आतापर्यंत कॉर्पोरेट जगातील व्यवहारापासून उगम पावलेल्या माझ्या काही रुपक कथा आपण वाचल्यात. त्यावर दिलेल्या बऱ्या वाईट प्रतिसादापासून नवे काही काही शिकायला मिळाले.
ह्या आधीच्या कथा कॉर्पोरेट जगातील काही विशीष्ट वागणुकी मधे उगम पावल्या होत्या. ही पुढची कथा मात्र ह्या जगाचेच चित्र रेखाटण्याचा एक प्रयत्न आहे. मागे जालावर तीन तारांवर बसलेल्या पक्ष्यांचे एक शिटी चित्र पाहिले होते. त्यावरून ही कथा सुचली. हे जग इतके गुंतागुंतीचे आहे, की कोणतेही एक चित्र त्याचे नीट दर्शन घडवू शकत नाही. त्यामुळे, त्रुटी राहिल्या असणारच. पण तरीही..............
पक्ष्यांची सभा
एका फ़ळाफ़ुलांनी बहरलेल्या विस्तीर्ण वृक्षावर अनेक पक्षी यायचे. जागेवरून आपापसात अनेकदा भांडणे आणि तह झाल्यावर त्यांनी बसण्याच्या जागांची एक सर्वमान्य व्यवस्था बनवून ठेवली होती. सगळ्यात शक्तीशाली पक्षी अगदी वरच्या फ़ांद्यांवर बसायचे. त्यांच्या वर ते कोणालाही बसू द्यायचे नाहीत. कोणी तसा प्रयत्न केलाच तर त्याचा ताबडतोब नाश करायचे. त्याच्या खालच्या फ़ांद्यांवर पाच सहा पक्ष्यांनी आपला हक्क प्रस्थापित केला होता. त्याही खालच्या भागात जवळ जवळ वीस एक पक्षी, आणि सगळ्यात खाली पन्नास एक, अशा प्रकारे सगळे जागा पटकावून बसले असायचे. मधेच उडून दाणा-पाणी घेऊन पुन्हा आपापल्या जागी यायचे.
असे कित्येक महीने चालू होते. वरच्या पक्ष्यांची शिट खालच्या फ़ांद्यांवर बसलेल्या पक्ष्यांवर पडायची. खालच्यांची त्याच्या खालच्या, असे होत होत, खालच्या भागातील पक्ष्यांच्या अंगावर शिटचा मोठा थर जमायचा. त्यामानाने वरच्या पक्ष्यांच्या अंगावर कमी शिट असायची. सगळ्यात खालच्या थरावरचे पक्षी नाईलाजाने शिटचा सगळ्यात मोठा थर अंगावर घेऊन बसायचे. त्यांची स्वत:ची शिट अर्थातच मातीला मिळायची.
जंगलच्या जीवनमानानुसार, प्रत्येक थरावरील पक्ष्यांमधे विविध अंगीभुत गुण असलेले पक्षी होते. काही बिचारे वरून येणारी शिट शिरोधार्य मानून स्विकारायचे. काही थोडा आरडाओरडा करून मग चुप बसायचे. काही पक्षी मात्र शिट चुकवण्यात हुशार होते. ह्यासाठी अनेक क्लुप्त्या योजल्या जायच्या. काही जण वरून येणारी शिट आधीच बघून शिताफ़ीने बाजुला होत, आणि ती मग खालच्या पक्ष्यांवर पडे. येणारी शिट वेळेत बघणे जमले नाही, तर अंग जोराने झटकून ती शिट आजुबाजुंच्या पक्ष्यांवर उडवण्यात काही जण तरबेज होते.
सगळ्यात कुशल पक्षी आपल्या जागेवर चुपचाप न बसता, वरच्या फ़ांद्यांवर सतत उडून जायचे. अर्थात तिथे त्यांना कायम बसणे शक्य नव्हते, तरी ते वरच्या फ़ांद्यांवर बसलेल्या पक्ष्यांच्या आजुबाजुला उडत, किंवा गप्पा मारायच्या मिषाने तात्पुरते बूड टेकवित. अशा वेळेस, ते वरून खाली शिट टाकायला विसरत नसत. यामुळे खालच्यांच्या वाट्याला येणारी शिट दुप्पट व्हायची. म्हणजे वरून येणारी अधिकृत, आणि वरच्यांच्या कानात सतत गुणगुण करण्याऱ्या ह्या खालच्यांची “अनाहुत” शिट!
