निसर्ग
हवा तसा लवासा
निसर्गाच देणं ६) गुंज
गुंजेची वेल पावसाळ्यात उगवते. ह्याची पाने चिंचेसारखी असतात. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गुंजेला फुल येतात. ही फुले फिक्कट गुलाबी रंगांची असतात.
फुलांना नंतर शेंगा येतात. कोवळ्या शेंगा दिसायला छान वाटतात.
ह्या शेंगा ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये सुकुन फुटतात आणि त्यातुन शेंदरी-काळे असे मोत्यासारखे गोंडस गुंज बाहेर पडतात.
पाउले चालती "माहुली"ची वाट..!!
ऑक्टोबरची सुरवात कुलंग ट्रेकने केली होती.. नि आता शेवटसुद्धा एखाद्या ट्रेकनेच करायचे ठरवले.. दिवाळीपुर्व ट्रेक असल्याने जवळपासच कुठेतरी जाण्याचे ठरवले.. मायबोलीच्या भटकंती कट्ट्यावर तशी पोस्टदेखील टाकली.. तांदुळवाडी वा माहुली ठरवायचे होते.. याच वर्षी एप्रिलच्या सुरवातीला तसा मी माहुलीला नाईट ट्रेक करुन आलो होतो.. पण शुल्लक चुकांमुळे अख्खा माहुली गाव रात्री काळकुट्ट अंधारात पालथा घालावा लागला होता.. हे कमी म्हणून की काय आम्ही सकाळीदेखील वरती जाण्याची चुकीची वाट पकडली नि भर उन्हात माहुली चढायला घेतला होता... कडक उन त्यावेळी झेपले नव्हते..
राज-ए-desert
पिटसबर्गहून फिनिक्सला आले... हिरव्या गर्द जंगलातून रखरखीत वाळवंटात... या वाळवंटाची सवय व्हायला जरा वेळ लागला खरा..पण जितकी जास्त भटकले तसे तसे ह्या वाळवंटाचे 'राझ' हळूहळू उमगत गेले.
रेगिस्तानकी एक सच्चाई है.. यहा बहुत कुछ छुपा हुवा है !
जो होता है वो दिखता नही !
जो दिखता है वो होता नही !
अॅरिझोनाच्या वाळवंटातनं फिरताना अनेक जागांनी मला ह्या ओळींची आठवण करून दिलीये.... त्यातलीच एक जागा म्हणजे अॅन्टलोप कॅनियन. युटा-अॅरिझोना सीमारेषेवरची !
इथे फोटो काढणं जरा tricky आहे.. कारण सगळा सूर्यकिरणांचा खेळ... आणि वाळवंटातला सूर्य तुमच्या कॅमे-यावर कोणत्याही क्षणी प्रचंड नाराज होऊ शकतो !
वो शाम कुछ अजीब थी...
हे असं काही अनुभवायला नशीब लागतं... आणि मी खूप नशीबवान आहे !
इतका कमी आणि वेगळाच प्रकाश होता खरं तर, की ट्रायपॉड्शिवाय फोटो काढायची माझी हिंमतही झाली नसती...
पण समोरचं दृष्य पाहून श्वास आपोआपच रोखला गेला... आणि ट्रायपॉडशिवाय फोटो काढण्याची गुस्ताखी हम कर बैठे !
Yellowstone National Park, USA
आईना देखकर तसल्ली हुई...
कॅमे-यामधून पाहताना अचानक माझ्या मनाची अवस्था अशी माझ्यासमोर प्रतिबिंबासारखी सामोरी आली..क्षणभर दचकायला झालं स्वतःलाच असं समोर पाहून.. त्या क्षणी ही 'खिडकी' माझ्यासाठी माझ्या मनाचा 'आरसा' बनून गेली... गुलजारच्या 'आईना देखकर तसल्ली हुई...' ह्या ओळी आणि कॅमे-याचं बटन एकाच वेळी क्लिक झालं !
Grand Canyon, North Rim
परेड
कॅनेडियन गी़झ
(दहा शब्द लिहिण्याचा आग्रह कशाला?)
उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग ३ - कुंभळगड़ मार्गे ठंडीबैरी ... !
भटकंतीची १० वर्षे ...
बघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी? कशी? काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे' पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला.