****************************************************
****************************************************
गार्गीला जवळजवळ एक तास झालेला होता त्या ऑफीसला येऊन.तिनं इंटेरिअर डेकोरेशनच्या कामाच प्रपोजल दिलेल होतं या कंपनीत अन आज त्याचा निर्णय होणार होता. सगळ्यांच्या मुलाखती चाललेल्या. जहागिरदारांच्या घरातल्या कुणाला अस काही मागायकरता कुठे याव लागणं-थांबाव लागणं हे तस काळ बदलत असल्याच लक्षण होत. पण गार्गीच जरा वेगळ होत.तिच्या 'घराण्याची' इतिहासानी जरी एव्हढी फरफट केली नसली तरी तिचा वर्तमान फार काही सुखावह नव्हता.तिला व्यवसायात उशीरा उतरल्यानं असाव,जम बसवण्यासाठी पायपीट करणं गरजेच होत.आणि तिनं स्वतंत्र अस काम सुरु करुनही असा काही फार काळ लोटला नव्हताच. तस सहजच घेतलेल शिक्षण अस कामात येइल याचा तिला शिक्षण घेताना बिलकुल गंध नव्हता. शिक्षणाने आपण खरे किती घडलो हे तिला कोड नेहेमीच पडे.सुरुवातीस काही वर्ष ओळखीच्या लोकांची इंटीरिअरची काम करत आता ती जरा स्थिरावायला बघत होती अन त्याचबरोबर काम कस वाढवता येईल तेही बघणं चाललं होत.कुठल्या कंपन्यांची कॉर्पोरेट ऑर्डर्स मिळवणं हा त्याच अँबिशनचा भाग होता. हा तिचा तसा पहीलाच प्रयत्न - मोठा म्हणावा असा!
"मिस गार्गी जहागिरदार"....रिसेप्शनीस्टने दिलेल्या आवाजान ती भानावर आली.चटकन उठली अन चालायला लागली रिसेप्शन काऊंटरकडे. तिथनं तिला आतल्या रुममध्ये नेण्यात येणार होतं जिथे एक पॅनल तिच काम तपासणार होतं. त्यानंतर मुलाखत अन मग निर्णय अशी काहीशी पद्धत असावी. ती बरीच तयारी करुन आलेली मुलाखतीसाठी पण ऐनवेळेवर टेंपरामेंट कस टिकतं त्यावरच सगळ अवलंबून होत. एक बाई तिला आतपर्यंत पोहोचवायला आलेल्या होत्या.....त्यांच्याबरोबरच ती हळुहळू आतल्या रुमकडे निघाली.
"गुड मॉर्नींग .."आत शिरताच तिनं तिथल्या सगळ्यांना अभिवादन केल.चारजणं अगोदरच बसलेली होती पण बहुधा कुणाची तरी वाट पहात असावीत.तेव्हढ्यात ज्या बाईंनी तिला आत आणुन सोडलेल ती येऊन तिथल्या एकाच्या कानात काही पुटपुटली.
"ओके..मग आम्ही सुरुवात करतो..वी विल ब्रिफ द बॉस लेटर"एका चष्मेवाल्या माणसानं तिला सांगितल.
"मिस गार्गी प्लीज बसा...मी अजय जोशी, हे पीटर परेरा, त्याच्या शेजारी सुहास बढे अन शेवटी बसलेले ते राम आठवले. आमचे सीईओ पण जॉईन होणार होते पण त्यांना काही काम निघालं अन त्यांना जावं लागलं......सो लेटस स्टार्ट विथ युवर युवर कन्सेप्ट पण बी ब्रिफ."चषमेवाल्या जोशींनी फर्मावल.
तिनं अशी वेळ आल्यास प्रेसेंटेशन न करताही आपल काम शोकेस करता याव म्हणून कॉपीज प्रिंट करुन आणल्या होत्याच.भराभर त्या प्रेसेंटेशनच्या कॉपीज तिनं सगळ्यांना वाटल्या अन मुख्य बारकावे तपशिलासह सांगायला सुरुवात केली. साधारण तासभर ती चर्चा चालली. लोकं हुशार होती अन पारदर्शक वाटत होती. तसेच त्यांना काय नक्की हवय ते माहीती होत. अन्यथा असल्या कंपन्यांमधे सगळाच आनंद असतो पण यांच एकुणच जरा ठीक वाटत होत. तिला हे काम आपल्यालाच मिळाव अस मनोमन वाटून गेलं.
"गुड मिस गार्गी...इटस अॅन इंटरेस्टींग कनसेप्ट्..आम्ही चर्चा करुन तुम्हाला उद्यापर्यंत कळवू.. थँक्स फॉर कमिंग्..गुड लक !!!" - अजय जोशींनी उभ राहात तिच्याशी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला...तिनं तत्परतेने आपला हात पुढे केला अन बाकीच्यांनाही नमस्कार करुन ती ऊठली.
बाहेर येऊन तिनं टॅक्सीला हात केला. घरच्या वाटेवर ती या कामाच्या मिळण्या-न मिळण्याच्या शक्यतेवरच विचार करत होती.
"मिळाल तर ग्रेट नाहीतर्...लाईफ कंटीन्युज्...अन काय्.."ती मनाशीच पुटपुटली.
दुसर्या दिवशी उठुन ती आवराआवरच करत होती की कामवाल्या बाईनं तिला तिचा सेलफोन वाजतोय म्हणुन आवाज दिला.प्रथम तिला इतक्या सकाळी कुणाचा फोन असावा म्हणुन आश्चर्य वाट्ल अन लगेच अमरचा तर नसेल म्हणुन एक तिडीक चेहेर्यावर तरळुन गेली.
"बाई बघा ना ...कोणी महत्वाच नसेल तर सांगा मी नाहीय म्हणुन..."
" मॅडम कोणी स्टरलींग कार्पोरेशनमधनं जोशीसाहेब बोलतायत...अजय जोशी...." अन ती उडालीच.... अरे इतक्या लवकर्...तिनं धावत फोन गाठला ..
"हॅलो...मोर्नींग मिस्टर जोशी..."
" मोर्नींग मिस गार्गी.... देअर इज अ गुड न्युज फॉर यु...आम्ही हे काम तुम्हाला द्यायचा विचार करतो आहोत. आम्हाला तुमचा कनसेप्ट अन प्रेसेंटेशन दोन्हीही आवडलय अन सर्वानुमते आम्ही हे काम तुम्हाला द्यायच ठरवलय तेंव्हा तुम्ही आज बारा वाजता काँट्रॅक्टच्या टर्मस निश्चीत करायला या..." एव्हढ बोलून जोशींनी फोन ठेवला.गार्गी जाम खुष झाली ....
"काहीतरी चांगल होणार याची मला हुरहुर होतीच आज...... ओह्..लाँग टाईम सिन्स आय हॅव इव्हन फेल्ट लाइक धिस.." तिनं स्वतःलाच फील्-गुड ची पावतीही देऊन टाकली.
गार्गी बरोबर बाराला स्टर्लींगच्या ऑफीसला हजर होती.तिला केंव्हा एकदा काँट्रक्ट पेपर्स बघते अन साईन करते अस झालेल....