अशी कित्येक वर्षे गेली. सगळ्यात खालच्या पक्ष्यांनी सातत्याने जमिनीवर पाडलेली स्वत:ची आणि इतरांची शिट जमिनीत जाऊन छान खत तयार झाले. तिथे शिट मधली बीजे रुजून नविन वृक्ष उगवले, आणि खतामुळे ते जोमाने वाढले. त्यांच्या फ़ळाफ़ुलांनी बहरलेल्या फ़ांद्या आता ह्या गोष्टीतल्या वृक्षाच्या खालच्या फ़ांद्यांपर्यंत . त्यांच्या बरोबर खूप नविन पक्षी देखील आले. गर्दीमुळे काही खालच्या पक्ष्यांची नेहमीची बसायची जागा मात्र गेली. त्यातले शहाणे होते, त्यांनी उडून वरती दाटीवाटीत का होईना, किंवा नविन वृक्ष पाहून वर-खाली, मिळेल तशा जागा पटकावल्या. जे शिटचे गतिविज्ञान न समजता, स्वच्छ जागेच्या शोधात इस्तत: भटकले, त्यांना इतक्या दाट वनराईत देखील आपली म्हणावी अशी कायम जागा लाभु शकली नाही. झाडांवरून झाडांवर नाना प्रकारची शिट सहन करत भटकणेच त्यांच्या नशिबी होते.
बोध-
१) वाट्याला येणारे काम कितीही शिटी वाटले तरी त्यातून कुठेतरी, काहितरी उत्पादन होत असतेच. त्याचा कमी-अधीक वाटाही यथावकाश मिळतोच.
२) कामे आपल्या अंगावर ओढवून न घेता, स्वत:ची आणि इतरांची जास्तीत जास्त मात्रेत वाटून टाकणाराच यशस्वी ठरतो.
३) कुठलेच काम किंवा परिस्थिती “स्वच्छ” नसते.
व्वा अरूण मान गये उस्ताद...
व्वा अरूण मान गये उस्ताद... काय मस्त! कंपनी आणि वास्तव जगताचे तत्वज्ञान कोळून प्यायला आहात वाटते... नवीन इसापनिती काढावी लागणार अरूणनिती नावाने...
पक्षांचे ऐवजी पक्ष्यांचे हवं... हे पक्ष म्हणजे राजकीय पक्ष वाटताहेत.
कामे आपल्या अंगावर ओढवून न घेता, स्वत:ची आणि इतरांची जास्तीत जास्त मात्रेत वाटून टाकणाराच यशस्वी ठरतो.>> अगदी बरोब्बर! (माझ्या फ्रस्ट्रेट होणार्या आणि मान मोडून सिन्सेअरली काम करणार्या नवर्याला मी हेच सांगत असते... एथिक्स को मारो गोली... डिप्लोमसी आणि प्रोफेशनलिझम आर द सक्सेस कीज.
बाकी मस्तच! लिहीत राहा... पुलेशु
आजपर्यतच्या सगळ्या कथा
आजपर्यतच्या सगळ्या कथा वाचल्या आणि आवडल्या. किंबहुना यातुन स्फुर्ती घेऊन सत्तांतर कथा लिहिली आहे. नजरेखालुन घालावी.
जे शिटचे गतिविज्ञान न समजता,
जे शिटचे गतिविज्ञान न समजता, स्वच्छ जागेच्या शोधात इस्तत: भटकले, त्यांना इतक्या दाट वनराईत देखील आपली म्हणावी अशी कायम जागा लाभु शकली नाही. झाडांवरून झाडांवर नाना प्रकारची शिट सहन करत भटकणेच त्यांच्या नशिबी होते.
अगदी बरोबर. कुठेही गेले तरी फक्त मणसांची नावे बदलतात. बाकी प्रव्रुत्ती त्याच असतात...
dreamgirl -- धन्यवाद.
dreamgirl -- धन्यवाद. पक्ष्यांची... इत्यादी बदल साठवले आहेत.
नितीन- आधीच प्रतिसाद दिला होता तुमच्या कथेवर. मस्तच आहे.
आवडली गोष्ट.
आवडली गोष्ट.
छान लिहिलय.. कथा आजच्या घडीला
छान लिहिलय.. कथा आजच्या घडीला चपलख बसते..
छान आहे कथा.
छान आहे कथा.
कथा आवड्ली. मुख्य म्हणजे
कथा आवड्ली. मुख्य म्हणजे कॉर्पोरेट वल्र्ड प्रमाणेच ब्रिस्क आणि चटपटीत पण 'बॉटम" लाईन लक्षात ठेउन पुढे सरकणारी आहे. अभिनंदन आनि शुभेछा.
त्याच्या बरोबर फोटो पण
त्याच्या बरोबर फोटो पण टाकायचा ना?
गोष्ट छान आणि फोटो पण छान.
गोष्ट छान आणि फोटो पण छान.
एकदम झकास
एकदम झकास
कथा छान अन् फोटो ही छान्....!
कथा छान अन् फोटो ही छान्....!
या कथा मॅनेजमेण्ट फंडे म्हणून
या कथा मॅनेजमेण्ट फंडे म्हणून आधी इंग्रजीत वाचल्या होत्या. आता मराठीत वाचतांना जास्ती मजा आला.
कथा ,फोटो दोन्ही छान.
कथा ,फोटो दोन्ही छान.