीस..... (शेजारीच बसलेल्या डॉ. कांचन चिटणीस यांनी आपला हात वर करून बघ्यांना आपल्या अस्तित्वाची जाणिव दिली. त्याने त्यांच्याकडे पाहीलं. साडेपाच फुट उंची, किंचित स्थुल वाटावा असा बांधा, गोलाकार गोबरा चेहरा, मोकळे केस, पीच कलरचा सलवार कुर्ता, निळसर झाक असलेले डोळे... कॉन्टेक्ट लेन्स असावेत... त्याच्या नजरेने पुन्हा स्कॅनिंग केली.), डॉ. कलिम शेख ( सामंताप्रमाणे त्यानेही नजर तिकडे फिरवली. शेख यांची खुर्ची रिकामी होती.) सॉरी..कोणत्याही क्षणी ते इथे पोहोचतील.... आणि मी.. डॉ. अद्वैत सामंत... आम्ही तिघांनी हे काम पुन्हा चालू केलं. आमचा शोध आम्हाला घेऊन गेला एका मठाच्या तळघरात आणि तिथे सापडले आम्हाला हे सारे अवशेष जे आज तुमच्या समोर आम्ही सादर करत आहोत. डॉ. गोयल यांची परवानगी असेल तर मी तुम्हाला त्या अदभूत दुनियेच्या सफरीवर घेऊन जाईन." डॉ. सामंतांनी डॉ. गोयल यांच्याकडे नजर फिरवली. डॉ. गोयल याची वृद्ध मान होकारार्थी हलली आणि सामंतांनी प्रोजेक्टरवाल्यास इशारा केला. ऑडीटोरीयममधले सगळे दिवे हळुहळु विझले आणि सामंताच्या मागे असलेल्या पांढर्या शुभ्र भिंतीवर एक चौकोनी प्रकाश दिसू लागला.
"अवशेषांचे फोटो आणि या संपुर्ण प्रोजेक्टचे माहीतपत्रक आपणा सर्वांच्या हातात आहेच. नेहमीच्या भाषणांच्या परंपरेला फाटा देऊन मी तुम्हा सर्वास विनंती करतो की तुम्ही हा काळाच्या उदरात गडप झालेला खजिना डोळ्यासमोरून घालावा. यानंतर तुमच्या प्रत्येक शंकेचे समाधान करण्यात येईल." सामंत व इतर सगळे पहिल्या रांगेत जाऊन बसले. स्लाईड शो सुरु झाला. थोड्याच वेळात समोरच्या स्क्रीनवर हिमाचल प्रदेशातील स्पिती जिल्ह्यातील घुयेन गाव होतं, जिथे पहिली भारतीय ममी सापडली. भारत्-चीन यांच्या सीमेजवळ असलेल्या डोंगराळ भागातील दुर्लक्षित गाव. १९७५ च्या भुकंपामुळे जमिनीवर आलेला समाधीचा भाग...... सुस्थितीतील बौद्ध भिक्षू सांगा तेन्झिन यांची ममी....पेन्सिल्वेनिया युनिवर्सिटी, एन्थ्रोपोलॉजी व आर्कयोलॉजी म्युझियम येथील संशोधक विक्टर मेईर यांनी 'ममी पाचशे वर्षे जुनी आहे' असं ममीबद्दल केलेले स्टेटमेंट.... अशा अनेक फोटोग्राफस नंतर मात्र समोर आले ते फोटोग्राफस वेगळे होते. यावेळेस पहिला फोटो होता तो डॉ. सामंत, डॉ. चिटणीस आणि डॉ. शेख यांचा. त्याच्या मागे होता एक फारच जुनाट वाटणारा मठ.... मठाचा आतला भाग... त्यानंतर मागची बाजू.... तेथला चौथरा..... त्यानंतर सुरु झालेलं खोदकाम......समोरच्या स्क्रीनवर दिसणारे फोटो तो नकळत हातात आलेल्या पत्रकाशी पडताळत होता. एखादी फिल्म दाखवण्याएवजी हे फोटो का दाखवले जात आहेत हा प्रश्न त्याच्या संशयी मनात डोकावला. या सगळ्या घटनांची एखादी डोक्युमेंटरी असायलाच हवी. हल्ली प्रत्येक गोष्टीची व्हिडीयो क्लिपिंग बनवली जाते. याची बनवली असेल ना.... मग ती का दाखवली जात नाही ?
त्याच वेळी स्क्रीनकडे पहात असलेल्या सामंताच्या उजव्या हाताला असलेला ऑडीटोरियमचा दरवाजा उघडला गेला. प्रकाशाची एक तिरिप अंधार चिरत आत आली आणि मागोमाग एक व्यक्ती आत आली. दार बंद झालं आणि कवडसा अंधारात हरवला. स्क्रीनच्या उजेडात त्या व्यक्तीच्या देहबोलीवरून तो 'सॉरी' म्हणत असावा हे त्याने जाणलं. त्या व्यक्तीने डॉ. चिटणीसाच्या शेजारची सीट पटकावली. डॉ. सामंत मात्र आपला पराक्रम पहाण्यात दंगले होते. कोण असावा हा ? डॉ. शेख तर नव्हेत ? अंधारात त्याला त्याच्या साडे पाच फुटाच्या उंचीशिवाय व मध्ये लखलखलेल्या चष्म्याच्या काचेशिवाय दुसरं काही दिसलचं नाही.
..............अकस्मात हाती आलेला एक दगडी दरवाजा..... त्यामागे वर्षानूवर्षे दडलेले भुयार..... आत शिरण्यास नकार देणारे घाबरलेले स्थानिक मजूर... भुयारात शिरणारे डॉ. सामंत, चिटणीस आणि शेख........... एका दहा बाय दहाच्या दगडी खोलीचा फोटो......
या सगळ्या पुरातन गोष्टीत त्याला काहीच रस नव्हता. पण कोणीच नव्हतं म्हणून त्याला संपादकाने पिटाळलेलं. पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो आलेला. त्याने आता स्क्रीनवरची नजर हटवून इकडे तिकडे पहायला सुरुवात केली. क्षणभर नजरेला अंधाराशिवाय काहीच जाणवलं नाही. नंतर मात्र आकृत्या स्पष्ट व्हायला लागल्या. शेजारचा विरळ केसांचा माणूस एखादा रहस्यपट पहावा अशा आत्मियतेने पहात होता. आजूबाजूला नजर फिरवताना त्याने हाताच्या कोपर्यापर्यंत दुमडलेले शर्टाचे हात खोलून मनगट झाकलं आणि बटण लावले. दोन्ही हात एकमेकांवर घासायला सुरुवात केली. त्या खचाखच भरलेल्या ऑडीटोरियममध्ये एखादा ओळखीचा चेहरा आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. माणसांच्या त्या गर्दीतले सगळे आकसायला लागलेले. चुळ्बूळ सुरु झालेली. तेव्हाच त्याला स्वतःच्या अचानक सुरु झालेल्या यांत्रिक हालचालींची जाणिव झाली. त्याच्या शेजारच्या माणसाने हातातला रुमाल कानावर बांधला आणि त्याला जाणवलं. वातावरणातला मघाचा उबदारपणा आता कमी झाला होता. त्याने सहज सेन्ट्रलाईज एसीच्या झरोक्यांकडे पाहीलं. दिसण्याजोगं काही नव्हतचं तिथे. पण वातावरणात गारवा वाढायला लागला होता. एसीने आपलं अस्तित्व जाणवून देण्याचा प्रयत्न सुरु केलेला. कुणीतरी एसीचा कंट्रोल आपल्या हाती घेऊन बटण फिरवत तर नसेल ... ? एक शंका त्याच्या मनात वाढणार्या गारव्यासह शिरली. नकळत त्याचा हात आता नाकाकडे गेला. एक कुबट दर्प त्या गारव्यात घुसमटल्यासारखा वाटला.
.........लोंबलेले व गंजलेले जीर्ण साखळदंड..... त्यात अडकून असलेला हाडांचा सापळा....... दगडी चौथर्यावर पडलेले ताट.... पेला....... एक ग्रथासम वाटणारे पुस्तक..... गौतम बुद्धांच्या शांत चेहर्याचा मुखवटा.... जुना रांजण.... रांजणात बाहेर लोंबत असलेले काही सोन्याचे दागिने.....
स्लाईड शो अजून चालूच होता. स्त्रियांनी पदर गुंडाळून घेतले. काही जणींना नावापुरत्या गळ्यात घातलेल्या ओढण्या सावरल्या. केसांना गुंडाळलेले स्कार्फ कानावर आले. मिनी व कॅप्री घातलेल्यांनी त्यातल्यात्यात जीन्सवाल्यांकडे 'कशा नशीबवान' असा दृष्टीक्षेप टाकत 'काय पांघरता येईल ? ' यासाठी इथे तिथे पाहायला सुरुवात केली. एक दोघांनी पाय वर घेऊन स्वत:लाच विळखा घातला होता. हातावर हात जोरात चोळायला सुरुवात झाली होती. चुळ्बुळ वाढायला लागली. पण गारवा आता सोसण्यापलिकडे गेला होता. बोचू लागला होता. अंगावर काटा आलेला. दात वाजू लागले. आतातर शब्दाआधी तोंडातून वाफ निघायला लागलेली. त्याने डॉक्टरांच्या दिशेने पाहीले. त्यांचीही परिस्थिती वेगळी नव्हती. डॉ. सामंत आपल्या सेलवर कुणाला तरी फोन करण्याच्या प्रयत्नात होते. महत्प्रयासाने अडवलेल्या खुर्च्या सोडून प्रत्येकजण दाराकडे वळला. स्लाईड शो मात्र अजून चालूच होता. पण आता त्याच्यावर काळ्या सावल्याच जास्त दिसत होत्या. प्रोजेक्टरसमोरून जाणार्यांच्या.
उत्कृष्ट कलाकुसर असलेली ती आठही लाकडी दारं गारठ्याने रुसली होती. दार उघडण्याचा प्रयत्न होऊ लागला. पण दरवाजे जाम झाले होते. आपण सगळे एखाद्या प्रचंड मोठ्या फ्रिजरमध्ये अडकलो आहोत ही भावना सगळ्यांच्या मनात गोठली. एकट्या दुकट्याच्या प्रयत्नाचे आता झुंडीत रुपातर झालेले. गोंधळ गोंगाट वाढलेला. स्क्रीनकडे कुणाचच लक्ष नव्हतं. गर्दीत एक उब आहे याची जाणिव होताच जो तो त्या गर्दीचा भाग होऊ लागला. गर्दीचं आता कुणालाच वावड नव्हतं. जगण्यासाठी चेंगरणं महत्त्वाच ठरलेलं. चेंगराचेंगरीत दारावरचा जोर वाढत गेला. मोबाईलवरचे नंबर डायल होत होते. आतल्या गोंधळामुळे बाहेरचा काही अदमास घेता येत नव्हता. त्या गदारोळात तो कुबट दर्प दुय्यम ठरला. त्याच वेळेस स्क्रीनवरची लाईट ऑफ झाली. स्लाईड शो संपला. नामावली सुरु झाली. त्यात काही महत्त्वाचे उल्लेख होते. आभारप्रदर्शन होते. एक गच्च काळोख ऑडीटोरियममधल्या पोकळ्या भरून उरला. पण फक्त मिनिटभरच. त्याही परिस्थितीत कुणीतरी दिवे लावले आणि आठही दरवाजे एकाच वेळेस उघडले. बाहेरची उष्ण आणि हवीहवीशी वाटणारी हवा प्रकाशाच्या सोबतीने आत शिरली. दारावर धडका देत असलेले खाली कोसळले आणि त्यांच्यावर मागचा जत्था कोसळला. एकच चेंगराचेंगरी झाली. वातावरणात आता फक्त किंकाळ्या होत्या.
एखाद्या चुटकीसरशी गारवा वितळावा तसं झालं. वातावरण बदललं. मे महिन्यातल्या नेहमीच्या संध्याकाळसारखं. सुरक्षारक्षकांचा ताफा परिस्थिती सांभाळू लागला. सेक्युरिटी इन्चार्ज देशमाने रिटायर्ड मिलिट्रीमॅन होते. असल्या गोष्टी हाताळणं त्यांच्यासाठी कठीण नव्हतं. दरवाजे उघडताच तो दर्प त्यांच्या नाकात घुटमळला. क्षणभरच. पण त्याकडे लक्ष न देता ते चेंगरलेल्या लोकांकडे वळले.
डॉ. सामंत त्यांच्या खुर्चीत येऊन स्थिरावले. समोर स्क्रीनची पांढरीशुभ्र भिंत होती. पण अजूनही चालू असलेल्या प्रोजेक्टरमुळे स्क्रीनवर नाचत असलेल्या काळ्या सावल्या आता ओसरल्या होत्या. त्यांची नजर शुन्यात हरवली. तो शिलालेख..... त्यावरच्या ओळी...... "आणि मग काळ्या सावल्या येतील" त्याबरोबर तो कुबट दर्प त्यांच्याभोवती रुंजी घालून गेला. तो दर्प त्यांच्या ओळखीचा होता. त्यांना समोरच्या स्क्रीनवर आता स्पष्ट दिसत होतं ते तळघर.... आणि त्यात उभे असलेले ते स्वतः.......... डॉ. चिटणीस आणि शेख त्यांच्या समोर येऊन उभे राहीले. दोन्ही हात खुर्चीच्या दांड्यावर ठेवून शेख ओणवे झाले.
"मी बोललो होतो अद्वैत." त्या आवाजाने सामंत भानावर आले. " तू मनावर घेतलं नाहीस. ये तो शुरुवात है.... याचा अंत काय होईल ते त्या अल्लाला माहीत." शेखने त्यांच्या चेहर्यासमोर आपला चेहरा आणत त्यांना हळूवार शब्दात जाणिव करून दिली आणि ते परिस्थिती सावरण्यासाठी गर्दीकडे वळले. सामंतानी पाठमोर्या शेखकडे पाहीलं आणि त्यांची नजर डॉ. चिटणीसांकडे वळली. डॉ. कांचन यांनी मात्र यावर मौन बाळगण्यातच धन्यता मानली. सामंताना स्वतःचा चेहरा हिमाचल प्रदेशातल्या भयचकीत झालेल्या मजुरांसारखा वाटू लागला. शेखचं बोलण पटायला कारणं कमी नव्हती पण विज्ञानवादी मनाला ते रुचावं तरी कसं ? तो दर्प इथे कसा ? डॉ. चिटणीस मात्र या विचारातच हरवलेल्या.
एव्हाना लोक सावरायला सुरुवात झाली होती. त्यात तोही होताच. त्याच लक्ष कलीम शेखांकडे होतं. रुंद कपाळ असलेल्या त्या माणसाची केसाची पद्धत डॉ. कलाम यांच्यासारखी होती. रंगही किंचित लालसर वाटावा असा. डोळ्यावरच्या चष्म्याचा नंबर त्याच्या सहकार्यापेक्षा जास्त नंबरचा. वर्ण गव्हाळपणा कडे झुकलेला. चेहर्यावर नीट कोरलेल्या दाढीमिशा व त्याही लालसर झाक असलेल्या. त्यांनी घातलेल्या तपकिरी रंगाचा सुट त्यांना थोडा विजोड वाटत होता. स्वारी पन्नाशीच्या जवळपास पोहोचलीय हे जाणवत होतं.
बॉडी टेंपरेचर नॉर्मल होताच त्याने कॅमेर्यात तिथेल्या चेंगराचेंगरीचे, हताश डॉ. सामंताचे, डॉ. चिटणीसांचे, चेहर्यावर हात धरणार्या व फोटोला नकार देणार्या शेख यांचे फोटो घेतले. या सगळ्या प्रकरणात त्याच्यासारख्या शोधक पत्रकारीता करणार्या पत्रकाराला वेगळा वास येण्यात काही नवल नव्हतं. तो शेख यांच्या मागे धावला. सामंत मात्र अजूनही त्याच खुर्चीत शांत बसून होते व चिटणीस हातातल्या पत्रकाकडे पहात होत्या.
या गदारोळात आपल्या खुर्चीत निश्चल पडलेल्या डॉ. गोयल यांच्याकडे कुणाचं लक्ष गेलच नाही.
शंतनूराव जहागिरदार. सुखवस्तूपणा दाटून असलेलं शरीर, भारी भरक्कम देहयष्टी, मागे फिरवलेले विरळ केस, त्यामुळे दिसून येणारं भव्य कपाळ. वारसाहक्काने चालून आलेल्या संपत्तीला लाभलेला परिस. कारखानदारीतील एक मान्यवर नाव आणि शिक्षण क्षेत्रातलं एक नामवंत प्रस्थ. महाराष्टातल्या प्रत्येक शहरात जहागिरदारांच्या नावाचा ठसा असलेलं एक विद्यापीठ व एक कारखाना असावा हा एकच ध्यास. त्यांना कोणत्याही विषयाची एलर्जी नव्हती. तंत्रज्ञान, शास्त्र, औषधे, जाहीरात, फॅशन, आयटी, हॉटेल मॅनेजमेंट... आर्किओलॉजीला वाहून घेतलेलं कॉलेज अगदी अलिकडच्या काळातलं. यातच त्यांची भेट इतिहासाने पछाडलेल्या डॉ. चारुहास देवधरांशी झाली. यातूनच निर्मिती झाली ती 'ध्येय' संस्थेची. विद्यापीठाशी संलग्न असुनही स्वतःच्या अस्तित्वाचा एक वेगळा ठसा उमटवणारी संस्था. 'ध्येय' निर्माण करण्यामागे त्यांचा हेतू साधा व सरळ होता. एक कारखानदार व शिक्षणसम्राट म्हणून सरकार दरबारी त्यांना वलय होतं. डॉ. चारुहास देवधरांची भेट झाली आणि पुरातन गोष्टींबद्दल त्यांना असलेलं सुप्त आकर्षण उसळी मारून वर आलं. आपलं संपुर्ण वजन वापरून त्यांनी 'ध्येय' ची स्थापना केली. खाजगीकरणाकडे वळलेलं सरकार पुरातत्व खात्याच्या खोदकामात पैसा पुरवण्यात रस घेत नाही हे कळण्याइतपत राजकारण त्यांनाही कळत होतं. 'ध्येय' ने पारदर्शी राहून आपले सगळे शोध तसेच त्याचे फलित भारतीय पुरातत्व खात्याकडे सुपुर्द करावे या मुख्य अटीवर ध्येयची स्थापना झाली. निदान कागदोपत्री तरी ध्येयच्या प्रत्येक हालचालीवर सरकारचं नियंत्रण होतं. डॉ. चारुहास देवधर ध्येयचे सर्वेसर्वा झाले.
पण आज जहागिरदार अस्वस्थ होते. त्यांच्या त्या प्रशस्त कॅबिनमध्ये ते तिघे शांतपणे बसले होते. जहागिरदारांच्या फोनवरील संभाषणाच्या समाप्तीची वाट पहात. समोरच्या काचेच्या टेबलावर असलेल्या प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ते तिघेही विराजमान होते. सोबत पत्रकात आर्वजून दिलेले काही फोटोग्राफ्सदेखील आणि डॉ. गोयल यांचा हारांच्या मागे अदृश्य झालेला चेहरा. इतिहासाच्या अंधार्या दरीत जाऊन त्यांनी लावलेल्या शोधाच्या विजयाला लागलेलं गालबोट जास्त अधोरेखित करण्यात आलं होतं. एका अतिउत्साही वर्तमानपत्राने 'इतिहासाचा शोध की शाप' या नावाने पहिलं पान व्यापलं होतं. सकाळी घरून निघताना कधी नव्हे ती त्यांनी सगळी वर्तमानपत्रे चाळली होती. जहागिरदारांचा फोन अपेक्षित होताच.
"सामंत, मुजुमदार येतील थोड्या वेळात. घडल्या प्रकाराचं स्पष्टीकरण हवय शासनाला." जहागिरदार सेल कट करून त्यांच्याकडे वळले.
"सर, अॅडमिनचा रिपोर्ट मिळेल दुपारपर्यंत. आपली संपुर्ण इमारत कॉम्पुटर कंट्रोलमध्ये आहे. एसीसुद्धा. त्याच्या सिस्टिममध्ये प्रोब्लेम झाला. सेट केलेल्या टेंपरेचरमध्ये सातत्याने वाढ व्हावी असा बदल कोणीतरी केलाय. हा माणूस आतला आहे की बाहेरचा हे कळायला वेळ लागेल. ऑडीटोरीयमच्या दरवाज्याचं लाकुड वेगळं आहे. सॉफ्ट आहे. कलाकुसरीसाठी हे विशिष्ट लाकुड वापरतात. एसीचं टेंपरेचर लो झाल्यावर हवेत ओलावा वाढला. त्यामुळे लाकुड पावसाळ्यात पाणी लागून फुगावं तसं फुगलं. दरवाजे घट्ट झाले. बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनीच घाई केल्याने चेंगराचेंगरी झाली. गारवा प्रमाणाबाहेर वाढल्याने डॉ. गोयल यांच्या श्वासोच्छवासात अडथळे निर्माण झाले आणि हार्ट अटॅकमुळे त्यांना मृत्यु आला. दॅटस इट." सामंत एका दमात बोलून मोकळे झाले.
"शेख काहीतरी वेगळचं सांगत होते सामंत." जहागिरदारांनी आपले घारे डोळे सामंतावर रोखले.
"तो त्यांचा दृष्टीकोन आहे सर. त्यांना ह्यात त्या अस्थिपंजराचा हात दिसतो, यावर आता मी काय बोलणार ?" सामंतांनी खांदे उडवले.
"सामंत, तुमचं म्हणणं पटतय मला. पण विज्ञानाला अजूनही कळल्या नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत जगात. एकदा त्या दृष्टीकोनातूनही तपास करा. म्हणजे शंकेला जागा राहणार नाही. शेख स्वतः रसायनशास्त्राच्या क्षेत्रातले तज्ञ आहेत. यापुर्वी त्यांनी असे स्टेटमेंट पुर्वी कधी केलेले नाही." जहागिरदारांना सामंताचे खांदे उडवणे रुचले नाही.