"यात आणिक काही तर निघणार नाहीना...कुणाला काही पर्सेंनटेज ..." तिला क्षणभर अस वाटुन गेल. मात्र तसलं काही तिला जमणार नव्हत. चांगल्या सवयींच एक हेही असत त्या तुम्हाला वाकडं काही करायला अगदीच दुर्बल करुन टाकतात.तिला नेहमी वाटायच की असली काम करणं आपल्या आवाक्यातलच नाहीय ते...बरोबरचे अनेक समव्यवसायी तसे करत असले तरी तिला आपण याबाबतीत अगदीच इन्कंपीटंट आहोत असेच वाटत असे नेहेमी. शेवटी जोश्यांचा निरोप आला अन ती आत गेली.
" या.. होप तुम्हाला वाट नाही पहावी लागली खुप..."
"नाही सर... बहुधा मी लवकर पोहोचले..."
"गुड ...चांगली सवय आहे..याचा अर्थ तुम्ही आमच कामही वेळेच्या आतच कराल...हे पेपर्स आहेत. टर्म्स एकदा निट वाचुन घ्या जर तुम्हाला मान्य असतील तर मग मी सांगतो पुढची सगळी प्रोसेस पुर्ण करायला..काही अडल तर मला सांगा.."
गार्गीनं सगळ लक्षपुर्वक वाचल. सगळ तर व्यवस्थित दिसत होत्...तिनं तसा निरोप आत जोशींना पाठवला. थोड्याच वेळात तिला कोणीतरी येऊन परत आत घेऊन गेल.
" सो अभिनंदन मिस गार्गी... हे तुमच काँट्रॅक्ट अन एक चेक आहे अॅग्रीमेंटमध्ये ठरल्याप्रमाणे. गुड लक!!!" तिला जोशींना काय बोलाव ते कळेना... तिनं जोशींशी हस्तांदोलन केल अन जायला उठली. ती उठुन वळते तो जोशींच्या कॅबीनचा दरवाजा उघडुन कोणी एकदम आत आल..अन ती बघतच राहीली...
"अजय... फोरगॉट टू टेल यु...ते दुबईला जाणं मला जमणार नाहीय सो यु बुक युवर्सेल्फ फॉर टुमोरोज फ्लाईट..".............. त्याच माझ्याकडे लक्षच नव्हत.. तो आदील होताआआआअ......आदील!!!
"येस चिफ... आय विल.. या कनसेप्ट डिसाईन्सच्या मिस गार्गी जहागिरदार आपल्या......"
त्यानं नाव ऐकताच गर्रकन मान माझ्याकडे वळवली...डोळे विस्फारले....अन आणखी विस्फारले..
"अरे.. गार्गी!!!" तो शब्दांसाठी स्ट्रगल करतांना पाहाणं नवीनच होत तिच्यासाठी...
" तुम्ही ओळखता यांना सर..." जोशींचा निर्व्याज प्रश्न..
"ओह येस अजय्...एक काम करा यांना माझ्याकडे पाठवुन द्या तुमच काम आटोपल की...मी जरा ते इनोवेशन अॅकेडमीच्या टीमबरोबर आहे...विल बी डन इन थर्टी मिनीटस" ..."सी यु देअर"- हे मात्र माझ्यासाठी होत... माझ्याकडे बघुन हे म्हणत तो वार्यासारखा गेलाही..
"आदिलसाहेब आमचे सीईओ आहेत...आदील मालशे.. व्हेरी डायनॅमीक..." - तिला पार भरुन आल. गेल्या चोवीस तासांत काय काय घडतय आपल्या आयुष्यात. तिनं जोशींना पाणी मागीतल. पाणी देऊन जोशींनी तिला आदीलच्या सेक्रेटरीच्या हवाली केल. से़क्रेटरी तीला शेजारच्या वेटींग लाऊंजला घेऊन गेली अन काय घेणार वैगरे विचारुन ती आपल्या कामाला लागली. गार्गी जरा स्थिरावली तोच तिच्यासाठी कॉफी आली. कपभर कॉफी कधी कित्ती मोठा आधार होते ते तिला आज कळाल...........आणि कॉफीबरोबर आदील अन पुर्वीच सगळ-सगळच तिच्या समोर येऊनही बसल...
************************
"आज केंव्हा भेटतोयस..." फोन संपता-संपता गार्गीन विचारल.
"संध्याकाळी ...सहाला भेटूयात म्हणजे तुझही उद्याच्या सेमिनारच काम आटोपतं तोवर..नेहमीच्या जागीच भेट मग जाऊ कुठे तरी वारा प्यायला.." आदीलच नेहेमीप्रमाणे सगळ वेळापत्रकच तयार होत..
गार्गी मग आवरायला लागली. सेमिनारच्या डिस्कशन पॉईंटसवरन नजर फिरवायची होती, ममीची काम्...
"ओह... बरच पडलय्..लवकर करायला हव नाहीतर सहाला पोहोचण होणार नाही अन मग स्वारी गुप्प होऊन बसणार. मग त्याला समजावता समजावता आणखी अर्धा तास उशीर-वारा प्यायला" गार्गीला हसु आल. आदील कसा अगदी मनस्वी आहे वागण्यात याच तिला नेहमी कौतुक वाटायच. बेट्याला नाही म्हणणं कस येतच नाही अन वेळ आलीच तर त्याच ते नाही-सांगणही हो-पेक्षा जालीम असतं.
आदील तिला भेटला त्याला बरेच दिवस झाले आता. होस्टेलला राहायचा अन सदैव मित्रांच्या गरड्यात फिरायचा. पहिली ओळख म्हणजे कॉलेजची निवडणुक..हा कधीच आमच्या "पोलिटीकल अड्ड्यात" नसायचाच. त्याच ते अॅथेनियम,गाणी अन हो ...क्रिकेट!!! पण त्याला आमच्या कंपुनी पकडला तो वेगळ्याच कारणासाठी. निवडणुकीच्या प्रचारासाठी आमच्या विरोधी ग्रुपनी कॉलेजच्या दोन्ही जिन्यांवर मोठ्ठी सहा फुटी पोस्टर्स लावलेली होती. दोन्हींवर फक्त पाऊलखुणा काढल्या होत्या अन तळाशी लिहिल होत "मार्चिंग टुवर्डस विक्टरी " तर पाऊलखुणा संपल्या तिथे वर टॉपला " वी गॉट इट!!!"...
याला सडेतोड उत्तर काय द्यायच त्या विचारात आम्ही सगळे बेचैन होतो तेव्हढ्यात कोणी आदीलच नाव सुचवल..
" अरे जाम क्रियेटीव्ह प्राणी आहे..तो सुचवील काही समर्पक अस.."
मग काय आमची झुंड निघाली त्याला शोधायला. पहीले तयारच नव्हता यात पडायला.....
" हे निवडणुकांच झझंट नकोय यार मला" ..पण मग त्याच नाव वापरायच नाही या अटीवर तो तयार झाला. आम्ही सगळे त्याला पोस्टर दाखवायला घेऊन गेलो. ते बघुन काय करायच याचा अंदाज त्याला आलाय अस मलातरी वाटल नव्हत पण नंतर जे झाल त्याने माझे सगळे अंदाज पार बदलवुन टाकले आयुष्यात..
पोस्टर्स पाहुन आमची झुंड मग कँटींनला पोहोचली. सगळ्या गर्दीत हा आपल वेगळा काहीतरी खरडत बसलेला ..सोबत चहाची लाच मात्र होती. चहा संपवुन तो ऊठला.
"हे लिसन... मला वाटत त्यांच्या आत्मविश्वासाला उध्दटपणातच रुप देऊन आपण हा मामला जरा इंटरेस्टींग करु शकतो. निदान बघणार्यांत चर्चा होईल अन तुम्हां लोकांना फुटेज मिळेल ते वेगळच"..
