दिवाळी असल्यामुळे संपुर्ण परिसर दिव्यांच्यी रोषणाई आणि फटाक्यांच्या आतीषबाजीमुळे गजबजुन गेला होता. महेश ने त्याच्या प्रेयसीला हमरस्त्यावर सोडले आणि आपली बाईक घ्ररच्या दिशेने वळवली अजुनही त्याच्या मणात आत्त्ताच घडुन गेलेल्या गोड आठवनी तरळत होत्या. ऐवढ्यात बाजुने कुनीतरी ऐ मह्ह्हेश अशी जोरात हाक मारली हाक ऐकताच महेशने करकचुन ब्रेक दाबला आणि आवाजाच्या दिशेने वळुन पाहीले, समोर दिपक आणि गणेश त्यांच्या इतर दोन मित्रांसोबत उभे होते त्या पैकी ऐक तेजस आहे हे महेश ने ओळखले,दुसय्राची चॉकशी केली असता त्याचे नाव इनायत असल्याचे समजले.
दिपक आणि गणेश बरोबर महेश ची मैत्री फार पुर्वीची तिघेही ही तरुण आणि तडफदार, सामाजीक कार्य असो वा वैयक्तिक मदतीसाठी नेहमीच तत्पर, तर तेजस वयाने ऐक दोन वर्षाने लहान परंतु कल्पनाशक्ती आणी प्रबळ इच्छा या दोहोंच्या बळावर जग जिंकू पाहणारा (त्याला भेटल्यावर नेहमीच कोणती तरी नवीन स्कीम ऐकायला मिळत असे)
महेशला समोर बघताच सर्वानी त्याला दिवाळी च्या शुभेछा दिल्या, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर त्याने सहजच म्हणुन ट्रेकींगचा विषय काढला आणि ऐवढा ऊशीर त्यांच्या गप्पा शांतपणे ऐकणारा तेजस उसलून म्हणाला "ऐ खरच जाऊया का आपण? नाही म्हणाले तरी आपल्याकडे तीन बाईक आहेत", त्यास दुजोरा म्हणुन महेश बोलला, "ऐ यार खरंच जाऊया या, रोजच्या वेळापत्रकाचा खुप कंटाळा आला आहे, तीच ८.३२ ची अन्धेरी, त्यात ती जीव घेणारी गर्दी, ऑफिस मध्ये गेल्यानंतर बॉसचा सुतकी चेहरा नको नको वाटत सारं."
तेवढ्यात दिपक बोलला, "आता तर नक्कीच जायचे; नाहीतरी तीन चार दिवस सुट्टी लागुनच आली आहे, पण तीन बाईक वर चारच जण... बहोत ना ईंन्साफी है", तेवढ्यात गणेश म्हणाला, "अरे इनायत येईल ना", या कमेंट वर इनायत काहीसा गांगरला व म्हणाला "मुझे....घर पे पुछना पडेगा" त्याच्या या बालीश बोलण्यावर सर्वजण हसले व हसता ह्सता त्याने ही आपला होकार कळवला, मधुनच दिपक म्हणाला, "मया तु कोणाला बरोबर घेणार?" त्यासं महेशने उत्तर दिले "none other than Sushya."
(सुश्या म्हणजे सुशांत, महेशचा शालेय मित्र व रहायला ही एकाच चाळीत त्यामुळे मैत्री घनिष्ट, नुकतेच दोघे कोकणात सुशांतच्या गावी बाईकवर जाऊन आले होते गावातील आठवणी ताज्या असतानाच दुसर्या कुणाचा विचार मनात आणने महेशला शक्यच नव्हते)
कुठे जायचे हा बेत मात्र जमत नव्हता, "ए अस करूया" महेश म्हणाला, "आज रात्रीच निघुया म्हणजे early morning आपण पोहचू मग दुपारपरर्यंत काय करायच ते करु, जेवण करुया आणि back to pavilion, कारण उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि आपण बाहेर राहीलो तर घरचे बोंबाबोंब करतील." "ते ठिक आहे रे पण जायचे कुठे?" तेजस वैतागुन बोलला; ते ऐकुन महेश बोलला "शांत गदा दारी भिम शांत्, आता जायचे तर ठरले आहे तर आधी इथुन हलायचे बघा, जेवून झाल्यावर सर्वजण चित्रा टॉकिजजवळ भेटू आणि तिथेच ठरवु कोठे जायचे ते. हो पण निघताना एकदा गाड्या तपासून घ्या; नाही म्ह्टल तरी रात्रीचा प्रवास आहे." सर्वानी मान हलवूण त्याच्या बोलण्यास संमती दिली, दिपकने ही बरोबर काय काय घ्यायचे याच्या सुचना देऊन टाकल्या आणि काही अंशी त्या योग्य ही होत्या, त्याचे बोलून होताच सर्वजण घरी पसार झाले ते अतिउत्साहानेच.
चाळीत शिरताच घराकडे न वळता महेश ने आपला मोर्चा सुशांतच्या घराकडे वळवला. सुशांत नुकताच जेवुण बाहेर पडत होता महेशला आपल्या दिशेने असे घाईत येताना पाहुन त्याने तडक हेरले की साहेबांचा मूड नक्कीच कुठेतरी जाण्याचा दिसतोय.
सुशांत: काय कदम उत्साही दिसताय काय बेत काय आहे हं...?
महेश: वा पाटील, खरे मित्र शोभता अगदी बरोबर ओळखल, आता जा आणि बॅग भर आपल्याला जायचे आहे. पाण्याची बाटली, एक जोडी कपडे & पाच सहा गांधी बरोबर घे बाकीच मी बघतो.
सुशांत: अरे ते ठिक आहे रे 'तुमने बुलाया और हम नही आये' असं झालय का कधी फक्त venue तरी सांग, आणि आपण दोघेच जायच की अजुन कोणाला बरोबर घेणार?
महेश: हे बघ तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्त्तरे तुला मिळतील पण आधी तू तयार हो बघु. मला ही अजुन जेवायचे आहे. so go & get ready fast ,till 12.00 o' clock we will have to reach Dadar."
सुशांत: but how we will go? by bus or any other vehicle?
महेश: no dear we are going on my black beauty
सुशांत: i didn't get u
महेश: urr offcourse on my bike, i assured u gonna enjoy this Adventurous trip,
सुशांत: ए बास झाल तुझ कोकाटे इंग्लीश आता जा लवकर आणि जेवून घे मी पण तयारीला लागतो, हो आणि घरी काय सांगु?
महेश: आयला तु केव्हापासुन घरच्यांना घाबरायला लागलास?
सुशांतः नाही रे दिवाळी आहे ना आई विचारेल,सनासुदीला कुठे उलथताय मग काय सांगु?
महेश: ऐ गप्प बस आणि तयार हो सांग माझ्या बरोबर आहेस ते .
सुशांतःअरे तेच तर tension आहे....ह ह ह (किंचीत हसुन)
महेश: ठीक आहे मी निघतो मला ही काही तरी थाप मारुनच निघावं लागेल ok. जेवुन झाल्यावर miscall देईन तयार रहा, बायकांसा नटापटा करत बसु नकोस.
महेश ला असे घाईत आलेले पाहुन त्याच्या आईने विचारले, "काय रे कुठे होतास एवढा ऊशीर? सनासुदीला जरा लवकर याव घरी". "हो गं आई कळत मला! पण झाला ऊशीर. असेच जरा काही मित्र भरपुर दिवसांनी भेटलो होतो, ते जाऊ दे पप्पा कुठे आहेत?" "अरे तुझेच वडिल ना, त्यांचा तरी पाय कुठे घरात असतो. तू ऑफिसला आणि हे बाहेर, मी मात्र एकटीने इथे किचनपाशी राबायचं,सुट्टीच्या दिवशी तर तूला खान्यापिन्याचे ही भान नसते." "काय ग आई मला कळ्त नाही का? ( लाडिक पणे). हे बघ पुढ्च्या महिन्यात आपण नक्की बाहेर जाऊया. आत्ता आधी जेवायला वाढ मला बाहेर जायच आहे." "कुठे?" "अगं दोन दिवस सुट्टी आहे म्हट्ल याव जरा फिरुन." "अरे कुठे आणि कोणाबरोबर त्यात उद्द्या लक्ष्मी पूजन आहे, बर नाही दिसत." "हे बग मी सुशांत, दिपक्,गणेश आणि त्यांचे दोन मित्र असे सहाजण बाईक घेऊन जाणार आहोत please तु काळजी करत बसु. नकोस मी उद्द्या संध्याकाळ पर्यंत नक्की येईन", महेश बोलला. "तुम्हाला बोलायला काय जाताय आई वडील व्हाल तेव्हा कळेल काळ्जी काय असते ते."
