....हळुहळु अनु आता तिच्या मोठाल्या कंपनीत रुळली होती. फ्रेशर असल्यामुळे काम शिकायला थोडे प्रयास पडलेत पण लवकरच आपली कामातली प्रॉडक्टिवीटी दाखवल्यामुळे ६ महिन्यातच पर्मनंट एम्प्लॉई झाल्यात मॅडम!!!! ट्रेनि सॉफ्टवेअर इंजिनीअर वरुन सॉफ्टवेअर इंजिनीअर ही बढ्ती झाल्यामुळे मेन म्हणजे ट्रेनि असल्याचा शिक्का साफ पुसला गेला होता त्यामुळे स्वारी एकदम मजेत असायची. दिवस मजेत जात होते . आपण आता खुप काम करतो आणि अजुन शिकायला हवे असे सतत वाटत असे. टीममधे कोणाही सिनिअरला पकडायचे आणि आपल्या कामातले डाउट्स क्लीअर करायचे.
पण इकडे अनिकेत जाम वैतागलेला होता.जेव्हापासुन समोर ही पोरगी बसायला लागली त्याची वाट लागली होती त्याची एक नव्हे कितीतरी कारणे होती.
कारण नं १: अनु जबरदस्त बडबडी होती त्यामुळे त्याला कामात प्रचंड डिस्टर्ब व्हायचे.
कारण नं २: काम करत असताना तिला सतत डाउट्स असत जे ती कोणाला ना कोणाला पकडून क्लीअर करत असे मग ते आलेले कोणी ह्याच्या ओळखीचे असले तर बोंब !!!!!!!!मग ती व्यक्ती ह्याचेदेखिल १०-१५ मि विचारपुस करण्यात घालवत असे................
कारण नं ३: ही काय कमी होती का हिची मैत्रिण पण आता त्यांच्याच क्युबिकल मधे बसायला आली होती??? दोघी दिवसभर विचारांची नाहीतर वस्तुंची देवाणघेवाण करत असत आणि हा कारभार अगदीच अनिकेतच्या नाकासमोरुन होत असे !!!.
कारण नं ४: अणि सगळ्यात कळस म्हणजे अनु अनिकेतला एसी लावू देत नसे.एक वेळ बाकी सर्व खपवुन घेतले असते पण एसी म्हणजे अनिकेतचा जीव की प्राण होता. नागपुरातल्या गरमीत कॉलेजचे दिवस काढल्यानंतर पुण्यातल्या थंडगार वातावरणाची आता त्याला चांगलीच सवय लागलेली आणि कंपनीत असताना तर एसी त्याची पर्वणीच असे.......पण ही ब्याद आल्यापासुन एसी चे नाव सुद्धा घेउ देत नवती...
म्हणे "मला ना खुप सर्दी होते....."अगं बाई पण माझा इथे जीव जातो ना.. स्वत:ला जॅकेट नाही घालता येत , शाल नाही आणता येत??
त्याने आज ठरवले होते काहीही झाले तरी आज हिला सांगायचे की "आपण एसी लावणार तू काहीही कर..." सकाळचे ९ वाजलेले त्याच्याव्यतिरीक्त तिघांच्या त्या क्युबिकल मधे उरलेल्या दोन व्यक्ती अजुन यायच्या होत्या. त्याने आपला एसी मस्त सुरु केला .खरे तर तो आणि अनु सोडुन असलेला तिसरा प्राणी म्हणजे अनुची मैत्रिण तो एक न्युट्र्ल प्राणी होता तिला एसी चे काही सुख्-दु:ख नवते. खरा प्रॉब्लेम ह्या अनुचाच.
अनिकेत : येवु दे आज हिला . एसी बंद करायला सांगीतला की बघतो. समजते काय स्वतःला?
.......आणि तेवढ्यात अनु मॅड्म एन्ट्री घेतात.
अनिकेत : ये बाळा ये आज दाखवतो तुला सर्दीवरचा उत्तम उपाय्....(मनात)
अनु: गुड मॉर्निंग अनिकेत.
