आसनगाव

पाउले चालती "माहुली"ची वाट..!!

Submitted by Yo.Rocks on 9 November, 2010 - 13:48

ऑक्टोबरची सुरवात कुलंग ट्रेकने केली होती.. नि आता शेवटसुद्धा एखाद्या ट्रेकनेच करायचे ठरवले.. दिवाळीपुर्व ट्रेक असल्याने जवळपासच कुठेतरी जाण्याचे ठरवले.. मायबोलीच्या भटकंती कट्ट्यावर तशी पोस्टदेखील टाकली.. तांदुळवाडी वा माहुली ठरवायचे होते.. याच वर्षी एप्रिलच्या सुरवातीला तसा मी माहुलीला नाईट ट्रेक करुन आलो होतो.. पण शुल्लक चुकांमुळे अख्खा माहुली गाव रात्री काळकुट्ट अंधारात पालथा घालावा लागला होता.. हे कमी म्हणून की काय आम्ही सकाळीदेखील वरती जाण्याची चुकीची वाट पकडली नि भर उन्हात माहुली चढायला घेतला होता... कडक उन त्यावेळी झेपले नव्हते..

Subscribe to RSS - आसनगाव