महेश मात्र निर्लज्यासारखा मान खाली घालुन जेवत होता. जेवून झाल्यावर महेश ने जरुर ते सर्व सामान आपल्या सॅग मध्ये भरले, गाडीची चावी आणि हेल्मेट घेतले तेवढ्यात आई म्हणाली "अरे ११.४५ झालेत तुला काय वेड लागलय का रात्रीची बाईक घेऊन जायला", "आई कशाला घाबरतेस मी काय एकटा चाललोय. इथेच
जवळपास चाललो आहे, आधीच या रोजच्या schedule चा कंटाळा आला आहे please घे ना समजुन माझी लाडकी आई", "बसं झाला मस्का" (हसुन...) "आणि हो आपल्या Don la (पप्पांना) संभाळुन घे मी हा गेलो आणि हा आलो."
घरातुन निघाल्यानंतर महेश थेट आपल्या बाईकजवळ गेला. सुशांतही तिथेच त्याची वाट पाहत ऊभा होता. बाईकची सर्व्हिसिंग दोनच दिवसांपूर्वी केली असल्यामुळे घाबरण्याचे कारण नव्हते. दोघेही बाईकवर बसले
महेश : मग निघायच का पाटील?
सुशांत : का तुतार्या वाजायची वाट बघताय? आणि प्लीज जरा संभाळून माझ लग्न अजुन झालेल नाही.
महेश : ए जरा थंड घे आता मला शांतपणे गाडी चालवु दे.
एक आठ ते दहा मिंनिटात ते चित्रा जवळ पोहचले. समोरच गणेश आणि तेजस आपआपल्या बाईक घेऊन उभे होते. (तेजसकडे जुनी CBZ होती परंतु त्याने ती छान कंडिशन मध्ये ठेवली होती तर गणेशकडे त्याच्या स्वभावाप्रमानेच CT 100, आणि महेशकडे अर्थातच Definitely male Pulser 150)
शेजारीच दिपक ही ऊभा होता तर तेजस ईनायत ची वाट पाहत होता. तो परेललाच कुठेल्यातरी जवळच्या मित्राला भेटायला गेला होता.
दिपक : चला ठरल्याप्रमाणे आपण एकदाचे इथपर्यंत येऊन पोहचलो, ते म्हणतात ना well began is half done,
गणेश : हो नाहीतरी कित्येक वेळा ठरवुन सुद्धा प्लान यशस्वी होत नाहीत, नक्कीच काहीतरी थ्रील अनुभवायला मिळणार.
तेजस: नक्की मिळेल पण जायचे कुठे?
"राजमाची ला जाऊया का लोणावळ्याची थंडीही अनुभवता येइल", गणेश ने सुचवले. बेत चांगला होता. तेवढ्यात महेश म्हणाला, "ए रायगड ला जाऊया का? मी अजुन नाही पाहीलाय, आत्तापर्यंत फक्त पुस्तकातुन आणि नेटवरुन फार वाचल आणि पाहीलय, त्याची भव्यता, त्याचा चोखटपणा, भॉगोलिकद्रुष्ट्या त्याचे इतिहासातील महत्व, खरच ट्रेकही होईल आणि इतिहास ही जवळुन पाहता येईल". महेशच्या बोलण्याला दिपकने दुजोरा दिला तो म्हणाला, "माझी ही फार दिवसांपूर्वीची सुप्त ईच्छा होती आणि त्यात जवळही आहे उद्या संध्याकाळपर्यंत परत येऊ आपण."
दिपकचे बोलुन होते न होते तोच इनायत समोरुन येताना दिसला. त्याला पाहताच सर्वांनी हायस वाटले कारण ऑलरेडी १२ वाजुन गेले होते, तो आल्या आल्याच तेजस ने त्याला सांगितले की आपण रायगडला जाणार आहोत त्यावर त्याने प्रतीक्रिया दिली, "अरे किधर भी चलो लेकिन पहला यहा से निकलो", यावर गणेश म्हणाला "साला 'येतात लेट नी होतात शेठ' चला बसा बाईकवर", तेवढ्यात महेश म्हणाला, "आता पहिला हॉल्ट पनवेल (मॅक डोनाल्ड-च्या बाजुला)". सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या.
तेजसच्या मागे इनायत, गणेशच्या मागे दिपक आणि महेशच्यामागे सुश्या, तिघांनीही सायन जवळच्या पेट्रोल पंपावर आपआपल्या गाडीच्या टाक्या फुल केल्या आणि वेगात एखाद्या योद्द्याच्या अविरभावात रायगडाकडे कुच केले. एसटी बसेस अथवा मोठ्या गाड्या सोडल्यातर संपुर्ण रस्ता रिकामाच होता. त्यात नोव्हेंबर महीना असल्यामुळे बाईकच्या वाढत्या वेगाबरोरच थंड वारा अंगाला बोचत होता. तेजस केव्हाच पुढे पसार झाला होता तर गणेश कुर्मगतीने मागुन येत होता, दिडएक तासातच सर्वजण पनवेलला पोहचले. तेथे थोडी फुकाफुकी आणि चहा झाल्यानंतर पुन्हा पुढचा प्रवास. खरच पुढचा प्रवास अक्ष्ररक्षः परीक्षा पाहणारा ठरला. शहरापासून दुर गेल्यानंतर थंडी ने आपला रंग दाखवायला सुरवात केली. संपूर्ण रस्ता धुक्याने आछादुन गेला होता. रात्रीच्या गडद अंधार, रस्त्याच्या आजुबाजुला कुणीही नाही, त्यात हाड गोठवणारी थंडी, सगळीकडे निरव शांतता पसरलेली फक्त गाड्यांच्या फायरींगच्या आवाजानेच वातावरणात एक अनोखा नाद घुमत होता. खरंच थ्रील काय असते ते आज अनुभवायला मिळत होते त्या सहाजनांना.
समोर दहा फुटांवरचही दिसेनास झाले तेव्हा अक्षरक्ष पार्किंग लाईट लाऊन गाडी चालवावी लागत होती समोरून अथवा मागुन एखादी मोठी गाडी पास झाल्यास फारच पंचाईत होत होती. वातावरण एवढे भयानक होत की कोणालाच कोणाशी बोलावस वाटत नव्हत. सर्वजन त्या गुढ अंधारात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते, अशी ही तारेवरची कसरत करता करता बाईकदळाची (पायदळ, घोडदळ) पहीली तुकडी महडला येऊन पोहचली ती महेश आणि सुश्याची, आणि एक दहा पंधरा मिनिटांच्या फरकाने तेजस आणि गणेश ही पोहचले.
महडला पोहचल्यावर सर्वांना हायस वाटलं. महेश म्हणाला, "काय मग कसं वाटल? होतं की नाही adventurous". "साल्या गप्प बस, गेल्या २४ वर्षात जेवढे नामस्मरण नाही केलं देवाचं तेवढे गेल्या तीन तासात झालय माझ्याकडुन, साला एके ठिकानी तर गाडी घातलीच होतीस पण नशीब बलवत्तर म्हणुन वाचलो आपण", सुश्या अत्यंत आगतिकपणे म्हणाला. "सॉरी यार पण त्या काळोख्या अंधारात आणि गडद धुक्यात तो ट्रक दिसलाच नाही मला, पण बाईक कंट्रोल केली ना! उगी आता रडायचं नाही हं हं हं हं..........", "नाही यार, पण रस्ता खरोखरच फार भयान वाटत होता, त्यात भर की काय म्हनुन ते रस्त्यावरचे बोर्ड, 'नजर हटी दुर्र्घटना घटी!', 'अपघात प्रवण क्षेत्र' आयला पार घाबरवुन टाकला आपल्याला", तेजस चे हे बोल ऐकुन दिपक मात्र मनोमन सुखावला, नाहीतर हा (तेजस) कुठे जाऊन आला की अशा काही बढाया मारायचा की ऍकनार्याच्या कानाचे पडदे दयेची भिक मागायचे.
