ती आणि तो ३ : http://www.maayboli.com/node/20463
आता अनुला ऑफिसमधे खुप काम असायला लागले होते. ती आपले काम करण्यात मग्न असे याचे कारण असे की काम शिकायला मिळत होते आणि तिला ते आवडत असे.पण ह्या गोष्टीमुळे तिला काही वेळा ऑफिसमधे उशिरापर्यंत बसावे लागत असे.टीममधील बाकी मंडळी असत पण तुरळक.पण एक व्यक्ती मात्र नेहमीच ती ऑफिसमधे असेपर्यंत तिचा मुक साथीदार असे ,ती व्यक्ती म्हणजे अनिकेत. आता एसी प्रकरण मिट्ल्यानंतर दोघांमधे क्वचितच काही संवाद झालेला होता ,फक्त रोज सकाळी आल्यावर एकमेकांना गुडमॉर्निंग तेवढे म्हणत असत.अनुच्या मते अनिकेत नावाच्या व्यक्तिला स्वतःच्या कामाव्यतिरिक्त काहिच कुणाशी पडलेले नसे तर अनिकेत विचार करत होता आता अनु बाळ मोठे होत आहे वाटते ,काम करायला लागलेले आहे त्यामुळे आता जास्त आवाज करत नाही.
शुक्रवारची संध्याकाळ ...ऑफिसमधे तुरळक पब्लिक दिसत होते अफ कॉर्स इट्स फ्रायडे!
सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणार्या प्रत्येक व्यक्तीला सोमवारी सकाळी ऑफिसमधे पाय ठेवताच शु़क्रवारचे वेध लागतात कारण शु़क्रवारनंतर त्यांचा विकेन्ड येणार असतो ना दोन दिवसांचा सुट्टीचा!! त्यामुळे प्रत्येक व्यक्ती शुक्रवारची अगदी मनोभावे वाट पाहत असतो आणि त्यादिवशी आपले काम लवकरात लवकर आटोपुन कलटी कधी मारता येइल या बेतात असतो. जसा वेळ जात होता तसे ऑफिस खाली होत होते .आता चक्क साडे आठ वाजलेले होते ,सेकंड शिफ्टमधले काही पब्लिक धरुन अगदी बोटावर मोजण्याइतकी डोकी आता दिसत होती .अनिकेत ने आपली नजर सहजच सभोवार फिरवली तर पाहतो काय अनु मॅडम अजुन समोरच ,आपल्या डेस्कटॉपवर नजर खिळवून कीबोर्डवर काहीतरी खडम खडम करत होत्या ! आयला ही अजुन गेली नाही ? त्याने विचार केला पण नंतर मनात म्हट्ला जाऊदेना आपल्याला काय करायचे आहे आणि परत आपल्या कामात डोके घालू लागला . खरे तर अनिकेतचे काम कधीच संपलेले होते पण आज घरी म्हणजे रूमवर जाउन तो काय करणार कारण त्याचे सारे रूममेट्स मुंबईचे ,ते कधीच घरी गेलेले होते आणि आज त्याच्या मित्रांपैकी कोणीच खरे त्याच्यासोबत असु शकणार नव्हते कारण ज्याचे त्याचे प्रत्येकाचे प्लॅन्स होते फ्रायडे नाईटचे !!! त्यामुळे अनिकेत ऑफिसधेच टाईमपास करीत होता 'रूमवर जितक्या उशिरा जाउ तितके बरे ,खाऊन झोपता येईल लगेच' या विचाराने .बाकी दोन दिवस तो आपला एमबीए चा अभ्यास करण्यात घालवणार होता.
