फ्रॉईड, मला माफ कर!
तू लिहिलेली एकही ओळ न वाचता मी परवा चारचौघांसमोर म्हणालो, "माणसाचं कर्तृत्व, त्याचा भविष्यकाळ हे सगळं त्याच्या बालपणावर, त्याच्या आणि त्याच्या आई-बापांच्या संबंधांवर अवलंबून असतं. म्हणजे त्याचा प्रवास आधीच ठरलेला असतो, आपण आयुष्यभर फक्त या 'ब्रॉडस्ट्रोक्स'चं डिटेलिंग करत असतो, हा शोध जाहीर करण्यासाठी सिगमंड फ्रॉईडला भर चौकात फाशी द्यायला हवी होती". असो!
मी गांजा ओढतो. राम पण हल्ली गांजा ओढू लागला आहे. त्यालाही अफूपेक्षा गांजा जास्त आवडतो. आम्ही गांजा ओढतो तेव्हा आम्ही गाडित असतो. समोर काही उंदीर नाचत असतात. आम्ही तिकडे दुर्लक्ष करून मनापासून एक एक कश ओढत राहतो.
'पोटंट वीड इज लाईक अ मच्यूर्ड वूमन, इट गिव्ह्ज यू प्लेजर टील द व्हेरी लास्ट मोमेंट!'
मिरवणूक जसजशी जवळ येते तसतसं चित्र अधिक स्पष्ट होत जातं. उंदराच्या मूर्तीसमोर नागडे उंदीर नाचत असतात. मिरवणुक आता गाडिच्या खूप जवळ आलेली असते. उंदरांचे चेहरी आता स्पष्ट दिसू लागतात. त्यांचा नाच आता ऐन रंगात आलेला असतो. ती ज्या गाण्यांवर नाचत असतात ती गाणी बिभत्स असतात. नागड्या उंदरांच्या हलचालीही तशाच घाणेरड्या असतात! हे सगळं आम्ही मजेत बघत असतो. गांजाही मस्तपणे डोक्याचा ताबा घेऊ लागलेला असतो. अचानक उंदरांना आमच्या अस्तित्वाचा आणि आमच्या आनंदाचा सुगावा लागतो. उंदरांच्या लाटाच्या लाटा गाडिच्या दिशेने सरकू लागतात. ते जसजसे जवळ येतात तसतसा त्यांचा आकार वाढू लागतो. बघता बघता ते सहा फुटांचे होतात! सहा फुटांचे काळे कभिन्न उंदीर! माझ्या हातमध्ये असलेली सिगारेट बघून, आपलं लिंग हातात घेऊन ती आम्हाला वेडावून दाखवतात.
आम्ही काही हलचाल करत नाही. मी हळूहळू काचा वर घेऊ लागतो, एवढ्यात काहीतरी चिकटसर माझ्या खांद्यावर येऊन पडतं! मी समोर बघतो, एक उंदीर माझ्यावर हसत असतो! सगळीकडे अचानक शांतता पसरते. सगळे उंदीर आमच्याकडे बघत असतात. मी रामकडं बघतो. राम मान होकारार्थी हलवतो. मी पूर्ण शक्तीनिशी एक्सिलेटर दाबतो. गाडी हवेमध्ये झेपावते. धाड! पहिला आवाज, मग दुसरा मग तिसरा. आजूबाजूला गोंधळ वाढू लागतो! जे उंदीर गाडीखाली नाही येत ते गाडीवर चढू लागतात. गाडीचा वेग कमी होऊ लागतो!
खाट!! एक आवाज होतो आणि गाडी थांबते! उंदीर चौफेर हल्ला करतात. गाडीच्या आतमध्ये आम्ही दोघं फक्त वाट बघता असतो. एक काच फुटते मग दुसरी... कुणीतरी दार उघडतं, आम्हाला दोघांना बाहेर खेचतात. उंदरांचा तो स्पर्श किळसवाणा असतो! घाण! राम खाली पडतो, मी पण खाली पडतो. आजूबाजूचे सारे उंदीर तुटून पडतात. लाथाबुक्यांनी, जे मिळेल त्यांनी ते आम्हाला बडवायला लागतात! रामाच्या डोक्यातून रक्त येतं, माझ्याही डोक्यातून रक्त येतं! माझे डोळे अर्धवट मिटतात, लांबून कुठून तरी एक कोड पडलेला उंदीर जवळ येतो, त्याच्या अंगावारचे सगळे केस झडलेले असतात, आतला मातकट रंग आपोआप बाहेर आलेला असतो! बाकीचे उंदीर आपोआप दूर पळतात! मी डोळे मिटतो!