अनिकेतः गुड मॉर्निंग अनुष्का.
अनु: तुम्ही सकाळी फार लवकर येतात हो.
अनिकेत :हो काम असते ना खुप.
अनु: डोक्यावर कसले आठ्यांचे जाळे पसरले...उत्तर देण्यासाठी जसे पैसे लागणार आहे खुप....सांगतोय तर असा जर ह्याने काम नाही केले तर कंपनीच बुडेल्..पण आज हा चक्क एवढा काय गोड बोलतोय .नक्कीच काहीतरी गड्बड आहे......(मनात)
आता हिला थंडी वाजायला लागली . ती ने लगेच फोन उचलला आणि हेल्पडेस्कचा नंबर फिरवला .
हॅलो.. कॅन यु प्लीज स्वीच्ड ऑफ ए.सी ०४ १६ .
अनिकेत : हिच वेळ बोल हिला आता फार झाले .आज नाही खपवुन घ्यायचे
एक मिनिट अनुष्का,मला खुप दिवसांपासुन एक सांगायचे आहे पण विचार करत होतो कसे सांगु....
अनु: हे काय नवीन ??..ह्याला वेड लागले का ...काय बरळतो आहे हा......हा मला प्रपोज वगेरे तर नाही ना करत आहे..प्लीज नो .नो असले ध्यान आपल्या गळ्यात पडलेले नकोच.. . देवा वाचव मला ह्या प्राण्यापासुन..................
अनिकेत : त्याचे असे आहे ना . . . .
अनिकेतचे मिशन एसी पॉसिबल झाले की इंपॉसिबल ते पाहू पुढे...
क्रमशः
हे काय नवीन ??..ह्याला वेड
हे काय नवीन ??..ह्याला वेड लागले का ...काय बरळतो आहे हा......हा मला प्रपोज वगेरे तर नाही ना करत आहे..प्लीज नो .नो असले ध्यान आपल्या गळ्यात पडलेले नकोच.. . देवा वाचव मला ह्या प्राण्यापासुन............... .. मला हा approach जाम आवडला
छान आहे. एक विनंती आहे, कृपया
छान आहे.
एक विनंती आहे, कृपया जरा जास्त लांबीचे भाग टाकाल का??
वाचायला सुरुवात केल्या केल्या संपल्यासारखा वाटला...
पु.ले.शु.
प्रणव ला अनुमोदन...
प्रणव ला अनुमोदन...
भाग छान आहे, प्रणव ला
भाग छान आहे, प्रणव ला अनुमोदन...
वा वा हाहि भाग सुंदर, अनिकेत
वा वा हाहि भाग सुंदर,
अनिकेत : ये बाळा ये आज दाखवतो तुला सर्दीवरचा उत्तम उपाय्....(मनात)>>>> हि हि हि हि.
आणि खरच किति वाट पहायला लावता, आणि मिळते काय?...... एवढासा, छोटुकलासा भाग. ये बात कुछ हजम नहि हुई......(आता हाजमोला नकोय, मोठा भाग हवाय). हि विनंति वजा प्रेमळ धमकि समजावि(हलके घ्या).
अश्वीनी, प्लीज प्लीज अग्गं
अश्वीनी, प्लीज प्लीज अग्गं बायो थोडे तरी मोठे लिही की गं भाग छान लिहीतेयंस
हे काय नवीन ??..ह्याला वेड लागले का ...काय बरळतो आहे हा......हा मला प्रपोज वगेरे तर नाही ना करत आहे..प्लीज नो .नो असले ध्यान आपल्या गळ्यात पडलेले नकोच.. . देवा वाचव मला ह्या प्राण्यापासुन............... .. मला हा approach जाम आवडला >> मलाही
हा मला प्रपोज वगेरे तर नाही
हा मला प्रपोज वगेरे तर नाही ना करत आहे >>>
भारीयेत दोघेपण
भारीयेत दोघेपण