"मला कल्पना आहे त्याची सर. याबाबत आमची चर्चाही झाली आहे. पण माझ्या २१व्या शतकातल्या मनाला आत्म्याचा शाप या गोष्टी पटत नाहीत." सामंतानी जहागिरदारांची नाराजी ओळखून सुर बदलला.
"शेख, तुमचं मत तुम्ही मला लेखी द्या. पण ते फक्त माझ्यापुरतचं राहायला हवं. प्रसारमाध्यमांकडे याची वाच्यता व्हायला नको. ही आपली खाजगी संस्था आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट शासनाला कळवण्यास बांधिल असलो तरी काही बाबतीत मौन बाळगणं सोयिस्कर आहे हे तुम्हाला सांगण्याची खरतरं गरज नाही. " जहागिरदारांच्या वक्तव्यावर शेख यांनी मान डोलावली.
"सामंत, तुमचा अहवाल लवकरात लवकर येऊ द्या. मुजुमदार इथून बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या हातात अहवाल आणि मनात समाधान असायला हवं. एक चुक आपली इतक्या वर्षांची तपश्चर्या धुळीला मिळवेल." जहागिरदारांसारख्या व्यवसायिकासाठी नावलौकीकात कोणतीही तडजोड नको होती. "आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी देवधरांना त्यांच काम संपवून यायला सांगितलय. तुम्ही हे प्रकरण नीट हाताळाल याची त्यांना ग्वाही दिलीय. "
"यस सर." तिघेही उभे राहीले व दाराकडे वळले. जहागिरदारांनी चिरुट पेटवला आणि काचेपलिकडच्या अथांग सागरावर त्यांनी नजर टाकली.
सेनापती बापट मार्गावर असलेली ध्येयची इमारत जहागिरदारांच्या ऑफीसपासून फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर होती. बाराव्या मजल्यापासूनचे वरचे सगळे मजले 'ध्येय'साठी समर्पित होते. बाकी सगळी इमारत लिजवर देण्यात आली होती. यात कॉरपोरेट ऑफीसेस, न्युज चॅनल्स, आयटी इन्स्टीट्युट, बँक वगैरेंचा भरणा होता. मागच्या वर्षीत 'ध्येय' इथे शिफ्ट झाले होते. सामंत ऑफीसकडे निघाले होते.
"लते, चारुची काही खबर ? " गाडीत बसल्या-बसल्या ड्रायव्हरला गाडी ऑफीसकडे घ्यायला सांगून त्यांनी स्नेहलताला फोन लावला.
"नाही रे. तुला फोन नाही आला का ? "
"नाही. सकाळपासून प्रयत्न करतोय. कुठे जाऊन खोदत बसलाय देव जाणे." सामंतच्या आवाजात नकळत चिडचिड आली.
"तुझ्याबद्दल मीही कधी कधी हेच म्हणते अद्वैत." स्नेहलताने संधी साधली.
"माहीत आहे मला ते. चल मी फोन ठेवतो. हे बघ, चारुचा फोन जर आलाच तर त्याला म्हणावं मला ताबडतोब फोन कर. घडला प्रकार अजून त्याला नीट कळलेला दिसत नाही. जहागिरदारांनी त्याला जास्त काही सांगितलं असेल असं मला वाटत नाही." सामंतांनी फोन ठेवला. थोड्याच वेळात ते त्याच्या कॅबिनमध्ये होते. बराच गदारोळ मॅनेज करायचा होता. बाहेर बरेच जण बाईटसाठी बसले होते. संपुर्ण दिवस पोलिस, रिपोर्टर्स यांच्यासोबतच गेला. त्यातल्या त्या इन्स्पे. धारकरांबरोबर काढलेला वेळ फार किचकट होता. तो माणूस नको तेवढ्या शंका विचारत होता.
"तुम्हाला असं वाटतय की कोणीतरी कमांड चेंज केली आणि त्यामुळे हे घडलं." टेबलावरच्या पेपरवेटशी चाळा करत इन्स्पे. धारकरांनी विचारलं.
"आतापर्यंत तुम्ही सातवेळा मला हे विचारलय." सामंतांनी नव्याने उत्तर देणं टाळलं.
"हो का ? असेल. पण तुम्हाला असं का वाटतय ? " धारकरांनी त्यांच्या आक्षेपाला कचर्याची टोपली दाखवली.
"वेल, मिस्टर..." सामंतांनी बोलण्याचा प्रयत्न केला.
"इन्स्पेक्टर... इन्स्पेक्टर धारकर. मला ते जास्त आवडतं" सामंतानी समोरच्या पन्नाशी गाठलेल्या संपुर्ण पिकल्या केसांच्या माणसाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. व्यायामाने कमावलेलं त्यांच शरीर जाणवत होतं पण ते बारीक केले गेलेले डोळे मात्र एखाद्या सुईसारखे टोचत होते.
"इन्स्पे. धारकर, ही संपुर्ण इमारत लेटेस्ट टेक्नोलॉजी वापरून बनवण्यात आली आहे. इथे कोणीही कामाशिवाय आणि वॅलिड ऑथेरिटी असल्याशिवाय फिरू शकत नाही. प्रत्येकाच्या हाताचे ठसे कॉम्पुटरमध्ये फिड केलेले आहेत. कुठल्याही दरवाज्याला पार करण्यापुर्वॉ त्याला तिथल्या स्क्रीनवर हात ठेवावा लागतो. ते फिंगरपिंट वॅलिड असतील तरच दरवाजा उघडला जातो. इथल्या लिफ्टस, एसी या गोष्टी कॉम्पुटरने ऑपरेट होतात. कंट्रोल रुममध्ये तसेच प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे आहेत. त्यामुळे मॅन्युअल सॅक्युरिटी जास्त प्रमाणात लागत नाही." सामंतांनी क्षणभर थांबून समोरचा पाण्याचा ग्लास उचलला.
"एकाद्या हॉलिवुडपटात असावी तशी रचना आहे म्हणायची इथे. जहागिरदारसाहेबांनी, बराच खर्च केलेला दिसतोय. तुमच्या कॅबिनमध्ये आहे का कॅमेरा ? " धारकरांनी नजर चोहीकडे फिरवली.
"नाही. काही ठिकाणी कॅमेरे नाहीत. तेवढा विश्वास आहे जहागिरदारसाहेबांचा." सामंतांनी खोचकपणे उत्तर दिलं.
"बरं सामंतसाहेब, जरा तुमच्या कंट्रोल रुमला जाऊन येतो. बघू, तुम्ही म्हणताय ते कितपत खरं आहे." इन्स्पे. धारकर दरवाज्याकडे वळले, तोच सामंतांचा सेल वाजला. त्यांनी सेल उचलला व दारात थांबलेल्या धारकरांकडे पाहीलं. सामंताना फोन घेण्याएवजी थांबलेलं पाहताच धारकर हसून बाहेर पडले.
"हॅलो अद्वैत, चारू बोलतोय. "
"थँक गॉड, आहेस कुठे तू ? "
"मेघालयच्या जंगलात. पण जे घडलं घडायला नको होतं."
"इट वॉज जस्ट अॅन अॅक्सीडंट.. अॅरेंज्ड वन."
"इट कान्ट बी अद्वैत. दिस नेवर हॅपन्ड बीफोर. डोन्ट बी अ फुल. मी तुला आधीच या प्रोजेक्टमध्ये हात घालू नकोस बोललो होतो. मी माझी खास तीन माणसं गमावून बसलो होतो यामुळे. यु न्यु दॅट."
"चारु, हा अपघात घडवलेला आहे. समवन चेंज द कमांड."
"अद्वैत, आगीशी खेळू नकोस. ते सगळं जिथे होतं तिथे नेऊन टाक. ट्रस्ट मी. काही गोष्टींवर विश्वास ठेवायला शीक. सगळ्याच गोष्टी विज्ञानाच्या चष्म्यातून पहात बसू नकोस. लता किती टेन्स आहे याची कल्पना आहे का तुला ?"
"डोन्ट टेल मी. तू तिला हे बोललास ?"
"कमॉन अद्वैत, मी तिच्यापासून काही लपवत नाही हे तुला चांगलच ठाऊक आहे. अॅड शी हॅज राईट टू नॉ एवरीथिंग. शी इज युवर बेटर हाफ एडू."
"तू केव्हा येतोयस ? जहागिरदार जरा नाराज वाटले मला."
"आय विल मॅनेज हिम. मी विक एंडला परततोय. अँड जस्ट डू वन फेवर फॉर मी. डोन्ट टच दॅट डॅम मटेरीयल. जस्ट टेल शेख अँड कांचन टू लॉक एव्हरीथिंग रिलेटेड टू दॅट इन सेफ. इटस अॅन ऑर्डर. डू इट." डॉ. चारुहास देवधरांचा फोन कट झाला. सामंत शांतपणे खुर्चीत रेलले. त्यांनी इंटरकॉमवर नंबर दाबला. पलिकडे डॉ. चिटणीस होत्या.
"हॅलो, कांचन, हे बघ, त्या प्रोजेक्टच्या सगळ्या गोष्टी.... आपण उचलून आणलेले अवशेष, स्लाईडस, सीडी, पेपर्स... सगळं .. लॉक ईट इन सेफ. इटस अॅन ऑर्डर फ्रॉम बॉस."
"बट सर ?"
"अॅन ऑर्डर इज ऑर्डर कांचन. जस्ट डू इट." सामंतांचा आवाज किंचित चढला. क्षणभरासाठी शांतता पसरली.
"अद्वैत, बॉसचा फोन आलेला ? " डॉ. शेख आता लाईनवर होते. डॉ. देवधर जरी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असले तरी 'बॉस इज बॉस.'
"यस कलीम, त्यांची ऑर्डर मी कांचनकडे पास ऑन केलीय." सामंतांच्या स्वरात नाराजी होती. डॉ. शेख आणि त्यांच्या वयात जवळजवळ दहा वर्षांचे अंतर होते. पण संबंध मात्र मित्रत्वाचे होते.
"दॅट इज द बेस्ट थिंग यु डीड मॅन. हॉप ऑल विल बी वेल नाऊ. " डॉ. शेख यांच्या स्वरातला आनंद लपला नाही.
"सी यु अॅट लंच कलीम" सामंतांनी इंटरकॉम बंद करण्यासाठी हात पुढे केला.
"अद्वैत, वन सेक... मी जहागिरदार साहेबांसाठी रिपोर्ट बनवलाय. आय एम सेंडीग यु द कॉपी. प्लीज रिवर्ट." डॉ. शेख घाईघाईने म्हणाले.
"शुअर बडी." फोन ठेवून सामंत लॅपटॉपकडे वळले. थोड्याच वेळात शेखचा रिपोर्ट समोर होता.
"ब्लडी हेल." पहिला पॅरा वाचताच सामंत स्वतःशीच बोलले. "दिस मॅन इज जर्क." शेखने कंप्लिट प्रोजेक्टमध्ये झालेल्या प्रत्येक गंभीर बाबींची नोंद केली होती. हा रिपोर्ट लीक झाला तर ध्येय बंद होईल याबद्दल शंकाच नव्हती. त्या रिपोर्टमुळे एक कळलं होतं. शेख घाबरला होता. पाचशे वर्षापुर्वीच्या त्या सांगाड्याला शेख घाबरला होता.
डॉ. शेख यांनी तपशीलासह सगळं लिहीलं होतं. अद्वैतने प्रिंट घेऊन ठराविक ओळी हायलाईट केल्या. हा रिपोर्ट असाच्या असा जहागिरदारांकडे जाणं त्याच्यासाठी नुकसानकारक होतं. काही गोष्टी त्यांच्या आपसातल्या होत्या.
"हॅलो सर, इन्स्पे. धारकर इथे आले होते." कांचनचा आवाज ऐकताच सामंत सावरून बसले.
"लॅबमध्ये कशाला ?"
"स्टेजवर त्यांना माती सापडली होती. तीच घेऊन आले होते."
"माती ? "
"मी ती माती चेक केलीय सर. आपण तळघरातून उचलेल्या मातीच्या सँपलशी ती मॅच होतेय."
"व्हॉट ? कांचन ती माती तिकडे कशी येईल ? " सामंतांन हा धक्का नवा होता.
"माहीत नाही सर. पण हा फॅक्ट आहे. धारकर कोणत्याही क्षणी चौकशीला परत येतील. काय सांगू त्यांना ? "
"जे आहे तेच. यात लपवालपवी करण्यात अर्थ नाही. तुझ्या सांगण्यावरून त्यांना संशय आला तर ते त्यांच्या लॅबमध्ये टेस्ट करतील. तू खरं ते सांग त्यांना." सामंतांनी इंटरकॉम बंद केला. ती माती स्टेजवर कुठून आली ? तसाच तो दर्पही...? त्याचवेळेस त्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये अंधार पसरल्यासारखा वाटला. त्यांनी बाहेर पाहीलं. आकाशात काळे ढग जमा झाले होते. सुर्य झाकोळला गेला होता. कदाचित यावर्षी पाऊस लवकर पडेल ? मागच्या वर्षीच्या पावसाने पाणी टंचाईचं संकट ओढवलं होत. पुन्हा तो त्रास नको.... स्वतःशीच पुटपुटत त्यांनी लाईट ऑन केला.
लंचला दोघे समोरासमोर होते. सामंतांनी शेखला आवर्जून स्वतःच्या कॅबिनमध्ये बोलावलं होतं. त्याआधी अॅडमिनचा रिपोर्ट काही अटॅचमेंटसह त्यांनी जहागिरदारांकडे पाठवला होता. मुजुमदारला रिक्त हस्ते पाठवणं संस्थेला परवडणारं नव्हतं.
"शेख, आय वॉन्ट यु टू डिलीट दिस." सामंतांनी हातातले कागद त्याच्या समोर ठेवले. डॉ. शेख यांनी चष्म्याची काच पुसून कागद समोर ओढले. पोपटी हायलायटरने अधोरेखित केलेला ते वाचू लागले.
"डॉ. चारुहास देवधराच्या रिपोर्टप्रमाणे सदर उत्खननाचे काम बौद्ध धर्मगुरुंच्या विनंतीवरून थांबण्यात आले होते. 'मठाची मोडतोड' हे धार्मिक निमित्त झाल्यास होणारा उद्रेक सबंधिताना जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे धर्मगुरुंच्या विनंतीला मान देऊन काम थांबवण्यात आले. पण मुळ कारण हे नव्हते. या कामाची सुरुवात होताच लागोपाठ तीन अपघात झाले व त्यात तीन मजुरांचा जीव गेला. पहिला मजूर पहिल्याच दिवशी मठाच्या मागच्या बाजूस असलेल्या जागेवर खोदत असता अचानक त्याच्या पायाखालचा दगड निसटला आणि त्याठिकाणी निर्माण झालेल्या पोकळीत तो नाहीसा झाला. त्याचा मृतदेहदेखील सापडला नाही. दोन दिवसांनी दुसर्या मजुरावर मधमाश्यांचा हल्ला झाला. स्वतःला वाचवण्याच्या नादात तो दरीत कोसळला. तिसर्या वेळीस खुद्द डॉ. देवधरांवर ओक वृक्षाची फांदी कोसळली. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा मजूर त्या फांदीखाली सापडून मेला. या कामाला आधीच बौद्ध धर्मगुरुंचा नकार होता. त्यांच्याकडे असलेल्या जुन्या हस्तलिखितात सदर जागेचा स्पष्ट उल्लेख होता. या जागेवर कधीच कोणत्याही प्रकारचे उत्खनन होता कामा नये, याचे स्पष्ट आदेश त्यात होते. तसे काही केल्यास परिणाम भोगावे लागतील याचे स्पष्ट विवेचन होते."
"शेख, या जुन्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही. ते अपघात होते. त्यामुळे मजूर घाबरले. त्यात स्थानिकांनी प्रकरण चिघळवण्याची धमकी दिली आणि उत्खनन थांबले. संस्थेने आणि शासनाने मान्य केलेला रिपोर्ट त्यांच्या रेकोर्डमध्ये असताना हे सगळं लिहून नवीन वादाला तोंड उघडण्याची काय गरज ? " सामंतानी शेख वाचायचे थांबताच विषय रेटला.
"सामंत, या सगळ्या प्रकरणाचं मुळ इथेच दडलय. दिस वॉज बेस. दिस वॉज स्टार्ट. एनी वे, वॉट नेक्स्ट ?" शेख पुढच्या पानाकडे वळले.
"बौद्ध धर्मगुरुंनी मागच्या घटनेचा पुनरुच्चार केला. त्यांना हिमाचल प्रदेश सरकारच्या काही नव्या मदतीची लालुच दाखवण्यात आली. त्यांनी ती झिडकारली. इतिहासाचा वारसा शोधण्याच्या कामात मदत करण्यास त्यांची मनाई नव्हती. पण त्या जागेत जे दडलं आहे ते भयानक आहे याबद्दल त्यांना काहीच शंका नव्हती. कोणतीही दुर्घटना घडली तर काम थांबवण्यात यावं या अटीवर त्यांनी काम सुरु करण्यास परवानगी दिली. उत्खननाला सुरुवात झाली. कामाच्या नोंदी ठेवण्यासाठी कामाचे चित्रीकरण करण्याचे ठरले. पहीले दोन दिवस काम सुरुळीत सुरु होतं. तिसर्या दिवशी काम चालू असताना अचानक एका मजूराने त्याच्या साथीदारावर हल्ला केला. त्यानंतर मध्ये आलेल्या प्रत्येकावर त्याने हल्ला चढवला. तीन मजूर गंभीर जखमी झाले. एकाची अवस्था जास्त बिकट होती. तो तीन दिवसानंतर हॉस्पिटलमध्ये वारला. हल्ला करणार्या मजुराला अटक झाली. पोलिसांनी पुराव्यादाखल चित्रीकरण मागवले. काम करता-करता अचानक त्या मजुराने विचित्र पद्धतीने आपले डोळे फिरवले. शरीर झाडलं. क्षणभर त्याला मिरगीचा अटॅक आला असावा अशी शंका त्याच्या सहकार्यांना वाटली. पण तो नॉर्मल झाला आणि दुसर्याच क्षणी त्याने आपल्या सहकार्यांवर हल्ला केला. आठवडाभर तो मजूर अफुच्या अमलाखाली असावा तसा होता आणि एका मध्यरात्री त्याने फाशी लावून घेतली. धर्मगुरुंनी पुढच्या कामास आक्षेप घेतला. पण घडल्या प्रकाराशी जागेचा काहीच संबंध नसल्याचे त्यांना पटवण्यात आले. सदर मजूर अफूच्या गुंगीत असे, हे धर्मगुरुंना सिद्ध करून देण्यात आले. दोन मजुरांच्या वैयक्तीक शत्रुत्वाचे पर्यावसान त्यांच्या भांडण्यात झाल्याचे पोलिसस्थानकात नोंदविण्यात आले."
"वॉट यु वॉन्ट मी टू एडिट इन दिस सामंत ?" डॉ. शेख यांना हायलाईट केलेल्या भागातील काय डिलिट करावे ते खरेच कळेना.
"शेख, चित्रीकरण केलय ते आपल्या माहीतीसाठी. ती गोष्ट प्रेसपर्यंत जाणार नाही याची काळजी घेतलीय आपण. तुझा रिपोर्ट जर कोणी लिक केला तर आपण सगळे ब्लॅकलिस्टेड होऊ. ते चित्रीकरण गाळून टाक." सामंत शांतपणे म्हणाले.
"वॉट नेक्स्ट ?" डॉ. शेख आता मुडमध्ये नव्हते.
"चेक इट आउट. आणि हे तू जेवता जेवता करू शकतोस कलीम. कधी तरी अशी संधी मिळते निवांतपणे जेवण्याची ती का दवडतोयस ? हे घे.. बटर चिकन तुझ्यासाठी पाठवलय स्नेहलने" सामंतने डिश पुढे केली.
"भाभीला थँक्स बोल. अजून काय कापायचय पुढे ... यस... त्या दगडी दरवाज्यावर पाली भाषेत एक शिलालेख होता. त्यात लिहीलं होतं, 'बौद्ध भिक्षुचा वेष धारण करणार्या एका पापी माणसाने तथागतांच्या नावाला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला. समाजातील आपली काळी कृत्ये दडवण्यासाठी तो बौद्ध भिक्षू झाला. पण त्याने त्याची काळी कृत्ये बंद केली नाहीत. चोरी, दरोडे, स्त्रियांचा उपभोग, खून असल्या अनेक कृत्यांची त्याला येथे शिक्षा देण्यात आली आहे. त्याला जिवंतपणी तळघरात कोंडण्यात आले. काळ्या जादूत पारंगत या पापी माणसाची सावलीच काय तर त्याचे अस्तित्वही मानवजातीस जाणवता कामा नये. जर कोणी या जागेत उल्लंघन करेल तर काळ्या सावल्या येतील. जो कोणी त्याच्या वस्तुंना वापरेल, त्यांचा काळ्या सावल्या नाश करेल. ' हे सुद्धा." डॉ. शेख यांनी चिकनचा पीस तोंडात घोळवत विचारलं.
"यस. कसं आहे चिकन ?"
"टू गुड. नेहमीप्रमाणे. सामंत, माझा जवळजवळ अर्धा रिपोर्ट तू उडवलायस. मी जहागिरदारांना काय देऊ ? "
"रिलॅक्स. मी तुझा रिपोर्ट ऑलरेडी एडीट करून आणलाय. दिस वन फॉर यु."
"ग्रेट. कॅन आय हॅव यु लुक ? "
"या. शुअर बडी." डॉ. शेख यांनी रिपोर्ट वाचायला सुरुवात केली.
"इन शॉर्ट एव्हरीथिंग इज मिसिंग. त्या शिलालेखावर ज्या मजुराने पहिला घाव घातला त्याला त्याचीच पारय लागून तो मेला. दरवाजा तोडणार्या दोन्ही मजुरांवर दगड कोसळले आणि ते कायमचे जायबंदी झाले. आत काय असेल या कुतुहलाने जो मजूर आत गेला तो पुन्हा शुद्धीवर आलाच नाही. त्या तळघरातल्या त्या वस्तू जेव्हा बाहेर काढल्या तेव्हा भुकंपाचा धक्का बसावा तसं झालं आणि साखंळदंडामध्ये बांधलेला तो अस्थिपंजर थरथरला. तिथल्या वस्तू जेव्हा उचलायला सुरुवात केली तेव्हा चोहीकडून कोळ्यासारख्या विचित्र वाटणार्या किटकांनी हल्ला केला आणि त्यामुळे सगळेजण तेथून पळाले. बौद्ध धर्मगुरुंनी ती जागा त्यांच्या मंत्रांनी पुन्हा बांधली. तिथून घेतलेल्या वस्तू परत करण्याचे त्यांना वचन देऊनही त्या वस्तू आपण घेऊन इथे आलो. हे सगळं मिसिंग."