त्याने पुन्हा एकदा कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला पण आता तो वैतागलेला होता म्हणुन उगाच आपलं इकडे तिकडे पाहत होता ,तसे त्याचे पुन्हा एकदा अनुकडे लक्ष गेले . त्याने तिला खरे तर कधीच निरखुन पाहिले नव्हते आणि आज पहिल्यांदा त्याने तिला लक्ष देवुन पाहिले. आयटीत असण्यार्या इतर मुलींपेक्षा ती थोडी वेगळी वाटली त्याला.... अगदीच साधा पेहराव ,लांब काळ्याभोर केसांची गच्च वेणी बांधलेली , चेहर्यावर मेकअपचा लवलेश नाही , अंगावर अजिबातच मॉडर्न नसलेला ड्रेस, पण तरीदेखील अनिकेतला तिच्यात एक वेगळे सौंदर्य भासत होते ,तिचा चेहरा एखाद्या निष्पाप बालकासारखा होता , तिच्या मोठाल्या डोळ्यात अगदीच मन भारावुन टाकणारे तेज होते , खरेपणा होता ,गर्व नाही पण आत्मविश्वास होता ! आता अनिकेतला वाटले कशी काय एखादी व्यक्ती इतकी पारदर्शक असु शकते!
पण एक गोष्ट त्याला अस्वस्थ करीत होती ती म्हणजे अनुच्या चेहर्यावरचे भाव कारण असलेच भाव तब्बल दोन वर्षांपुर्वी त्याच्या चेहर्यावर दिसत होते जेव्हा तो नविन होता सो कॉल्ड अनएक्स्पीरीन्स्डहोता .' गोंधळलेले ,कसला तरी गुंता सोडवू पाहणारे , कुणाची तरी मदत शोधु पाहणारे ,पण मदत नाही पाहुन हिरमुसलेले ,तरी पण स्वत: प्रयत्न करणारे' सतत बदलणारे ते भाव अनिकेतला क्षणोक्षणी त्रस्त करीत होते मग न राहवुन तो तिला विचारतो.
अनिकेत : काय अनुष्का आज घरी नाही जायचे का? ९ वाजत आले आहेत.
अनु विचार करते चक्क हा आज माझ्याशी बोलतोय ! माझी विचारपुस करतोय . कसे काय मि.बीझी ला वेळ मिळाला ? पण चला बोलुया तर सही ,नाही तरी आता डोके फुटायची वेळ आली आहे विचार करुन.
अनु : हो ना जायचेय ना . पण हे काम बाकी आहे आणि मी एका ठिकाणी अडकले आहे काहिच कळत नाही आहे कसे पुढे जावे ते.
अनिकेत : अगं , नाही समजत तर राहु दे ना . सोमवारी येवुन कर कोणाची मदत घेऊन .
अनु : हो ते पण खरे आहे म्हणा , पण मग पुन्हा हे लोक म्हणतील उशीर झाला असे . खरे तर मला ना कसलेच ट्रेनिंग मिळाले नाही , या लोकांनी डायरेक्ट प्रोजेक्टवर टाकले आणि लगेच काम एक्स्पेक्ट करतात. मी तर जाम वैतागली आहे. मदत कराला खुप कमी लोक तय्यार असतात ,त्याना त्यांचीपण कामे असतात ना . मग कसे करणार काम ? तरी स्वतः शिकुन करते पण त्याने मग वेळ लागतो ना....
अनिकेतला खरे तर हे माहीत होते की अनुच्या प्रोजेक्टमधे खुप काम होते आणि मॅनेजर लोक फ्रेशर्सला ट्रेनिंग सध्या तरी देवु शकत नव्हते आणि इतर अनुभवी मंडळी तर महानच !!! त्यांच्यापैकी अर्ध्या लोकांना स्वतःची सिनियॉरिटी दाखवणे आणि नव्या पोरांना छळणे यात मजा वाटत असे तर अर्धी बिचारी कामाच्या ओझ्याखाली स्वतः एवढी वाकलेली असत की इच्छा असुन पण ती या नव्या पोरांची मदत करु शकत नसत... परिणाम काय ? अनुसारखी नवी पोरे यात भरड्ली जात.आणि स्वतः अनिकेत देखिल या सर्वातुन गेलेला होता.म्हणुनच त्याला अनुला काहीतरी का असेना पण आपल्या परिने मदत करायची होती. म्हणुन तो आता अनुला सहानुभुतीपेक्षा आत्मविश्वास द्यायचा प्रयत्न करणार होता.