"मी काही लिहिलय जे मोठ्ठ्या अक्षरात त्यांच्या पोस्टरच्याच बाजुला त्याच साईजच्या पोस्टरवर लावता येईल जे सगळी पब्लीक वाचेल अन मग रंगेल मैफल.."
सगळ्यांना कनसेप्ट आवडला होता ..आता त्यानं काय लिहिलय त्यावर सगळ्यांच लक्ष लागलेल...
" ये कदमोंके निशां बता रहे है के ये लडखडाये हुए है..जन्नत के ख्वाबोंमे बेहके हुए है "
हे आपण एका जिन्यावर लावू अन दुसर्या पोस्टरच्या शेजारी हे लावू "....
"बरसोंसे ये दुनिया है जानती...... कागज पे चलके कभी मंझील नही मिलती.."
वा..वा म्हणुन सगळ्यांनी आदीलला जाम केला...पण नंतर जे झाल ते मात्र अगदी अचंभित करणार ठरल. त्याच्या अपेक्शेनुसार त्या ओळी भाव खाऊन गेल्या अन आमच्या ग्रुपला एक सॉफ्ट कोर्नर मिळायला लागला प्रस्थापितांविरुध्द्च्या निवडणुकीत. त्याच्या त्या ओळी सगळ्या कॉलेजभर झाल्या अन त्याच नावही. ते कस अन कोणी सार्वजनीक केल ते कधीच कुणाला कळल नाही.
निवडणुक आम्ही जिंकली अन मी कल्चरल सेक्रेटरी झाले. त्याच्या मदतीशिवाय हा विजय शक्य नव्हता म्हणून आदीलला एक आभाराच कार्ड पाठवल
"थँक्स फॉर ऑल दॅट यु डिड".....हे कार्ड त्याच्याशी आणखी संपर्क वाढवायचा चांगला मार्ग होता हे मात्र मी स्वतःपासनही लपवू पाहात होते. कार्ड मिळताच त्याच सरळ उत्तर आल ....
"नुस्त्या कार्डवर नाही चालणार मॅडमे...पार्टी मंगता है अपुनको..." - मी तयारच होते. कुठे काय वैगरे ठरवुन आम्ही रविवारला "हिल व्ह्यु"ला भेटायच ठरल.
त्या भेटीत आदील खुप जास्त मनस्वी वाटला. त्याचं स्वतःच अस एक तत्वज्ञान आहे जे तो बिनदिक्कत मिरवतो अन पाळतोही हे प्रकर्षान जाणवल. येताना निशिगंधाची एक मस्त टोकरी घेऊन आला होता...
"फुलांचा गुच्छ करण हा जीवघेणा प्रकार आहे.... अपवाद फक्त गजरा अन तोही मोगर्याचा असेल तर तो अपवाद नाहीच तर नियम असावा!" त्याच तत्वज्ञानाच प्रास्तवीक सुरु झालेल...."फुलं काड्यांत अन दोर्यांत बांधुन जर कुणाला दर्शनीय वाटत असतील तर तो द्रुष्टीदोषाचा प्रकार समजायला हवा....फुलं मोकळीच द्यायला-घ्यायला हवीत...सुख-दु:खांसारखी.. हाताळायला-भोगायला-जपायला बर पडतं!!!!" - त्याच बोलण ऐकत राहाण्यासारख होतच होत. तो बरच बोलला.
हिल व्युची पहीली भेट अगदी जादू करुन गेल्यागत संपली. नंतर मात्र मी आदीलची पाठ सोडायला तयार नसे. त्याच्याबरोबर तासनतास गप्पा मारणं, फिरायला जाणं, कॉलेजला चाट देऊन सिनेमे पाहाणं हे नित्याचच झालेल. त्याच्या होस्टेलला फिस्ट असेल त्यादिवशी संध्याकाळी त्याची मेस बंद असे तेंव्हा मी घरी काय्-काय क्लुप्त्या करुन त्याच्यासाठी डब्बा बनवत अन नेत असे. त्याच्यासाठी हे सगळ मनापास्न करावस वाटायला केंव्हा सुरुवात झाली ते कळलच नाही.
*********************
जोशींच्या केबीनमधन निघालेला आदील चक्रावलेला दिसतच होता..त्याच्या केबीनमध्ये येतांना त्याच्या सेक्रेटरीनी-मेरीनी त्याला विचारलही तब्येत बरी नाही का म्हणुन..तो ऑल वेल म्हणत आत आला.... अन सोफ्यावर चक्क कोसळलाच....... त्याला इंदोर..तिथलं कॉलेज आठवलं..... तिथले ते सोनेरी दिवस अन त्याहुनही सोनेरी गार्गी...
ती गार्गी होती..... आदीलला आपल्या डोळ्यांवर अजुनही विश्वास बसत नव्हता. जे तो बारा वर्षांपुर्वी सोडुन आला होता ते आता समोर अस अवचित येऊन उभ होत..स्वप्न-सत्य अन सगळ काही एकत्र - तिच्या रुपात - गार्गीच्या रुपात... गार्गी जहागिरदार-जहागिरदार घराण्याच वर्तमान... अन इंदोरच्या प्रसिद्ध समाजसेविका अश्विनिताई जहागिरदारांची एकुलती एक ल्येक!!!! त्याला सगळ डोळ्यासमोर तरळायला लागलं......त्याच अन गार्गीच कॉलेजातल एकत्र असणं...रोजच भेटणं..फोन कॉल्स..एकमेकांच्या वेळा पाळणं..सगळ तिला प्रथम दाखवायला पळणं..तिच चोरुन घरातन फोन करणं... होस्टेलच्या मित्रांच ते निर्हेतुक सगळ्याला मदत करणं....अन गार्गीच त्याला अमाप जपणं...सगळ सगळ एका दमात त्याच्या मेंदुवर येऊन तरंगायला लागल...
त्याला सुरुवातीची गार्गी आठ्वली... रुक्ष...कोणावरही चटकन विश्वास न ठेवणारी..... अगदी तुटक अस्तीत्व घेऊन फिरणारी..अन मग निवडणुकांनंतर त्याच्या अगदी जवळ आलेली. ग्रॅजुएशनंतर त्यानं मॅनेजमेंट करायला घेतल अन गार्गीन काहीतरी करायच म्हणुन इंटीरीअर डिझाइनिंगचा डिप्लोमा करायला घेतला. दोन्ही कॉलेजेस जवळ्-जवळ होती हे एक सोयीच कारण झाल. त्याचं मॅनेजमेंट झाल तेंव्हा पुढे काय हा प्रश्न त्याला नव्हताच. त्याचं सिव्हील सर्व्हीसेसची परीक्षा द्यायच नक्की झालेल. बाबांनी "तुला जे करावस वाटेल ते कर पण आनंदान कर" हे सांगुन सगळ त्याच्यावरच सोपवलेल्...मग उरल गार्गी बद्दल्..त्यानं बाबांना गार्गीबद्दल सांगितलेल तेंव्हा बाबांनी खुश होऊन म्हट्लेल..
"तुम्हारी पसंद है तो अच्छीही होगी भाई...तुला योग्य वाटेल तेंव्हा सांग मी जाईन जहागिरदारांकडे बोलायला"..... बाबांच नेहमी असच असायच.ते सगळ करायला मोकळीक देत फक्त परिणामांची जबाबदारी घ्यायची तयारी ठेवा हे निक्षुन सांगायचे. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायची एक सवयशी लागुन गेलेली. त्याच नाव ठेवतांनाही लोकांनी म्हटलेल..