"शेख, आपल्याला आयुष्यात अजून बरचं काही करायचय. 'ध्येय' अशा जागेवर न्यायचय जिथे कोणी कधी पोहोचूच शकणार नाही. या असल्या छोट्याछोट्या गोष्टी घेऊन रडत बसलो तर इथेच सडत राहू. सो लिव्ह देम. मी दिला तसाच रिपोर्ट जहागिरदार साहेबांना दे. त्यांच काम आहे फायनान्स करण्याच आणि आपलं काम आहे इतिहासाचे अवशेष शोधायचं. कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. चिकन खा. "
डॉ. शेख यांनी मुकाट उरलेला शेवटचा पीस उचलला.
घट्ट बसलेले ते दरवाजे, तो कुबट दर्प, ती माती..... शेख या सगळ्या गोष्टी सामंतशी बोलणार होते. पण सामंत हेतूपरस्पर त्याकडे काणाडोळा करतोय हे त्यांना जाणवलं. जे घडलं ते मानवी नव्हतं याची जाणिव शेखना झाली होती. सामंत ते मान्य करायला तयार नव्हते.
"हॅलो, सर, कांचन बोलतेय."
"बोल."
"तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळया गोष्टी सेफमध्ये ठेवल्यात. पण एक गोष्ट सांगायची आहे सर."
"कोणती ? "
"सर, त्या अस्थिपंजराचे फोटो ठेवत असताना एक गोष्ट जाणवली. पहील्या फोटोत त्याच्या उजव्या हाताच्या बोटात एक अंगठी होती. लाल खडा असलेली. तोच हात आपण आपल्याबरोबर घेऊन आलोय. पण त्याच्या बोटात आता अंगठी नाही."
"तेव्हा झालेली धावपळ विसरलीस कांचन ? पडली असेल अंगठी कुठेतरी. फर्गेट इट."
"ओ.के. सर, गुडनाईट सर."
"गुडनाईट कांचन." सामंतांनी फोन ठेवला. सामंतांनी आवराआवर सुरु केली होती. त्यांनी ड्रॉवर उघडला. पेपर्स आत टाकले. ड्रॉवर बंद करत असताना त्यांची नजर सेफच्या चावीवर गेली. त्यांनी चावी घेऊन सेफ उघडली. समोर एका छोट्या मखमली डबीमध्ये ती लाल खड्याची मुद्रिका होती. त्यांनी ती डबी हातात घेतली. त्या अस्थिपंजराला पाहताक्षणीच ती अंगठी त्यांच लक्ष वेधून गेली. तो अस्थिपंजर त्यांना सोबत आणायचा होता. पण अचानक झालेला तो विचित्र किटकांचा हल्ला..... सगळं त्यांच्या समोर उभं राहीलं..............
... समोर साखळदंडात तो अस्थिपंजर होता. हॅल्मेटच्या बॅटरीचा झोत त्याच्या त्या उरल्यासुरल्या हाडांवरून फिरवून ते पाहणी करत होते. अचानक पायावर काहीतरी चढत असल्याचे त्यांना जाणवलं. चेहर्याचा भाग सोडला तर बाकी सगळा भाग सेफ्टीसुटने आच्छादित होता. तरी ते जाणवलं. त्यांनी नजर पायाकडे वळलली. कोळ्यासारखे दिसणारे असख्य किटक त्यांच्या सुटवर चढत होते. त्यांनी इतरांकडे पाहीलं. त्यांना बाहेरच्या दिशेला धावणारे मजूर दिसले. बॅटरीचा झोत भिंतीवर फिरला. भिंतींना असलेल्या लक्षावधी छिद्रातून किटकांच्या झुंडी बाहेर येत होत्या.
"जे शक्य असेल ते उचला आणि पळा." ते जोराने ओरडले. सगळे बाहेरच्या दिशेला धावायला लागले. ते त्या अस्थिपंजराकडे झेपावले. हाती आलेला तो उजवा हात घेऊन त्यांनी बाहेर धाव घेतली. बाहेर पडणारे ते शेवटचे होते. ते बाहेर येताच तळघराच्या दारात आग भडकली. किटकांचा बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला. मजुरांनी त्याच्या अंगावर चढलेल्या किटकांना झाडायला सुरुवात केली...... त्याचक्षणी अंगावर काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटलं सामंतांना. त्यांनी पाहीलं. काहीच नव्हतं. त्यांनी डबी बंद केली. सेफमध्ये ठेवली. सेफ बंद करून सामंतांनी चावी ड्रॉवरमध्ये टाकली. पुढच्या महिन्यात स्नेहलताचा वाढदिवस. ती मुद्रिका तेव्हा तिला भेट म्हणून द्यायची. लाडक्या बायकोला सुरेख, सुंदर भेट. निघताना लाईट बंद करण्यापुर्वीच कॅबिनमध्ये पसरलेला काळोख त्यांच्या लक्षात आला नाही. खिशातला रुमाल नाकाला लावून ते बाहेर पडले.
डॉ. चारुहास देवधर परतले आणि त्यांनी कमांड आपल्या हातात घेतली. सगळ्या वस्तू लॉक आहेत याचा त्यांना आनंद झाला. त्यांनी सेफच्या चाव्या ताब्यात घेतल्या. सेफमधल्या इतर गोष्टी कधीही लागू शकतील याची कल्पना असल्याने चाव्यांचा एक गुच्छ कांचन चिटणीस यांच्या ताब्यात होता. मेन सेफ वॉल्टचा कोड मात्र डॉ. देवधर, सामंत आणि शेख यांनाच माहीत होता. अभ्यास पुर्ण झालेल्या सगळ्या वस्तू रिपोर्टच्या एका प्रतिसह तिथेच ठेवल्या जात. त्यानंतर त्या तिथून पुरातत्व खात्याच्या ताब्यात जात. घडलेल्या घटनेचा त्यांनी संपुर्ण मागोवा घेतला. डॉ. शेख यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यांना जाणवलं की सगळ्या घटना ह्युमन मिस्टेकमध्ये मोडत नाहीत. डॉ. शेख याबाबतीत ठाम होते. सामंतांनी मात्र त्याला अनुमोदन दिलं नाही. डॉ. देवधरांना त्यांचा अनुभव चांगलाच लक्षात होता. डॉ. शेख यांचं बोलणं त्यांनी गंभीरपणे घेतलं होतं. पण जहागिरदारांना मात्र या गोष्टींबाबत अंधारात ठेवून त्यांनी आश्वस्त केलं. घडल्या प्रकारामुळे उडालेला धुरळा आता खाली बसायला लागला होता. कोणताही अनुचित प्रकार गेल्या काही दिवसात घडला नव्हता. देवधरांना आता कोणताही अपघात नको होता. हा ध्येयच्या इभ्रतीचा व विश्वासार्हतेचा प्रश्न होता.
"कांचन, मी आत्ताच मुजुमदारांशी बोललोय. आपल्या मागच्या उत्खननात सापडलेल्या वस्तू आपल्याला त्यांच्याकडे पाठवायच्या आहेत. दे आर मोर कन्सर्न अबाऊट दॅट वास. सोळाव्या शतकातला तो 'वास' अनमोल आहे. त्या सगळ्या वस्तूंसकट तो वास पॅक करून घ्या. यावेळेस मी स्वतः मुजूमदारांना भेटणार आहे. तेव्हा या गोष्टी त्यांना सुपुर्द करेन. जस्ट टेक केअर ऑफ दॅट. कॉल मी वन्स यु फिनिश." देवधरांनी समोर बसलेल्या डॉ. कांचन यांना मिटींगचं मुख्य कारण सांगितलं.
"यस सर." नेहमीप्रमाणे डॉ. कांचन यांनी मान डोलावली.
इतिहास हा चिटणीसांचा आवडता विषय. लहानपणीच हे बीज डॉ. कांचनच्या मनात रुजलं ते त्यांच्या वडीलांमुळे. ते गडप्रेमी होते. छत्रपती त्यांचे आराध्य दैवत. मुलगा झाला नाही म्हणून चिटणीस दु:खीकष्टी होऊन बसले नाहीत. त्यांनी आपल्या मुलीलाच मुलगा समजून आपल्या भ्रमंतीत सामिल करून घेतलं. लहानपणी रुजलेलं बीज नंतर वृक्ष झाले आणि इवलीशी मनस्वी कांचन डॉ. कांचन चिटणीस झाली. 'ध्येय'मध्ये ती सामंतांमुळेच पोहोचली. तिचं ते इतिहासात डुंबणं त्यांच्या पारखी नजरेने नीट ओळखलं होतं. त्या त्यांच्या कामाच्या बाबतीत काटेकोर होत्या. मितभाषी होत्या. कधी बोलल्याच तर फक्त कामाबद्दल. आईच्या मागोमाग वडील गेल्यानंतर कांचन पुर्णपणे कामात गुंतल्या. त्यांनी त्यांच्या डाचत असलेल्या एकटेपणाला इतिहासाच्या अंधारात हरवून टाकलं. या सगळ्यात लग्न, संसार, मुलं या गोष्टी केव्हा मागे पडल्या त्या त्यांनाही कळल्या नाहीत. त्यांना इथे अनेक मित्र मिळाले होते. फक्त त्यांच्याशी बोलणारे. फुटकी भांडी, बोथट हत्यारे, खापराचे तुकडे, दागिन्यांचे अवशेष, सांगाडे.... एक ना दोन. प्रत्येक जण त्यांच्याशी गप्पा मारायला उत्सुक असा. रोज प्रत्येक प्रयोगात ते स्वत:बद्दल काहीतरी नवीन सांगायचे. त्या गप्पा चिटणीसांना उल्हसित करायच्या. एक एक वस्तू त्या आईने आपल्या नवजात शिशूला हाताळावं तश हाताळायच्या. त्या अवशेषांनी घेतलेल्या नव्या श्वासाची पहीली स्पंदनं सर्वात आधी त्यांना जाणवायची. त्यांचे पहिले बोल आधी त्यांच्या कानांना ऐकू यायचे.
'ध्येय'मध्ये संशोधित झालेली प्रत्येक वस्तू त्यांच्या अखत्यारित होती. प्रत्येक वस्तुचा बायोडेटा त्यांना तोंडपाठ होता. मिरजेच्या उत्खननात सापडलेला तो वास कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना होता. इतक्या शतकानंतरही सुस्थितीत होता. त्यांच्या आजवरच्या कामगिरीतील अजोड कामगिरी.
हरिहरन बरोबर त्यांनी प्रत्येक वस्तू स्वतः जातीने पॅक केली. हरीहरन डॉ. देवधरांचा खास माणूस. त्यांचा ड्रायव्हर कम उजवा हात. गेली पाच वर्षे त्यांच्यासोबत त्यांनी त्याला पाहीलेलं. कामात अत्यंत हुषार. 'ध्येय'च्या प्रत्येक बाबींची त्याच्याइतकी खडा न खडा माहीती दुसर्या कुणाला नव्हती. तो देवधरांचा चालता-बोलता कॉम्पुटर होता. एंटीक्सच्या डिलीव्हरीजमध्ये त्याचा सहभाग महत्त्वाचा होता. सावळा, कुरळ्या केसांचा, पस्तिशीचा हरीहरन तब्येतीने शिडशिडीत होता. कमी बोलायचा. सतत कोणत्या ना कोणत्या कामात असायचा. कोणत्याही कामाला त्याचा नकार नसायचा. वेळप्रसंगी चहा, कॉफी आणून देण्यातही त्याला कमीपणा वाटत नसे. चिटणीस त्याच्या त्या सराईत हालचालींकडे पहात होत्या. सर्वात शेवटी त्या 'वास'कडे वळल्या. 'वास' घेऊन त्यांनी तो बॉक्समध्ये ठेवला. हरीहरनने शेवटच्या बॉक्सला नीट काळजीपुर्वक पॅक करायला सुरुवात केली. पॅकींग कंप्लिट झाली. डॉ. चिटणीस मात्र आता वेगळ्याच विचारांच्या गर्तेत होत्या. काहीतरी कुठेतरी बिनसलं होतं. पण काय ? काय?...... वास... तो वास.... त्यात काय होत जे गोंधळ घालतय... हरिहरनने त्यांच्याकडे पाहीलं. सगळ्या नोंदी झाल्या. सगळ्या वस्तू घेऊन तो निघाला. डॉ. चिटणीसांमध्ये झालेला बदल त्याच्या नजरेने टिपला.
"काय झाल मॅडम ? "
"काही नाही. तू नीघ." हरिहरन वळला. दाराजवळ पोहोचल्यावर त्याने पाहीलं. डॉ. चिटणीस लॅपटॉपवर काहीतरी चेक करत होत्या. त्यांच्या पाठच्या काचेत त्याला ते प्रतिबिंब स्पष्ट दिसलं. तो 'वास' होता. तो निघून गेला.
"यस. पण त्या वासचं वजन कमी कसं झाल ? " डॉ. चिटणीस स्वतःशीच बोलल्या.
दुसर्या दिवशीच्या संध्याकाळी डॉ. चारुहास देवधर सामंतांच्या घरी होते. आठवड्याभराने शाळा सुरु होणार होत्या. त्यामुळे साहील आणि संजना अजून आजी आजोबांकडेच होते. कधी नव्हेत तो पावसाळा वेळेवर आला होता. पावसाची हलकी भुरभुर सुरु झालेली.
सामंतांनी देवधरांच्या ग्लासात रम ओतली. स्नेहलता जातीने त्यांना हवं ते पुरवत होती. जगजीतसिंग 'कागज की कश्ती' आळवत होते. बाहेर हलका पाऊस. स्नेहल अद्वैतच्या शेजारी जाऊन बसली.
"लता, आय एम सॉरी. " देवधरांचा तो तिसरा पेग होता.
"कशाबद्दल ? " स्नेहलताला त्यांच्या माफीचा रोख कळला नाही.
"तो प्रोजेक्ट मी अद्वैतला द्यायला नको होतो. ते ही मी स्वतः त्याचे परिणाम भोगल्यावर." त्यांनी ग्लास तोंडाला लावला.
"चारू, तू का गिल्टी फिल करून घेतोस. टु द बेस्ट ऑफ माय नॉलेज, तू अद्वैतला आधीच सगळं सांगितलं होतस. तो गाढवपणा करायचा निर्णय त्याने स्वतःच घेतला होता." स्नेहलताने एक टप्पल सहज सामंतांच्या डोक्यावर हाणली.
"अरेच्चा, कमाल झाली. तू माझी बायको असून त्याच्या बाजूने बोलते ? " सामंतांनी काजू तोंडात टाकत तिला विचारलं.
"एडू, तुझी बायको ती नंतर झाली. आधी ती आपली मैत्रिण होती हे विसरलास." देवधरांची दारू भुतकाळात शिरली.
"नोप." सामंतानी तोंडाचा चंबू केला.
"अद्वैत, दिस वन इज लास्ट. जास्त घेऊ नकोस." स्नेहलताने डोळे किंचित वटारत सामंतांना दटावले.
"यस माय लॉर्ड." सामंतांनी मान तुकवली.
"चारु, तुही. आता जेवायला बसायचय. मी काकांना सांगते डिनर सर्व करायला." स्नेहल उठून आत गेली.
"एडू, साल्या तू लकी निघालास. " देवधरांचा चौथा पेग सुरु झाला.
"तो कसा काय ? "
"तुला लता मिळाली. शी वॉज बेस्टॅस्ट इन अवर ग्रुप. तू जिंकलस तिला. मला मात्र अजूनही तिच्या लेवलची कोण मिळाली नाही." देवधरांनी ग्लासासह एका दमात मनाच्या कप्प्याचा तळ रिकामा केला .
"यु नो चारू, प्रेमात आणि युद्धात जो पुढे सरतो, तोच जिंकतो. तुमची कुणाची छातीच नव्हती तिला प्रपोज करायची. मी केलं आणि मी तिला जिंकलं." सामंतांच्या आवाजात नकळत स्वतःबद्दलचा गर्व डोकावला.
"यस एडू, नाही जमलं आपल्याला. पण नो प्रोब्लेम, ती अजूनही माझी मैत्रिण आहे आणि शेवटपर्यंत राहणार. शेवटपर्यंत." देवधरांनी उठायचा प्रयत्न केला. पण त्यांना जमलं नाही.
"चारू, रिलॅक्स." देवधर पुन्हा खाली बसले. अचानक आठवल्यागत ते सामंतांकडे वळले.
"एडू, बँगलोरला केव्हा निघतोयस ?"
"बहुतेक उद्याच. येताना पुण्याला जाईन. मुलं येतात का ते बघतो ? " सामंतांनी आपला ग्लास उचलला.
"अद्वैत.... चारू... चला लवकर...." स्नेहलने आतून आवाज दिला. हातातला ग्लास संपवून 'चारु'च्या हातात हात घालून 'एडू' आत जायला निघाले.
चारू अद्वैतला सिनियर होता. हुशार होता. कॉलेजच्या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने चारु, अद्वैत, स्नेहलता, हेमंत, जान्हवी, अविनाश, संजय एकत्र आले होते. एकाच प्रोजेक्टवर काम करता करता त्यांची गट्टी जमली. पुढे अद्वैतने स्नेहलताला लग्नासाठी विचारलं. त्यांच ठरलं आणि चारू लंडनला निघून गेला. बाकी सगळे आपापल्या दिशेला. चारूच्या मार्क नावाच्या कुणा मित्राने त्याला 'आर्किओलॉजी' या क्षेत्रात असलेल्या उत्तम संधीबद्दल त्याला कळवलं होतं. चारूची पुन्हा गाठ झाली तेव्हा तो डॉ. चारुहास देवधर होता. त्या भेटीतच देवधरांनी सामंताना 'ध्येय'मध्ये बोलावलं. मघल्या हरवलेल्या काळाला विसरून तिघे मित्र पुन्हा एकत्र आले. करीअर आणि संसार यात संसाराला महत्त्व देणार्या स्नेहलताला चारूने नंतर डिनर टेबलवर एक प्रदिर्घ लेक्चरही दिलं. जे स्नेहलताने अजिबात मनावर घेतल नाही.
बेंगलोरवरून सामंत सकाळीच पुण्याला पोहोचले होते. संध्याकाळी सामंत मुंबईला निघायला तयार झाले. पण त्यांच्याबरोबर येण्यास मुलांनी नकार दिला होता.
"पण बाबा...." सामंत आता वडीलांसमोर उभे होते.
"हे बघ अद्वैत, चार दिवसांनी मी स्वतः येईन मुलांना घेऊन. तू उशीर व्हायच्या आत निघ. कसा जाणार आहेस ?" बाबांनी विचारलं.
"काही प्लान केलं नव्हतं. कुल कॅबने जाईन. पहिल्या पावसात घाट पहाण्यासारखा असतो."
"एक काम कर. गाडी घेऊन जा. नंतर श्यामबरोबर माघारी पाठव."
"नॉट अ बॅड आयडिया." सामंताना स्नेहलताबरोबर घाटातून केलेलं लाँग ड्राईव्ह आठवलं. आज पुन्हा तीच लज्जत तिच्याशिवाय चाखायची होती. बिनसाखरेच्या चहासारखी.
कोथरुड वरून गाडी जेव्हा एक्सप्रेस वेला लागली. तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. निघेपर्यंत संध्याकाळचे साडेसात झाले होते. सकाळपासून रिमझिमणार्या पावसाने आता आपला मुड बदलला होता. सामंतांनी गाडीचा वेग कमी केला. गाडी जास्त सुसाट पळवण्यात अर्थ नव्हता. एक तर अंधार, त्यात मुसळधार पाऊस... पुढचं काही नीट दिसायला तयार नव्हतं. कदाचित पुढे पाऊस ओसरेल..... निवांत जाऊ... घाट येईपर्यंत..... एक्सप्रेसवेच्या वेगमर्यादेच्या बोर्डांना पाहण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी वेग ५० वर ठेवला होता. पावसाचा जोर जसजसा कमी होऊ लागला, तसतसा रस्त्याचा अंदाज घेऊन त्यांनी गाडी पिटाळायला सुरुवात केली. वेग साठावर आला. तेव्हाच मागून एक ऑइल टँकर त्यांना ओव्हरटेक करून पुढे गेला. मध्येच एकदा सेल वाजला. फोन स्नेहलचा होता. गाडी बाजूला घेऊन आपण 'ऑन द वे' आहोत हे सांगून त्यांनी फोन कट केला. पाऊस आता थांबला होता. खंडाळा जवळ आलेलं. ५०० मिटरच्या अंतरावर भुयार होतं. ते जवळ पोहोचले तेव्हा त्यांना भुयारात शिरणारा टँकर दिसला. टँकर भुयारातून बाहेर पडला आणि नेमकी त्याच क्षणी वरून एक शिळा कोसळली. तिचा अणकुचीदार भाग टँकरचा पत्रा फाडून आत शिरला. टँकर एखाद्या तळीरामासारखा गडबडला. सामंतांना ते जाणवलं. त्यांचा पाय नकळत ब्रेकवर आला. तेव्हाच त्यांना त्या शिळेने निर्माण केलेला स्पार्क दिसला. दुसर्याच क्षणी तिथे एक आगडाँब उसळला. पेटता टँकर पुढे सरकला त्याचक्षणी आतून ड्रायव्हरने बाहेर उडी मारली. एका प्रचंड स्फोटासहीत टँकर समोरच्या कपारीवर आदळला आणि जागीच फिरला. डोंगर हादरला. दरडी कोसळू लागल्या. टेंकरचे जळते अवशेष सगळीकडे उडाले. रस्ता संपुर्ण व्यापला गेला. सामंतांनी करकचून ब्रेक मारला. टेंकरचे एक झाकण त्यांच्या गाडीपुढे येऊन आदळले. त्यांच्या मागोमाग बर्याच गाड्या थांबल्या. गाडी थांबवून ते गाडीच्या बाहेर आले. त्यांच्यापासून ५० मीटर अंतरावर टँकर जळत होता. रस्त्यावर छोट्या दगडांचा खच पडला होता. त्यात जळके अवशेषही होतेच. त्यांना धग जाणवत होती. गाडीतून कोणीतरी उडी मारली ते त्यांना अस्पष्ट दिसलं होतं. तो जिवंत असेल का ? ते पुढे सरकले. जळत्या टेंकरपासून शक्य तेवढ्या लांब राहून त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली. त्यांना आता आगीची धग बर्यापैकी जाणवत होती. पलिकडून त्याच्या हाकेला अस्पष्ट उत्तर आलं. आपण पुढे जावं की नाही या विचारात ते असतानाच....
"वॉच आउट" कोणीतरी किंचाळलं. आवाजासरशी सामंत वळले. त्यांची गाडी उतारावरून त्यांच्याच दिशेने येत होती. विचार करायलाही वेळ नव्हता. डावीकडे उडी मारल्यावर फक्त कपाळमोक्ष आहे हे त्यांना इतक्या वर्षांच्या प्रवासामुळे माहीत होतच. गाडी वेगाने येत होती. गाडी अचानक चालू कशी झाली ? आपण तर बंद केली होती ? नेमकं काय करावं तेच त्यांना कळेना. त्याक्षणी ते कंप्लिट ब्लँक झाले.
"वॉच आउट" मघाचा माणूस पुन्हा किंचाळला आणि सामंत भानावर आले. पुढच्या दोन सेकंदात गाडी त्यांना सोबत घेऊन जाणार होती. शेवटच्या क्षणाला त्यांनी शरीर उजवीकडे भिरकावलं. वेदनेची एक कळ मस्तकात गेली. पाय मुरगळला होता. हातापायांना खरचटलेलं वेगळच. स्वतःला सावरून जेव्हा ते वळले, तेव्हा त्यांची गाडी त्या टँकरच्या आगीत प्रवेश करत होती. क्षणार्धात दुसरा स्फोटाचा आवाज वातावरणात घुमला. डोंगर पुन्हा हादरला. उरलं सुरलं बळ एकवटून, वरून येणार्या दगडांचा मारा चुकवत सामंत भुयाराच्या दिशेन धावले. ती एकच जागा आता सुरक्षित होती. ते जवळ पोहोचताच दोघे तिघेजण पुढे आले. सामंतांनी रस्त्यावरच बसकण मारली. त्यांची गाडी समोर जळत होती. गाडी सुरु कशी झाली ? आपण हेंडब्रेक ओढायला विसरलो का ? आपण ते कधीच विसरत नाही. समोरची आग पाहून भांबावल्याने कदाचित ब्रेक लावला नसावा. उतार होता म्हणून गाडी पुढे सरकली. पण इतक्या वेगाने ? ते त्याच्याच विचारचक्रात गुरफटले. अवतीभवतीचे लोक काय बोलताहेत त्यातलं त्यांना एक अक्षरही कळत नव्हतं. समोर गाडी जळत होती. आकाशात काळ्या मेघांची दाटी पुन्हा झालेली.
दोन दिवसात सामंतांना डिसचार्ज मिळाला. पायही बरा झालेला. वेदना जास्त जाणवत नव्हत्या. जखमाही काही गंभीर स्वरूपाच्या नव्हत्या. स्नेहलने दोन दिवस त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्येच काढले. मुलं बाबांबरोबर परतली होती. डॉ. चारुहास व इतर संपर्कात होतेच.
डॉ. देवधरांच्या सांगण्यावरून स्नेहलताने त्यांना घरात डांबल. काही दिवसांची 'कंपलसरी बेड रेस्ट'. 'आपण पुर्ण ठिक आहोत' या त्यांच्या विधानाला कुणी काडीची किंमत दिली नाही. शेवटी त्यांनीही वाद घालण्याचे टाळले आणि मुकाट घरात बसले. पण स्नेहलता नसताना ते अधूनमधून डॉ. कांचन व डॉ. कलीमच्या संपर्कात होते.
आजचा तिसरा दिवस त्यांना डिसचार्ज मिळाल्यानंतरचा. शनिवारची संध्याकाळ. कॉफीसोबत ते सिडने शेल्डन घेऊन बसले होते. स्नेहलता कुठल्यातरी महिलामंडळाच्या कार्यक्रमाला गेली होती. त्यांचा सेल वाजला. नंबर धारकरांचा होता.
"बोला धारकरसाहेब."
"सामंतसाहेब, मला एक फार वाईट सवय लागलीय बघा."
"म्हणजे ? "
"माझ्या हद्दीत कुठे काही घडलं की मग त्या प्रकरणाशी संबधित प्रत्येकजण माझ्या नजरेत संशयित असतो आणि घटनादेखील. जुना स्वभाव"
"मग...? माझ्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या ? " सामंताना धारकराच्या गप्पात रस नव्हता.
" आता तुमचा हा अपघात घ्या ना.." आपल्याच आधीच्या वाक्याचा धागा पकडत धारकर बोलले.
"त्यात काय... ? "
"मी आत्ताच सगळे रिपोर्टस पाहीले त्या अपघाताचे. उरले सुरले अवशेषदेखील. म्हटल, तुमच्या कानावर घालावं. तुमच्या गाडीच्या उरलेल्या भागात मला ती माती सापडलीय."
"व्हॉट ? " समोरच्या दारात मंजू, त्यांची मेड धावत आली तेव्हा सामंताना जाणवलं की आपण फार जोरात ओरडलोय. चार-पाच सेकंद समोरून आवाज नव्हता. "हॅलो.... हॅलो...."
"बोलतोय. कानाला झिणझिण्या आल्या. केवढ्याने ओरडलात. आता जास्त काही ऐकू यायचं नाही. फोन ठेवतो मी." धारकरांनी फोन ठेवला आणि सामंत विचारांच्या गर्तेत बुडाले. नेमका तेव्हाच पुन्हा सेल वाजला.
"बोल कांचन. "नंबर पाहताच ते बोलले.
"सर, तुम्हाला इथे येता येईल." डॉ. कांचन यांचा भेदरलेला आवाज त्यांच्या कानी आला.
"काय झाल कांचन ?"
"प्लीज सर, तुम्ही इथे या. डॉ. चारु....प्लीज..." फोन कट झाला. 'काय झाल असेल ?... कांचन इतकी घाबरलेली का होती ? इथे म्हणजे कुठे ? संस्थेत ? पण आज शनिवार... शनिवारी ती तिथे काय करतेय ? सुट्टीच्या दिवशी ? सध्या कोणतीच अर्जट असाईनमेट नसताना ? चारुचा काय संबंध ? तोही तिथे आहे का ? विचारांना बाजूस सारून त्यांनी कांचनला फोन लावला. रिंग जाताच फोन कट झाला. त्यांनी पुन्हा फोन केला. फोन आता स्विच ऑफ होता. चारुला फोन करावा का ? करावाच. त्यांनी फोन केला.
"चारु, कुठे आहेस ? "
"जिमखान्यावर. का रे ? काय झाल ? " देवधरांच्या आवाजाबरोबर कोण्या स्त्रीच्या खिदळण्याचा आवाज आला. सामंताना आवाज ओळखीचा वाटला.
"समथिंग इज राँग. कांचनचा फोन होता. मी ऑफीसला जातोय. कॅन यु जॉईन मी देअर ?"
"शुअर. आलोच मी." सामंतानी सेल खिशात टाकला.
काहीतरी गडबड आहे... त्यांच्या मनाने त्यांना धोक्याची सुचना दिली. ते उठले. पंधरा मिनिटात ते त्यांच्या गाडीने वरळीच्या दिशेने निघाले होते. सी लिंकने आपण पुढच्या ३० मिनिटात पोहोचू याची त्यांना खात्री होती. सबर्ब कडून टाऊनच्या उलट दिशेला जाणार्या गाड्याची रहदारी कमी होती.
गाडी बेसमेंटमध्ये पार्क करताना त्यांनी तिथल्या गाड्यांवर नजर फिरवली. डॉ. कांचन आणि डॉ. कलीम या दोघांच्या गाड्या तिथेच होत्या. काहीतरी घडतयं.... आय मस्ट सी.. ते मुख्य दाराकडे धावले.
मेन गेटला रिटायर्ड मिलिट्री मॅन मिश्रा होते. देशमाने नंतरची सेकंड कमांड.
"कांचन मॅडम कुठल्या फ्लोरला आहेत ?" त्यांनी विचारलं
"लॅबमध्ये." मिश्राने क्षणाचा विलंब न करता उत्तर दिलं.
"कम विथ मी" ते लिफ्टकडे धावले. त्याच्या मागोमाग मिश्रा धावले. लिफ्ट तेराव्या माळ्याला थांबली.
लॅबचा दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता. त्यांनी बाहेरच्या स्क्रीनवर हात ठेवला. तो काचेचा दरवाजा उघडला गेला. दोघे आत शिरले.
"कांचन" सामंतानी आवाज दिला.
"मॅडम" मिश्रांनीही आवाज दिला. दोघे लॅबमध्ये तिला शोधत होते. पण कांचनचा पत्ता नव्हता. सामंत विचारात पडले. लॅब मध्ये सगळ्या गोष्टी जागच्या जागी होत्या. काय झाल असेल ? मिश्रांनी नजरेखालून घातलेला परिसर न्याहाळण्यासाठी ते त्या दिशेला वळले. शेवटच्या क्युबिकलमध्ये लॅपटॉप ऑन होता. त्यावरचा हिमाचल प्रदेशचा स्लाईड शो नुकताच संपला होता. शेवटची नावांची स्लाईड त्यात आली. डॉ. कांचन चिटणीसांचा चेहरा नावासह स्क्रीनवर आला.
"शी वॉज डेफिनेटली हिअर अँड समथिंग इज रोंग समवेअर." सामंत स्वतःशीच पुटपुटत दाराकडे वळले. तेवढ्यात त्यांची नजर कोपर्यातल्या दाराकडे गेली. हा दरवाजा गॅलरीच्या दिशेने जाणारा होता. ही गॅलरी संपुर्ण ओपन होती. तिथे वॉटरकुलर आणि टी कॉफी मशीन होती. अधून मधून रेस्ट घेण्यासाठी व एखाद दुसरी सिगरेट फुंकण्यासाठी ती सोय होती. शहरात चालणारी मेजर कंस्ट्रक्शनची कामे समोर चालू होती. बदलत्या मुंबईचं संपुर्ण चित्र तिथे दिसत होतं. अजूनतरी हवा तिथवर पोहोचत होती. समोरचा सेनापती बापट फ्लायऑव्हर नेहमीपेक्षा कमी गजबजलेला होता. लॅब साऊंडप्रुफ असल्याने आतला आवाज बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. दाराकडे वळलेले सामंत गॅलरीकडे वळले. दरवाजा उघडून त्यांनी गॅलरीत नजर फिरवली. सगळं जागच्या जागी होतं. नथिंग सस्पिशिअस. सामंत वळले. नेमकं तेव्हाच मिश्रांनी त्यांना थांबवलं.
"साब....." सामंतांनी त्याच्या नजरेच्या दिशेने पाहीलं. गॅलरीच्या कठड्याजवळ एक उलटी सँडल होती. सामंत त्वरेने जवळ गेले. त्यांनी खाली वाकून पाहीलं. फर्स्ट फ्लोरवर बनवलेल्या ओपन गॅलरी कम लॉबीत कोणीतरी अस्तव्यस्त अवस्थेत पडलेली होती. रक्ताच्या थारोळ्यात.
"ओ शीट." सामंत बाहेरच्या बाजूस धावले. मागोमाग मिश्रादेखील. त्यातही तो ओळखीचा कुबट दर्प सामंताना जाणवला.
सामंत जेव्हा खाली पोहोचले तेव्हा बरेच बघे जमा झाले होते. त्यात हरीहरन होता. त्याच्या हातात छोटीशी पिशवी होती. डॉ. चिटणीस रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. नेमक्या डोक्यावर आदळल्याने डोक्याची कवटी तडकली होती. सामंतानी ते पहाताच नजर फिरवली. आपल्याच सहकार्याला त्या अवस्थेत पाहणं त्यांना जमलं नाही. कलीम.... ? त्यांच्या लक्षात आलं की डॉ. शेखही इमारतीत आहेत. पण कुठे ?
"हरी, तू इथे काय करतोयस ?"
"मॅडमनी बोलावलं होतं."
"का ?"
"त्यांना काही वस्तू चेक करायच्या होत्या. रोजच्या गडबडीत जमत नाही. म्हणून आज आल्या होत्या. त्यांनी मला हे कालच सांगितलेलं."
"तू इथे आहेस ते देवधरांना माहीत आहे."
"हो. मी सरांची परवानगी घेऊनच आलोय. आता मी मॅडमसाठी सँडविचेस आणायला गेलो होतो."
"मिश्रा, पुलिसको फोन करो और एंबुलेन्स बुलाओ..... हरी माझ्याबरोबर चल." मिश्राला सुचना देता-देता सामंतांनी देवधरांचा फोन डायल केला. सामंत धावत पुन्हा लिफ्टजवळ पोहोचले. डॉ. देवधर तोवर खाली पोहोचले होते. सेल खिशात सारुन सामंत लिफ्टमध्ये शिरले. चौदाव्या मजल्यावर पोहचताक्षणीच ते आत धावले.
"कलीम... कलीम" त्यांच्या हाकेला प्रत्युत्तर मिळालं नाही. नसत्या शंका मनाभोवती फेर धरू लागल्या. सामंत डॉ. शेख यांच्या कॅबिनकडे धावले. दरवाजा संपुर्ण काचेचा होता. त्यावर उभे आडव्या मिल्की स्ट्राईप्स होत्या. त्यांनी त्या स्ट्राईप्सच्या गॅपमधून आत पाहीलं. डॉ. शेख यांची रिवॉल्वींग चेअर पाठमोरी होती. त्यातून फक्त एक लोंबकळणारा हात दिसत होता. छातीत धस्स झालं सामंतांच्या. टेबलावर कॉफीचा मग होता. दाराबाहेरच्या लॉकवरील विशिष्ट नंबर दाबून सामंत आत शिरले. टेबलावर बराच पसारा होता. ते चेअरकडे धावले. त्या एवढ्या काळात नको नको त्या कुशंका मनावर थाप मारून गेल्या. त्यांनी चेअर धरून फिरवली. डॉ. शेख गाढ झोपेत होते. त्याचा चेहरा एखाद्या लहान निरागस मुलासारखा दिसत होता. गेले तीन दिवस ते सामंतांच्या उरलेल्या कामाचे रिपोर्ट बनवण्यात व्यग्र असल्याचे सामंतांना कांचननेच सांगितले होते. टेबलवर एका कॉपर्यात तो कंप्लीट रिपोर्ट पडला होता. मगमध्ये अर्धी कॉफी तशीच होती. सामंत त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसले. हरी त्यांच्याजवळच शांतपणे उभा होता. थोड्याच वेळात बाहेर एंबुलेन्सचा आवाज येऊ लागला. दरवाजा उघडून डॉ. देवधर आत आले. जिमखान्यावरून यायला चारुला एवढा वेळ का लागला ? त्या बाईमुळे... कोण असेल ती ? सामंतांनी देवधरांकडे पाहीलं. त्यांचा चेहरा चिंताक्रात होता.
इन्स्पे. धारकर लॅबच्या गॅलरीत उभे होते. कठड्याजवळून त्यांनी वाकून खाली पाहीलं. त्याचवेळेस हवालदार बागवे गॅलरीत त्यांच्या दिशेने आले आणि त्यांचा तोल गेला. धारकरांनी त्यांना सावरलं. सवयीने बागवेंनी एक मातृभाषेतील शिवी घातली व त्यांनी आपण कशाला अडखळलो ते पाहीलं. धारकर त्या जागेचे निरिक्षण करू लागले. दारापासून कठड्यापर्यंत पसरलेल्या गॅलरीच्या फरशीचे दोन भाग होते. दारापासून असलेला पहिला सहा फुट रुंदीचा भाग कठड्यालगत असलेला दोन फुट रुंदीच्या भागापेक्षा आठ इंच उंच होता. दारापासून किंचित डाव्या हाताला असलेल्या वरच्या भागाच्या शेवटच्या दोन फरश्या विचित्र पद्धतीने तुटल्या होत्या. त्यात तीन्-चार खळगे होते. नवखा माणूस दोन्ही फरशीमधलं अंतर लक्षात न आल्याने तिथे हमखास धडपडेल हे त्यांना जाणवलं. जसे बागवे धडपडले होते. दोन इंचाची हिल असलेली ती सँडल तशी धारकरांना नॉर्मल वाटली. त्यांनी हिलचं निरिक्षण केलं. टोकाला रेतीसिमेंटचे कण होते. सँडल खळग्यात अडकली असेल, धारकरांनी तर्क केला. खिशातली छोटी डायरी काढून धारकरांनी त्यातले दोन कागद फाडले. कठड्याजवळच्या फरशीवर असलेले मातीचे कण त्यात गोळा केले.
"बागवे, दारावरचे ठसे घ्यायला सांगा आणि सँडलच्या हिलला लागलेले कण या मटेरियलशी मॅच होतात का ते पहा. बॉडीवरही ठसे आहेत का ते पहा आणि त्यांच्या हातातलं घड्याळ बघा, चालू आहे की बंद झालय ते ." धारकर बाहेर आले तेव्हा देवधर, सामंत, शेख आणि सेक्युरिटी इन्चार्ज देशमाने बाहेरच उभे होते. जहागिरदारसाहेब तेव्हा युएसला असल्याने त्यांना नंतर कळवण्याचा निर्णय त्या त्रयीने घेतला होता. धारकरांनी लॅबच्या दाराचे निरिक्षण केले. वरचा कॅमेरा त्यांच्या नजरेत आला.
"हे कोणीही उघडू शकत नाही ना ? " धारकरांनी स्क्रीन न्याहाळली.
"नाही. ठराविक लोकच लॅबमध्ये येऊ शकतात." देवधर पटकन उत्तरले.
"दिवसभरात कोण कोण आत आलं होतं ? किती वाजता आले होते ? ते कळेल का यातून." धारकरांनी तिघांवरून नजर फिरवली.
"कदाचित. तशी कधी शक्यता पडताळली नाही. मी अॅडमिनला सांगतो. ते तुम्हाला रिपोर्ट देतील." देवधरांनी धारकरांना आश्वासन दिलं.
"आणि त्याचे क्लिपींग्सही." धारकरांनी कॅमेर्याकडे पहात देवधरांना सांगितलं.
"सामंत, तुम्हाला जेव्हा फोन आला तेव्हा ती घाबरलेली होती. त्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीच माहीती नाही." धारकर सामंताच्या नजरेत नजर मिळवून बोलले.
"हो." सामतांनी तिने केलेला डॉ. देवधारांचा उल्लेख टाळला.
"मिस्टर कलीम शेख तेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये झोपलेले होते." धारकरांनी त्यांची नजर शेखवर रोखली. ते त्यांचं निरिक्षण करू लागले. त्यांच्या पँटला गुडघ्यावरील भागास काहीतरी घासून गेल्याचा अस्पष्ट पांढरा ठसा होता. धारकरांची नजर त्यावर खिळली. शेखना ते जाणवलं. त्यांनी तो ठसा झाडला.
"शेखसाहेब, तुम्ही खाली आला होता का ?" धारकर त्यांच्यासमोर आले.
"हो. मला झोप येत होती. वरचं मशिन बंद असल्याने मी कॉफी घ्यायला इथे आलो होतो. कॉफी घेतली आणि पुन्हा निघून गेलो." शेख यांनी शांतपणे उत्तर दिलं.
"तेव्हा मिस. कांचन चिटणीस तुम्हाला नेमक्या कुठे दिसल्या ? " धारकरांनी एक गुगली टाकला.
"कुठेच नाही. मी आत शिरलोच नाही. सरळ इथेच आलो" शेख निर्विकारपणे म्हणाले.
"त्यांची सँडल तेव्हा इथे होती ?" धारकरांचा दुसरा प्रयत्न.
"कल्पना नाही. मी लक्ष दिलं नाही." इति शेख.
"तुम्ही कॉफी कशात घेतलीत ?" तिथे जवळपास धारकरांना युज एन थ्रो ग्लासेस दिसले नव्हते.
"माझ्या मगमध्ये. मी इकडचे डिसपोजेबल ग्लासेस वापरत नाही." इति शेख.
"चांगली सवय. देवधरसाहेब, तेवढा रिपोर्ट मला पाठवा. ही जागा तात्पुरती सील करावी लागेल. आमचं काम आटोपलं की आम्ही तुम्हाला कळवूच. मघापासून तुमचा तो हरीहरन दिसत नाही. जरा त्याला पाठवा. गप्पा मारायच्यात. आणि सामंतसाहेब, हे पाहीलत..." त्यांनी हातातली कागदाची पुडी त्यांच्यासमोर उलगडली. "ही माती आता माझ्या ओळखीची झाली आहे. " ते ऐकताच एक थंड लहर सामंतांच्या शरीरातून गेली. त्यांना तो मघाचा दर्प आठवला.
बागवे...." धारकर बागवेकडे वळले आणि देवधर सामंतांकडे. देवधरांना त्या 'माती' चा अर्थ बरोबर कळला होता.
"सामंत, दॅट ब्लडी थिंग इज किलीग अवर करीअर. खाली मिडियावाले आलेत. लागोपाठ घडलेली दुसरी घटना. हार्ड टू डायजेस्ट." देवधर स्वतःवरच चिडल्यासारखे वाटले सामंतांना.
"सर, मिडियावाल्यांना मी बघतो." चारचौघात 'चारु' हाक मारणं सामंतांनी नेहमीच प्रकर्षाने टाळलं होतं. शेवटी चारू त्याचा इमिजियेट बॉस होता.
दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात 'कांचन चिटणीस हत्या की आत्महत्या' या कॅप्शनखाली बातम्या झळकल्या. टिव्हीवर ब्रेकींग न्युज आदल्या दिवसापासून सुरु झालेली. डॉ. देवधर, डॉ. सामंत आणि डॉ. शेख यांनी प्रकरण पोलिस हाताळत असल्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. त्यावरुनही त्या तिघांना मिडियाने संशयाच्या पिंजर्यात उभं केलं होतं. जहागिरदारांना या बातम्या क्लेशकारक ठरत होत्या. दोन दिवस धारकर मात्र 'ध्येय' मध्येच तळ ठोकून होते. त्यांनी ध्येयमधली एकेक गोष्ट नजरेखालून घातली होती. ध्येयमधला प्रत्येक दरवाजा हा फिंगरप्रिंटशिवाय उघडत नाही हे जाणवल्यावर त्यांनी प्रत्येक रिपोर्ट मागवला होता. शेखची कॅबिन दोनदा पडताळली होती. त्यांच्या अनुभवी मेंदुने अनेक आडाखे तयार केले. अंदाज बांधले. रिपोर्ट आल्यावर त्यातील फिलर्स कंप्लिट होणार होते.
"धारकरसाहेब, सामंत बोलतोय "
"बोला सामंत साहेब, आमची कशी काय आठवण काढलीत ?"
"त्या एसी प्रकरणाचं काय झालं ?"
"ते प्रकरण..... मी चेक केलं सगळं. तुमच्या कंट्रोल रुममध्ये बाहेरचा कोणी माणूस आला नव्हता. नथिंग इन कॅमेरा."
"म्हणजे कोणी आतला माणूस ?"
"तशी शक्यता दिसत नाही. पण ज्याने केलय तो काँपुटर जिनियस असावा. मला त्या काँपुटरमधलं काही नीट कळत नाही. पण माझा मुलगा मला म्हणत होता की हॅकींग इज पॉसिबल."
"ओ आय सी. मला खात्री होती की हे कुणाचं तरी काम आहे. तुम्हाला त्या हॅकरबद्दल काही कळलय."
"अजून नाही. कळेल. बाय द वे सामंतसाहेब, डॉ. कांचन आणि डॉ. शेख यांचे संबंध कसे होते ?"
"व्यवस्थित. त्यांच्यात कोणाताही वाद नव्हता."
"पक्का ? "
"१०० %"
"ओ.के." धारकरांनी फोन ठेवला आणि ते समोर ठेवलेल्या कागदाकडे वळले. एकेक पॉसिबिलिटी त्यांनी अनुक्रमे मांडली होती. त्यांनी डॉ. कलीम शेख यांच्या नावाभोवती एक वर्तुळ बनवलं आणि दुसरं 'माती' भोवती. पलिकडे फोन ठेवणार्या सामंताना त्यांच्या प्रश्नाचा रोख बिल्कुल कळला नव्हता.
सोमवार. पावसाची रिपरिप सुरु झालेली. हवेत किंचित गारवा वाढलेला. कॉफीचे घोट घेत शेख खिडकीकडे वळले. ऑफीसला निघण्याची तयारी झालेली. मेन गेटमधून डोक्यावर छत्री धरलेला सय्यद, शेख यांचा ड्रायव्हर, बिल्डींगच्या दिशेने जवळजवळ धावतच आला. शेख यांनी घड्याळाकडे नजर टाकली. आठ वाजून पंधरा मिनिटे. पंधरा मिनिटे लेट.
मघासची मसालाचायची चव अजून सय्यदच्या जिभेवर होती. तशी त्याची तिथे भेट अकल्पनीय होती. पण त्याचा तो चहाचा आग्रह सय्यदला मोडवेना. शेवटी 'तो' देवधरांचा खास माणूस. शेखच्या अपार्टमेंटपासून शंभर फुटावर असलेली भटची टपरी त्याच्या 'मसालाचाय'साठी फेमस होती. त्या चहाचा आग्रह आणि तोही अशा मस्त मौसममध्ये... त्याला नकार देताच आला नाही. त्याने सय्यदला बाजुच्या दुकानाच्या आडोशाला उभं केलं आणि दोन फुल चहा घेऊन तो त्याच्याकडे परतला. दोघांनी त्या बोचणार्या गारव्याला समांतर अशी त्या मसालेदार चहाची लज्जत शरीरातल्या नसांमध्ये उतरवली. पण या चहाच्या नादात उशीर झाला.
भावेश पिझा हटच्या बाहेर उभा होता. किंजल कोणत्याही क्षणी तिथे पोहचणार होती. त्याने वडीलांची लँड क्रुजर समोरच पार्क केलेली. त्याला कालच ड्रायव्हींग लायसन्स मिळालेलं. तीन दिवसापुर्वी त्याचे वडील त्याच्या आईसोबत अहमदाबादला गेलेले. सगळं त्याच्या मनासारखं जुळून आलं होतं. घरी त्याला अडवणारं कोणी नव्हत. किंजलची इच्छा पुर्ण करायची हीच संधी होती. लँड क्रुजरमधून सी लिंकवर सुसाट फेरी मारायची. सकाळी जरा लवकर निघालं की गर्दी ट्रॅफीक जास्त नसते याचा आढावा त्याने घेतला होता. त्यात पाऊस. एक थ्रिलिंग, रॉमेंटीक एक्सपिरियन्स. वन्स इन लाईफटाईम. त्याला काहीही करून जिग्नेश आधी तिला इंप्रेस करायचं होतं. किंजल समोरुन येत होती. लेमन कलरचा टॉप आणि किंचित डार्क कलरची कॅप्री घालून. मोकळे सोडलेले केस. तिला पाहताच त्याने हात दाखवला आणि तो गाडीकडे धावला. थोडयाच वेळात तो तिच्यासोबत त्याच्या आयुष्यातल्या एका भन्नाट ड्राईव्हवर निघाला होता. त्याने एफएम ऑन केला. सोनु निगमच 'तुमको पाया है तो जैसे खोया हूँ' लागलेलं. परफेक्ट सॉंग. ऑल सेट. सी लिंक समोर होता. त्याने स्पीड वाढवला. तो बांद्राच्या दिशेने निघाला. वायपर्स वेगाने काचेवर आदळणार्या थेंबाना दुर सारत होते. भावेश अधून मधून तिच्याकडे पाहत होता. स्पीडोमीटरमध्ये पुढे सरणार्या काट्याबरोबर ती एखाद्या लहान मुलासारखी अत्यानंदाने खिदळू लागली. जणूकाही इतरांशी असलेल्या वेगाच्या स्पर्धेत ते सर्वात पुढे होते. भावेशसाठी सारं जग आता त्या छोट्या लँड क्रुजरमध्ये आकुंचित झालं होतं.
शेख यांचा लॅपटॉप ऑन होता आणि ते सेलवर सामंतांशी बोलत होते.
"अद्वैत, तू येणार आहेस का आज ? "
"नक्की नाही. स्नेहलताला अजूनही मी ओ.के. वाटत नाहीय. तू निघालायस का ? "
"हो. आताच. हे बघ, आपल्या फाईंडींगवर शेवटचा हात फिरवतोय. आय विल सेंड यु कॉपी विदीन हाफ एन अवर. जस्ट चेक एन कॉल मी बॅक." शेखने फोन डिसकनेक्ट केला.
हिमाचल प्रदेशातल्या त्या शोधावर त्याला अजून शेवटचा हात फिरवायचा होता. जे घडलं होतं त्याची कारणीमिमांसा त्याने त्याच्या परिने केली होती. सगळे निष्कर्ष मांडले होते. जहागिरदारांना दिला जाणारा रिपोर्ट जरी बर्याच कट एन पेस्ट मधून गेला असला तरी हा रिपोर्ट त्यांच्या लेखी ऑल इन वन होता. त्यांना प्रत्येक गोष्ट नीट नेटकी आणि ऑन द रेकोर्ड करायची सवय होती. कांचनच्या घटनेने त्यांना खात्री झाली होती की त्यांचा अंदाज बरोबर आहे. 'देअर इज समवन इनविजिबल...लेट देम थिंक आय एम स्टूपिड'. एकेक फोटो समोर सरकत होता. सय्यदने मिररमध्ये पाहीलं. शेखची नजर स्क्रीनवर गुंतलेली. आजच्या पंधरा मिनिटाच्या उशीराबद्दल बॉस कदाचित पावसामुळे बोलले नसतील अशीच त्याने स्वतःची समजूत घातली होती. एवढ्या वर्षात ती तशी पहिलीच मेजर चुक होती. सय्यदने समोर पाहीलं. पावसामुळे वाहनांची वर्दळ कमी होती. त्याने थोडा वेग वाढवला. त्याचवेळेस मेंदूतून पायापर्यंत शरीरात काहीतरी दौडत गेल्याचा त्याला आभास झाला. आपल्या सर्वांगाला घाम फुटतोय असं वाटायला लागलं. त्याने पाहीलं तर एसी ऑन होता. पण आतल्या नसा पिळवटत होत्या. समोरची काच धुसर होऊ लागलेली. पण त्याचा मेंदू जागृत होता. त्याने गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण पाय ताठर होत होते. शरीर आता त्याच्या मेंदूच्या ताब्यात नव्हतं. जीभ जडावली. त्याने मिररमध्ये पाहीलं. शेख लॅपटॉपमध्ये बिजी होते. त्याच्या ताठरणार्या शरीरामुळे नकळत एक्सेलेटरवरचा दाब वाढत होता. काय चाललयं ते त्याला कळत होतं, ओरडावसं वाटत होतं. शेख यांनी त्या लॅपटॉपच्या स्क्रीनएवजी आपल्याकडे पहायला हवय. काहीतरी भयानक घडणार आहे हे त्याला जाणवलं. आपण सी लिंकवर पोहोचल्याचं त्यान पाहीलं. डोळे स्पिडोमिटरकडे वळले. त्याने वेगमर्यादा केव्हाच ओलांडली होती. स्टिअरिंगवरची पकड घट्ट होती. पण प्रयत्न करूनही स्टिअरिंग त्याला हलवता येत नव्हती. त्याने समोरच्या धुरकट पडद्याआड पाहण्याचा प्रयत्न केला. सगळं दिसत होतं. पण त्याविरुद्ध कोणतीही हालचाल करण्याची मेंदू परवानगी देत नव्हता. गाडी किंचित वेडीवाकडी झाली.
"सय्यद, बी केअरफुल." स्क्रीनवरची नजर न हटवता शेख बोलले. पण तोपर्यंत सय्यद पुढच्या गाडीवर धडकला होता. त्या हादर्याने शेख यांच्या हातून लॅपटॉप घसरला. ते पुढच्या सीटवर आदळले. स्वत:ला सावरणार तोच मागून दुसर्या गाडीची धडक बसली. सावरण्यासाठीही वेळ नव्हता. स्टिअरिंग अजूनही सय्यदने घट्ट पकडलं होतं.
भावेशने किंजलवरची नजर समोर फिरवली. वरळीच्या दिशेने जाणारी स्कोडा पुढच्या गाडीवर आदळली व मग लेन सोडून मधले ऑरेंज बॅरियर्स उडवून त्याच्या समोर हेलकावत आली. बाजुला दोन गाड्या एकमेकावर आदळल्या होत्या. त्याने एक क्षण किंजलकडे पाहीलं. भीती तिच्या नजरेत तरळली होती.
"स्टॉsssप भाsssssवेश" किंजलचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला. पण त्याचा पाय ब्रेकवर पोहचायच्या आतच ते त्या स्कोडाला धडकले. गाडी जागच्याजागीच गरगरली आणि जाऊन कडठ्याला धडकली. मागून आलेली दुसरी गाडी स्कोडावर आदळली आणि काही कळायच्या आतच स्कोडा कठडा मोडून खाली झेपावली. तोपर्यंत आणखी एक गाडी येऊन लँडक्रुजरला धडकली होती. बेशुद्ध होण्याआधी भावेशने एकदा किंजलचा रक्ताने माखलेला चेहरा पाहीला.
संध्याकाळी उशीरा गाडी पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळालं. पाण्याने फुगलेल्या दोन्ही बॉडीज गाडीच्या आत होत्या. सगळं प्रोसेजर रितसर सुरु झाले.
"नेमकं काय झालं होतं ?" धारकरांनी सब इन्स्पेक्टर वागळेंना विचारलं.
"सर, पाठीमागे मि. जोजेफची गाडी होती. त्याने सांगितलं की स्कोडागाडी व्यवस्थित लेनमध्ये चालत होती. स्पीडही लिमिटमधे होता. अचानक स्पीड वाढला. गाडी किंचित वेडीवाकडी होऊ लागली. मग स्कोडाची लेफ्ट साईड पुढच्या होन्डा सिटीवर आदळली. नेमका तेव्हाच बोलेरोवाला राईट साईडने मि. जोजेफना ओव्हरटेक करून पुढे गेला आणि स्कोडावर आदळला. स्कोडा त्यामुळे बाजुच्या लेनवर गेली. समोरून येणार्या लँडक्रुजरने स्कोडाला उडवलं. जस्ट अठरा वर्षांचा मुलगा आहे तो. बहुतेक त्याला गाडी कंट्रोल करता आली नाही." वागळेंनी थोडक्यात सगळा प्रकार सांगितला. धारकरांनी एंबुलेंसमध्ये चढवलेल्या बॉडीजकडे पाहीलं व ते त्यांच्या पल्सरकडे वळले.
"तो मुलगा आणि मुलगी कसे आहेत ? "
"सिरियस आहेत." वागळेंनी माहीती पुरवली. धारकरांनी खिशातल्या कागदावर नजर टाकली. वर्तुळातलं नाव आता या वर्तुळाबाहेर गेलं होतं. पण दुसर्या वर्तुळातली वस्तू त्या गाडीत मिळेल का ?
"आर यु शुअर अबाईट इट ? " देवधरांनी कपाळावरचा घाम पुसला.
"यस चारू, मी बोललो होतो त्याच्याशी. तो तेव्हा ते फोटोग्राफ्स चेक करत होता." सामंत बोलले.
"डेम इट. मी आधीच बोललो होतो. त्या सगळ्या गोष्टी लॉक करा. डोन्ट गो थ्रु इट. बट यु गायज डोन्ट बिलिव्ह मी. तो स्लाईड शो सुरु होता तेव्हा ऑडॉटोरियम फ्रिज आणि लॉक झाला. कांचन आणि कलीमही तेच फोटो चेक करत होते. ही किल्ड देम." देवधर संपुर्ण अपसेट होते.
"चारु, तू बरा आहेस ना ? अरे, हा योगायोग असू शकतो." स्नेहलताने एवढ्या वेळात प्रथमच त्यांच्या संवादात तोंड उघडलं.
"तीन वेळा ? स्नेहल, तुझ्या नवर्यासारखाच मीही डॉक्टर आहे. पण विज्ञानाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का ? काही गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो. लिसन, एडू, मी त्या सगळ्या गोष्टी पुन्हा त्या तळघरात नेऊन टाकणार आहे. इनफ इज इनफ. तुला तो अपघात का झाला यावर जरा विचार कर. गाड्या आपोआप चालत नाहीत."
"चारु, मी कदाचित हँड ब्रेक वापरला नव्हता." सामंत समजावणीच्या सुरात बोलले.
"कदाचित ? तुला खात्री नाही यातच सगळं आलं. आणि ती तिथली माती...तो दर्प... ती माती कशी काय त्या सगळ्या ठिकाणी आली. शोधली तर कलीमच्या गाडीतही सापडेल ती. मी जहागिरदारांशी बोलतो. मला आजच बँगलोरला जायचय रात्री. दोन दिवसांनी मी येईन तेव्हा आय विल फिनिश दिस ऑफ." डॉ.चारुहास देवधर आता याबाबतीत ठाम झाले होते.
तिच्या शेवटच्या फोनमध्ये कांचन काय बोलली ते अजूनही सामंतांच्या डोक्यात घोळत होतं. चारुला विचारावं की नाही ? सामंतांच काही ठरत नव्हतं.
"चारु बोलतो त्यावर विश्वास आहे तुझा ? " स्नेहलताने सामंताना विचारलं.
"नाही. मला यावर विश्वास ठेवता येणं शक्यच नाही. पाचशे वर्षापुर्वी मेलेला एक माणूस, त्याची काळी जादू.... कमॉन स्नेहल, मी यावर विश्वास ठेवावा तरी कसा ?"
"पण तुला झालेला अपघात, कांचन आणि कलीमबरोबर झालेले अपघात... ती माती... या सगळ्यांवर काय उत्तर आहे ? चारुच्या बोलण्यात काहीतरी तत्थ असेल. तु त्याला त्या वस्तू नेऊ देणार नाहीस का ?"
"नाही. ते शोधून काढायला आम्ही काय भोगलय ते आमचं आम्हाला ठाऊक. एखाद्या अतृप्त आत्म्याला घाबरून मी ते सगळं गमावणार नाही. नेवर." सामंताच्या शब्दात ठामपणा होता. यापुढे सामंतांशी बोलण्यात अर्थ नाही इतक स्नेहलताला कळत होतं.
"बोला धारकर, काय म्हणतेय तुमचं इनवेस्टीगेशन ? " सामंत धारकरांच्या समोर बसले होते.
"कांचन चिटणीसांच्या खुनाशी...." धारकरांनी हातातला चहाचा कप दाखवत त्यांना खुणेनेच विचारलं.
"जस्ट वन सेक... खुनाशी... तो एक अपघात होता ना ?" सामंतांनी चहाला नकार दिला.
"पहाताक्षणी तसच वाटलं होतं. पण मला खात्री आहे की तो खून होता."
"आणि तो खून कोणी केला ?"
"कलीम शेख."
"धारकर, तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला कळतय ना ?"
"सामंत, ड्युटीवर असताना मी घेत नाही."
"मग कलीमने हा खून का केला तेही माहीत असेल तुम्हाला ?"
"नाही. मला वाटत की त्यांचाही खून झालाय."
"धारकर, तुम्ही मला गोंधळवताय. कलीमच्या गाडीला अपघात झाला होता."
"कदाचित. सय्यद एक परफेक्ट ड्रायव्हर होता. गेली तीस वर्षे तो गाडी चालवतोय. पण त्याच्या रेकोर्डवर एकही अपघात नाही. रॅश ड्रायव्हिंगची केस नाही. साधी सिग्नल तोडल्याची केस नाही. एक पक्का मुसलमान. दारू कधी पीत नव्हता. नमाजी माणूस होता. त्याच्या गाडीला अपघात... नेहमी वेळेवर येणारा सय्यद त्यादिवशी पंधरा मिनिटे लेट आला होता. असं मिसेज शेख म्हणाल्या. काहीतरी कुठेतरी मिसिंग आहे."
"धारकर, मी, कांचन आणि कलीम गेली पाच वर्षे एकत्र काम करत होतो. कलीम तिच्यासोबत कधी भांडलाही नाही. मग तिचा खून कशाला करेल ?"
"तेच तर शोधतोय मी. का ? तुम्हाला काय वाटतं का केलं असेल ते त्याने ? "
"मला कल्पना नाही. पण तुम्ही हे निष्कर्ष कसे काढलेत."
"सांगतो." नंतर बराच वेळ धारकर बोलत होते आणि सामंत निमुट ऐकत होते.
"वेल, धारकरसाहेब, तुम्ही तुमचं इनवेस्टीगेशन चालू ठेवा. काही गरज लागलीच तर मला बोलवा. आय विल ग्लॅडली हेल्प." सामंत निघाले तेव्हा त्यांना काय करावं तेच उमगत नव्हतं.
गाडी पार्कींगमध्ये लावून दोघे खाली उतरले. थोड्याच वेळात ते मेनडोरसमोर होते होते. त्याने दरवाजा उघडला. दोघेही आत शिरले. दार बंद करून ते त्यांच्या बेडरुमकडे वळले. त्याने दार उघडले आणि लाईट ऑन केली. दोन सेकंदात ती किंचाळली. त्याने दचकून तिच्याकडे पाहीलं. ती विस्फारलेल्या नजरेने समोर पहात होती. समोरच्या लाईट पिंक भिंतीवर लाल भडक ओघळ होते. त्याने ती अक्षरे वाचली.
"हे काय आहे ? मंजू...मंजू...." ती संतापाने किंचाळली. तिच्या त्या तारस्वरातल्या किंचाळीने किचनमध्ये झोपलेली मंजू धावतच तिथे आली. मागोमाग डोळे चोळत दोन्ही मुलं आली.
"हे कोणी केलं मंजू ? कोण आल होत घरी ?"
"कोण नाय. मुलांना विचारा. कोण नाय आलं."
"स्नेहल, हे त्यांनी केलेलं नाही. यांच्यापैकी कोणालाच पाली भाषा येत नाही. "
"पाली.. ? ही पाली भाषा आहे. काय लिहीलय हे ? "
"मी आलोय माझ्या वस्तू न्यायला. सोबत तुमचे प्राणही हवेत."
"ओ माय गॉड, चारू वॉज राईट..... ही वॉज राईट.... अद्वैत, त्यांला देऊन टाक. त्याला काय हवय ते देऊन टाक. जस्ट थ्रो दॅट शीट अवे."
"रिलॅक्स स्नेहल. रिलॅक्स..... " सामंतांनी भिंतीवरच्या त्या सुकलेल्या जाड ओघळांकडे पाहीलं. भेदरलेल्या स्नेहलने मुलांना जवळ घेतलं. काहीच न कळालेली मंजू दाराजवळ गप्प उभी होती.
"धारकरसाहेब, तुम्हाला काय वाटतं ?"
"सामंतसाहेब, हा तुमचा एरिया माझ्या अंडरमध्ये येत नाही."
"मला माहीत आहे ते. पण मी पोलिसस्टेशनला कोणतीही तक्रार नोंदवणार नाही. तुम्हाला आतापर्यंत काय घडलय ते माहीत आहे. मला वाटते हा त्यातलाच एक भाग आहे. तुमचं मत काय ? "
"मला काय वाटतं, ते तुम्ही मला जर नीट सगळ सांगितलत तर सांगता येईल ना ?"
"वेल, सांगतो." सामंतानी सुरुवातीपासून एकेक घटना त्यांना सांगायला सुरुवात केली.