"महाराज्यांच्या क्रुपेने इथवर सुखरुप पोहचलो; आता पाऊन एक तासातच किल्ले रायगड", चष्म्याच्या आत डोळे चोळत गणेश म्हणाला, तर इनायत मात्र पैसे देउन भाषण बघायला आलेल्या माणसांसारखा त्या पाच जणांचे बोल ऐकण्यात दंग होता. पहाटेचे साडे चार वाजले होते, गारवा फारच जाणवत होता, परंतु अतिउत्साहाने सर्वांनी त्या काकडत्या थंडीवरही मात केली. किल्ले रायगड महडच्या उत्तरेस मुख्य महामार्गापासुन आत २५ कि.मी वर आहे. मुख्य रस्त्यावरच दोन शिवकालीन सिंहस्तंभ येणार्या पर्यटकांचे स्वागत करतात. त्या दोन सिंह स्तंभाना पाहील्यावर सर्वांना एक अनोख स्फुरण चढले, त्यातच सुशांतने 'जय भवाणी जय शिवाजी' अशी रक्त सळसळवणारी नादमय आरोळी ठोकली आणि सर्वजन रायगडाच्या दिशेने कुच झाले. एक पाऊनएक तासातच सर्वजण पायथ्यानजीकच्या पाचाडात पोहचले, तेथुन डाव्याबाजुचा रस्ता थेट राजमाता जिजाऊंच्या समाधीकडे जातो तर उजव्याबाजुने सरळ वर गेल्यास किल्ले रायगड निधड्या छातीने स्वागतासाठी सज्ज दिसतो.
बाईक वरुन पुढे जात असताना सर्वांची नजर गावातील विहिंगम द्रुश्य अ:क्षरक्ष टिपुन घेत होती. सुर्यनारायन नुकतेच सह्याद्रीच्या डोंगर रांगातुन डोकाऊन पाहात होते. त्या त्यांच्या सौम्य तेजाने सारे आसमंत पिवळ्या केशरी रंगाने न्हाऊन गेले होते जनु काही एखाद्या निष्णात चित्रकाराने आपल्या कल्पनेच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर रंग भरले असावेत. सगळीकडे झुंजूमुंजू झाले होते त्यात पाखरांचा चिवचिवाट, दारासमोरील रांगोळीचा सडा, गुरांचे हंबरने त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा खळखळाट, गवताचा मन कासावीस करणारा वास हे सर्व बघता बघता सारे गडाच्या पायथ्याजवळ पोहचले.
समोरच एक उपहारग्रुह आहे तिथेच सर्वांनी आपल्या गाड्या पार्क केल्या आणि गरमागरम कट वड्यावर येथेच्छ ताव मारला. खाता खाताच दिपक बोलला "ए खाऊन जाल्यावर पहीले फ्रेश होऊया आणि मग चढायला सुरुवात करुया", तेवढ्यात हॉटेलमालकाने कळवले की तेथे पाण्याची थोडीफार टंचाई आहे तुम्हाला पाणी गडावरच मिळेल ते ऐकुन सुश्यांत बोलला "हा यार नाहीतरी आपला अवतार एकदम द्रुष्ट लागण्यासारखा झाला आहे. साला एखाद्या मुलीने पाहीले तर झालेली लाईन तुटायची",यावर सर्वजण हसले. "आणि हो पाण्याच्या बाटल्या इथुनच घेऊया. परत वर जाई पर्यंत पाणी नाही" गणेशने सुचवले व त्याच्या म्हणण्याप्रमाने सर्वांनी बाटल्या भरल्या आणि चढाईस सज्ज झाले. हॉटेलातुन बाहेर पडताच चार-पाच चॉदा पंधरा वर्षांची मुल हातात ताकाने भरलेली कळ्शी आणि ग्लास घेऊन धावत त्यांच्या दिशेने आली त्यापैकी एकाचे नाव विचारले असता त्याने बाबु असल्याचे सांगितले, "ओ दादा, ताक घेणार का? घेत असाल तर तुमच्या बरोबर वरपर्यंत येईन आणि गडबी फिरवीन, आणि ताक पित रहाल तर दम बी न्हाय लागणार". त्याचं ते एवढ्याश्या वयातल व्यवहारी कसब पाहुन सर्वांना फार कुतुहल वाटले.
"कस दिल रे ताक?" महेश ने विचारले, "पाच रुपये" बाबुने उत्साहाने सांगितले. "मग ठिक आहे, त्याआधी एक सांग वर कुठून म्हणजे कोणत्या वाटेने जायचे?" "हे बघा, ही जी समोरून वाटजाते ती हाय सोपी पण पोचायला दिड तास तरी लागल आणि एक वाट मागनं हाय जरा अवघड आणि झाडाझुड्पाची हाय, पण तीनं एक पाच-सहाशे पायर्या कमीबी होतील आणि तासाभरात गडावबी पोचु आपण." बाबुचे शब्द पुर्ण होतात न होतात सर्वजण एक सुरात म्हणाले, "आता गड सर करायचा तर मागच्या वाटेनेच हर हर महादेव,हर हर महादेव.." सर्वांनी चढाईस सुरवात केली. रात्रभर प्रवास करून सर्वांचे चेहरे अगदी शिनले होते; परंतु आता एकच ध्येय होत ते म्हणजे गड सर करायचा. सर्वात पुढे डोक्यावर कळशी आणि हातात ग्लासं गेतलेला बाबु आणि त्याच्या मागे हे सहाजण अत्यंत शिस्तीने पादक्रमण करत होते. एक वीस पंचवीस मिनिटातच तेजस ने धापा टाकायला सुरवात केली.
त्याला बघुन इनायत म्हणाला, "साले बोलता था ना ज्यादा फुका मत कर. साला जवानी मे तेरी ये हालत है?" "हा यार अभी ज्याते ही सब छोड दुंगा", यावर दिपकने मागे वळुन पाहीले व काहीसे वात्रट हसत म्हणाला, "वंदे वंदे आणि च्यु.... बनवायचे धंदे. गेल्या वर्षभरात याने दहा वेळा हीच प्रतीज्ञा केली, पण ज्याप्रमाने मुंगी साखरेचा वास काढत डब्यापर्यंत पोहचते त्याप्रमाणे हाही जेवल्यावर पानापट्टीवर पोहचतो. सुरवातीला रोज एक अशी कधीतरी ओढतो म्हणुन घ्यायचा आणि आता साला पाकीटच ठेवतो खिशात." त्यास जोड म्हणुन गणेशने री ओढली, "धुंवा धुंवा....धुंवाही धुंवा" तेजस मात्र असहायपणे धापा टाकत ऐकत होता. सुश्या आणि महेश मात्र बाबुचा इंटरव्ह्यु घेण्यात रमले होते. बाबु शाळेत सातवीला होता त्याच गाव तिथेच चालत दोन तासांच्या अंतरावर होत. घरचीपरिस्तिथी बेताचीच त्यामुळे सुट्टीच्या दिवशी हा इथे ताक विकुन पैसे कमवत असे तर आई वडील दुसर्याच्या शेतात मजुरीवर काम करत. घरी अजुन दोन भावंड होती, हे सर्व ऍकुन दोघांचेही चेहरे विषण्ण झाले. एकाच क्षणात त्यांना खेळण नाही मिळाल म्हणुन आई-वडीलांवर रुसणारी उलट बोलनारी मुल आठवली तर इथे आयुष्याचा खेळ चालावा म्हणुन झगडणारी मुल पाहायला मिळत होती.