"आदील मुसलमानी छापाच नाव वाटत हो.." पण त्यांच असल्या मतांना बघुन जगायच व्रतच नव्हत.
चांगले आई-वडील हे केव्हढ मोठ धन आहे अन ते आयुष्याला किती समृद्ध बनवतात हे तो जाणुन होता. आता त्याला गार्गीच्या आईला भेटायच होत.. तिच्याकडे सगळ तिची आईच बघते अस काहीतरी त्रांगड होतं पण त्यात त्याला विशेष रस नव्हता.. गार्गीच्या वडलांना त्याबद्दल हरकत नव्हती म्हणुन असाव बहुधा.
गार्गीनही आम्ही दोघही आपापल्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत असतांना आईशी बोलुन ठेवलेल. आईनही तुमच्या परीक्षा आटोपु देत मग भेटीन म्हणुन भेटायची परवानगी दिलेली होतीच.
परीक्षा संपल्याच्या तिसर्या दिवशी गार्गी आईचा भेटायला बोलावल्याचा निरोप घेऊन आली. पण तो देतांना मात्र ती जरा तणावात वाटत होती
"हे स्वीटस्.. होप ऑल वेल..." मी तिचा चेहरा हातात पकडत विचारल.हे अस केलेल तिला आवडायच..
"हो रे.. ऑल वेल..आदील,पण ममा जरा कडक आहे स्वभावाने अन तू असा सेंसीटीव्ह म्हणुन मी जरा काळजीत होते.."गार्गीच्या या वाक्यावर मात्र मी काही बोललो नाही...अन तिचा मुड हलका करायला मग मी "शायद तुम्हारी शादीका खयाल ..." सारखे बेचव विनोद करत चिडवायला लागलो..
"चायपे नही ..डिनरपे बुलाया है हुजुर..." गार्गी ठासून म्हणाली
"अरे बापरे... बकरेको काटनेसे पेहेले खुब खिलाते है... हे फक्त ऐकुनच होतो मी आजपर्यंत..पण हे डिनर वैगरे जरा भारीच वाटतय यार"
"नाही ...जहागिरदारांना एकच मुलगी आहे बाबा....इतना तो बनता है..."
संध्याकाळी सातला मी तिच्या घरी पोहोचायच ठरवुन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
**********************
"मिस गार्गी अजुन काही घेणार आपण..ही विल टेक फिफ्टीन मिनिटस मोर" मेरीच्या या हाकेन गार्गी भानावर आली...
"नो ...आय अम फाईन विथ धिस्...थँक्स..." गार्गीला परत चित्रपटात शिरायच होत...आदीलबरोबरचे दिवस होतेच असे चित्रपटासारखे - प्रेक्षणीय अन हवेहवेसे...अन आदीलबद्दल अस वाटायच कारण त्याच व्यक्तीमत्व तर होतच पण बहुधा माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या घरातल्या पुरुषांच - पपा,चुलत भावंड यांच वागण मी जे पाहुन होते त्यामुळेही आदील खुप वेगळा वाटायचा.त्याला कशाची इन-सेक्युरीटी किंव्हा असुरक्षितता अशी वाटतच नसे...सगळ अगदी उमदेपणान करायचा.. स्वतःच्या वडलांना सारखा रेफर करायचा...
"मी वडलांची बिनदिक्कत कॉपी करतो गं चांगल जगता याव म्हणुन....." अस नेहमी म्हणायचा.
माझ्यासाठी सगळ खुप लाऊडली करायचा...फुल आणणं.. नविन कविता केल्या केल्या फोनवर सांगणं अन मग स्वतःशीच खुश होणं...तिला ती फुलवाल्यांची गोष्ट आठवली.. ओह...असच एकदा फिरतांना - त्याचा आवडता रस्ता होता तो - फुलबाजाराचा...खुप सारी फुलांची दुकानच दुकानं. मी सहजच म्हटल
"क्या बात है... आजची फुलं कित्ती वेगळी अन टप्पोरी दिसतायत या दुकानातली.."
संध्याकाळी मी माझ्या रिसर्च रुममध्ये येऊन पाहते तो त्या दुकानातली सगळी फुलं खोलीत विखुरलेली....
"जे करायच ते असच भरभरुन करायला हव...त्यातल संगीत एकदा अंगवळणी पडल ना मग बघ काय मजा येते ती...." त्याच आयुष्याच तत्वज्ञान वेगळच होत्...पण तो लोकांमध्ये जाम पॉप्युअलर होता हे मात्र खर. त्यानंतर थोड्याच दिवसांनी अशीच काही कुरबुर झाली अन मी त्याला भेटलेच नाही दिवसभर तर संध्याकाळी माझ्या स्कुटरवर एक कार्ड :
"आज तुमको मेरे साथ ना देखकर....बहोत हैरान रेह गये फुल बेचनेवाले.."
......मी सरळ त्याच्या होस्टेलवर जाऊन त्याला मिठीच मारली.....
अन हे सगळ करता करता आम्ही एकमेकांना कधी सर्वस्व समजायला लागलो ते कळलच नाही.
**********************
"सर आजच्या अपॉईंटमेंटस मी काय करु... तुमचा दिवस आज तसा नऊला संपतोय्...व्हिडीओ काँन्फरंसनंतर..." मेरीच्या इंटरकॉमने त्याची तंद्री भंग पावली.
"नो मेरी...कॅन्सल इव्हरीथिंग...सॉरी सांगा माझ्यातर्फे..." त्यानं मेरीला सांगितल अन तो परत सोफ्यावर टेकला.त्याला तो शेवटचा अध्यायही अगदी चांगला आठवत होता...मेनली तिच्या आईशी त्याची भेट....
बरोबर सातला आदील जहागिरदारांच्या गेटवर उभा होता...आत जाताच त्याला घराची भव्यता जाणवली. बाहेरुन कधी जाणवल नव्हत इतक मोठ घर असेल म्हणुन किंव्हा मी तितक लक्ष देऊन बघितलही नसाव.
"बस तू ...मी आईला आवाज देते तू आलायस म्हणुन..." अस सांगुन गार्गी वरच्या मजल्यावर गेली.
तोवर नोकरान सरबताचा ग्लास आणुन पुढ्यात ठेवलेला.
" आई तुला वरच बोलावतेय..." गार्गी पळतच सांगत आली..मी तिच्या मागे मागे निघालो..
वरच्या मजल्यावर जिथे आम्ही शिरलो तो एक मोठ्ठा दिवाणखानाच होता...खुपस जुन फर्नीचर,शिकारीचे फोटो अस सगळ म्हणजे ज्यातन ऐश्वर्याच प्रदर्शन होईल व ज्यावर धुळ बसलेली दिसत नाही ते सगळ तिथे होत...
"या ...कसे आहात आदील ?" - मी पुढे होऊन तिच्या आईला नमस्कार केला
"बर्याच दिवसांच तुम्हाला भेटाव म्हणुन गार्गीन टुमण लावल होत्...म्हट्ल आता तुमच्या परीक्षा संपल्यायत तेंव्हा ही वेळ छान आहे.. काय घेणार जेवणाआधी..." -
" सरबत मी घेतलय ... दॅटस फाईन...अन तुम्ही मला तू म्हणा प्लीज"
"गार्गी छानसा अॅपल ज्युस पाठव नारायणबरोबर अन तु डिनरच बघ... तोवर मी जरा मोकळ्या गप्पा मारते आदीलबरोबर..." त्यांनी माझ्यासाठी शीतपेयाबद्दल अन गार्गीसाठी तिथन जाण्याबद्दल सगळ स्वतःच ठरवल होत...