"सामंत साहेब, हा बल्ब पेटलाय विजेमुळे. विज दिसत नाही. पण स्पर्श केला की जाणवते. ईश्वराचं अस्तित्व तसच आहे म्हणे. मग सैतानाचही असायलाच हवं. बरं, मला सांगा तुम्ही दोघे जेव्हा घरून निघालात तेव्हा या भिंतीवर काहीच नव्हतं."
"नाही. स्नेहल तयार होत होती. मी खाली मुलांबरोबर बसलो होतो. दहा मिनिटात स्नेहल आली आणि आम्ही निघालो."
"दहा मिनिटात ? बराच कमी वेळ लागतो तुमच्या बायकोला तयारी करायला. चांगल आहे. मग तुम्ही रात्री जेव्हा घरी परतलात तेव्हा हे पाहीलं. तोपर्यंत तुमच्या रुममध्ये मुलं, तुमची कामवाली कोणी इथे फिरकलं नाही. घरी कुणी भेटायला आलं नाही. सगळ्या खिडक्यांना ग्रिल आहे. म्हणजे बाहेरून कोणी आत आलेलं नाही. म्हणजे हे घरातल्या माणसाचं काम आहे नाहीतर मग त्या भुताचं. तुमच्या घरात लाल रंग आहे का ? "
"नाही."
"असायला हवा. ज्याने हे रंगवलं असेल त्याने रंगाचा डबा व ब्रश इथेच कुठे तरी ठेवला असेल ना ? जर हा रंग असेल तर..... चला शोधूया. " पुढच्याच क्षणी धारकरांनी घरातला प्रत्येक कोपरा न्याहाळायला सुरुवात केली. त्यांना भिंतीच्या तळाला ती माती सापडली. त्यानंतर काही थेंब जे खिडकीपर्यंत गेले होते. त्यांनी खिडकीच्या खाली जाऊन चेक केल. त्या परिसरात दुसरं काहीच नव्हतं.
"चारु, इथे लॅबमध्ये टेस्ट केलं मी सँपल. ते रक्त आहे. तेही माणसाचं. ओ पोजिटिव्ह. हा ब्लड ग्रुप कलीमशी मॅच होतो." सामंत शांतपणे बोलले.
"व्हॉट नॉनसेन्स. कलीम इज डेड. " देवधरांना सामंतांचा रोख कळला.
"आय नो चारु, धारकरांच्या म्हणण्याप्रमाणे कांचनच्या खुनामागे कलीमचा हात आहे. कलीमचाही खून झालाय." सामंतांनी देवधरांकडे पाहीलं. त्यांनी कपाळावरचा घाम पुसला.
"दॅट मॅन इज क्रेजी. तो कसा विचित्रपणे बघतो, पाहीलस तू. त्याला काय वाटेल ते तो बरळतो. "
"चारु, दरवाज्याच्या स्कॅनरचे रिपोर्ट आहेत त्यांच्याकडे. त्यात त्या वेळेत फक्त कलीम लॅबमध्ये दोनदा आल्याचं दिसतय आणि दुसरं म्हणजे क्लिपिंग्समध्ये हरीहरन नंतर कलीम फक्त एकदा आत येताना व बाहेर जाताना दिसताहेत. पुढचं रेकॉर्डींग झालेलच नाही. कॅमेरा कनेक्शन कोणीतरी ऑफ केलं होतं."
"एडू, कलीम कशाला मारेल कांचनला ? वॉटस द ब्लडी रिजन."
"नो आयडीया. दुसरं म्हणजे कंट्रोलरुमचा कॉम्पुटर कलीमच्या लॅपटॉपच्या थ्रु हॅक झाला होता. त्यादिवशी कलीम ऑडीटोरियममध्ये लेट आला होता."
"आय कान्ट बिलिव्ह दिस." देवधरांना विश्वास ठेवणं कठीण जात होतं. "त्यांना अस का वाटतय की कलीमचा पण खून झालाय ? "
"सय्यद अपघात करेल हेच त्यांना पटत नाही. शिवाय त्यांना कारमध्ये ती माती सापडली आहे. ती तिथे असेल याची तुलाही खात्री होतीच."
"म्हणजे दॅट ब्लडी...." देवधरांनी बोलता-बोलता आपली जीभ चावली. सामंत उठले. दाराकडे वळले. क्षणभर थांबून पुन्हा देवधरांकडे वळले.
"चारु, कांचनने जेव्हा मला फोन केला होता तेव्हा तिने तुझं नाव घेतलं होत. त्यांनंतर 'प्लीज' हा तिचा शेवटचा शब्द." सामंतांनी नजर देवधरांवर रोखली.
"व्हॉट ? एडू तुला कळतय तू काय बोलतोयस ते ? कांचनचा अपघात झाला तेव्हा मी जिमखान्यावर होतो."
"यस. पण बांद्रयाहून मी इथे पोहोचलो तरी तू पोहोचला नव्हतास. आय थिंक यु वेअर मच क्लोजर टू दिस प्लेस."
"आय वॉज स्टक इन दॅट ब्लडी ट्रॅफीक. जस्ट वन सेक, वॉट यु वॉन्ट टू प्रुव्ह ? मी मारलं कांचनला आणि कलीमला ?"
"नाही. मी कलीमचं नावही घेतलं नाही. मी फक्त सगळ्या पॉसिबिलिटीज चेक करतोय. कारण पुढचा नंबर माझा असणार आहे. मरणाला मी घाबरत नाही चारू. आम्हा तिघातला आता मी एकटाच उरलोय. जर काही 'कर्स' असेल तर मग मीही अशाच एखाद्या अपघातात जाईन. आय हॉप तू स्नेहलची आणि मुलांची काळजी घेशील. गुडनाईट चारू." सामंत डॉ. देवधरांच्या ऑफीसमधून त्वरेने बाहेर पडले.
सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत नव्हत्या. सगळं विचित्र आणि विपरित. पुढे काय ? हा प्रश्न होताच. त्या सगळ्या वस्तू आणि ती मुद्रिका आपल्या ताब्यात असायला हवी. दॅट विल बी द फर्स्ट थिंग आय विल डू टुमारो मॉर्निंग. गाडी सी लिंकवरून भन्नाट वेगाने बांद्राच्या दिशेने जात होती. सामंतांनी काय करायच ते नीट ठरवलं होतं. त्यांना मरायचं नव्हतं. मोठ्या कष्टाने ते या पदावर पोहोचले होते. ते सगळं एका पाचशे वर्षापुर्वीच्या सांगाड्याच्या हाती त्यांना सोपवायचं नव्हतं. विचार वार्यासारखे भरकटत होते. चारू काहीतरी दडवतोय का ? कुठे आणि कुणाबरोबर होता तो त्या दिवशी ? कांचन लॅबमध्ये आहे हे त्याला माहीत होतं. अजून त्याला काय माहीत आहे जे आपल्याला माहीत नाही. पहायलाच हवं.
****************************************************
डॉ. देवधरांनी डोळे मिटले आणि ते मागे रेलले. कुठच्या कुठे गेल्या होत्या सगळ्या गोष्टी. आपल्या 'ध्येय'मध्ये असं कधी काही होईल याची त्यांना अपेक्षाही नव्हती. घटना इतक्या वेगाने आणि अकल्पितपणे घडल्या होत्या की काही संगतीच नीट लागत नव्हती..... संशोधन थांबवायचा आपला निर्णय योग्यच होता. पण अद्वैतने यावर विश्वास ठेवला नाही. त्याचा तो हट्ट जीवघेणा ठरलाय. ऑडीटोरियममधली चेंगराचेंगरी, डॉ. गोयल यांचा मृत्यु... त्यांचा तर काही संबंधही नव्हता या सगळ्याशी. ही वॉज जस्ट अ चीफ गेस्ट.... आपल्या विनंतीमुळे ते कार्यक्रमाला हजर राहीले होते. मग कांचन... तिची चुक हीच की तिला इतिहासाशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. अद्वैतच्या साहसात ती सहभागी झाली ते काळाच्या उदरात गडप झालेल्या गोष्टी शोधण्यासाठी..... वडीलांचीच 'नवं काहीतरी शोधण्याची जिद्द' तिच्या अंगी होती. तिच्यासोबतच गेली. मागोमाग कलिम... धारकरला वेड लागलय ? कलिम तिचा खून करेलच कशाला ? मुलीसारखा वागवत असे तिला तो. गाईड करत असे. म्हणे, त्याने तिचा खून केलाय आणि त्याचाही खून झालाय. धारकर सायकीक असावा... प्रत्येक गोष्टीत संशय... तो अद्वैतचा अपघात.... तो ही जाणूनबुजून घडवला कोणीतरी.... धारकरला त्यात दिसला नाही काही घातपात... पण ती माती.... ती तरी दिसते की नाही ?..... मग तरी का त्याच्या डोक्यात घुसत नाही. धारकर एक मठठ माणूस आहे...................... हे सगळं त्याने घडवलंय. पाचशे वर्षानंतर तो जागा झालाय... त्याला शांत करायला हवयं.. त्याला शांत करायला हवय...
डॉ. देवधरांनी सेफ उघडली. त्यातल्या त्या सगळ्या वस्तू बाहेर काढल्या आणि हरीहरनला बोलावलं.
"हरी हे सगऴं नीट पॅक कर. कॅअरफुली. दिस 'कर्स' हॅज टू गो बॅक वेअर इट बिलाँग्स." हरीने सुचनेप्रमाणे कामाला सुरुवात केली. बाहेरचा आसमंत आता काळवंडला होता. आपल्या कॅबिनमध्ये खिडकीजवळ उभ्या असलेल्या देवधरांना लाईट लावायचही भान उरलं नव्हतं. बाहेरून येणार्या तुटपुंज्या प्रकाशात त्यांच्या कॅबिनमध्ये काळ्या सावल्यांचा खेळ सुरु झाला होता. केबिनमध्ये जेव्हा कुबट दर्प जाणवायला लागला तसे ते हरीहरनकडे वळले. त्या दर्पाबद्दल कुतुहल असायल हवं होतं. पण विमनस्क अवस्थेत तेही जाणवलं नाही देवधरांना.
डॉ. देवधर घरी पोहोचले तेव्हा त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. हा मानसिक होता. सामंतांनी जाता-जाता जे आरोप केले ते कल्पनेपलिकडचे होते......... त्या दिवशी उशीर का झाला ? कसं सांगणार की स्नेहलता त्या दिवशी त्यांच्या सोबत होती. त्याच्या अपघाताचा संबंध तिनेही त्या उत्खननाशी लावला होता. ती फार टेन्स होती. पुन्हा तसलं काही घडेल अशी भीती होती तिला. आणि आपण मात्र तिला त्या विचारातून बाहेर काढण्यासाठी विषय बदलून हसवण्याचा प्रयत्न करत होतो. काही विनोद सांगून.
"चारु, अद्वैतचा विश्वास नसला तरी मला मात्र भीती वाटते. का ते मलाही नीट सांगता यायचं नाही. पण वाटते हे खरं. रात्री बेरात्री मी खडबडून जागी होते. त्या अपघातात अद्वैतला काही झालं असतं तर.... आज त्याला खोटच सांगून आलेय. या विषयावर तुझ्याशी मी बोलू नये अशीच त्याची इच्छा. तुझ्याकडे आलेय हे माहीत नाही त्याला. मला तुझी मदत हवीय. यातून बाहेर पडायचा काहीतरी मार्ग असला पाहीजे. प्लीज चारू, डु समथिंग." स्नेहल किती अपसेट होती तेव्हा. अद्वैतची किती काळजी वाटत होती तिला. विश्वासाने आली होती माझ्याकडे. पण अद्वैत आपला हट्ट सोडत नाहीय.
अशा परिस्थितीत कांचनबद्दल तिला कसं सांगता आलं असतं ? अद्वैततरी कुठे नीट बोलला होता. काय झाल ? अद्वैत काय बोलला ?.... किती वेळ ती पुन्हा पुन्हा तेच विचारत होती. काही झालेलं नाही अशी तिची समजूत घालण्यातच वेळ गेला.
देवधर सोफ्यात शिरले. हरीहरन त्यांच्या सोबत होताच. तसा तो नेहमीच त्यांच्या सोबत असायचा. ऑफीस असो वा घर. घरातला तिसरा माणूस म्हणजे दामोदर. हा देवधरांचा आचारी. पण तो आज घरी नव्हता. रविंद्रला सुरेखा पुणेकरांच्या 'नटरंगी नार' चा शो होता. चार दिवस आधीच त्याने देवधरांकडून त्यासाठी परवानगी घेतलेली.
"सर, मी तुमच्या आंघाळीची तयारी करतो." हरीहरन सगळं सामान हॉलमध्ये ठेवून सोफ्यावर पसरलेल्या देवधरांना बोलला. रात्रीच्या जेवणाआधी 'मस्त आंघोळ' हा देवधरांचा नेहमीचा शिरस्ता.
"नको. मी करेन. तू जेवणाचं बघ. दाम्या काय करून गेलाय ते." ते बाथरुमच्या दिशेने निघाले.
"यस सर." हरीहरन किचनकडे वळला. किचनच्या दरवाज्यातून त्याने पाहीलं तेव्हा डॉ. देवधर बातम्या पहात होते. तिथल्या हवेत हळूहळू गारवा भिनायला लागला होता. देवधर आंघोळीला गेले तेव्हा हरीहरनला तो कुबट दर्प जाणवू लागला.
देवधरांनी नळ ऑन केला. पाण्याची धार टबमध्ये बरसू लागली. त्यांनी पाणी चेक केलं. बर्यापैकी गरम होतं. त्यांना पुरेसं होतं. ते बेडरुममध्ये आले. त्यांनी कपाटातला नाईट ड्रेस काढला. टॉवेल वगैरे घेऊन ते पुन्हा बाथरुममध्ये शिरले. त्यांनी दार लॉक केलं. टब अर्धा भरला होता. ते पाण्यात उतरले. गरम पाण्याचा स्पर्श सुखावह होता. दोन क्षण ते तसेच पाण्यात शांतपणे पडून राहीले. तोच समोरच्या काचेवरून एक सावली हलल्यासारखी वाटली त्यांना. क्षणभर ते थांबले. दुसरी कोणतीच हालचाल नव्हती. त्यांनी कानोसा घेतला. पानाची सळसळ ऐकू आली. आपल्या बंगल्याच्या मागच्या बाजुस झाडांची दाटी आहे हे त्यांना आठवलं. बाहेर वारा सुटला असावा, त्याशिवाय इथे गारवा वाढतोय....पाऊस पडेल कदाचित... ते स्वतःशीच पुटपुटले. तेवढ्यात त्यांना तो दर्प जाणवला. त्यांनी चहुवर नजर टाकली. त्या दर्पाचं कारण त्यांना दिसलं नाही. मागच्या बाजूस सफाई करून बरेच दिवस झाले होते. पाऊस सुरु होण्याआधी ते काम व्हायला पाहीजे होतं. पण हा दर्प कसला.... आधीही जाणवला होता. कुठे ?....... टब बर्यापैकी भरल्यासारखा वाटताच त्यांनी नळ बंद करायला हात वर केला आणि....
गॅस बंद करून हरीने सगळं जेवण डायनिंग टेबलवर सजवलं. पण देवधरांचा पत्ता नव्हता. हरी जिन्याकडे वळला. जिन्यावरून पाणी ओघळत होतं. हरी गोंधळला. तो वर धावला. पाणी देवधरांच्या बेडरूममधून येत होतं. त्याने आत पाऊल टाकलं. खोलीत सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. तो हाका मारत बाथरुमकडे वळला. बाथरुमचा दरवाजा आतून बंद होता. त्याने दाराला धडका मारायला सुरुवात केली. पाचव्या प्रयत्नात त्याला यश आलं. दरवाजा उघडला गेला. त्याबरोबर कुबट वासाचा भपकारा बाहेर आला. अंगावर आलेल्या गारव्याच्या झुळकीने हरीहरन शहारला. टबमध्ये देवधराचा काळानिळा देह वेडावाकडा पहुडला होता.
दामोदरचा फोन येताच सामंतांनी धारकरांना फोन केला. धारकर जेव्हा बंगल्याच्या बाहेर पोहोचले तोपर्यंत सामंत स्नेहलताबरोबर तिथे हजर झाले होते. थरथरणारा हरी एका कोपर्यात बसला होता. दामोदर त्याला धरून त्याच्या शेजारी बसला होता. धारकरांनी इन्स्पे. शृंगारपुरेंना आपली ओळख दिली आणि ते त्यांच्यासोबत बाथरुममध्ये गेले. एव्हाना नळ बंद करण्यात आला होता. पाणी बरच ओसरलं होतं. शृंगारपुरेंची टीम त्यांच्या कामात व्यस्त होती.
"इलेक्ट्रिक करंट. पण कसा ते कळलं नाही अजून. कदाचित पाण्यातून असावा. पण पाण्यात कुठून आला असेल ? पाईपलाईन कन्सिल्ड आहे. नळ बंद केला तेव्हा त्यात करंट नव्हता. " शृंगारपुरे माहीती देत होते. धारकर मात्र तेव्हा टबमधल्या पाण्यात पहात होते. बॉडी उचलली गेली आणि टबमधल्या पाण्यात त्यांना ती माती दिसून आली. ती तिथे असायलाच हवी होती. वातावरणातला कुबट दर्प बर्यापैकी ओसरला होता.
"शृंगारपुरे, ती मातीही उचला. टेस्टसाठी."
धारकरांनी बाथरुमच्या खिडक्या चेक केल्या. बाहेर पाहणं शक्य नव्हते. ग्रील्स होत्या. ते रुमच्या बाहेर आले आणि टॅरेसकडे वळले. पाण्याच्या टाक्या चेक केल्या. आत संशयास्पद असं काही नव्हतं. टाकीच्या खाली असलेल्या हॅलोजनचा प्रकाश संपुर्ण गच्चीवर पसरलेला. त्यांनी आजुबाजुला पाहील. दोन्ही बाजुच्या गच्च्या रिकाम्याच होत्या. पावसाळी दिवसात कोण कशाला वर तडमडेल ? त्यांनी स्वत:शीच विचार केला. शक्य तितकी पाईपलाईन चेक केली. कुठेही वायर जोडल्याच्या खुणा दिसल्या नाहीत. ते खाली आले. शृंगारपुरेंना बाजुला घेऊन त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्या दहा मिनिटात शृंगारपुरे फक्त मान डोलावत होते. धारकर जेव्हा सामंतांकडे वळले. तेव्हा रडणार्या स्नेहलताला त्यांनी नोट केलं. सामंतांच्या चेहर्याकडे पाहताच त्यांना वाटल, सामंत द्विधा मनस्थितीत आहेत.
"सामंतसाहेब, काही सांगायचय का तुम्हाला ?"
"त्या वस्तू... त्या त्याच्याच आहेत." सामंताचा आवाज थरथरत होता.
"त्या आत्म्याच्या..." धारकरांच्या शब्दांबरोबर सामंतानी मान डोलावली.
"त्या तुमच्या सेफमध्ये असायला हव्या होत्या. इथे काय करताहेत त्या ?"
"कल्पना नाही. कदाचित हरी काहीतरी सांगू शकेल." धारकरांची नजर हरीकडे वळली. तो अजूनही थरथरत होता. नंतर बराच वेळ ते हरीच्या सोबत बसून होते. शृंगारपुरेंची टिम आपल्या कामात व्यस्त होती.
देवधरांचा मृत्यु एखाद्या स्फोटासारखा होता. त्याचे पडसाद चहुदिशेला उमटले. मिडीयाने पुन्हा पहिल्यापासून सगळ्या गोष्टींची उजळणी केली. ऑडीटोरियममधला प्रसंग, सामंतांचा अपघात, कांचन व शेख यांचा अपघात आणि शेवटी देवधरांचा अपघात... प्रत्येक गोष्ट त्यात होती. पण टिव्हीवर मात्र मामला त्याही पुढे गेला होता. ब्रेकींग न्युजच्या जमान्यात हे प्रकरण म्हणजे पर्वणी होती. ते सरळ हिमाचल प्रदेशात धडकले होते. तिथे घडलेल्या अपघातांची शक्य तेवढी माहीती त्यांनी गोळा केली होती. त्या अर्धवट माहीतीवर "कर्स ऑफ फाईव्ह हंड्रेड इयर्स ओल्ड स्केलेटन" या हेडींगखाली रोज काही ना काही झळकत होतं. स्पेशल प्रोग्राम 'ग्राफिक्ससकट' चॅनल्स व्यापून होते. यामुळे मजूरांचे अपघातदेखील चॅनल्सच्या हवाल्याने वृतपत्रांच्या पहिल्या पानावर आले. पाचशे वर्षापासून सुप्त असलेल्या एका शापाला जागृत केल्याचा आरोप आता सामंतांवर होता. सामंतांना तर पत्रकारांनी एका जागी बसणं मुश्किल केलं. विज्ञाननिष्ठ माणसांनी यावर विश्वास कसा ठेवावा ? 'दुष्टात्म्याचा शाप' या भाकडकथेवर जाहीर विश्वास ठेवणं प्रत्येकाने टाळलं तरी खाजगीत कुजबुज वाढायला लागली. त्या जीवावर चॅनल्सचे आपसात वॉर सुरु झाले. लोकमत आजमावण्याचा खेळ सुरु झाला. ज्योतिष, रमल, सख्याशास्त्र, टेरो कार्ड....... सगळ्या शास्त्रांचे जाणकार चॅनेलवर हजेरी लावू लागले. एकाचे एक तर दुसर्याचे दुसरेच. दुसरीकडे जहागिरदार आणि मुजुमदार बैठकींवर बैठकी करत होते. प्रकरण आता विधानसभेत पोहोचलं होतं. सत्ताधार्यांच्या विरोधात रान उठवायला विरोधकाना एक कोलीत मिळालं. पण यात पैशांचा गैरव्यवहार वा आर्थिक घोटाळा असला प्रकार नसल्याने जास्त ताणून धरण्यात राजकारण्यांना रस नव्हता. 'ध्येय' च्या विरोधात मत वाढायला लागली होत. पण ती सर्वसामान्य होती. जास्त आवाज मात्र सपोर्ट करणार्यांचाच होता. पण खाजगीकरणाचे फायदे आणि तोटे यांचे मात्र सेमिनार या निमित्ताने भरले. चर्चांना उत आला. विचारवंत, तज्ञ, संशोधक यांनी यात आपल्या बुद्धीचा किस काढायला सुरुवात केली. जहागिरदारांनी आपला पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही जणू पणाला लावले होते. आम आदमीसाठी या बातम्या एखाद्या रहस्यकथानकाच्या डेली एपिसोड इतक्याच महत्त्वपुर्ण होत्या. पण सगळं वातावरण ढवळून निघालं होतं खरं.