अनिकेत : अगं ट्रेनिंग नाही मिळत आहे म्हणुन तू काही रड्त बसणार आहेस का? आणि तू स्वतःचे स्वतः शिकतेय ते काही कमी नाही . तुला माहित नसेल तर सांगतो , तू जेवढे स्वतःहुन शिकशील आपल्या क्षेत्रात तेवढे उत्तम !! का महिती आहे ? कारण ते तुला नेहमी लक्षात राहिल तेव्हा तुला कोणाला विचारावे लागणार नाही. आता तुला थोडे कष्ट पडतील पण नंतर त्याच गोष्टी तू अगदी सहज करशील. त्यामुळे असा काही विचार करु नकोस आणि निराश तर अजिबातच होऊ नकोस.
तुझी टेक्नॉलॉजी वेगळी आहे नाही तर मीच तुला मदत केली असती आता.पण तुझ्या टीममधे आहेत की बरीच चांगली लोक . सध्या त्यांना खुप काम असल्यामुळे ते तुला मदत नाही करु शकत आहे पण तु त्यांना वेळ असेल तेव्हा तुझे डाउट्स विचारु शकतेस ना?. काय बरोबर ना.
अनु : हं ते बरोबर सांगताय तुम्ही .
अनिकेत : आणि हे मला महित आहे तु हार मानणार्यांपैकी नाहीये हे मला दिसतेय कारण आतासुद्धा तू कामाच्या कारणाने ऑफिसमधे आहेस . दॅट्स लाईक अ गुड गर्ल ,कीप इट अप.
अनु : थँक्स. तुम्ही असे छान बोललात ना अगदीच हलके हलके वाटले खरे सांगू तर. नाही तर आता मला खरेच खुपच हताश वाटत होते. आणि हा मला पहिला धक्का लागला की तुम्ही चक्क कामाव्यतिरिक्त काहीतरी बोललात.
अनिकेत : तू ना ?? नाही सुधारणार . बडबड झाली का सुरु तुझी ? पण छान वाटले तुझी बडबड ऐकुन , बर्याच वेळेपासुन शांतता अगदीच जीव घेत होती गं. आणि मी फक्त ऑफिस आवर्स मधे कामाव्यतिरिक्त बोलत नाही ,त्यानंतर बोलतो बरं का , आणि आता ऑफिस आवर्स संपलेत मॅम !!
आणि आता घरी जा , बराच उशिर झालेला आहे .नंतर कर ते काम , आणि हो आता रिक्षाने नाही तर कॅब ने जा .का मी सोडु तुला घरी , हो जर तुझी हरकत नसेल तर.
अनु : नको मी जाइन रिक्षाने , पण थँक्स हं . चला गुड नाईट . तुम्ही देखील जा आता घरी जेव्हा पहावे तेव्हा इथेच दिसतात !! तुमचा हल्ली मुक्काम ऑफिस आहे वाटते , घरी जावेसे नाही वाटत का?
अनिकेत : नाही गं , घरी म्हणजे आमच्या रुमवर सगळी मुंबईकर मंडळी आहेत ना , ती जातात वीकेन्ड्ला घरी मग मी एकटा काय करणार जाउन ? म्हणुन इथेच आपला टीपी करावा. पण निघेल आता थोड्या वेळातच, चल तू निघ , उशिर झाला आहे. बाय, टेक केअर..
अनु: सेम टू यु , बाय.
जातांना अनु विचार करत होती हा पोरगा वाटतो तितका खडुस नाहीये , मनाने चांगला आहे . आपण बिचार्याबद्दल उगाच काहीबाही विचार करत होतो.
असेच दिवस जात होते पण अनुची अस्वस्थता आता वाढतच होती. ती झपाट्याने नविन काम शिकत होती स्वतःहुन . कामे अगदी पर्फेक्ट होत असत . पण या गोष्टीचे परिणाम उलटेच होउ लागले होते. लोक तिला कामाचे श्रेय देण्याऐवजी तिच्यावर आणखीन कामांचा बोजा वाढवु लागले ,आणि अगदीच कठिण काम आता तिला देत असत आणि त्यात तिला अजिबातच मदत करत नसत. याचे कारण म्हणजे अनुच्या सिनिअर्सला तिची कामातली झट्पट प्रगती पाहुन खरे तर एक ईर्ष्या वाटत होती , त्यातच ज्युनिअर असुन ही लवकरच आपल्या बरोबरीला येणार ही भितीदेखील वाटत होती. तिचे सिनिअर्स तिला मदत करायला तयार नसत , वाटल्याने ज्ञान वाढते हे अनुने शाळेत शिकलेले संस्कार या कोर्पोरेट जगामधे लागु पडत नव्हते.