एक तासाभरात सर्वजण नाना दरवाज्यापर्यंत पोहचले. दरवाज्याच्या आतील बाजुस पहारेकर्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत त्यांस देवड्या म्हणतात. आत शिरताच गणेशणे "गो ब्राम्हण प्रतीपालक.....छत्रपती शिवाजी महाराज की जय!" अशी रोमांचकारीआरोळी ठोकली. सर्वजण विसावा घ्यायला तिथे थांबले. दोन ग्लास ताक रिचवल्यानंतर थोड फार फोटो सेशनही झालं. अशा प्रकारे थकत भागत, ताक पीत, शोर्य गीत बोलत, टिवल्या बावल्या करत एक दिड तासात सर्वजन गडावर पोहचले. गडावर पोहचल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावर ओसांडून वाहत होता. सुश्या बोलला, "यार, आता पहीले फ्रेश होऊया नाहीतर अंगात फिरण्यासाठी त्राण उरणार नाही." तेजसची तर दातखिळीच बसली होती तो नुकत्याच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णासारखादिसत होता. "अरे इथे कुठे पाणी आहे का?" दिपक ने बाबुला विचारले, "हो हाय की इथुन पुढेसरळ चालत गेलात की गंगासागर तलावाच्या बाजुला पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत व आंघोळीचीही व्यवस्था आहे." "गेलात म्हणजे? तु नाही येणार आमच्या बरोबर?" "आलो असतो पण दिवसात कुठे तीन चार फेर्या खाली वर केल्या तरच सुटतात शे-दिडशे रुपये. तेवढाच आई-बाला आधार", एवढ बोलुन तो पाठमोरा झाला पुढच्या गिर्हाईकांच्या शोधात पुन्हा तीच आरोळी ताक घेणा..........र का ताक्क..........!
गणेश बसल्याजागीच पेंगत होता. त्याला दिपकने हलवले "साहेब ऊठा. दोन तासात आपल्याला गड पाहुन परतीच्या प्रवासावर निघायचे आहे." ते ऐकून सर्वांनाच भान आले. अर्ध्या पाऊन तासात सर्वांच्या आंघोळी झाल्या. ऊन बर्यापैकी जाणवत होत परंतु फ्रेश झाल्यामुळे सर्वांच्या चेहर्यावर तरतरी आली होती. आता पुढचा प्रवास्. गडावर पाहण्यासारखी एकूण पंचवीस ठिकाणे आहेत. खुबलढा बुरुज, नाना दरवाजा, मदारमोर्चा, पालखी दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिकार पेठ, कुशावर्त तलाव, टकमक टोक, हिरकणी बुरुज, महादरवाजा, चोरदिंडी, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, स्तंभ, मेणा दरवाजा, जगदिश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी, वाघ दरवाजा आणि अत्यंत शोभनीय असे मेघडंबरी म्हणजे महाराज राजसभेत ज्या आसनावर बसत ती जागा. शिवकालीन सिंहासनहे बत्तीसमन सोन्यापासुन बनवले होते परंतु संभाजी राज्यांच्या म्रुत्युनंतर मुघलांनी ते काबीज केले. आता तेथे पंचधातुपासुन बनवलेले सिंहासन शासनाच्या क्रुपेने पाहायला मिळते.
संपुर्ण रायगडभ्रमण करुन सर्वजण शेवटी जगदिश्वराच्या मंदीरात पोहचले. ऊन चांगलच तापल होते, परंतु मंदीरात एक विलक्षण गारवा होता दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी थोडा वेळतेथे घालवण्याचे ठरवले. बघता बघता पाचही जनांचा डोळा लागला. महेश मात्र थकलेल्या डोळ्यांनी कधी मंदीराच्यासमोरच दक्षिनेकडे असलेल्या समाधीकडे पाहात होता तर मध्येच गाभार्यातील शिवलिंगाकडे. कसलतरी विलक्षण दडपण त्याला जाणवत होत पण उलगडा मात्र होत नव्हता. त्याने पुन्हा आपला कटाक्ष गाभार्यातील पिंडीवर टाकला आणि या ऐतिहासिक वास्तुची जी काही हेळसांड झाली ती तो आठवु पाहत होता. तेव्हा त्याला जाणवले की कित्येक ठिकाणी दारुच्या बाटल्या, प्लास्टीकच्या वस्तु, फळांच्या साली इस्त:त पडल्या होत्या, त्यात भर म्हणुन प्रेमी युगुलांनी स्वताच्या नावाने रंगवलेल्या ऐतिहासिक जागा. बहुतेक त्यांना archies किंवा hallmark चे ग्रीटिंग्स परवडत नसावेत? तर काही ठिकाणच्या वास्तु पुढच्याभेटीत पाहायला मिळतील की नाही अशा कंडिशनमध्ये होत्या, जर स्वराज्याच्या राजधानीचीच ही अवस्था तर बाकीच्या गडकोटांचा विचार न केलेलाच बरा. यावरुन खरच शासनाच या सर्व गोष्टींकडे किती लक्ष आहे व महाराजांच्या कार्याविषयी खरंच किती आस्था आहे याची प्रचीती आली. एक अर्ध्या पाऊन तासातच सर्वजन ऊठले, आत्ता मात्र तेजसला चांगलीच तरतरी आली होती ए चला आता आपल्याला येथुन कलटले पाहीजे, अरे वो ठिक है लेकिन मुझे जोरो की भुक लगी है
यावर गणेश बोलला अरे थोडा सबर कर बच्चु, कारण आता पहीले ईथुन निघुया म्हणजे एक दोन अडीच तासातच आपण महडला पोहचु जेवणही तेथेच करु आणि मग मुंबईईईई.....पण महेश मात्र शांतच होता का ते त्याचे त्यालाच कळत नव्हते पण जड अंतकरणाने त्यानेही आपली पावले तेथुन वळवली अजुनही त्याला तिथेच मंदिरात बसुन राहावेसे वाटत होते.गड उतरताना काही जास्त कष्ट लागले नाहीत. खाली उतरताच सर्वांनी थोडे पाणी पिले आणि पुन्हा पावंसात रायगडाला नक्की भेट द्यायची या निश्चयाने तिघांनीही आपल्या गाड्या काढल्या आता महडमध्ये भेटायचे हे
आधीच ठरले असल्यामुळे तेजस सवयीप्रमानेच तेथुन निघाला.मागुन महेश आणि गणेशने ही आपल्या गाड्या हाकल्या रात्रभरचा प्रवास त्यात सकाळपासुनची भटकंती यामुळे महेशला विलक्षन थकवा जाणवत होता आणि इतरांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती उतरणीची वळने फार धोकादायक वाटत होती गड सोडुन एक पाचंच मिनिटे झाली असतील कि महेशच्या गाडीचा हार तुटुन पडला
आप-आपल्या गाडीत पट्रोल भरल्यानंतर सर्वजन ढाब्याच्या दिशेने निघाले,आता मात्र सर्वांनाच सनकुन भुक लागली होती त्यामुळे काही करुन लवकरात लवकर तेथे पोहचायचे आणि मिळेल त्याचा फडशा पाडायचा असे एकंदर सर्वांच्या चेहर्यावरुनच वाटत्त होते इनायतचा तर चेहरा शंभरच्या बल्बसारखा तळपत होता तर तेजस मात्र गुर्हाळाच्या बैलासारखा गाडी रेमटवण्यात मग्ण होता बहुतेक कोणत्या कोणत्या पदार्थांवर ताव मारायचा या विचारात तो असावा,
गणेश आणि दिपकची परीस्तिथी जरा बिकट वाटत होती ते आत्ताच उपोषणातुन उठलेल्या कार्यकर्त्यांसारखे दिसत होते तर सुश्यांत मात्र झाल्याप्रकारामुळे थोडासा शांतच बसला होता महेशला तर कधी एकदा घरी जातोय आणि बिछान्यावर अंग टाकत्तोय अस वाटत होते त्यात उजव्या हाताच्या तळव्याला लागल्यामुळे त्यास एक्सलेटर देताना बराच त्रास होत होता आणि गुडघाही चांगलाच- ठणकत होता पेट्रोलपंप सोडुन एक पंधरा मिनिटे झाली असतील कि अचानक अज्ञात मारुती कार ने महेशच्या गाडीला उजव्या बाजुने दाबले हे सर्व इतक्या वेगात घडले की महेशला गाडीच कंट्रोल