भोकात
कसलातरी वास येतोय!
'राम्या, भडव्या इथंही जॉइन्ट मारतोयस? मला पण दे!"
समोर एका उंची सोफ्यावर मगाचा कोड पडलेला उंदीर बसलेला असतो. जमिनीवर मी आणि राम.
''तुम्हाला काही सांगायचं आहे?'' कोड्या उंदीर!
"कशाबद्दल?" राम
"तुम्ही दोघं देशद्रोही, धर्मद्रोही आहात" कोड्या
"हे तू सांगतोयस!" मी
"मग? तुम्हाला काही सांगायचं आहे?" कोड्या
"कशाबद्दल?" राम
मी आणि राम हसू लागतो. कोड्या भडकतो!
"का मारलं एवढ्या भक्तांना?" कोड्या
"त्यांनी माझ्या अंगावर वीर्य उडवलं" मी
"..... " कोडया
"कोड्या, भाडखाउ, तुझा, तुझ्या बापाचा आणि त्याच्याही बापाचा जन्म ज्या दिव्य द्रव्यामुळं झाला, ते म्हणजे वीर्य!" राम
"एवढं दिव्य द्रव्य? किती महान आत्मा, पूर्ण पुरुष! आहाहा.... साधू साधू... त्यालाही तुम्ही मारलं! तुम्ही दोघं जगण्यास लायक नाही" कोड्या!
"हे तू म्हणतोस! हॅ हॅ हॅ!" राम
"कोड्या, यडझवा आहेस तू" मी
" फॉर किलिंग अ ग्रेट सोल अॅण्ड मेनी अदर बिलिव्हर्स, आय हेअर बाय ऑर्डर टू हॅन्ग दिज टू मॉर्टल्स टिल दी एण्ड ऑफ देअर लाईफ! मे देअर सोल रेस्ट इन पीस अॅण्ड ऑलमाईटी फरगिव्हस देअर सीन्स!"
"वूईच ऑलमाईटी? द वन ऑन युवर साईड ऑर द वन हू इज स्टील वेटिंग टू सी वूईच साईड विन्स, यू ईडियट!" राम
अंधार!
"अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले- स्मरणांचे उत्सव झाले! "
"गप्प बस की! ग्रेस म्हातार्याची आठवण नको काढू!"
"माल आहे का?"
"नाही, कोड्याने सगळा काढोन घेतला!"
"भुक्कड साला!"
"वास येतोय का?"
"नाही"
"मला पण"
रामचं पोस्टमॉर्टम माझ्या आधी झालं! आम्हाला एकाच वेळी इथं आणलं गेलं. म्हणजे मी एका मुडद्यावरची चादर दूर केली तर तिथं राम होता, रामाने चादर दूर केली तर तिथे मी होतो. मग थोडा वेळ आम्हाला कळालंच नाही की मी राम आहे, रामच्या शरीरातून बघणारा मी आहे वा माझ्या शरीरातून बघणारा राम आहे. पण तेवढ्यात चिरफाड करणारे आले आणि त्यांनी परस्परच प्रश्न मिटवला. ते आले तेच फूल टैट! मी इकडेतिकडे पाहिले तर अनेक उंदरांचे मुडदे तिथे पसरले होते. त्या मुडदेफारासाला विचारलं मी.
"बेवारस है वो, उंदीर फेस्टिवल के वजह से टाइम नहीं मिला, साला बहोत बदबू मारता है!" मुडदेफरास
"हमारा क्या होगा?" ऐसेच पड़ेंगे क्या इधर?" राम
"कायकू, आप तो बड़ा लोग, स्पेशल बॉडी होना आपका!" मुडदेफरास
च्यायला! मजा आहे!
Script for tonight special
आजच्या ठळक बातम्या
आज दोन युवकांनी नशेच्या भरात अनेकांना चिरडले.
दोघेही आमली पदार्थाच्या नशेत!