या सगळ्यात धारकर मात्र आपल्या कामात लक्ष घालून होते. या केसच्या बाबतीत काहीही न करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. वरुन प्रेशर आलेलं. जहागिरदारांच्या वरदहस्ताचा परिणाम. अपघाती मृत्यु असा ठप्पा फाईलवर मारण्याचा आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला. खात्याच्या समाधानासाठी धारकरांनी 'ध्येय'च्या फाईल्स बासनात गुंडाळल्या. मिडीयापर्यंतही बातमी रितसर पोहचवण्यात आली. ओफॉशियली प्रकरण गुंडाळण्यात आलं. पण आपल्या आजवरच्या लौकीकाला ते धरून होणार नाही याची जाण असलेले धारकर मात्र 'ऑफ दि रेकॉर्ड' केसमध्ये इनवॉल्व होते. मिडीयाने धारकरांनाही बर्याचदा धारेवर धरल होतं. पण ते सगळयांना पुरून उरले. केस अक्कलखाती जमा झाली असली तरी काही पत्रकार त्यांच्या मागावर होतेच. शिवाय खात्यातही काही अल्पसंतुष्ट होते जे कोणत्याही क्षणी वरिष्ठांपर्यंत बातमी पोहोचवू शकत होते. धारकरांनी सगळं आता धीराने करायचं ठरवलं होतं. आपण अजूनही त्या केसवर काम करतोय हे कुणाला कळणं त्यांच्या हिताचं नव्हतं. ती केस त्यांच्या बुद्धीचातुर्याला आव्हान होती. त्यांच्या अनुभवी मेंदूने सगळे आडाखे आता अचुक मांडलेले. रोजच्या इतर गदारोळात ते खिशात आपल्या इतर टाचणांच्या कागदाबरोबर 'ध्येय'च्या केसचा कागद घेऊन होतेच. तशा अनेक गोष्टी त्यांना क्लियर झाल्या होत्या. पण ती 'माती' मात्र त्यांना शांत बसू देत नव्हती.
सय्यदला झालेला उशीर त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा होता. तो का झाला ते त्यांना कळलं आणि कुणी केला तेही. पण पुरावा खंबीर नव्हता. कुणी कुणाला चहा पाजला तर त्यात संशयास्पद काय ? पण त्या चहातून जर काही शरीरात गेलं असेल तर ते पोस्टमार्टेममध्ये मिळायला हवं होतं. तसं खात्रीलायक काही मिळालं नव्हतं. ते रक्तात विरघळलं की समुद्रात... त्याचा सुगावा लागला नव्हता.
आजही आपल्या घरी ते समोरच्या कागदावरील एकेक वर्तुळ नीट तपासत होते. त्यांचा तपास शेवटच्या टप्प्यावर आला होता. आता त्यांच्या समोर दोन ठळक वर्तुळ होती. एक म्हणजे 'माती' आणि दुसरं म्हणजे 'हरीहरन'. वर्तुळांकडे पहात असतानाच त्यांना चटकन आठवलं, मागच्या वेळेस जेव्हा त्यांनी कलीमच्या नावाभोवती वर्तुळ काढलं होतं, त्यानंतर त्यांना फक्त त्याच प्रेत सापडलं होतं. त्यांना आता हरीहरनला पुन्हा भेटायचं होतं.
देवधरानंतर सामंत आता 'ध्येय' चे सर्वेसर्वा होते. जहागिरदारांनी सगळं त्यांच्या हातात सोपवलं होतं. 'ध्येय' देवधरांच्या मेंदुची उपज होती. त्यांच्या त्या अपघातानंतर जहागिरदारांकडे सामंताशिवाय दुसरा पर्याय नव्हता. जे घडलं त्यात सामंताचा दोष आहे अस जहागिरदारांना कधीच वाटलं नाही. सामंतांनी त्यांच काम केलं होतं. नेहमीप्रमाणेच. मग त्याचे जसे सुपरिणाम 'ध्येय'ने अनुभवले तसेच त्याचे दुष्परिणामही भोगणे अनिवार्य होते. देवधरांसारखेच सगळे अधिकार आता सामंताकडे होते. फक्त अट एकच की पुन्हा असं काही होता कामा नये. जिथे जिथे म्हणून धोक्याची आगाऊ सुचना असेल तिथे तिथे शक्यतो हात घातला जाऊ नये. ' कर्स' असो वा नसो, विषाची परीक्षा करायची नाही. सामंतानी ही अट मान्य केली होती. प्रकरणाचा शासन दरबारी निकाल लागेपर्यंत देवधरांनी घरी नेलेल्या वस्तू पुन्हा सेफमध्ये ठेवण्याचा निर्णय झाला होता. शासकीय सील ठोकून पेटी सेफ वॉल्टच्या एका कोपर्यात स्थानापन्न झाली. दामोदर आणि हरीहरन आता सामंतांबरोबर होते. मिडीयाशी कोणताही संपर्क साधण्याबद्दल 'ध्येच' च्या स्टाफला आता मनाई होती.
दामोदरने जेवण टेबलावर लावलं. सामंत येऊन बसले. तोच सेल वाजला. सामंतांच्या कपाळाला आठ्या पडल्या. जेवताना त्यांना फोन आलेले बिल्कुल आवडत नसतं. त्यांनी सेल उचलला. पलिकडे धारकर होते.
"नमस्कार धारकरसाहेब, काय विशेष ? "
"काही खास नाही. हरीहरनला भेटायचं होतं. आहे का तिकडे तो ?"
"अजून आलेला नाही. संध्याकाळी ऑफीसमधून निघाला एवढच कळलय. त्यानंतर त्याचा पत्ता नाही. का काय झाल ? "
"काही खास नाही. देवधरांबद्दल दोन गोष्टी कन्फर्म करायच्या होत्या."
"मला वाटते धारकरसाहेब, ती केस आता क्लोज झाली आहे."
"हो ना, पण माझी पर्सनल फाईल अजून ओपन आहे. म्हणूनच हरीहरनशी बोलायचयं. मला वाटते यात तुमची काही हरकत नसावी."
"बिल्कुल नाही. तुमच्या मनाचं समाधान होईपर्यंत तुम्ही तपास चालू ठेवा. बाकी काळजी तुम्ही घ्यालच."
"नक्कीच. तुमचा सल्ला लक्षात ठेवेन. बाकी तुमच्याकडे काय विशेष ?"
"काही नाही. जेवायलाच बसलो होतो."
"ओ.. सॉरी. हरीहरन आला की मला कळवा." धारकरांनी फोन ठेवला.
आजची सकाळ छान होती. पाऊस नव्हता. प्रसन्न उन होतं. सामंत ऑफीसला पोहोचले. त्यांनी सेफ उघडली. ती मुद्रिकेची मखमली डबी काढली आणि खिशात सारली. उद्या स्नेहलताचा वाढदिवस. त्यांनी सगळं नीट प्लान केलं होतं. ते दोघेच महाबळेश्वरला त्यांच्या बंगलीवर जाणार होते. सामंतांनी भराभर काम उरकायला सुरुवात केली. वातवरणातला हल्कासा कुबट दर्प त्यांना अधूनमधून अस्वस्थ करत होता.
दुसर्या दिवशी सकाळी सामंत स्नेहलताबरोबर महाबळेश्वरला रवाना झाले. दोन्ही नोकरांना त्यांनी सुट्टी जाहीर केली. आजच्या सेलेब्रेशनमध्ये त्यांना कोणाचाच व्यत्यय नको होता. फक्त ते, स्नेहलता आणि तो रम्य, धुंद एकांत.
त्याच दिवशी संध्याकाळी..
" बोला बागवे, काय घेऊन बसलाय ? "
"काही नाय सर. दहा मिनिटापुर्वी एक बाई आलीय. तुमच्यासाठी एक पार्सल आहे म्हणते. "
"बाई ? पार्सल ? बघू." बागवेंनी कोपर्यातल्या बेंचवर बसलेल्या बाईकडे धारकरांसहीत मोर्चा वळवला. तिच्या चेहर्यावरच्या खुणा बोलक्या होत्या. फार अपसेट दिसत होती ती. रंगाने सावळी असली तरी रेखीव होती. देखणेपणाचा वरदहस्त नसला तरी आकर्षक होती. तिच्या हालचालीत एकप्रकारची चुळबुळ जाणवली धारकरांना. गळ्यातला क्रॉस व एकंदरीत तोंडावळा ती ख्रिश्चन असल्याचे सांगत होता.
"बोला, मी धारकर. " त्यांबरोबर ती उठून उभी राहीली. तिने हातातलं पार्सल त्यांना दिलं.
ब्राऊन कलरच्या त्या एनव्हलपमध्ये एक दुसरं पांढरं एनव्हलप होतं. धारकरांनी एनव्हलप फोडलं. एक छोटासा कागद खाली घरंगळला. त्यांनी कागद उचलला.
"कोणत्याही दिवशी चोविस तासात जर मी फोन केला नाही तर ही डायरी इन्स्पे. धारकरांना द्यायची." चिठ्ठीवर लिहीणार्याचं नाव नव्हतं.
धारकरांनी डायरी उघडली. ती २००५ ची एक साधी काळ्या कवरची डायरी होती. डायरीतल्या प्रत्येक पानावरच्या तारखेएवजी खाली वेगळीच तारीख लिहीलेली होती. नंतर नंतर तर तारखेचा पत्ताच नव्हता. लिहीणारा डायरी क्वचितच लिहीत असावा. चहा सांगून धारकर तिच्यासोबत स्वतःच्या टेबलाकडे वळले. तिला बसायला सांगून स्वतःही खुर्चीत बसले. त्यांनी पहिलं पान उघडलं. पर्सनल माहीतीचा कॉलम संपुर्ण रिकामा होता. एकदा त्यांनी समोरच्या स्त्रीकडे पाहीलं. तिचा चेहरा वरवर शांत भासत होता. धारकर पुन्हा डायरीकडे वळले.
३ मे २००७
पैसा आज सर्वस्व आहे. पैश्याशिवाय या जगात काहीच मिळवता येत नाही. ज्याच्या हातात पैसा नाही त्या माणसाला या जगात काडीची किंमत नाही. इथे जर उभं राहायचं असेल तर पैशाच्या कुबड्या हव्याच.
८ ऑगस्ट २००७
मला हा जुगाराचा नाद सोडायला हवा. होत नव्हतं ते यात गेलय. उधारी वाढलीय. हा नाद एक दिवस तो मला घेऊन बुडेल. कळतय, पण पत्ते पाहीलेच की हात त्यांच्याकडे आपसुक झेपावतात. काय करू ?
३ नोव्हेंबर २००७
आज मारियाला पाहीलं. मला ती आवडली. तिला मी आवडलो असेन का ?
२८ डिसेंबर २००७
चोविस तासात मला सात लाखांचा बंदोबस्त करायला हवा नाहीतर मला जगणं अशक्य होईल. जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो तरी ते मला शोधून ठार मारतील. त्यांच्यापासून लपणं मला शक्य नाही. मला मरायचं नाही. त्यासाठी मी काहीही करीन. कुणाचे पाय धरू ?
७ जानेवारी २००८
तो देवमाणूस आहे. त्याने माझं आख्खं कर्जे फेडलं. माझ्या कातड्यांचे जोडे केले तरी ते कमीच. त्याचे हे उपकार मी कसे फेडीन ते माझं मलाच कळत नाही.
१८ जानेवारी २००८
मारीया मला 'हो' म्हणाली. आम्ही आता लवकरच लग्न करू. मला लवकरात लवकर घर घ्यायला हवं. लग्नानंतर राहणार कुठे ?
३ फेब्रुवारी २००८
आज पहिल्यांदाच साहेबांनी मला काम सांगितलं. मी सामानाची डिलिव्हरी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर केली. आता माझ्या खिशात पाच हजार आहेत. मी त्यांच्या उपयोगी पडलो याचा मला आनंद होता. तोच पुरेसा होता. पण तरीही त्यांनी मला कामाचा मोबदला दिला. मी प्रामाणिकपणे त्यांच काम केलं. काय असेल त्या बॉक्समध्ये ?
७ जुलै २००८
या कामात चांगला पैसा आहे. गेल्या पाच महिन्यात डिलीव्हरीज वाढल्यात. माझा मोबदला देखील. आता माझ्या राहण्याचीही सोय झाली. डॉक्टर खुप चांगले आहेत. माझं नशीब माझ्यावर फिदा झालयं, मला तर विश्वासच बसत नाही. पण त्या बॉक्समध्ये काय असतं ते एकदा पहावं का ? साहेबांना कळलं तर...
९ सप्टेंबर २००८
गेले दोन महिने एकही डिल झाली नाही. आजच्या डिलमध्ये फक्त पंधरा हजार मिळाले. पण काम लवकरच वाढणार आहे. वाढायलाच हवं. मला त्याशिवाय पैसा कसा जमा करता येईल ? मारियाला मी नेकलेस प्रॉमिस केलाय. लवकरच तिच्यासाठी घेईन तो. कालच जवेरी बाजारमध्ये टीबीझेड ज्वेलर्सच्या दुकानात मी तो नेकलेस पुन्हा पाहीला.
डिसेंबर २००८
२६ नोव्हेंबरला ताजमध्ये मोठं लफडं झाल. डिलिव्हरी घ्यायला आलेलाच शुट झाला. त्या हल्ल्यामुळे तीन डिल कॅन्सल झाल्यात.
मार्च २००९
हॉटेल ताज आतून किती देखणं आहे. एक दिवस मी मारीयाला इथे लंचसाठी घेऊन येईन. आजच्या दोन पार्सल्सचे चाळीस हजार मिळालेत. साहेब माझ्या कामावर खुष आहेत. पण प्रत्येक कामगिरीत सावधगिरी बाळगण्याची त्यांची पद्धत कमालीची आहे. आज मी पहिल्यांदाच बॉक्समधली वस्तू पाहीली. माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
१७ ऑगस्ट २००९
हल्ली मी पैशांचा हिशोब ठेवायचं बंद केलय. पण पैसा माणसाला वेडा बनवतो हे खरय. कितीही असला तरी आणखी हवासा वाटतो. साहेबांकडे काही कमी नाही. पण तरीही ते या धंद्याकडे का वळले तेच कळत नाही. उशीरा का होईना पण मी काय डिलिव्हर करतोय ते मला कळलं. न राहवून विचारलं त्यांना. एंटीक वस्तूना इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिमांड आहे. या अशा जुन्या, काळवंडलेल्या वस्तूंसाठी लोक एवढा पैसा का देत असतील ? माझ्या घरात मी असलं काहीही ठेवणार नाही.
मारीयासाठी घर घ्यायचं मी नक्की केलय. पण पैसे कमी पडताहेत. काहीतरी करायला हवं. साहेबांना विचारायला हवं. ते नक्की मदत करतील. घर फायनल झाल की त्यांना विचारेन मी.
मार्च २०१०
थँक गॉड. हि डिल चांगली झाली. अजून दोन लाख हवेत. मुंबईत घरांच्या किमती किती वाढल्यात. एक घर मारियाला पसंत पडलय. म्हाडाचा जुना फ्लॅट आहे. पण ती चालेल म्हणाली. तिच्या अपेक्षा किती कमी आहेत. असेना, आपल्या हातात पैसा हवा. ती ज्या वस्तुकडे बोट दाखवेल, ती घेता आली पाहीजे.
मे २०१०
हॅकींग करण्यात फायदा आहे. माझं ज्ञान मी जर नीट वापरलं तर मला बरचं काही करता येईल. साहेबांनी प्रत्येक गोष्ट नीट प्लान केली आहे. माझ्याकडून दहावेळा करून घेतलं. पुन्हा त्यानी एकेक स्टॅप लिहून दिलीय. डॉ. शेख लॅपटॉप घेऊन एकदा कामाला बसले की लवकर उठत नाहीत. त्यांच्यामुळे उशीर झाला. पण काम झालं. ठरल्याप्रमाणे मी कमांड चेंज केली. पण त्या एवढ्याश्या चेंजमुळे फारच गोंधळ उडाला. डॉ. गोयल यात बळी गेले. असं काही होईल असं साहेबांना पण वाटलं नव्हतं. या कामाचे एक लाख मिळणार आहेत. साहेब म्हणालेत, जसं मी सांगेन तसं करत जा. तुला हवे तितके पैसे देतो. मला लवकरच घर घेता येईल. डॉक्टरांकडे तरी किती दिवस राहायचं ?
जुन २०१०
डॉ. काचन यांना संशय आलाय. मी साहेबांना तस कळवलय. अस पहिल्यांदाच घडलय. तशा त्या हुशार आहेत याची साहेबांना नीट कल्पना आहेच. म्हणून तर आजपर्यंत फक्त ओ.के करून पुरातत्व खात्याकडे जाणार्या वस्तूच बदलण्यात आल्या. पण डॉक्टर चिटणीसांना आलेला संशय आमच्या दोघांच नुकसान करणारा आहे. त्यांनी निर्णय घेतलाय. मला फक्त अंमलबजावणी करायची आहे.
आज डॉ. कांचन यांनी ऑफिसला बोलावलं. त्यांनी सगळ्या वस्तू समोर ठेवल्या होत्या. एकेक वस्तू चेक करत होत्या. मी त्या आत ठेवत होतो. त्यांना लक्षात आलय की त्यातल्या दोन वस्तू फेक आहेत ते. त्यांच्या ओरिजिनल मी मागेच डिलिव्हर केल्या होत्या. तो वास त्यांनी वजनावरून ओळखला. शेवटी डुप्लिकेट ती डुप्लीकेट. काहीतरी गडबडलय. वजनात मार खाल्ला वासने. मला त्यांनी सँडविच आणायला सांगितलं. मी बाहेर पडलो व साहेबांना फोन केला. ते म्हणाले,'आताच.' मी पुन्हा वळलो तेव्हा माझ्या हातात चाकू होता. मी कॅमेरा ऑफ केला. चाहुल लागल्यामुळे लपलो. ते डॉ. कलीम होते. कॉफी घेऊन चालले होते. तोंडावर रुमाल बांधला. खिशातील पातळ हातमोजे काढले. त्यावर डॉ. शेख यांचे फिंगरप्रिंटस आधीच मॅनेज केलेले होते. साहेब खरचं हुशार आहेत. त्या हॅकींगच्या वेळेसच त्यांनी हे हातमोजे मला दिले होते. टॅक्नोलॉजीने काय काय करता येते. डॉ. शेख यांच्या फिंगरप्रिंटमुळे दरवाजा उघडला. मी कोपर्यातल्या क्युबिकलमध्ये असलेला डॉ. चिटणीसांच्या लॅपटॉपवर स्लाईड शो ऑन केला. पण त्या मला दिसल्याच नाहीत. त्यांना आवाज एकू गेला असावा. मी कानोसा घेतला त्या फोनवर कुणाशी तरी बोलत होत्या. माझी चाहूल लागताच त्यांनी फोन बंद केला. त्यांना चाकू दिसला असेल कदाचित. मी पुढे गेलो. त्या तिथल्या क्युबिकलमध्ये नव्हत्या. तेवढ्यात त्यांचा रिंगटोन वाजला. त्यांनी आलेला फोन डिसकनेक्ट केला. मी त्या दिशेने धावलो. त्या दुसर्या बाजूने दाराकडे धावल्या. मी आधी पोहोचलो. तशा त्या गॅलरीकडे वळल्या. मी मागे धावलो. दारावर डॉ. शेख यांचे फिंगरप्रिंटस दाबले. त्या तुटलेल्या फरशीत अडखळल्या आणि कठड्यावर धडपडल्या. मी चटदिशी त्यांचे पाय उचलले. दुसर्या क्षणी त्या हवेत होत्या. तेव्हा अचानक तो घाणेरडा वास आला होता. अंगही गारठलं होतं. आधी ते जाणवलं नाही. पण नंतर मात्र तीव्रतेने जाणवलं. १३व्या मजल्यावर 'हवा' समजू शकतो. पण तो वास ? मी खिशातल्या प्लास्टिक पिशवीतली माती तिथे त्यांच्या सॅंडलच्या बाजूस टाकली व लॅबमध्ये शिरलो. त्या दोन्ही वस्तू जाग्यावर ठेवल्या आणि बाहेर येऊन कॅमेरा कनेक्शन ऑन केल. सगळ्या वस्तू लॉकरमध्ये टाकून गेटबाहेर धावलो. सॅडविचेस घेऊन परतलो तोवर गर्दी झालेली. सगळे वर जमा झाले होते, तेव्हा मी आठवणीने डॉ. शेख यांच्या गाडीत माती टाकली.
साहेबांनी मला दोन लाख दिले. मला आता अनेक काम लवकरात लवकर संपवायची होती. घराची डिल फायनल करायची आहे. मारियाला हे कळलं तर किती खुष होईल.
जुन २०१०
त्या गोळीत काय होतं मला माहीत नाही. मी ती चहातून सय्यदला दिली. साहेबांनी सांगितलं तस केलं. पण का ?... ते मला माहीत होतं. इन्स्पे. धारकरांना डॉ. शेख यांचे ठसे सगळीकडे सापडले होते. तो माणूस हुशार आहे, फार खोदून खोदून चौकशी करत होता. त्याच्यापासून सावध राहायला हवं.
डॉ. शेख यांच्या गाडीला अपघात झाला. सय्यद तर चांगला ड्रायव्हर होता. मग अस कसं झाला ? गोळी झोपेची तर नव्हती ना ती ?