झाली नाही काहीसं गांगरुन त्याने पुढचा डिस्क दाबला ब्रेक इतका अर्जंट होता की बाईकचं पुढचं चाक जागेवरच स्किड झाल व काही कळायच्या आतच दोघेही(सुश्यांत & महेश) रस्त्याच्या खाली फेकले गेले.सुदैवाने रस्त्याच्या दोन्ही बाजुला बर्यापैकी गवत होते, दोघेही त्या गवतात जाऊन पडले महेशला असे पुन्हा पडलेले पाहुन तेजस आणि गणेश दोघांनीही आपल्या गाड्या जागीच थांबवल्या व ते दोघांना उचलण्यासाठी धावले.बाजुनेच गावातील काही महीला पाणी घेऊन जात होत्या त्यांनीही त्यांच्या दिशेने धाव घेतली,महेशच्या डोळ्यांसमोर भर दुपारी काजवे चमकायला लागले त्याने हळुच आपले हेल्मेट काढले व एक नजर पुन्हा तो स्वतालाच न्याहाळु लागला तेव्हा त्याला असे आढळले की अर्ध्यातासाभरापुर्वीच हाताला जे बॅंडेज केले होते त्यातुन आता पुन्हा रक्त वहायला लागले होते तसेच खालचा ओठ दातांखाली चिमटल्यामुळे तोंडातुनही थोडेफार रक्त वाहु लागले याउलट सुश्यांत ने प्रसंगावधान ओळखुन आधीच उडी घेतल्यामुळे त्याला अजिबात लागले नव्हते झाला प्रकार तेजसने अगदी जवळुन पाहीला असल्यामुळे तो तावातावात त्या कारवाल्या इसमास शिव्या घालत होता तेवढ्यात जमलेल्या बायकांपैकी एका मध्यम वयाच्या बाईने महेशला आणि सुश्यांतला आपल्या जवळील पाणी पा़जले व आपुलकीने तीने त्यांची विचारपुस केली तीचे ते शब्द ऐकुन महेशला निघतानाचे आईचे शब्द आठवले खरच आपल्या पालकांची मुलं अशी लांब गेलीत की काय विवंचना होत असेल्?या नुसत्या विचारानेच त्याच्या अंगावर शहारा आला. आता कधी एकदा घरी जाउन आईला भेटतोय असं त्याला वाटत होते तेवढ्यात दुसर्या बाईने गणेशला सांगितले बाबांनो जरा जपुन गाड्या चालवा आधीच ह्या रस्त्यावर भरपुर अपघात होतात कित्येकदा असं तरुन पोरांना विव्हळताना पाहील कि वाईट वाटतं तरी तुमच नशीब बलवत्तर म्हणुन थोड्यावरच भागलं, जीवाला जपा आमच्या लेकरासारीचं तुम्ही
इकडे इनायत ने बाईक उभी करुन साईड स्टॅंडवर लावली व तो महेश जवळ आला क्या dude क्या हुआ? अरे कुछ नही मै सीधे ही जा रहा ता इतने मै उसने ने पिछेसे आके मुझे अंदर दबा दिया साला आज नसीबच खराब आहे महेश दुखर्या आवाजात बोलला यावर सुश्यांत काहीसा चिडक्या आवाजात बोलला काही नाही रे तु मगाशी झालेल्या प्रकारामुळे जरा बिथरला होतास व त्याच भीतीमुळे तुला गाडी कंट्रोल झाली नाही त्याच्या या वक्तव्यावर महेश तशा अवस्थेथ देखील चिडला अरे भीती कसली गेल्या दोन वर्षात रो़ज अंधेरीला अप डाऊन करतो तेव्हा साध घसपटल सुद्धा नाही आणि बहुतेक तु विसरलास तुझ्ह्या गावी आपण ह्याच रस्त्यावरुन गेलो होतो तेही भर पावसांत तेव्हा तर सलग तेरा तास गाडी मी एकट्यानेच चालवली होती.महेशला असे चिडलेल पाहुन दिपक पुढे झाला अरे ठिक आहे आता एकमेकांची माप काढण्यापेक्षा आपण लवकरात लवकर घरी कसं जातायेईल ते पाहुया महेश मला वाटते तुझा टाईम आज जरा वाईट आहे त्यामुळे आपण आता आपल्या जागा बदलुया तुला काही प्रोब्लेम?" गणेश ने विचारले. "नाही यार मला आता ड्राइव्ह करण शक्यच नाही, पण आधी बाईक चालु आहे का ते पहा." ते ऐकुन बाईक जवळ उभ्या असलेल्या तेजसने सांगितले, "गाडी ओके आहे फक्त इंजिनचा जरा वेगळा आवाज येतोय, तो काय सर्व्हिसिंग केलं की होईल व्यवस्थीत." फक्त आता गाडी चालवणार कोण हा यक्ष प्रश्न? अखेर सर्वांच्या संमतीने ही जबाबदारी ईनायतवर सोपवण्यात आली. त्यानेही ही ती जरा आढवेढे घेतच स्वीकारली. तेही रास्तच होतं आधीच एकाच गाडीचा एकाच दिवशी दोनदा अपघात, त्यात ज्या व्यक्तीला pulsar ह्या गाडीविषयी पहील्यापासुनच अनास्था त्याच्यावरच तिला घरपर्यंत नेण्याची जबाबदारी. सारं काही न उलगडनारं. खरचं नियतीने पुढे काय वाढुन ठेवलं असेल ह्याची कुणालाच कल्पणा नव्ह्ती.
थोड्याच वेळात सर्वजण ढाब्यावर पोहचले. ढाबा तसा छोटासाच होता पंरतु नीट नेटका होता. आत मध्ये शिरताच गाड्या उभ्या करण्या-साठी जागा, बाहेर बाकडे मांडलेले आणि जोडीला टिपीकल पंजाबी जेवणाचा वास ह्या सर्व वातावरणात तेजस मुग्ध होऊन गेला. बहुतेक त्याला सर्व गोष्टींचा विसर पडला असावा अगदी महेशला लागलय हे ही. त्याने घाई-घाईत आपली गाडी पार्क केली व महेशला तश्याच अवस्थेत सोडुन तो आणि ईनायत बाकड्यांर पळाले. गणेश मात्र सुश्यांतला आपल्या बरोबर घेऊन आत गेला झाल्या प्रकारामुळे तो जरा बिथरलाच होता. तर ईकडे दिपक महेशजवळ येऊन उभा राहीला "दुखतय का जास्त?" दिपकने विचारले "जाऊ दे रे, त्या दुखन्यापेक्षा त्याच्या बोलण्याने जास्त दुखावलोय मी. असा कसा वागु शकतो तो, अरे मी काय काल परवा गाडी चालवायला शिकलोय? काय तो म्हणे मी घाबरलो अरे असं असत ना तर पहील्यावेळी पडलो ना तेव्हाच गाडी घेतली नसती मी हातात" महेश मोठ्या आवाजात बोलला. यावर सुश्यांतनेही तिकडुन री ओढली "तुझ हे नेहमीचच आहे, जरा तुझा ईगो हर्ट झाला की बसायच ताठुन, कळतय कुणाला राग आलाय तो." "अरे इथे मला इजा झाली आहे आहे आणि तुला कळवळण्याचे कारण नाही. आणि तुझे फाल्त्तु टोमणेही नकोत ह्याच्यापुढे. क्रुपा करुन माझ्या गाडीवर बसु नका म्हणजे मी जो काही पडेल(घाबरुन किंवा चुकुन) तो माझ्या नशीबाने" महेश तावातावात बोलला. "बर झाल सुंठेविना खोकला गेला, नाहीतरी इथे कुणाला हॉस आहे दहा वेळा पडुन घेण्याची". त्याच्या या बोलण्यावर मात्र इनायत काहीसा हसला. हे पाहुन महेशने त्याच्याकडे रागात पाहीले तसा तो गप्प बसला पण सुशांतचा मात्र त्याला मनापासुन राग आला होता. एवढ्यात गणेशने मध्यस्थी केली व तो सुशांतला म्हणाला "पाटील तो काय मजा म्हणुन पडला नाही. एखादा दिवसच खराब असतो त्यात तुझ नशीब बलवत्तर की तुला फक्त खरचटलय त्याला तर लागलं ही आहे. आणि गाडीही दोनदा पडली जरा त्याच्या परिस्तीथीचा विचार करा" यावर मध्येच अपेक्षेप्रमाने तेजस बोलला "जल्ला पक्के लहानपणीचे मित्र शोभतात. आता भांडतील नी उद्या परत एक होतील. खरच ह्यांचा काही नेम नाही" आणी बहुतेकवेळा असच झाल असल्या-मुळे दोघांनीही एकमेकांडे पाहीले व हळुच दोघेही एकमे़कांकडे पाहुन हसायला लागले. हे पाहुन दिपक बोलला "ये हुयी ना बात आता जेवायला हरकत नाही" यावर इनायत म्हणाला "साला जल्दी से मंगाओ, नही तो मै भुक से तडप के मर जांऊगा" तर तेजस मात्र पदार्थांची सुची वाचण्यात दंग झाला होता. ह्या सर्व गोंधळात जेवणाची ऑर्डर घेणारा पोरगा केव्हाचा बाजुला येऊन उभा राहीला होता.
