खुप वेळा ' मन रानात गेले गं , पाना पानात गेलं ग ' असे गुणगुणत उड्या मारत रानात स्वछंदपणे फिरावेसे वाटते . एखादे छान गाणं कानावर पडावे ..अणि मग मी त्या गाण्याची नायिका व्हावे अशी एक कल्पना किती सुखद असते !!
आयुष्य क्षणभर कुठेतरी थांबले आहे असे उगाचच वाटते . पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडतो आहे . आणि बैलगाडी चे सर्जा आणि राजा गळ्यातली घुंगरांची माळ वाजवून रस्त्यातल्या लोकांना आपण येत आहे अशी ग्वाही देत आहेत. मी त्यांना "हुर्रर्र " म्हणून वेगाने चालायला सांगते आहे आणि मग हलकेच माझा वेग वाढला आहे असे वाटायला लागते.
पण मग जाणवते अरे गाणं कानावर पड़ते आहे ..पण आपण पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यावर आहे . भोवताली जे सुन्दर तलावाताले पाणी वाटते आहे ते रस्त्यावरच्या खड्ड्यात जमलेले बाजुच्या फुटक्या drainage pipe चं पाणी आहे .मागे कानाशी वाजणारे हॉर्न चे आवाज मला माझा वेग वाढवायला सांगत असतात. घुंगरांच्या आवाजाइतका सुखद भाव मात्र तिथे नसतो . "हुर्रर्र" आवाजाने सर्जा राजाला मी गोंजारते आहे अशा सुखद कल्पनेला तडा देणारा आवाज येतो " ओ बाई हला कि , आssss ईsssssला काsssय वैताग आहे !!! "
कल्पनेतल्या गावातल्या रस्त्यांवरून मी माझ्या झोपडीत येते . आणि मग अग्गबाई अरेच्चा मधल्या गाण्याप्रमाणे " मेघ सावळा माझा राजा , भोळा भाबडा माझा राजा .. माझ्यावरी त्याची डोंगरा एवढी माया " असे गुणगुणत असताना ...राजा येतो ,खांद्यांवरून गवताची गंजी खाली टाकतो.रांगडा वाटणारा कल्पनेतला राजा ओंजळीतून पाणी पिताना हलका इशारा करत आहे असे वाटायला लागते. त्यावेळी त्याने खांद्यावरून खाली टाकलेले गवत पण सुंदर वाटत असते.
कल्पना रंगत असतात ...
आणि वास्तवात मी खड्डयातून गाडी काढत पुढे निघालेली असते. इतक्यात घर येते. माझी गाडी पार्क करून मी माझ्या घरात जाते. घराचे टाळे माझे स्वागत करते आणि मी स्वगत करत घरात शिरते.... ' रोज कुलूप उघडायला मीच .. एक दिवस ह्याला लवकर नाही येता येत. ' गाण्यातल्या प्रेमाची जागा माझा त्रागा घेतो. आणि मग मेघ सावळा आजिबात वाटणार नाही असा माझा शहरी नवरा घरात शिरतो. हातातली भाजीची पिशवी खाली ठेवतो. आणि ' पुन्हा हीच भाजी . जर्रा म्हणून काही वेगळे आणायला नको ' असे आवाज ओठात अडकून राहतात. गवताच्या गंजीकडे कौतुकाने पाहणारी मी भाजीकडे पाहून संतापते. ( पुन्हा वैताग !! ). " जरा पाणी देतेस ? " त्याचा आवाज येतो . " रोज काय रे मीच पाणी आणायचे. मी पण आत्ताच आले आहे ना? " माझा आवाज गरजतो. कल्पनेतल्या इशाऱ्याची जागा त्याच्या तीक्ष्ण कटाक्षाने घेतलेली असते.
संध्याकाळी चुलीपाशी फुंकणी हातात घेऊन मी बसले आहे. भाकरया भाजते आहे. आणि माझ्या डोळ्यात धुराने पाणी आले आहे . मी डोळे चोळते आहे आणि माझा नवरा जवळ येऊन डोळ्यात फुंकर मारून माझा त्रास कमी करतो आहे . आनंदात भाकरी भाजी हातावर घेऊन अन गोड मानून आम्ही खात आहे. असे स्वप्न पाहताना....