जुन
सत्ता आणि पैसा यांची लालसा कधीच संपत नाही. त्या माणसाला वेडा करतात. साहेबांचही तसच झालय. डॉक्टरांना संशय आलाय की काय ? असेल. नाहीतर मग साहेब असं बोललेल नसते. त्यांनाही मारायला लागणार वाटतं. ते एवढं काही कठीण नव्हतं. फक्त हॅलोजनचं कनेक्शन काढून तिथे होल्डरमध्ये अॅडाप्टर लावायचा आणि वायर टाकीत सोडायची. नंतर पुन्हा सगळ्या वस्तू जागच्या जागी. दरवाजा तोडून आत गेलो. त्याबरोबर तो घाण वास आला. मागे कधीतरी हा वास आला होता. चिटणीसांच्या वेळी. पॅकींग करतानाही हा वास आला होता. अंग गारठल यावेळेसही. डॉक्टरांना त्या अवतारात पाहवल नाही. टबमध्ये माती सोडण्यासाठी जेव्हा जवळ गेलो तेव्हा आपण काय केलं ते जाणवलं. ते फार चांगले होते. त्यांच्यासोबत असं व्हायला नको होतं. त्यांनी मला कधीही नोकराची वागणूक दिली नव्हती. पण मी खाल्या ताटात माती कालवली.
गेले किती दिवस मी डायरीत लिहीणं बंद केलं होतं. पण हे सगळं आता लिहीतोय. यापुढे मी असलं काही करणार नाही असं साहेबांना निक्षून सांगितलं. ते फक्त हसले. ते हसणं माझ्या ओळखीच आहे. डॉ. चिटणीस, डॉ. शेख आणि डॉ. देवधर.... तेव्हाही ते तसेच हसले होते. कदाचित उद्या माझाही बळी गेला तर... पण माझ्यावर कोण विश्वास ठेवेल ?
एक माणूस आहे. इन्स्पे. धारकर. त्यांचा त्या आत्म्यावर विश्वास नाही. साहेबांनी किती खुबीने सगळया गोष्टी आत्म्याच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला. इतका व्यवस्थित प्लान. पैसा माणसाला वाट्टेल ते करायला लावतो. पण मी यापुढे पुन्हा कुणाला मारणार नाही. अजून पाप करायची माझी हिंमत नाही. मी त्यांना त्यांच्या कामासाठी नवीन माणूस शोधायला सांगितलाय. मला लवकरात लवकर इथून निघून जायला हवं.
मी ही डायरी मारीयाकडे ठेवेन. इथे कोणाच्या हाती लागता कामा नये.
धारकरांनी डायरी बंद केली. समोर बसलेल्या मारियाकडे पाहीलं. तिला विश्वासात घेणं कठीण नव्हतं. चहाचा पहिला घोट घेतल्यावर त्यांनी चौकशीला सुरुवात केली.
त्यांचे सगळे फिलर्स नीट भरले होते. बागवेंना काही सुचना देऊन ते जीपच्या दिशेने धावले. जीप वेगाने निघाली आणि त्याच वेळेस वायरलेस मॅसेज आत घोंगावू लागला.
" वसई हायवेला काल रात्री एक बॉडी सापडलीय. ओळखू येण्यापलिकडे आहे. मृताचं वय साधारण ३२ त ३५ वर्षे, रंग सावळा, कुरळे केस, पिवळसर शर्ट, तपकिरी पँट, हातावर 'मारिया' गोंदलेले आहे. माहीती असल्यास कंट्रोल रुमला कळवा."
धारकरांनी ड्रायव्हरला जीपचा वेग वाढवायला सांगितले.
महाबळेश्वरच्या त्या बंगलीत सामंतांना आनंदोत्सव साजरा करायचा होता. स्नेहलता फ्रेश होण्याकरता गेली. त्यांनी पिशवीतला मोगरा काढला. बेड पहिल्या रात्रीसारखा सजवायचा होता त्यांना. त्यांनी मोगरा बेडवर पसरवायला सुरुवात केली.
एक स्वप्न पुर्ण झालं होतं. 'ध्येय' सारख्या संस्थेत नंबर वन होण्याचं. देवधर असेपर्यंत ते शक्यच नव्हतं. 'जिकणे' ही इच्छा नव्हती तर तो आता हव्यास होता. एकदा माणूस जिकायला लागला तर विजयाची नशा दारुपेक्षा वाईट. याची कमान फक्त चढती असते. प्रत्येक वेळा 'जिंकणं' हेच 'ध्येय' आणि त्यामुळेच 'ध्येय' जिंकणही गरजेचं झालेल. 'एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह एन वॉर'. प्रेमात तर ते जिंकले होतेच. पण आयुष्याच्या एका बाजीत देवधर जरा त्यांच्या पुढे गेले होते. पण आता सगळं व्यवस्थित झालं होतं. मनासारखं. पण अर्धवट. 'ध्येय' वर अजून संपुर्ण मालकी हक्क नाही.
सत्तेसाठी पैसा हवा आणि पैशासाठी वाट्टेल ते करायची तयारी. उत्खननात सापडणार्या वस्तू सरतेशेवटी पुरातत्व खात्याकडे जात होत्या. तिथून म्युजियममध्ये. केलेल्या मेहनतीला मनाजोगते रिटर्नस नव्हते. ते हवेच. 'एंटीक' ची हुबेहुब नक्कल बनवणारा सादिक जेव्हा भेटला तेव्हा एक वेगळच वळणं लाभल आयुष्याला. मग अदलाबदल सुरु झाली. चारुने कर्सला घाबरून संशोधन सोडलं तेव्हाच 'ध्येय' जिंकण्याचा प्लान गवसला होता. त्याचीच पहिली पायरी होती ऑडीटोरियम. स्टेजवर पसरलेली माती संशयाची सुई फिरवायला पुरेशी होती. कलिमच्या नकळत त्याचा वापर झाला. दुर्दैवाने त्यात गोयल बळी गेले. मग तो टँकर जेव्हा अपघातग्रस्त झाला तेव्हाच त्याचा फायदा घ्यायची कल्पना सुचली. हँडब्रेक न ओढता गाडी सोडून पुढे गेलो. माती न विसरता पेरली. सगळं व्यवस्थित झालेलं. धारकर तिथे पोहोचणार याची खात्री होतीच. दुर्दैवाने ती कांचन जास्त चौकस निघाली. नशीब तिने चारुवर संशय घेतला. साहजिकच होतं. त्या डिलीव्हरीज त्याच्या नियंत्रणाखाली होत्या. पण माझ्या थ्रु. तिला संपवणं गरजेचं झालं आणि पुढचा प्लानही सहज सुलभ झाला. धारकरची एन्ट्री फायद्याची ठरली. ज्या पद्धतीने त्याचा तपास चालला होता त्यावरून तो कलिमकडे सहज पोचला असता. म्हणून मग कांचनच्या खूनात कलिमचे फिंगरप्रिंटस पुन्हा वापरले. पण इतक्या सहज कलिमपर्यंत पोहचून कसं चालेल ? कलिम प्रश्नाची उत्तर देण्यापुर्वी त्याला संपवायलाच हवं होतं. शिवाय तो नको तिथे बुद्धी चालवत होताच. पण धारकरला त्यातही संशय आला. जिनियस आहे. फार बारीक नजर आहे त्याची. तो पंधरा मिनिटांचा उशीरही त्याने हिशोबात घेतलाय. पण ती माती त्याला गोधळवणार होतीच. मग आणखी एक धक्का. लेबमध्ये असलेल्या ब्लडबँकेत कलिमच्या रक्ताचे सँपल होते. ते वापरून स्वतःच्या घरात खुनाची धमकी लिहीली. खिडक्यापर्यंत थेंब. ब्रशसकट ते ते रक्ताचे सँपल जाता-जाता खाडीत फेकलं. झाल्या प्रकाराचा स्नेहलताला इतका धक्का बसला की धारकरने माझ्या स्टेटमेंटची तिच्याकडे उलटतपासणी केली नाही. धारकर अप्रत्यक्षरित्या माझे साक्षीदार होते. आता प्लानमधील शेवटचा खेळ... ओल सेट. चारुचा विश्वास होताच. तो आता दृढ झाला. हरीने त्याची शेवटची कामगिरी बजावली.
बिच्चारा हरी ! चारुचा खास पण मी त्याला नेमकं हेरलं. त्याचा जुगाराचा नाद कळल्यावर मग तो हातात येईल याची खात्री होतीच. तो आला. त्याला पैसा द्यायला सुरुवात केली. भले भले पैशाला भुलतात. तोही भुलला. सांगेल ते करायला लागला. पण चारुच्या खुनानंतर मात्र हादरला. पण आता मागे वळून करणार तरी काय ? त्याला कायमचा गप्प करणं फार गरजेचं. आता सगळी गुपित घेऊन तो गेलाय. कसलाही अडथळा राहीलेला नाही. आता फक्त ध्येयचा मालकी हक्क.....
सामंतानी पिशवीतील उरलेली फुल पलंगावर टाकली. स्नेहलताला पुन्हा ते त्या क्षणाकडे नेणार होते. पहिल्या रात्रीचा तो क्षण.....
स्नेहलता इच्छा नव्हती. चारुबरोबर जे झालं ते तिला विसरता येत नव्हतं. तो तिचा बेस्ट फ्रेंड होता. पण सामंतांना नाराज करायच नव्हतं. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ती लग्नातला शालू नेसून आली. सामंतांनी लग्नातला जोधपुरी घातला होता. सजवलेला पलंग पाहून तिने नकळत हसली. सामंतानी तिला मिठीत घेतलं आणि खिशातली डबी काढली. खिशातल्या डबीतील मुद्रिका आता त्यांच्या हातात होती. त्यांनी डबी एका बाजूस फेकली. वातावरणात गारवा पसरू लागला. बाहेर पावसाला सुरुवात झाली होती. सामंतानी तिचा हात हातात घेतला. ती अनिमिष नेत्रांनी त्यांच्याकडे व त्या मुद्रिकेकडे पहात होती. त्यांनी तिच्या हाताच चुंबन घेतलं आणि अनामिकेतील अंगठी काढून त्या जागी मुद्रिका घातली. वातावरणातला गारवा वाढू लागला. खिडक्या वाजू लागल्या आणि कुबट दर्प चहुदिशांनी त्या खोलीत शिरला. त्याबरोबर दुसर्याच क्षणी त्या खोलीत काळ्या सावल्यांनी थैमान घालायला सुरुवात केली. काही समजण्याची संधीही मिळाली नाही. त्या भोवतालच्या वावटळीत सामंताना भयाने किंचाळणार्या स्नेहलताचा पांढराफटक चेहरा दिसला. दुसर्याच क्षणाला तिची शुद्ध हरपली. मग त्या वावटळीतल्या काळ्या मातीत दिसला तो शिलालेख... ज्याच्या जीवावर त्यांनी त्याचा सगळा प्लान रचला होता..... तो त्यांना आता डोळ्यांसमोर दिसत होता. "आणि काळ्या सावल्या येतील."....... त्यानंतर दिसायला लागले त्या काळ्या मातीने साकारलेले काही चेहरे.... गोयल, कांचन. कलीम, सय्यद, देवधर आणि हरीहरन...... चिडलेले... प्रचंड चिडलेले. सरतेशेवटी स्नेहलताचा चेहरा... अविश्वासाचा भयप्रद भाव असलेला....... काळ्या सावल्यांच्या वावटळीचा वेग वाढला. त्यांचे शरीर आता अलगद वर उचलले गेले होते. शरीरावरील कपडे तर केव्हाच त्या वावटळीत नाहीसे झालेले. आता त्वचाही झडू लागली होती. वर्षानुवर्षे मातीत पुरलेल्या देहासारखी. काळ्या मातीच्या कणात बदलत चाललेली. सामंताना आपल्या शरीरातील रक्ताचा एकेक थेंब शोषून घेतला जातोय याची जाणिव झाली. प्राणांतिक वेदना शरीरातल्या अणू रेणूला जाणवत होत्या. पण ते किंचाळू शकत नव्हते. हातापायाच्या अस्थि आता दिसायला लागल्या. कणाकणाने देहाला व्यापणारा मृत्यु सामंत उघड्या डोळ्यांनी पहात होते. संपुर्ण देहाची माती होईपर्यंत त्या डोळ्यात जीव होता. काळ्या सावल्याचे ते वादळ जेव्हा सरले तेव्हा खोलीत फक्त झोंबणार्या गारव्यासोबत तो कुबट दर्प होता. खोलीच्या मध्यावर असलेल्या त्या दोन अस्थिपंजरापैकी एकाच्या बोटात त्या मुद्रिकेतला लाल खडा चमकत होता. बाहेर पावसाचा जोर वाढला होता.
सामंतांच्या घरून निघालेल्या धारकरांनी महाबळेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. एक जीप थोड्याच वेळात बंगलीच्या दिशेने निघाली. इन्स्पे. बंडगरांनी सोबत असलेल्या टीमला बंगलीला घेरण्याच्या सुचना दिल्या. रिवॉल्वर हातात घेऊन ते स्वतः खिडकीतून आत शिरले. समोरचं दृश्य थरारक होतं. शहारा सरसरून गेला. पण नंतर मात्र त्यांची नजर अस्थिपंजराच्या हातावर गेली. इन्स्पे. बंडगरांनी अशी मुद्रिका त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीच पाहीली नव्हती. तो लाल खडा अद्वितीय होता. मागचापुढचा विचार न करता त्यांनी मुद्रिका त्यांच्या खिशात सारली आणि बाकी टीम आत पोहोचली.
बाहेर अंधाराला पुन्हा डोळे फुटले. सावल्या फेर धरून नाचायला लागल्या होत्या. कुबट दर्प पुन्हा पसरायला लागला.
देवधर ? मांडणी किंचित
देवधर ?
मांडणी किंचित विस्कळीत झालीये. कथा कळते आहे नीट, पण मध्ये एकदा दोनदा मागे पुढे जावे लागले. पण एकूण आवडली कथा नेहमीप्रमाणेच.
"डॉ. गोयल यांची परवानगी असेल तर..." << इथे डॉ. गोयल अचानक येतात, त्या संशोधनात त्यांची भूमिका कोठेच कळली नाही.
अपेक्षित शेवट वगैरे
अपेक्षित शेवट वगैरे देन्याच्या भानगडीत मी पडणार नाही....
तुम्ही जो शेवट केला आहे तोच वाचायचा आहे ... तेव्हा प्लीज प्लीज प्लीज लवकर शेवट्चा भाग टाका...
एक सांगायचचं राहिलं... कथा
एक सांगायचचं राहिलं... कथा जबरदस्त आहे.....
अप्रतिम, शेवट तुमच्याच शब्दात
अप्रतिम, शेवट तुमच्याच शब्दात वाचायला आवडेल.
प्लीज, लवकर टाका ना पुढचा
प्लीज, लवकर टाका ना पुढचा भाग..................................
कथेने खिळवून ठेवल होत आणि क्रमशः दिसल
तुझ्या डोक्याची कमाल आहे रे
तुझ्या डोक्याची कमाल आहे रे बाबा. मस्त. शेवट टाक लवकर. आता विशाल परत म्हणेल्....या कौतुकचे काय करायचे?
मी सांगु?..... मी सांगु?
मी सांगु?..... मी सांगु?
विशाल, विचारता काय? सांगा
विशाल, विचारता काय?
सांगा ना!! तसही अपेक्षित शेवट विचारलाच आहे....
ए विशाल, तू नाही ज्जा!! तू
ए विशाल, तू नाही ज्जा!! तू कटाप आहे खेळातून. तू आणि कौतुक काय वेगळे आहात का? एकच गडी आहात ना खेळातले?
आता एकदा शेवटचा पंच देऊन
आता एकदा शेवटचा पंच देऊन नॉकाआउट करा कि हो आम्हाला.
कौतुक, जबरदस्त आहे, पण कथा
कौतुक,
जबरदस्त आहे, पण कथा एका पत्रकाराच्या दृष्टीकोनातुन सुरु होते त्याचा नंतर काहीच उल्लेख नाही , तो कुठे गेला?
मी माझा अंदाज सांगु? हे सगळं डॉ. सामंताच्या हातुन होतय, त्यांच्याहि नकळत, त्या लाल खड्याच्या मुद्रिके मुळे. मी काही चचा नाही पण आपला एक प्रयत्न!!.
आता शेवटाची वाट बघतेय!!!
मिलिंदा, खर तरं कथेची कादंबरी
मिलिंदा, खर तरं कथेची कादंबरी व्हायला लागली होती. बरेच तपशील गाळावे लागले. त्यामुळे विस्कळीतपणा वाटत असेल. लिखाण फारच रडत खुडत झालय.
धनुडी, तो पत्रकार फक्त निमित्तमात्र आहे. त्याचा संबंध फक्त ऑडीटोरियममधल्या घटना वाचकापर्यंत पोहचवण्यासाठी होता. सबंध कथेत हाच प्रकार वापरायची इच्छा होती. पण वर म्हटल्याप्रमाणे ते टाळावं लागलं. भावेश व किंजल हे ही त्यामुळेच यात आलेले. पण हात दुखतोच ना शेवटी टायपून. समजून घ्या.
विस्ल्या..
विस्ल्या..
कौतुक, प्लीज टाका ना शेवट
कौतुक, प्लीज टाका ना शेवट लवकर
आणि खरचं या कथेची कादंबरी मस्तचं होइल, वेळ मिळेल तेव्हा जरुर लिहा कादंबरी.... कथा माहीत असली तरी कादंबरी वाचायला मज्जा येइल...
पण आधी शेवटचा भाग प्लीईईईईईईईईईईईईईईईईज!!!!!!!!!!!
कौतुक मस्त!!! मिलिंद म्हणाला
कौतुक मस्त!!!
मिलिंद म्हणाला तसं मधे एकदोनदा जरा विस्कळीत वाटलं - म्हणजे references सापडले नाहीत.. अर्थात अगदीच छोटीशी बाब आहे!
खरच कादंबरीच लिही ना.. मज्जा येईल वाचायला (म्हणजे अजून)
भन्नाट लिहिलीयेस!
प्लीज शेवट टाक बाबा लवकर!!!
कौतुक : मस्त ...जबर लिखाण
कौतुक : मस्त ...जबर लिखाण झालय्...पकड जाणवतेय शेवटपर्यंत.
याची चांगली कादंबरी नक्कीच होऊ शकते.
औरभी बहोत कुछ लिखो....!!!!
कौशि.. कथा जबरी झाली
कौशि.. कथा जबरी झाली आहे..
माझा अंदाज.. डॉ. देवधर आणि सामंतांची बायको ह्यांची काहीतरी भानगड आहे.. आणि ती जशी जशी इतरांना कळते तशी ते लोक मरतात.. आणि ह्यात हरिहरनची त्यांना साथ असते....
माझा अंदाजः देवधरांचा ह्यात
माझा अंदाजः देवधरांचा ह्यात काहिच हात नाहि.
भन्नाट रे कौत्या !
भन्नाट रे कौत्या ! मुद्रीकेकडे कुणाचंच लक्ष गेलेलं दिसत नाहीये
असो मलाही शेवट तुझ्याकडूनच समजलेला आवडेल.
... वॉव्..गुंगायला झालं..
... वॉव्..गुंगायला झालं.. पटकन टाक आता पुढचा भाग..
सय्यदला चहा देणारा आणि उशीर
सय्यदला चहा देणारा आणि उशीर करवणारा पुरूष आहे. सहकर्मचार्यांच्या वाहकांची ओळख, मैत्री असतेच. त्यामुळे 'हरी' चा संशय येतोय. त्याला ध्येयची पूर्ण माहिती आहे.
त्या 'वास' मधुनच माती कमी झाली असावी आणि म्हणुन तो हलका झाल्याचं डॉ. कांचनच्या लक्षात आलं. (तिच्या लक्षात आलय हे हरीच्याही लक्षात आलंय.) तीनं काहीतरी शोधुन काढलं असावं म्हणुन तीचा बळी गेला.
एखादी फिल्म दाखवण्याएवजी हे फोटो का दाखवले जात आहेत हा प्रश्न त्याच्या संशयी मनात डोकावला. >>>>>>माझ्याही. त्या फोटोंमध्ये काहीतरी पुरावा असावा किंवा
जुना रांजण.... रांजणात बाहेर लोंबत असलेले काही सोन्याचे दागिने..... >>>>>> ते दागिना म्हणा खजिना म्हणा जहागिरदारांना 'ध्येय' साठी हवं असावं.
जाऊ दे. पुलंनी म्हंटल्याप्रमाणे आम्ही खूप रहस्यकथा वाचल्यामुळे चुकीचा तर्क बरोबर करतो.(असंच काहीतरी)
कौतुक तू आता पटकन पोस्ट बघु.
कौतुक जबरदस्त , टाक ना पुढच
कौतुक जबरदस्त , टाक ना पुढच भाग लवकर ............. शेवट तुझ्याकडूनच एकायला आवडेल
>>>मांडणी किंचित विस्कळीत
>>>मांडणी किंचित विस्कळीत झालीये. कथा कळते आहे नीट, पण मध्ये एकदा दोनदा मागे पुढे जावे लागले >>><<<
अनुमोदन.
मी गेले ३ दिवस वाट बघत्ये
मी गेले ३ दिवस वाट बघत्ये पुढच्या भागाची........................................
काय ? कौस्तुक अजुन किती वाट
काय ?
कौस्तुक अजुन किती वाट बघायला लावनार आहेस अजुन?
आता आमचा interest जायच्या आधी लवकर टायपून दे.
बाकि. कथा नेह्मिसारखि भन्नात होति.
अरे काय करताय ? थोडा तरी
अरे काय करताय ? थोडा तरी डोक्याला त्रास द्या. इथे एकापेक्षा एक सरस आहेत. कोणी ना कोणी अचुक ओळखेलच. लेटस प्ले द गेम. एक दोन दिवस. नंतर इथेच पुढचा भाग टाकतो.
आता गपचुप टाक पुढचा भाग,
आता गपचुप टाक पुढचा भाग, नायतर "गेमच" करतो बघ
शेवट ssssssssss शेवट
शेवट ssssssssss शेवट sssssssssss
काय हे , तीन दिवस झाले तरी
काय हे , तीन दिवस झाले तरी शेवटाचा पत्ता नाही..
डोम्या म्हणे - कथा लौकर पूर्ण
डोम्या म्हणे - कथा लौकर पूर्ण करणे. नाहीतर माझ्यासारख्या तुमच्या पंख्यांना शेवट मेलने पाठवणे बाकीच्यांना डोके खाजवत ठेऊन.
Pages