"बी कंफरटेबल हं..." अस पुटपुटत गार्गी जायला उठली........
" सो आदील.....मालशे नाहीका तुमच आडनाव..." ...मी होकारर्थी मान डोलावली
"आमच सगळ इथेच आहे आदील...एक मोल्डेड फर्निचरचा कारखाना आहे जे आम्ही सगळ निर्यात करतो..काही कार डिलरशिप्स आहेत.." बाईंनी सुरुवात केली...
"कोण-कोण असतं घरी तुमच्या? वडील काय करतात... हे मी गार्गीलाही विचारु शकले असते पण म्हटल तुम्हालाच विचारीन भेटू तेंव्हा.."
" ओह्..अब्सोल्युटली फाईन... बाबा फिलोसोफीचे प्रोफेसर होते गावातल्याच कॉलेजात...आता शेती बघतात.. बरीच शेती आहे घरी.." - मी सफाई दिल्यासारख का बोललो ते मला खर तर कळलच नाही ...बाईंच्या व्यक्तीमत्वाचा परीणाम असावा....
"आमच प्रोफाईल की काय म्हणतात ना आदील ..मी पसारा म्हणते त्याला - ते खरच खुप मोठ आहे. हा बिजीनेस आहे..जमीन्-जुमला आहे बराच्..गार्गीन सांगितलच असेल तुम्हाला सगळ.." बाईंचा खर्ज लागत असल्याची जाणीव व्हायला लागली होती मला.
"नाही आमच या विषयावर कधी बोलणच नाही...गरज वाटली नाही कधी..." मी शांतच होतो..
"जे सोयीच तेच गरजेच करुन घेतो आपण आदील... बहुधा तुम्हाला ते सोयीच वाट्ल असेल काही अर्थाने..." बाईंच काही कळत नव्हत ...त्यांना नक्क्की काय म्हणायचय ते...
"सॉरी आय डिड नॉट गेट यु मॅडम...." मला इंग्लीश्मध्ये राग चांगला लपवता येतो -व्यक्त करता येतो अस उगीच वाटायच्...आताही मी तेच केल...
"सोपं आहे मालशे...तुम्ही आमच्या कुटुंबाच्या एकुणच प्रोफाईलकडे बघा.. ते बघुन दिपायला होणारच. तुमचही प्रोफाईल ठीक आहे...अगदी मध्यमवर्गीय आहे पण गार्गीसाठी आम्हाला त्याहून जास्त काही हवय... आय वाँट यु टू अंडरस्टँड दॅट...खाली आमच्या चार-चार गाड्या उभ्या आहेत तुम्ही पाहील्या असालच येतांना" बाई आता कुठे सुरात आल्या होत्या...
"माझ्या लक्षात नाही आल ते... " मी कसतरी उत्तर दिल्..अन छताकडे बघायला लागलो..मला चिडायच नव्हत कुठल्याही परिस्थितीत..
"आलं तरी कळल नसत तुम्हाला... दोन इंपोर्टेड आहेत्..तुम्ही बहुधा पाहील्याही नसतील अजुनपर्यंत..गार्गीला या सगळ्या गोष्टींची सवय आहे लहानपणापासुन..." बाईंचा आवाज तीक्ष्ण झालेला..
"यु सी मॅडम... आम्ही एकमेकांना गेली चार वर्षे ओळखतो...अन आम्ही एकमेकांना आवडतो...आयुष्य मजेत घालवता येईल त्यासाठी तस सगळ आहेच माझ्याकडे अन जास्तीच लागल तर ते निर्माण करायची क्षमतादेखील आहे...निदान आतातरी एव्हढच सांगु शकतो..." मीही सडेतोड व्हाव अस मला वाटायला लागल..
"मालशे जिद्दीच्या गोष्टी आपण चित्रपटांसाठी सोडुयात... आज जे आहे त्याबद्दल बोलूयात" बाई लवकरात लवकर समेवर यायला पाहात होत्या.
"तुम्ही गार्गीला सांगितलत या तुमच्या भुमिकेबद्दल्..जर तिलाही असच वाटत असेल तर प्रश्नच सुटला...मला बोलायचय तिच्याशी एकदा यावर्...आत्ताच्..इथेच..!!! " मीही निक्षून सांगितल.
"आदील ही तुमची जहागिरदार कुटुंबातल्या कोणाशीही शेवटचीच भेट आहे... गार्गीला मी समजावीन्..मला प्रथम तुम्हाला हे सगळ स्पष्ट सांगायच होत्...उशीर व्हायच्या आत..."
" अन मला वाटत तो उशीर झालेला आहे मॅडम... मला नाही वाटत आता तुम्ही हे कंट्रोल करु शकाल.." मी थंडपणे सांगतोय अस वाट्ल पण बाई भडकल्यासारख्या वाट्ल्या..चेहेर्यावरुन मात्र त्यांनी तस दाखवल नाही...
" हे बघा मालशे मी तुमच्या घरादाराची सगळी माहीती गोळा केलीय अन तुम्हाला चुप करायला मी काहीही करु शकते पण मला वाटतं तुम्ही स्वाभिमानी आहात अन इतक सगळ करुन गार्गीबरोबर आयुष्य घालवायला तुम्हाला नक्कीच आवडणार नाही..." बाईंच आता जरा हाताबाहेर जायला लागल होत्..
मी थोड बुचकळ्यातही पडलो...काय कराव्..करावेत का एक घाव अन दोन तुकडे अन न्याव का गार्गीला या महालातन सरळ हात धरुन या बाईंच्या डोळ्यादेखत्..बघु काय करतात ते...पण मग बाबा आठवले..त्यांना नसत आवडल हे सगळ्..शेवटी गार्गी बाईंच एकुलत एक संतान होती..मग मी काहीसा विचार केला...अगदीच पक्का नव्हता पण वेळेवर तेच सुचल...
" लुक मॅडम्...मला प्रेमात निगोशिएट करायच ज्ञान नाहीय्...मी तुमच चॅलेंज अगदी एका पायावर स्वीकारु शकतो पण गार्गी तुमच एकुलत एक अपत्य आहे...मला नकोय असले तणाव तिच्या आयुष्यात कधीच...मी उद्याला गार्गीशी बोलुनच ठरवीन काय ते....तुम्ही तिला अडवल नाहीत तर्.....आता मी निघतो...आपल्या आदरातिथ्याबद्दल आभार..." अन मी निघालो तर दारात गार्गी उभी..
"गार्गी तुझ्या आई तुला सांगतीलच आमच काय बोलण झाल ते... आपण उद्या भेटू कॉलेजच्या आवारात सकाळी अकराला अन मग ठरवू ..." मी गार्गीच्या डोळ्यात बघून सांगितल..अन निघालो तडक बाहेर्...माझ्यासाठी हे सगळ अनपेक्षीत तर होतच पण समजायला त्याहुनही कठीण होत...
मी खाली आलो ... वेस्पाला कीक मारली नी निघालोही...
निघतांना सहज नजर गेली...माझी वेस्पा खरच त्या इंपोर्टेड गाड्यांसमोर खुपच नगण्य दिसत होती..!!!!
---------------------------------------
दुसर्या दिवशीचे अकरा झाले ...रात्रीचे... पण गार्गी आली नाही...मी पार तुटुन गेलो होतो तोपर्यंत्. होस्टेलला मित्रांनी उचलल अन म्हटल चल आता कँटीन बंद झालय्..बाहेर जाऊन काही खाऊयात्..मी स्तब्ध्पणे ते नेतील तिथे गेलो...रेस्टॉरंट मध्ये तुरळक माणस होती..
