त्या दोघांचे कसे जमले कुणास ठाऊक...
कारण ती म्हणजे रिमझिम पावसाची सर
जिथे जाणार तिथे बरसणार्.......भेटेल त्याला चिंब चिंब करुन टाकणार
तर हा नेहमीच शांत राहणारा.....आपल्या मर्जिने वाहणारा वारा....
आपल्याच विश्वात दंग्......सभोवार कोण याचे भान न ठेवणारा...........
पण एक दिवस दोघे भेटले.....भेटले कसले आदळले........
आणि एक वादळ आले दोघांच्या आयुश्यात........
ती मनात म्हटली कसले हे ध्यान आयुश्यात कधी हसला असेल कि नाही देव जाणे.........तर तो आपला विचार करतोय कसली ही बावळट अजिबातच अक्कल नाही....कॉलसेंटरच्या लोकांसारखी सतत बड्बड्......तो जाम वैतागला होता....
......................................................................................................
आज तिचा ऑफिसचा पहिला दिवस होता..मॅनेजर प्रोजेक्ट अलोकेट करुन तिला टिम-मेंबर्स सोबत इन्ट्रोंड्यूस वगैरे केले आणि मग शेवटी तिच्या जागेवर स्थानापन्न झाली.अनु आपली मध्यम वर्गिय घरातली साधी-सरळ मुलगी आणि आज एवढी मोठी मल्टीनॅशनल कंपनी पाहुन खरे तर मनातून ती थोडी धास्तावलेली इथले वातवरण पाहुन आपले इथे कसे होणार असा विचार ती सध्या करत होती.......तेवढ्यात त्याची एन्ट्री झाली....दिसायला टापटीप ,चेहरा उजळ आणि कपडे एकदम प्रोफेशनल अणि लूक पण तसाच !!!!!!!! आणि मग त्याने तिच ठेवणीतली आपली प्रोफेशनल स्माईल दिली.
ही आपले काहितरी बोलावे म्हणून हाय म्हणाली..आणि मग आपण कुठ्ल्या कॉलेजचे , आपले गाव , आपले इंजिनीअरींग .....झाल्या मॅड्म सुरू...... अनिकेत आपला विचार करतोय कधी थांबते हिची एक्स्प्रेस ??????
अनिकेत : थांबली !! थांबली एकदाची ..हुश्श्!
अनु: अरे हा काही बोलत का नाही..
आणि आले त्याचे तेच स्माईल.जाउदे आपल्याला काय करायचे आहे असले भाव त्याच्या चेहर्यावर. आणि लागला कामाला. नंतर एक शब्द देखिल तोंडातून निघाला असेल तर शप्पथ्....
अनु: चला अनु मॅम आता कामाला लागा असलेच विचित्र प्राणी भेटणार इथे ...तय्यार रहा..
अनुचे ऑफिसदर्शन पहिल्या मजल्या पासुन तर सातव्या मजल्या पर्यंत करुन झाले आणि आज असाच सगळा दिवस टाईमपास करण्यात गेला. ..
बघु आता तो आणि ती चे पुढे काय होते...........
क्रमश....
येऊद्या लवकर पुढचे
येऊद्या लवकर पुढचे भाग...लेखनासाठी शुभेच्छा!
छान लिहलय, पुलेशु.........
छान लिहलय, पुलेशु.........
अश्विनी, सुरुवात चांगली आहे
अश्विनी,
सुरुवात चांगली आहे ..
तुमचा एक छानसा नविन आयडी केला तर मस्त होईल ...
अनु म्हणजे कोण ?
तुम्हा सर्वांचे खुप खुप
तुम्हा सर्वांचे खुप खुप धन्यवाद्....लिहिते लिहिते...लवकरच्.....आणि हो नक्कीच काही तरि आयडिया आणते..
वा वा, छान सुरुवात, लवकर
वा वा, छान सुरुवात, लवकर येऊद्यात पुढचा भाग.
पाहुयात तो आणि ती चे पुढे काय होते ....
पु.ले.शु
पु.ले.शु
अश्विनी, सुरूवात छान आहे पण
अश्विनी, सुरूवात छान आहे पण घाबरत घाबरत छोटूसा भाग पोस्टलेला दिसतोय... पुढचा भाग थोडा मोठा आणि आधीचा विसरून जायच्या आधी टाक...
आणि हो नक्कीच काही तरि आयडिया आणते..>> अगं बायो आयडिया नव्हे गं (आत्ताच भेट्लेत नी आयडिया कसल्या... आधी ओळख तर होऊदे पुरेशी...)
अनिल७६ म्हणत आहेत तो gmail id टाकला आहेस ना त्याऐवजी छान नाव (आयडी... युजरनेम) घे...
किति वेळ लावताहो.... अशाने
किति वेळ लावताहो.... अशाने आधिचा भाग विसरुन जाऊ आम्हि...
छान !
छान !