पण यातच अनुचा जीव जात होता .तिचा आत्मविश्वास खचत होता.आपण आपल्या आईबाबांना सोडुन इथे ज्या करिअरसाठी आलो ते तर अगदीच जिवघेणे निघाले होते. पगार मिळत होता पण आत्मिक समाधान नव्हते त्यात . मरुन मरुन काम करावे आणि त्याच कामाचे श्रेय आपल्याला मिळत नाही. तिच्या कामाचे श्रेय कोणी दुसरेच लुटत असे. तिची आगतीकता दिवसेंदिवस वाढत होती. त्या साध्या जिवाला हा सारा प्रकार कळत नव्हता, तिथले पॉलिटीक्स तिच्या प्रामाणिक मनाला उमजत नव्हते. अनूची तब्येत ढासळत चालली होती , पुर्वीची सतत हसणारी अनु आता उदास दिसत असे. चेहर्यावर हास्य असे पण त्यात एक उदासवाणी छटा असे .तिला वाटे या छळासाठी ती एक इंजिनिअर झाली होती का? इथे काम करणार्यांपेक्षा फक्त मॅनेजर लोकांची हाजी हाजी करणार्या लोकांचेच चालते का? ती आता खरोखर खुप एकटी पडली होती. तिची मदतीची हाक ऐकायला त्या जगात कोणीच नव्हते का ?
होते , एक जण होते...कोणाला कळो ना कळो पण अनिकेतला अनुच्या परिस्थितले सारे बदल कळत होते .त्याला तिची ती मुक अस्वस्थता , आगतिकता कळत होती आणि सलत होती. त्याने त्या निष्पाप जिवाला या चक्रातुन काढायचेच हे आता ठरवले होते. अनुला आता इथल्या कोर्पोरेट लाईफ मधे कसे टिकायचे हे शिकवायचे असे त्याने ठरवले होते. आणि तेव्हाच त्याने अनुला मैत्रिचा हात देऊ केला.अनुने देखील तो लगेच स्विकारला. कारण नाही तरी आता त्या दोघांत आता बरिच ओळख झालेली होती. अनिकेत आता तिच्याशी मुद्दामच काही ना काही विषय काढुन तिला बोलते करत असे ,तिदेखील हळुहळु का असेना पण आपला सौम्य प्रतिसाद देत लागली होती . अनुला पुन्हा बोलते करण्यासाठीचे त्याचे प्रयत्न हळुहळु फळाला येत होते. अनु आता बोलु लागली होती पण खुप कमी लोकांशी .तिचा टीममधल्या लोकांवरचा विश्वास खरे तर कधीच उडाला होता , त्यांच्याशी तर ती कामाव्यतिरिक्त बोलतच नसे. पण अनिकेतशी?? अनिकेतशी आत्ता ती दिलखुलास गप्पा मारत असे. दोघे सोबत नाश्ता करु लागली , चहाला दोघे सोबत जात इतकेच काय दोघे रोज अनु राहत असलेल्या सोसायटित सांयकाळी ऑफिसनंतर सहज फिरत गप्पा मारत असत .
या सर्व गोष्टीमुळे अनु आणि अनिकेत एकदम बेस्ट फ्रेन्ड्स झाले होते !!दोघांना एकमेकांबद्दल प्रत्येक गोष्ट माहित होती आणि काही नविन झाले की कधी एकमेकाला सांगतो असे दोघांना होत असे. अनिकेतच्या मैत्रिमुळे अनुमधे आता बराच फरक झाला होता, तीचा गमावलेला आत्मविश्वास परत आला होता , चेहर्यावर येइल ते चेलेंज स्विकारण्याची धमक दिसु लागली होती . अनिकेत अनुच्या करिअरबद्दल सतत तिचे बौद्धिक घेत असे , काम करण्यासोबत काम दाखवणे हे देखिल तितकेच महत्वाचे आहे हे त्याने तिला शिकवले होते. त्यामुळे अनु आता आपले काम दाखवु शकत होती ,स्वतः स्वतःच्या कामचे श्रेय घेउ शकत होती आणि स्वत:चे काम एन्जॉय करु शकत होती. पण याबद्दल ती अनिकेतला नेहमीच एक वाक्य म्हणत असे...."ऑल क्रेडिट गोज टु यु , अनिकेत"
आणि अनिकेत मग उत्तर देइ "ओये पोरगी एक्स्ट्रा प्रोफेशनल झाली वाटते आता मित्रांला थँक्स वगेरे म्हणते." आणि मग ती हळुच त्याच्या डोक्यावर एक ट्पली मारत असे..