"मला दारु प्यायचीय आज..." मी बोललो अन दचकलेच सगळे...तोपर्यंत मी कधीच दारु बिरुच्या भानगडीत पडलो नव्हतो.
त्यादिवशी आयुष्यात पहिल्यांदा आपण बेशुद्ध होईपर्यंत दारु प्यायलो हे आदीलला अजुनही आठवत होत...
रात्री त्या नशेत-झोपेत बाबा येऊन काळजी करतायत्...आई रागावतेय वैगरे सगळ दिसलं पण गार्गी स्वप्नातही आली नाही............!
**************************
"मिस जहागिरदार... सर बोलावताहेत तुम्हाला....." अन ती भानावर आली..
कसबस स्वतःला सावरत ती मेरीच्या मागे चालु लागली.आदीलला कस फेस करायच तिला कळतच नव्हत...
"थँक्स मेरी..." मला आत सोडायला आलेल्या बाईंना उद्देशुन होत ते...
"ये बस...." त्यान सोफ्याकडे बोट दाखवत म्हटल
"कशी आहेस......." तोही तितकाच चाचपडत होता हे तिला जाणवल...
" मी ठीक आहे ... तू कसा आहेस..."
"तुझ्यासमोरच आहे ...फिट अन फाईन.."तो जबरदस्तीच हसु आणत म्हणाला..त्याच हे नविन होत तिला.
"तु इथे मुंबईत असशील अस वाट्लच नव्हत मला...जहागिरदारांच तर इथे काहीच नव्हत" तो म्हणाला...एकमेकांबद्दल जाणुन घ्यायची उत्सुकता निर्माण होतेय का हे निश्चीत करण कठीण होत म्हणुन जे मनात आल ते तो बोलुन गेला असावा बहुधा......
"ह्म्म्म्म्म... बरच पाणी वाहुन गेलय आदील...तुला आता वेळ असेल तर बोलु अन्यथा पुन्हा कधीतरी.."
"मी माझ्या सगळ्या अपाँइंट्मेंटस कँसल केल्यायत्...आपण बोलुयात...तस इतका काळ मधन निघुन गेलाय की काय काय विचाराव्-सांगाव हे एक कोडच आहे" त्याच सडेतोड बोलण तसच होत
" अगदी सुरुवातीपासन सांगायच तर तु गेलास न जेवता त्या दिवशी अन मला आईन नंतर सगळ सांगितल वर माझ्याकडन वचन मागितल की मी तुला परत कधीच भेट्णार नाही.मी ते दिलच नाही...रात्री सगळे झोपलेयत हे बघुन मी एक बॅग कपडे घेऊन निघाली होती तुझ्या होस्टेलला यायला पण गेट्लाही कुलुप लावुन ठेवलेल्..चावी घ्यायला आत परत गेले तर तिथे ममा अन पपा उभे..त्यांना कसा सुगावा लागला ते कळायच्या आत बरच ऐकाव लागल अन माझी रवानगी बंद खोलीत्..दुसर्या दिवशी माझी रवानगी बंगलोरला मामाकडे अन दोन आठ्वड्यात लंडनला छोट्या मामाकडे. सगळीकडे पहारेच पहारे..तुझा होस्टेलचा फोनपण कामात आला नाही कारण तू तोवर निघुन गेलेलास..."
एव्हढ बोलुन ती टेबलवरच पाणी प्यायली. अन पुन्हा बोलायला लागली ...
"मग धीरे-धीरे त्या पहार्यांची सवय झाली अन जीवनाकडे वेगळ्यापद्धतीन पहायला शिकायला लागले..मी जवळजवळ मुकीच होते वर्षभर्...मग थोडफार काम करायला लागले. त्यात वेळ अन मन दोघही गुंतवायच होत...मी जरा नॉर्मल झाल्याच बघुन आईने मामाच्या ओळखीतला एक मुलगा बघुन माझ लग्न लावुन दिल....तिला जास्त वेळ थांबल तर मी परत काही करुन बसेन अशी भीती असावी बहुधा...तिच्या इच्छेप्रमाणे देशमुखांच प्रोफाईल तिच्या-आमच्या बरोबरीच होत... अन अशारितीने मी गार्गी जहागिरदारची ..गार्गी देशमुख झाले."
"लग्नानंतर मी अमरच्या बरोबर मेलबर्नला त्याची नोकरी होती तिथे गेले....अन तिथे त्याच खर स्वरुप दिसायला लागल्...तो अतिशय मस्तवालपणे जगत होता तिथ. नोकरी नावाचीच होती घरुनच सगळे पैसे मागवायचा...मला आपण पद्धतशीरपणे फसवले गेल्याच लवकरच लक्षात आल पण ममाच असेंब्ली इलेक्शन होत त्यामुळे तो ब्रभा झाला असता अन देशमुखांच प्रस्थ इंदोरात खुप मोठं होतं आणि ते ममाचे राजकीय समर्थकपण होते. यासगळ्या कारणांनी मी फार काही करु शकत नव्हते.
अमर खुप दारु प्यायचा अन मग नको ते थेरं करायचा..मला ते नकोस व्हायच पण उत्तर सापडत नव्हत..नंतर तर तो मला मारझोडही करायला लागला..घरी न सांगायच्या धमक्या द्यायचा..माझा पासपोर्ट लपवुन ठेवायचा अन काय काय करायचा...मला आठवायलाही नकोस वाटतं ते सगळ आता...."
"जेंव्हा या सगळ्याचा अगदी कळस झाला तेंव्हा मी एका मैत्रीणीला हे सांगितल्..तिनं तिकीटाच जमवल अन मी पासपोर्ट लांबवुन पसार झाले...घरी येऊन आईला सगळ सांगितल -परत अमरकडे न जायच्या निर्णयासहीत - ते मात्र तिनं लगेच ऐकल!!!"
"जरा स्थिर झाल्यावर मी आईला स्पष्ट सांगितल्...मला आता परत लग्न करायच नाहीय अन तुमच्याबरोबर पण राहायच नाही...मी माझ्या बळावर उभी राहायच म्हणतेय्..बघु जमत का ते..."
"पण का गार्गी ...आम्हाला कोण आहे दुसर...."
"ममा आदीलला माझ्यापास्नं तोडल्याच प्रायश्चित्त समज हव तर... अन तसही मला एकट राहायचय..जरा मनासारख कारायचय...आणि मी इथनं बाहेर जातेय...काहीतरी उद्योग करीन म्हणते मुंबईला...तुझी थोडी आर्थीक मदतही लागेल सुरुवातीला..."
"अशा तर्हेने मी मुंबईला आले...मधल्या इतक्या वर्षात तुझ काही कळल नव्हत अन खरतर मला तुला फेस करायच धैर्यही नव्हत उरलेल..."
"माझ्या घरचही बरच बदललय आता...आईच राजकीय करीअर फार महागात पडलय सगळ्यांनाच...फॅक्टरी बंद पडुन काही वर्ष लोटलीत..डिलरशिप्स काढुन घेतल्या गेल्या पण जुन्या संपत्तीवर अजुन इभ्रत टिकून आहे ......"