दोन्हीही युवक चांगल्या घरातील असून त्यांच्या घरच्यांच्या सालसपणाचे, पुरावे त्यांचे शेजारी देता आहेत. असे असूनही, आजचे युवक आमली पदार्थांच्या नादी का लागले आहेत हे तपासणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही आज स्टुडिओमध्ये बोलावले आहे बाबा रामदवे यांना!
"मुलं कितीही मोठी झाली तरी, आईवडिलांचं लक्ष असायलाच हवं त्यांच्यावर! आपली मुलं काय करतात, कुठे जातात, कुणाच्या संगतीत असतात, हे पालकांना कळायलाच हवं. कसं असतं, मुलांचं लहानपण कसं गेलं, त्यांचं संगोपन कसं झालं यावर मुलांचं भविष्य अवलंबून असतं!" बाबा रामदवे
कमर्शियल ब्रेक : कोम्प्लान, बोर्नव्हिटा आणि लाईफ इंश्योरंस!
...
मस्तच...
मस्तच...
गांजा मारुन लिहिली काय हो ही
गांजा मारुन लिहिली काय हो ही कथा ???
निव्वळ अप्रतिम आहे मित्रा...
निव्वळ अप्रतिम आहे मित्रा... खूप... खूप आवडली!!!!
आवडेश. पण शेवटाला 'बक्षिसाची
आवडेश. पण शेवटाला 'बक्षिसाची एकाकिंका' झाली रे.
अप्रतिम मित्रा... लय बेश !
अप्रतिम मित्रा... लय बेश !
अँकी, हबा, सूर्यकिरण :
अँकी, हबा, सूर्यकिरण : धन्यवाद!
प्रगो : असेलही कदाचीत!
नी : शेवट लांबतोय असं वाटत होतं, पाणी घातल्यासारखा, म्हणून असा करावा लागला, शिवाय सुरुवातीचा विषय मला पूर्ण करायचा होता, आणि त्यासाठी रामदवे बाबांपेक्षा योग्य कोण असेल!
फ्रॉईड मला माफ कर!
फिक्शन ऑफ विड ऑन द पनिशमेंट
फिक्शन ऑफ विड ऑन द पनिशमेंट ऑफ बीइंग...ही त्रासातुन आलेली सरीयल सटायरगिरी आहे....
पढनेवालो की मजा..लिखनेवालो को सजा...
लिखते रहो...
गुड वन...... बर्याच दिवसांनी
गुड वन......
बर्याच दिवसांनी चांगलं वाचायला मिळालं....
मस्तच................
छान लिहिलय
छान लिहिलय
नी अनुमोदक! शेवटच स्पषटीकरण
नी अनुमोदक!
शेवटच स्पषटीकरण नकोच होत अस वाटते. बरच फोर्मुलेटिक लिहीलय असही वाटल. फ्रॉइड चा संदर्भ कशाकरता ?
नी, शशांकला अनुमोदन. शेवट
नी, शशांकला अनुमोदन.
शेवट कसा, का? ते लेखक जाणो, पण जे सरळ सरळ दिसतंय वा जो अर्थ अभिप्रेत असावा हे तेवढंच नाही, कदाचित फ्रॉइड चा संदर्भ त्याचकरता.
गप्प बस की! ग्रेस
गप्प बस की! ग्रेस म्हातार्याची आठवण नको काढू!>>>
मस्त लिहलंय.
सही मित्रा! गांजा घेतल्यावरच
सही मित्रा!
गांजा घेतल्यावरच उंदीर दिसतात, असं थोडीच आहे..?
कथा आवडली.. जाहिरातींसोबत!
(शेवट फार रुचला नाही.. पण चलता है!)
brilliant! meet me and we
brilliant! meet me and we will have one joint together...
फ्रॉइड चा संदर्भ Contrast
फ्रॉइड चा संदर्भ Contrast किंवा hypocrisy अधोरेखित करतो असे नाहि वाटत का पेशव्या ?
मला आवडली. अश्लिलतेचे ताबून ह्याच्यावर नाहि नाचले म्हणजे मिळवली.
आवडली. छान आहे खरेच.
आवडली. छान आहे खरेच. फ्रॉइडचा संदर्भ मलाही कळला नव्हता. पुन्हा एकदा वाचल्यावर असामीसारखंच वाटलं.
मस्त
मस्त
लई भारी..............!!!
लई भारी..............!!!