पिझ्झा चे खोके घेऊन चिरंजीव शिरतात आणि " आई गं आज तुला सुट्टी !!! Dominos ने नवीन flavor आणला आहे म्हणून मी आपल्याला पिझ्झा आणला आहे ." असे जाहीर करतात . मग काय ?? हातावरच्या भाकरीची जागा पिझ्झा घेतो . भाजी वेगळ्याने घ्यावी लागत नाही, ती त्यातच आलेली असते . पण तो पिझ्झाहि हातातच घेऊन आम्ही गोड मानून खातो. ( मुळात त्याचा कंटाळा आलेला असतो , कल्पनेतली भाकरी आठवून जीव तुटत असतो . ' कार्ट्याला कसले पिझ्झे आवडतात ?' असे वाटत असते ) .चूल लावलेलीच नसते त्यामुळे धूर , नवऱ्याचे कौतुकाने जवळ येणे स्वप्नातच राहते.
रात्र होते.... " शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला , थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला " असे शब्द गुणगुणत मी खोलीत येते. आणि आता मात्र ... स्वप्न खरे होईल असे वाटणारे वातावरण माझ्या साजणाने खोलीत निर्माण केलेले असते. माझ्यासाठी आणलेला मोगरा खोलीत दरवळ पसरवत असतो.
अचानक सर्जा राजाला " हुर्र्र" म्हणताना फेटा घालून बसलेला माझा नवरा , पाणी पिताना इशारा करणारा रांगडा गडी वाटणारा माझा नवरा , चुलीपाशी डोळ्यात फुंकर घालणारा माझा नवरा असे सगळे जण माझ्या शहरी नवरयाच्या भोवतालून मला खुणावत आहेत असे वाटायला लागते.
मी मनातून लाजून जाते. एवढा वेळ मनातल्या मनात चालू असलेले गाणे मी गुणगुणायला लागते.
स्वप्नातला दिवस आणि स्वप्नातला गाव नसे ना का नशिबात ....पण स्वप्नातला राजकुमार आता माझा राजा आहे या वास्तवातल्या जाणीवेने मी सुखावते आणि पुन्हा एकदा "स्वप्नाच्या गावा जावे" म्हणत नवरयाच्या मिठीत शांतपणे झोपून जाते .
रुपाली सहीच.
रुपाली सहीच.
सून्दर. अप्रतिम. लेखन शैली
सून्दर.
अप्रतिम. लेखन शैली आहे रुपाली तुमच्याजवळ.
सहिच.
छान ग, मजा आली, थोड तुझ्या
छान ग, मजा आली, थोड तुझ्या विश्वात डोकावून... लिहीत रहा..
मानलं बाबा. खरेच प्रतिभावंत
मानलं बाबा. खरेच प्रतिभावंत आहेस! फारच छान!
सुंदर गं!
सुंदर गं!
चांगलयं.. पण कथेपेक्षा ललित
चांगलयं.. पण कथेपेक्षा ललित मध्ये जास्त सुट होईल..
वाह काय मस्त लिहल आहे ....
वाह काय मस्त लिहल आहे .... खुप आवडल.
मोजक्या शब्दात खुप काहि...
चिंगी - ललित मध्ये टाकण्याचा
चिंगी - ललित मध्ये टाकण्याचा विचार होता. अगदी ऐन वेळी कथा निवडले कारण हि काल्पनिक कथाच आहे .
सुरेख
सुरेख
छान जमली आहे गावाची सहल !!
छान जमली आहे गावाची सहल !!
रुपाली तुझ्या कल्पनेला
रुपाली तुझ्या कल्पनेला चांगलेच पंख फुटलेत्..छान भरारी घेतीयेस!! आवडली..
मस्त आहे..माझ्याही मनात असेच
मस्त आहे..माझ्याही मनात असेच काहीतरी चाललेले असते..वास्तवात आले की मात्र चांगलीच भांड्णे होतात, होर्न वाजवणार्यांशी, रिक्षावाल्यांशी, नवर्याशी इ.इ.
रुपाली, ही पण छान आहे कथा
रुपाली, ही पण छान आहे कथा
तुझी लिहीण्याची सहज्-सुंदर शैली आवडली...
खुप मस्त तुझ्या कल्पनेला
खुप मस्त तुझ्या कल्पनेला मानलं बुवा!!
छान लिहिलिय्स कथा.. आवडली..
छान लिहिलिय्स कथा.. आवडली..
सुंदर............... अगदी
सुंदर...............
अगदी स्वप्न जगल्यासारखं वाटलं...................
सुंदर अगदी स्वप्न जगल्यासारखं
सुंदर
अगदी स्वप्न जगल्यासारखं वाटलं.
(No subject)