"अमरनी घटस्फोटासाठी बराच त्रास दिला...पण मी फर्म राहीले ...अजुनही तो त्रास देतो... माफी मागतो ..परत एकत्र येऊ म्हणतो म्हणुन त्याचा ससेमीरा चुकवायला मी इथ या मायानगरीत राहाते...इथे यायच तेही एक कारण होत...इथे नुसते चेहरेच असतात ..त्यांना नाव नसल्यासारखीच्...इथे अमरचा ससेमीरा चुकवायला सारखी घर बदलते अन तशीच जगते आहे" --- गार्गीला हे सगळ सांगुन थकायला झालेल...
आदील पार गुदमरल्यासारखा दिसत होता..तिच्यासाठी कॉफी बनवायला तो उठला...
"माझ आतापर्यंतच सांगायच तर थोड सरळसोट आहे गार्गी..माझ्या मध्यमवर्गीय प्रोफाईलसारख....मी तुझी जवळजवळ आठवडाभर वाट पाहीली अन मग गावी निघुन गेलो. बाबांना सगळ सांगितल्..ते तयार झाले तुझ्या आईजवळ हात पसरायला पण मी अडवल..."
"मग सिव्हील सर्वीसेसच जे डोक्यात होत ते सोडुन मी खासगी क्षेत्रात नोकरीत शिरलो...खुप काम केल्..लंडन-न्युयॉर्कला काही वर्ष होतो मग परत भारतात आलो. इथला सगळ्यात तरुण सीईओ वैगरे झालो अन चार वर्षांपुर्वी ही कंपनी काढलीय्..यात माझी पस्तीस टक्के मालकी आहे... आम्ही इंफ्रास्ट्रकचरची काम करतो जगभरात....."
" हां ...लग्न मात्र करायला वेळ मिळाला नाही ,,इच्छाही झाली नाही कधीच..बहुधा तुझ्यानंतर कोणी आवडलच नाही..ते म्हणतात न्....."कभी कोई दिलसे नही मिलता...कभी किसीसे दिल नही मिलता"..बस्स तसच काहीस झाल अन कामात इतका प्रचंड गुंतलो की यावर फार विचार करायला वेळच नाही मिळाला.तुझ्या आईसाहेबांच-तुमच प्रोफाईल वेगळ आहे - ते कुठेतरी मनात घर करुन बसलेल्..त्या प्रोफाईल बनवण्याच्या तंद्रीत मी पैसा कमवायच्या पलीकडे काहीच केल नाही आतापर्यंत.आता माझ्याकडे सगळ आहे पण आई-बाबा नाहीत. हे नक्की काय प्रोफाईल आहे ते मलाही माहीत नाही. शेवटी पैसा-ऐश्वर्य म्हणजे प्रोफाईल का या प्रश्नाच उत्तर माझ्याकरता तरी आज उशीरानेच पण 'नाही' हेच झालय्...सध्या असलच तर माझ"एक रिक्त प्रोफाईल" आहे.... आता रागलोभ खुप निवळलेयत्..निर्मोह झाल्यासारख वाटत असतं...आयुष्य कळलय अस म्हणणार नाही पण या सगळ्यातला फोलपणा कळालाय..अन हे रिक्त प्रोफाईलच आपल खर प्रोफाईल असत हे मनोमन पटलय मला.... म्हणुनच काही वैयक्तीक निर्णय मी घेतोय्...या कॉर्पोरेट लाईफमधन लवकरच निवृत्त होतोय्...तुला मेडीयातन कळेलच"
"लवकरच म्हणजे या बोर्ड मिटींगनंतर हे सगळ थांबवुन मी बस्तरला शिफ्ट होतोय गार्गी.. आई-बाबांनंतर आपल अस कोणी नाहीच तेंव्हा त्या निसर्गपुत्रांनाच जवळ करीन म्हणतोय....ही रॅटरेस शेवटी कोणासाठी हाही विचार येतो मनात्...इथला सगळा पैसा मी बस्तरच्या आदीवासी भागात टाकणार आहे..हीच वेळ आहे आयुष्यात काही मनासारख करायची अन मागे काही जपण्यासारख जगाला देऊन जायची. बाबा सांगायचे...
" जाओगे तो कुछ तान छेड जाओ ऐसी... की नाम जिंदा रहे इस बज्ममे नमीं बनकर" बस हेच करायचा मनोदय आहे....काही शाळा अन दवाखाने काढायचे व चालवायचे हा कार्यक्रम ठरवला आहे..बघुया कस जमत ते..."
गार्गीला आदील कसा बेफाम पसरलाय ते कळुन चुकल आतापर्यंत्...थोड अपराध्यासारखही वाटायला लागल....तिला काय बोलाव ते कळेना ...शब्दांची जुळवाजुळव सुरुच होती... हे शब्द असे दगाबाज होतात कधीकधी.... हातातच येत नाहीत जेंव्हा त्यांची खुप गरज असते तेंव्हा..!!!!
"यात आणखी कोणासाठी जागा ठेवलीयस आदील...." तिन अडखळत विचारल...
"तुला काय म्हणायचय गार्गी.... तू स्वतःबद्दल बोलतेयस ते समजलो मी पण तु गर्दी करतेयस अस नाही वाटत तुला..आता मी पुर्वीसारखा आदील राहीलेलो नाही...." आदील अगदी स्पष्ट बोलत होता...
"हे बघ मी एका वेगळ्याच मार्गावर आहे आयुष्यात .... तुझ्या आईशी झालेल्या त्या भेटीन मला पार वेगळ करुन टाकल ग......गेल्या बारा वर्षांत जे काही केल अन मिळवल त्यानंतर मी बराचसा विरक्त झालोय या सगळ्यातन...तुला झेपायच नाही आता ते...तुला माझी जी ओळख आहे तो आदील केंव्हाच संपलाय"
"आदील मला तुझ्याबरोबर यायचय्....... ,मला माहीतीय हे मागायचा अधिकार मला आता तेव्ह्ढा नाहीय पण तरीही........."
"बघ गार्गी ...मी आता त्या आदीवासी पाड्यांवर-वस्त्यांवर उरलेल आयुष्य घालवणार आहे...जहागिरदारांच्या मुलीला ते फारस सुट करेल अस वाटत नाही...तरीही मी तुला नाही म्हणणार नाहीय.... पण निर्णय विचार करुन घे..घाई करु नकोस"... आदीलन तिला त्याच्या ट्रेडमार्क पद्धतीन समजावल.....तेव्हढ्यात इंटरकॉम वाजला...
"सर जोशींना तुम्हाला भेटायचय थोड्या वेळासाठी...महत्वाच आहे म्हणताहेत..." मेरीन हळुच विचारल
"ओह्..ओके...मेरी मीच येतो बाहेर...."
"गार्गी ....एक काम करुयात... तू विचार कर चांगला यावर अन मला उद्याला सांग ..काही गर्दी नाहीय" अस म्हणुन तो जोशींना भेटायला म्हणुन केबीनच्या बाहेर पडला...
बाहेर जोशींशी बोलुन यायला त्यायला दहाएक मिनीटं लागली असतील ...परत येऊन बघतो तो गार्गी गेलेली...केबीन रिकामीच...
"सर मॅडम गेल्या...त्यांनी तुमच्यासाठी एक लिफाफा ठेवलाय तुमच्या टेबलवर...." मेरीनी मागुन येत सांगितल......आदील सुसाट आत आला...टेबलवर गार्गीचा लिफाफा होता...त्यान घाईन तो उघडला...त्यात मोठ्ठ्या अक्षरांतला मजकुर होता....
"आदील : मी सगळा विचार करुनच सांगतेय...मला अजुन वेळ नकोय्...