थकलेले असल्यामुळे महेश सोडला तर सर्वांनी जेवणावर येतेच्छ ताव मारला. महेशच्या ओठांना दात लागुन जखम झाली असल्यामुळे त्याने थोडासा डाळ भातच खाने पसंद केले. आलेली मरगळ झटकावी म्हणुन त्याने तोंडावर सोड्याचा प्रयोगही केला तेव्हा कुठे त्याला थोड बर वाटायला लागलं. जेवणानंतर गणेशने जमलेल्या कॉंन्ट्रीब्युशन मधुन खाण्याचे बिल पेड केले आणि सर्वांनी आपला मोर्चा बाजुच्याच पाणपट्टीच्या गादिवर वळवला. गणेश, दिपक आणि इनायत ने पान खाने पसंद केले, तर सुश्या आणि तेजस ने थोटुक पण महेश मात्र दुखर्याण तोंडामुळे यापैकी कशाचाच आस्वाद घेऊ शकत नव्हता. एव्हढ्यात दिपक म्हणाला "आयला आता इथेच झोपावस वाटतयं". "वाटतय? कशावर? पाट्यावर की मिक्सर मध्ये" तेजस खुश होउन बोलला. "ए हसा रे हसा" दिपक सर्वांना उद्देशुन म्हणाला आणि तेजस सोडला तर सर्वजण मोठ्याने हसायला लागले. "हा यार कंटाळा तर आलाय पण काय करणार संध्या़काळी लक्ष्मी पुजन आहे. कोनत्याही परिस्थीतीत आपल्याला सातच्या आत घरात गेल पाहीजे." गणेश जांभयी देत म्हणाला यावर सर्वजनांनी होकार दर्शवला. "ए मी मात्र आता कुठेही थांबणार नाही. दोन तासात मुंबई ट्च" तेजस तोर्यात बोलला. यावर महेश म्हणाला "बाबा सांभळुन. आधीच माझा दिवस खराब आहे आणि ह्याच्या पुढे काही झालं तर माझी सहन करण्याची अजिबात इच्छा नाहीये" (कारण आधीच ठरल्याप्रमाणे महेश त्याच्या मागे बसणार होता). तेवढ्यात सुश्यांत महेशच्या जवळ आला, "sorry यार मगाशी जरा जास्तच बोललो", "अरे कशाला मी काय कमी शेन खाल्ल" महेश बोलला "जाऊ दे विसरुन जा, पण खर सांगु कसलीतरी विलक्षन जाणीव मला गडावर असल्यापासुनच होत होती पण त्याचा उलगडा होत नव्हता, आणि त्यानंतरच हे पडझड सत्र सुरु झालं. जसा एखादा उथळ घोडा आपल्या पाठीवर कोणालाच स्वार होऊ देत नाही तसचं काहीसं माझ्या बाईकच्या बाबतीत घडतय आज." "ए प्लीज, डरा मत तेरी गाडी को मुझे चलाना है वो भी बंम्बईतक. एक तो पहलेसेही ये गाडी मुझे पसंद नही है. साला खाली दिखती अच्छी है लेकिन कब धोका दे इसका गॅरंटी नही" यावर त्याला धीर देत तेजस बोलला "अबे साले तु तो छावा है गाडी चलाने मे" यावर दिपकने ही इनायत गाडी कशी छान चालवतो याची पावती दिली. त्यांचा आपल्याविषयीचा कौतुक समारंभ ऍकुन इनायत शहारला. त्याच्याकडे पाहुन असे वाटत होते की त्याला आता विमान जरी दिले असते तरी तो पायलटच्या सीटवरच बसला असता.
थोड्याश्या विश्रांती नंतर सर्वांनी निघण्याचे ठरवले. "मी आता कोणासाठीही थांबणार नाही" तेजस बिनदिक्कत सर्वांसमोर बोलला. "आयला बरच आहे, सुंठेवाचुन खोकला गेला" दिपक खुश होऊन म्हणाला. यावर काही प्रतिक्रिया न देता तेजसने फक्त डोळे वटारुन त्याच्याकडे पाहीले व तो आपल्या बाईक-कडे रवाना झाला. "शिट...शिट......." गणेशला असे त्रयस्त उद्-गार काढलेले पाहुन सुश्यांत ने त्याला विचारले "काय रे, काय झालं?" "अरे काय होणार, मोबाईल ची बॅटरी ऑफ झाली. घरुन एक अर्जंट फोन येणार होता" "अरे हो यार, फारच मोठी पंचाईत झाली आपली", दिपक बोलला. "आपली म्हणजे???" सुशांत ने री ओढली. "अरे तेजसचा आणि महेशचा मोबाईल आपण गडावर होतो तेव्हाच बंद पडलाय. माझाही एक दोन तासच तग धरेल, मग संवाद साधायचा कसा? त्यात सकाळपासुन आपली उडालेली तारांबळ", "तसं टेन्शन घेण्याचं कारण नाही. माझं भ्रमणयंत्र अजुनतरी चालु आहे" सुश्यांतने कळवले. त्याचं बोलनं मध्येच तोडत काहीसं मिश्किल हसत तेजस बोलला "अरे संवाद साधायला आपण काही पत्रकार परिषद बोलावली नाहीये." "ए बाबा तु महेशला घे आणि हो पुढे", गणेश उद्-गरला. "तो तर मी जाणारच आहे आणि तुम्हीही या लवकर, नाहीतर एन दिवाळीत घरुन असे काही बांबु पडतील की अवघड जागी दुखनं होऊन बसेल हा हा हा........." निघन्याच्या अगोदर महेश दिपक आणि इनायत जवळ आला व त्याने शांत स्वरात त्यास गाडी जपुन चालवण्याची सुचना केली आणि पुन्हा सर्वजण बाईक्सवरती आरुढ झाले तेजस-महेश, ईनायत-दिपक आणि गणेश-सुश्यांत.