अशीच अनिकेत आणि अनुची मैत्री प्रत्येक दिवसागणिक बहरु लागली .दोघांना गप्पांना वेळ पुरत नसे आणि एक दिवस एकमेकांना भेट्ल्याशिवाय होत नसे. आणि एक दिवस यातच त्याची एन्ट्री झाली आणि अनु कामातुनच गेली....
क्रमशः
कथा लिह्ताना स्वता डोकवायच
कथा लिह्ताना स्वता डोकवायच नसत्;खळबळ माजते मनात्;लिहीता॑ना रहा त्रयस्थ ;या वाटेवरचे तुम्ही नवे प.थस्थ. अभिनदन्॑अ
वा, आमच्या विनंतिला मान देऊन
वा, आमच्या विनंतिला मान देऊन तुम्हि पुढ्चा भाग टाकलात, आणि तो हि चक्क ईतका मोठा. खुप खुप धन्यवाद
मला तर वाटले, हे लोक तुम्हाला रेशिमगाठि चे रेकॉड ब्रेक करायला सांगताय आनी तो ब्रेक करता कि काय????
जेव्हा तो नविन होता सो कॉल्ड अनएक्स्पीरीन्स्डहोता .' गोंधळलेले ,कसला तरी गुंता सोडवू पाहणारे , कुणाची तरी मदत शोधु पाहणारे ,पण मदत नाही पाहुन हिरमुसलेले ,तरी पण स्वत: प्रयत्न करणारे' सतत बदलणारे ते भाव >>> काय हुबेहुब वर्णन केलत हो, अग्दि तंतोतंत जुळतय.
खुपच छान लिहिलय, पण 'अनुला होणारा त्रास' लिहितांना जरा गुंडाळला सारखा वाटला. हा भाग अजुन फुलवता आला असता. (हे आपल माझ मत, Suggestion manun ghya)
छान लिहिलय...
छान लिहिलय...
वा, आमच्या विनंतिला मान देऊन
वा, आमच्या विनंतिला मान देऊन तुम्हि पुढ्चा भाग टाकलात, आणि तो हि चक्क ईतका मोठा. खुप खुप धन्यवाद>> अगदी अगदी मीही हेच लिहीणार होते परेश
धन्स अश्विनी, मोठ्या भागाबद्दल. दॅट्स लाईक अ गुड गर्ल ,कीप इट अप.
पुलेशु... लिहीत राहा... आता पुढचा भाग याहून मोठा ना?
आणि हे मला महित आहे तु हार मानणार्यांपैकी नाहीये...
तुम्हा सर्वांच्या
तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
परेश तुमचे Suggestion प्रत्यक्षात आणण्याचा थोडा प्रयत्न केला आहे आणि हा भाग थोडा वाढवलेला आहे.
अरे वा.... छान, आता पुढ्चा
अरे वा....
छान, आता पुढ्चा भाग येऊद्यात लवकर.
खरचं छान लिहितेस , किप ईट अप
खरचं छान लिहितेस , किप ईट अप !
छान लिहिलय
छान लिहिलय
hi pl. submit part 5
hi
pl. submit part 5 asap
vinayak
येऊद्यात लवकर.
येऊद्यात लवकर.
आता पुढ्चा भाग येऊद्यात लवकर.
आता पुढ्चा भाग येऊद्यात लवकर.
पुढ्चा भाग येऊद्यात
पुढ्चा भाग येऊद्यात लवकर.......