ऊर्जेचे अंतरंग-०२: स्थितीज ऊर्जा
वारं आलं. कागद उडाले. कागदांवर ठेवलेला काचेचा वजनी गोळाही (पेपरवेटही) ढकलल्या गेला. पायावर पडला. लागलं. पण तोच गोळा जर नुसता पावलांवर अलगद ठेवला असता तर मुळीच लागलं नसतं. तो गोळा ज्या उंचीवरून पडला त्या उंचीमुळेच गोळ्यात काहीतरी वेगळी 'ऊर्जा' निर्माण होत असावी. तिलाच 'स्थितीज ऊर्जा' म्हणतात. स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा. अर्थातच जेवढी उंची जास्त तेवढीच ऊर्जाही जास्त. आणि हेही खरेच की स्थितीज ऊर्जा जशी त्या वस्तूच्या उंचीवर अवलंबून असते तशीच ती त्या वस्तूच्या वजनावरही अवलंबून असते. वजन जास्त असेल तर ती वस्तू तेवढ्याच उंचीवर जास्त ऊर्जा सामावू शकेल.