जे हातात आयुष्य येऊ बघतय ते मला हवय्..हवच आहे... होप यु अंडरस्टँड...
I WANT TO GROW OLD WITH YOU ....
THE LAST OF LIFE FOR WHICH THE FIRST WAS MADE
मी तुला उद्याला सकाळी नऊला भेटतेय...
- गार्गी "
*************************************************
*************************************************
-------------- समाप्त-----------------------
www.maitreyaa.wordpress.com
अप्रतिम.... अगदीच सुंदर
अप्रतिम....
अगदीच सुंदर लिहिलय
कथा फारच छान आहे.....
कथा फारच छान आहे.....
खुपच छान.... फ्लो छान,शेवटी
खुपच छान....
फ्लो छान,शेवटी गार्गीची आई आणि आदिल आमने सामने छान वाटल असत.
अर्थात हे माझ मत आहे चुकीच हि असु शकतं..
शुभेछा.......
छान लिहीलेय
छान लिहीलेय
कथा खुप खुप आवडली. आदिल मस्त
कथा खुप खुप आवडली. आदिल मस्त वाटला एकदम ..
सुरेख कथा .... पण मध्ये
सुरेख कथा ....
पण मध्ये मध्ये गोंधळायला झालं. म्हणजे बघा सुरुवातीला कथा कुणातरी त्रयस्थाच्या निवेदनातुन आकाराला येत असल्यासारखी वाटते. आणि नंतर अचानक गार्गी आणि आदिल दोघांचेही निवेदन ’प्रथमपुरूषी’ म्हणतात तसे व्हायला लागते. त्यामुळे कथेचा बाज बदलतोय असे मला वाटले. बाकी माबोकर सांगतीलच.
पण कथानक आणि शैली दोन्हीही ओघवते असल्याने मजा आली.
छान लिहिली आहे कथा .. आवडली
छान लिहिली आहे कथा .. आवडली
छान कथा...आवडली..विशाल
छान कथा...आवडली..विशाल दादासारखा माझाही गोंधळ उडाला सुरुवातीला...पण एकुण कथा मस्त
गोड प्रेमकथा. मधल्या
गोड प्रेमकथा. मधल्या गाण्यांच्या, काव्याचा ओळी अगदी चपखल!
कथा आवडली .कुठेही काही
कथा आवडली .कुठेही काही फाफटपसारा नाही ,नेमकेपणाने छान पुढे पुढे मस्त वाटचाल करणारी
कथा .मस्त .
छान आहे कथा! आवडली.
छान आहे कथा! आवडली.
सहीये
सहीये
मस्त जमलिय!
मस्त जमलिय!
आवडली. छान जमली आहे.
आवडली. छान जमली आहे.
छानै..आवडली.. फ्लो छान जमलाय
छानै..आवडली.. फ्लो छान जमलाय
मस्त जमलिय! शेवटी
मस्त जमलिय!
शेवटी यशवंतरावांच्या कथेची आठवण आली..... वर्तुळ पुर्ण झाले! रॅट रेस संपवली
मस्त कथा. त्यांचे प्रेम,
मस्त कथा. त्यांचे प्रेम, घुसमट, आणि नंतरची विरक्ती नेमकी टिपली आहे. फ्लो तर लाजवाब.
अपवाद फक्त गजरा अन तोही मोगर्याचा असेल तर तो अपवाद नाहीच तर नियम असावा!>> हे तत्वज्ञान जबराच!
पण सगळ्यात आवडल्या त्या शेवटच्या ओळी, थेट "याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा" याची आठवण करून देणार्या.
फुल मोकळीच द्यायला-घ्यायला
फुल मोकळीच द्यायला-घ्यायला हवीत्...सुख-दु:खांसारखी..>>>>> सुरेख ...आवडली
छान जमल. हा. मस्त.
छान जमल. हा.
मस्त.
मस्ती उतरलेली गार्गीची आई आणि
मस्ती उतरलेली गार्गीची आई आणि तिच्या खुज्या व्यक्तीमत्वापुढे आभाळाएवढा आदिल या दोन व्यक्तीरेखा एकमेकांपुढे पुन्हा आल्यात, असे चित्र बघायला आवडले असते. कथासूत्र छान. विशालदांच्या सूचनेशी सहमत.
गिरीश दोन कथा झाल्यात. आता रुळलात. थांबू नका.
हम्म!
हम्म!
आपलि मत आपल्या मुलांवर किति
आपलि मत आपल्या मुलांवर किति लादावि कि जेणेकरुन त्यांच्या आयुष्याचि धुळ्धाण होणार नाहि हे जेव्हा पालकांना कळेल तो सुदिन.कथा आवडलि.
छान जमलीय, आवडली कथा!
छान जमलीय, आवडली कथा!
आवडली. गरीब नायक, श्रीमंत
आवडली.
गरीब नायक, श्रीमंत नायिका, कॉलेजात एकमेकांचे प्रेमात पडणे, मग घराणे की इज्जत साठी घरच्यांकडून विरोध, मग त्यांचे दुरावणे आणि शेवटी एकत्र येवुन सुखांत. वाचतांना एखाद्या सिनेमासारखी डोळ्यांसमोरून सरकत होती म्हणून - एकदम सिनेमा स्टाइल कथा.
आवडली.
आवडली.
बदलून असे लेबल लागले म्हणजे
बदलून असे लेबल लागले म्हणजे नेमके काय? कुठे बदल होतो?
सगळ्या मित्रांच्या
सगळ्या मित्रांच्या प्रतिसादांबद्दल मनःपुर्वक आभार... जरा बर वाटतय आता... योगेशनी म्हटल्याप्रमाणे रुळल्यागत वाटतय... हार्दीक आभार !!!
विशाल : तुमच बहुधा खरच असाव - तुमचा अनुभव दांडगा आहे..पण मी त्यानंतर दोनदा परत वाचली पण मला फ्लो तुटल्या सारख वा गोंधळल्यासारख खरच नाही वाट्ल... पण तुम्ही म्हणता तर असेलच...
योगेश / श्वेत : मला कथा गार्गी -आदीलच्याच भोवती ठेवायची होती नाहीतर तशी प्रलोभन बरीच होती पण मग प्लॉट खुप पसरला असता बहुधा अन माहीत नाही इफेक्टीव्ह राहीला असता का...असो.
योगेश : पुन्हा सांगतो या कथालेखनाच्या "विषप्रयोगास" जबाबदार आपणच...
रुनी : मला हे असच फिल्मी इफेक्टचच ठेवायच होत... खरा रोमांस फिल्मी झाल्यावरच बहरतो...
माधव : मजा आ गया आपका लाजवाब प्रतिसाद पढके... धन्यवाद !
पुनःश्च आभार सगळ्या मित्रांचे....
सस्नेह : गिरीश
कथा आवडली. पात्रांची नावं पण
कथा आवडली. पात्रांची नावं पण छान घेतली आहे. कथेत हिंदी डायलॉग वाचुन 'दिल खुश हो गया' :).
'इंदोर' वाचुन मन तिथे फिरुन आले.
छाने कथा. काही काही ओळी छान
छाने कथा. काही काही ओळी छान आहेत. वारा प्यायल्याचे फील!
छान कथा. आवडली. फक्त एक
छान कथा. आवडली.
फक्त एक अनाहूत सल्ला, लिहिताना अनुस्वारांकडे लक्ष द्या, फार छोटी गोष्ट असली तरी त्याने वाचताना खटकतं व वाचनाचा आनंद कमी होतो. सॉरी, राग मानू नका.
Pages