ढाबा सोडुन चांगले दिड-दोन तास झाले असतील. सवयीप्रमाणेच तेजस सर्वांच्यापुढे गाडी रेमटवत होता. महेश आपला त्याच्याच गुढ विचारात रमला होता. त्याला राहुन राहुन तेच आठवत होतं आणि मग मन उदास होत होतं. काल एवढ्या खुशीत निघालो, रात्रीचा तो थरारक प्रवास, शरीराने थकवणारी परंतु मनाला तजेला देणारी दुर्ग भ्रमंती, सार काही व्यवस्थीत चालल होतं पण....... ह्या पण चेच उत्तर काही केल्या मिळेनासे झाले होते. ह्या मनातील गुंता-गुंतीचा विचार करताच त्याची नजर सभोवतालच्या नजार्यावरती फिरत होती. वाकण, नागोठणे अशी एक एक करुन गावं मागे पडत होती. घड्याळाच्या वेगाबरोबर गाडीचाही वेग तेजस ने वाढता ठेवला होता. तो इतक्या निर्दयीपणे गाडी रेटत होता की काही क्षणी महेशला असे वाटलं की आत्ता आपण दुसर्या गाडीखाली जाऊ आणि क्षणात............... बस विचारही न केलेला बरा तो मनाशीच म्हणाला. पण पुन्हा कधीही ह्या रा़क्षसाच्या मागे असं जीव मुठीत घेऊन बसायच नाही याचा त्याने निर्धार केला. वडखळ नाका मागे पडल्यानंतर तेजसला उधानं चढल, त्याने आपला वेग अजुन वाढवला. बहुधा त्याचामुळेच त्याच्या बाईकचा स्पीडोमीटर बिघडला असावा. साधारण वढखळ ते जे.न.पी.टी हे अंतर तासाभराचे, परंतु तेजसने फक्त अर्ध्या तासात हे अंतर लीलया पार केले. अखेर न राहावुन महेशने तेजसला विचारले, "अरे दोन तास उलटुन गेले पण अजुन कोणाचाच पत्ता नाही. एखादा पीसीओ पाहुन जरा गाडी बाजुला लाव." "हा यार! मलाही तेच वाटत होतं", "आणि तरीही तु गाडी पळवतोयस" महेश चिडुन बोलला. "ठिक आहे बाबा, चिडु नकोस." असं म्हणत त्याने गाडी रस्त्याच्याच बाजुला एका छोट्याश्या टपरीवर लावली. गाडीवरुन पायउतार होताच महेशने तेजसला कोपरापासुन हात जोडले, "बस्स आज मजबुरी म्हणुन बसलो पण ह्यापुढे कधीच नाही", "अरे समजुन घेना सोन्या, काही करुन मला ६ वाजेपर्यंत घरी पोहचायचे आहे" तेजस विनंतीच्या स्वरात म्हणाला, "अरे असाच गाडी चालवशील ना तर नक्कीच पोहचशील, पण घरी नाही मो़क्षाला", महेश खोचकपणे बोलला. "हे बघ, मी गाडी आठवीत असल्यापासुन चालवतोय आणि माझी गाडी मला कधीच अशी धोका देत नाही समजलं. ते जाऊ दे ४.३० वाजलेत आणि आपण पणवेलच्या बॉर्डरवर आहोत, म्हणजे तासाभरात घर्र्.............री". "अरे धीर धर. आधी हे चौघे कुठे आहेत ते तर पाहु" महेश बोलला. "साला गणेश सोड. त्याची तर सवयच आहे कुर्मगतीने चालवण्याची. पण इनायत एवढ्या मागे पडणं अशक्य आहे. मला वाटत गाडीत काही तरी बिघाड झाला असावा, नाहीतरी दुसर्यांदा पडली तेव्हा जरा वेगळाच आवाज येत होता" तेजस चिंतातुर होत बोलला. "ए, इथे आधीच टेन्शन आहे अजुन घाबरवू नकोस" महेश रिसीव्हर कानाला लावत बोलला. झाल्या प्रकारांमुळे महेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. सर्वात पहीला त्याने दिपकचा नंबर ट्राय केला परंतु तो नॉट रिचेबल लागत होता. नतंर त्याने सुश्यांतचा फोन ट्राय केला. यावेळी मात्र रिंग वा़जली आणि क्षणात समोरुन सुशांतचा रडवेला आवाज आला.
सुशांत : अरे कुठे आहात तुम्ही, आत्ताच्या आत्ता परत या तुझ्या गाडीला पुन्हा अपघात झालाय एका दमात तो सर्व बोलला.
महेश : पाटील आता भंकस नको बस झाल आता अपघात अपघात खेळनं.
सुशांत : अरे मी खरंच भंकस करत नाहीये, तुझ्या गाडीचा आणि एका इंडीका कारची वाकण येथे जोरात टक्कर झाली आहे... प्लीज तुम्ही परत या काही करुन.
महेश : ठीक आहे तु काळजी करु नकोस कुणाला काही लागलय का?
सुशांत(रडवेल्या स्वरात) : अरे मला तर काहीच सुचत नाहीये इनायतची तर गुढघ्याची वाटीच फुटली आहे. दुखापत एवढी जबर आहे की तो पुन्हा normal चालु शकेल की नाही याची शंका वाटते. आणि दिपकच्या पायांनाही भरपुर घसपटलय. परंतु ईनायतच्या गंभीर दुखापतीपुढे त्याच्या जखमांचे भानच कुणाला राहील नाहीये. तरीही तो ठिक आहे. तुम्ही आधी कुठे आहात ते सांगा.
महेश : हे बघ आम्ही आत्ताच पनवेलच्या जवळपास पोहचलो आहोत. पण तु काळजी करु नकोस आम्ही लगेचच निघतो. आणि गणेश, दिपक कुठे आहेत?
सुशांत : काही वेळापुर्वीच ते त्याला गाडीत घालुन जवळच्याच हॉस्पीटल मध्ये गेलेत. मी इथे अपघातस्थळी उभा आहे व तुझी गाडी ही इथेच आहे. तर गणेशने त्याची गाडी इथे जवळपासच एका दुकानात ठेवली आहे ती तो उद्द्या किंवा परवा येऊन घेऊन जाणार आहे. मांझ तर डोकच काम करत नाहिये.
महेश : हे बग तु आधी शांत हो आणि व्यवस्थीत सांग पाहू कुठे यायच ते ?
सुशांत : नागोठण्यापासुन अलीकडेच खोपोली फाट्यापासुन काही अंतरावर, नदीवर एक अरुंद पुल आहे आणि बाजुलाच पोलीस चौकीही आहे.
महेश : हे बघ मी तासाभरातच पोहचतोय तिथे, तु धीर धर ok. बघितलस नाहीतरी मी तुम्हाला म्हणत होतोच की मला कसलीतरी विलक्षण जाणीव होतेय म्हणुन, पण नाही तुंच मला म्हणालास की मी घाबरल्यामुळे सर्व झाल मग आता हे कस काय झालं?
सुशांत : please yaar ते सर्व सोड आता आपण नंतर चर्चा करु या विषयावर. त्याआधी मला ईनायतची फार काळजी वाटतेय रे.
महेश : ठेवतो आता तरीही मधुन-मधुन फोन करीन.tension घेऊ नकोस.
फोन ठेवल्यानंतर महेश अगदी सुन्न झाला. त्याला त्या अवस्थेत पाहुन तेजस काहिसा काळजीच्या स्वरात बोलला "काय रे काय बोलला? आणि तु ते accidents वैगरे काय बोलत होतास? please सांग ना काय झालं ते?" "तेजस अरे माझ्या गाडीला पुन्हा अपघात झाला रे, आणि ईनायतच्या पायाला गंभीर दुखापतही झाली आहे. दुखापत एवढी जबर आहे की तो पुन्हा ठिकपणे चालु शकेल की नाही याची शंका वाटते. दिपकला ही बर्यापैकी लागलय". सुरवातीचे लागलय हे शब्द ऐकून तेजस विचारांच्या गर्तेत गेला. त्याच्या डोळ्यासमोर हसरा ईनायत तसाच उभा होता, त्याच्याबरोबर कधीही कुठेही येणारा, कोनतेही कार्य असो केव्हाही नाही न बोलणारा ईनायत, आपल्या जखमी पायाकडे पाहुन विव्हळणार्या नजरेतुन जणु काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे... नुसत्या विचारानेच त्याच्या अंगभर मुंग्या संचारल्या व तो म्हणाला "महेश, चल आता मला एक क्षणभर ही येथे थांबवत नाहीये. अरे खरंच त्याला माझी गरज असेल. shit, साला माझ्यामुळेच झाल सर्व. कालही त्याला मीच फोर्स केला चल म्हणुन, सकाळीही त्याला pulsar आवडत नसताना मीच चालवण्यासाठी आग्रह धरला. आता त्याच्या आई-वडिलांना काय सांगु? की तुमचा मुलगा आता लवकर किंवा कधीच व्यवस्थीत चालु अथवा पळु शकणार नाहीये?" बोलता बोलता त्याच्या डोळ्यातुन अश्रु ओघळले. हे पाहताच महेशने लगेचच त्याला आपल्या जवळ घेतले, "हे बघ तु कसलेही वाईट-साईट विचार करु नकोस. आपण आधी घटनास्थळी जाऊया मग ठरवु काय करायच ते", आणि दोघेही तडक वाकणच्या दिशेने निघाले. ईनायतच्या काळजीने तेजस एखाद्या धुमकेतुच्या वेगाप्रमाणे गाडी चालवत होता. बाईकच्या प्रचंड वेगाने महेशच्या डोळ्यातुन गंगा-जमुना वाहु लागल्या आणि भितीचं वेगळ सांगायला नको. आज भीती नावाची गोष्ट खरच अस्तित्त्वात असती तर तिलाही भिती वाटली असती. वीस मिनिटांच्या रेकॉर्ड ब्रेक वेळेत दोघे वडखळ नाक्यावर पोहचले. तेथे येताच महेशने तेजसला गाडी थांबवण्यास सांगुन सुश्यांतला फोन केला. तेव्हा त्याने सांगितले की "ईनायतचा भरपुर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यास ambulance ने सायन हॉस्पीटल मध्ये हालवले आहे. बहुतेक ते आत्ता रस्त्यातच असतील. तर तु तेजसला हॉस्पीटलमध्ये जायला सांग आणि तु ईथे ये. पोलिस केस झाल्यामुळे तुझी गाडी नागोठणे पोलीस ठाण्यात नेली आहे." झाला प्रकार महेशने तेजसला ऐकवला, तसा तो तिथुन तडक हॉस्पीटलच्या दिशेने निघाला व इकडे महेश मिळेल त्या वहानाने घटनास्थळी पोहचला. तेव्हा संध्या़काळचे सात वाजले होते व समोरच सुश्यांत गलित गात्र अवस्थेत उभा होता. महेशला समोर पाहताच त्याने क्षणाचाही विचार न करता त्याच्याकडे धाव घेतली. "महेश काय झाल यार, मला तर तो अजुन तसाच डोळ्यासमोर दिसत आहे." सुश्यांत काकुळतीच्या स्वरात बोलला. "हे बघ तु आधी शांत हो. आणि मला सविस्तर काय झाल ते सांग." तेव्हा सुश्यांत ने झाला सर्व प्रकार कथन करण्यास सुरवात केली.
"तुम्ही पुढे गेल्यानंतर आम्ही आरामात येत होतो. एक चार-साडे चारच्या सुमारास एका हॉटेलवर आंम्ही चहा पिण्यासाठी थांबलो सुद्धा, चहा पितानाच आम्ही सकाळच्या पडझड सत्राविषयी पुन्हा चर्चा केली. तेव्हा बिचारा ईनायत गणेशला बोलला सुद्धा की पनवेल पर्यंत आपण एका पाठोपाठ बाईक ठेवुया एकदा पनवेल गेले की काही टेन्शन नाही. त्यानंतर थोडे जोक वैगेरे झाल्यानंतर आम्ही तेथुन निघालो. पंधरा एक मिनिटानंतर या पुलावरुन गणेश ने एका जीपला overtake केला, तेव्हा ईनायत आणि दिपक आमच्या मागेच होते. क्षणात मोठा आवाज झाला तेव्हाच माझ्या मनात आलं की आपलीच गाडी असेल. गणेशनेही आवाज ऐकताच जागेवरच गाडी थांबवली. मागे वळुन पाहतो तर काय दिपक मागच्या मागे उडुन डाव्या बाजुला पडला होता, तर ईनायत रस्त्याच्या मधोमध कळवळत होता. आम्ही पहीली धाव ईनायत कडेच घेतली. टक्कर एवढी भीषण होती की इंडिकाचा पुढचा टायर जागीच फुटला व ती कठड्यावर जाऊन आदळली. गाडी थेट ईनायतच्या उजव्या गुडघ्यावर आदळल्यामुळे गुडघ्यावरील मांस फाटुन आतल सर्व दिसत होतं. मला बघताच चक्कर येऊन उलटीसारख वाटु लागल. अरे आमच तर सोड ईनायतला तर बिचार्याला प्रथमदर्शनी कळलच नाही. त्याने पहील हाताला तोंडाला कुठे काही लागलाय का ते पाहीलं, पण जेव्हा त्याची नजर पायाकडे वळली तेव्हा त्याने आमच्याकडे एकदा व्याकुळ नजरेने पाहीले. त्याच्या तोंडातुनतर आवाजच निघत नव्हता. इतक्यात दिपक लंगडत लंगडत आला. ईनायतची ती अवस्था पाहुन त्याला बिचार्याला उचलण्याचही भान कोणाला राहील नाही. एव्हाना पुलावर बरीच गर्दी जमली होती. दुतर्फा गाड्या जाम झाल्या. तेव्हा सुदैवाने गर्दीतुनच एक इसम आपण डॉक्टर असल्याचे सांगुन पुढे आला व त्याने पटकण इनायतवर प्राथमिक उपचार केले. बाजुलाच चौकी असल्यामुळे पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन ambulance ची व्यवस्था करुन दिली. ईनायतचीतर पुर्न पॅंन्ट रक्त्ताने भिजली होती. अतिरक्तस्त्रावामुळे बिचार्याच्या अंगात काहीच त्राण ऊरले नव्हते. जणुकाही दातखिळीच बसली असावी. तशाही परिस्थीतीत दिपकने आपल्याला काही लागलय याचा विचार न करता, तो आणि गणेश ईनायतला hospital मध्ये घेऊन गेले. तेव्हा गणेशनेच तिकडुन फोन करुन त्याला urgent सायन hospital ला नेत आहोत हे कळवले. मला मात्र पोलीसांनी इथेच थांबण्यास सांगितले. पंचनामा करताना त्यांनी गाडीचा मालक आणि कागदपत्रांविषयी विचारपुस केली, असता मी खर काय ते सांगितले. त्यात दुर्दैव असे की इनायत जवळ driving license नव्हते. मग फारच पंचाईत झाली आता केस होणार. गाडीतर पोलिस घेऊन गेलेच आहेत. मग पुन्हा त्याच्यासाठी त्यांची वेगळी आळवणी करा आणि भरीस भर म्हणुन घरच्यांच्या शिव्या. साला निघताना कुणाच तोंड पाहील होतं काय माहीती? असो, देवा बाकीचं काही झाल तरी चालेल, पण बिचार्या ईनायतला लवकर बरं कर." सुश्यांत काळजीच्या स्वरात बोलला. महेश मात्र शून्यात नजर ठेऊन समोरील द्रुश्य पाहात होता. संध्याकाळचे आठ वाजले असतील घरा-घरात पणत्या लागल्या, कंदीलही मंद प्रकाशात आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होते, छान गेरुच्या सड्यावरती सुबक रांगोळ्या रंगु लागल्या, त्यास जोड ती फटाक्यांची वातावरणात एक मंदसा सुवास भरुन गेलेला जणु काही लक्ष्मीच आपल्या हातांनी दरवाज्यावर दस्तक देत आहे असे मंगलमय वातावरन पण...........
होय या "पण" चे उत्तर महेशला आता मिळाले होते. राहुन राहुन त्याला आईचा हसरा चेहरा, तर बाबांची पुजेसाठी चाललेली धडपड आठवत होती. परंतु आता यापैकी काहीच आनंदायला मिळणार नव्हते..........................
कथा लई भारी पन खरी असल तर लई
कथा लई भारी पन खरी असल तर लई सॉरी.
कथा चांगली, पण हा अनुभव वाईट.
कथा चांगली, पण हा अनुभव वाईट. पुढच्या वेळेस जरा शुद्धलेखनाकडे लक्ष द्या.
कथा चांगली जमली आहे...वातावरण
कथा चांगली जमली आहे...वातावरण निर्मिति मस्त...
सुन्दर.
सुन्दर.
श्री आऊटडोअर्स तुम्हाला कथा
श्री आऊटडोअर्स तुम्हाला कथा वाचताना झालेल्या त्रासाबद्दल क्षमा असावी परंतु ही कथा मी आधी लिहुन ती word format मध्ये save केली होती त्यामुळे त्यात काही वाक्यांमध्ये फरक पडला असावा. परंतु एक लेखक म्हणुन मी या गोष्टींचा नक्कीच विचार करेन.
सर्व वाचकांचे मनापासुन आभार
आपला विश्वासु,
श्रीमत्.
धन्यवाद.
धन्यवाद.
छान कथा आहे ! आवडलि आहे
छान कथा आहे !
आवडलि आहे !
लिखान देखिल!
शैलिदार झाले आहे !
चांगली आहे. पण ते महड चे महाड
चांगली आहे.
पण ते महड चे महाड असायला हवे.
ईन्टरफेल आणि सस्मित धन्यवाद.
ईन्टरफेल आणि सस्मित धन्यवाद.