केरळ मून्नार मधील हे काही दोस्त- ४
हा एकटा जीव सदाशिव
अफलातून ड्रेस सेन्स (अगदी फूलावर फुकपाखर बसल्या सारख वाटतय ना.)
हा एकटा जीव सदाशिव
अफलातून ड्रेस सेन्स (अगदी फूलावर फुकपाखर बसल्या सारख वाटतय ना.)
ठाणे जिल्ह्यात वसई, विरार ते पालघर या पटट्यात नाही म्हटले तरी बरेच गड आहेत.. त्यांचा विस्तार वा इतिहास फारच छोट्या स्वरुपात असल्याने (अपवाद वसईचा किल्ला) तसे ते दुर्लक्षितच राहिले... वसईचा किल्ला सोडला तर बाकी गड तसे अज्ञातच राहिले.. येथील बरेच गड हे आजुबाजूच्या प्रदेशावर पहारा देण्यासाठी वापरले गेले होते.. नि त्यातलाच असा एक गड "वज्रगड" !! ("पुरंदर" चा शेजारी नव्हे !) मलाही हे नाव माहित नव्हते.. खरे तर मी वसईला 'हिराडोंगरी' नावाची एक टेकडी आहे जिथुन सुंदर देखाव दिसतो हे ऐकुन होतो.. नि तिथे जाण्याचा मार्ग नेटवर शोधतानाच कळले की या टेकडीचे खरे नाव वज्रगड आहे..
पहाटे-पहाटे सर्व उठले आणि परत निघायच्या तयारीला लागले. आज ट्रेकचा नक्की शेवटचा दिवस होता. वाढीव असला तरी. चहा नाश्ता झाला. ४ दिवस 'शंभो' झालेले नव्हते तेंव्हा फ़क्त घासून-पुसून स्वच्छ झालो आणि आम्ही तोलारखिंडीकडे निघालो. गुहेमधून बाहेर पडलात की उजव्या हाताची वाट तोलारखिंडीकडे जाते. गेल्या ३-४ दिवसाच्या ट्रेकवर गप्पा टाकत आम्ही चालत होतो. तशी घाई नव्हतीच कारण पुढे अख्खा दिवस पडला होता खिरेश्वरला पोचायला. दिवाळी पहाट तर हुकली होतीच मग आता उगाच धावाधाव करून काय उपयोग होता? हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून तोलारखिंड चांगली ५-६ किमी. लांब आहे. मध्ये अनेक ढोरवाटा येउन मिळतात.
सकाळी जाग आली तेंव्हा बाहेर आमच्यापैकीच काही जणांची 'किलबिल' सुरू होती. आळस देत-देत बाहेर आलो आणि समोर बघतो तर काय... सुंदर दृश्य होते समोर. एक सुंदर पुष्करणी आणि त्याच्या बाजुलाच असलेले महादेवाचे एक अतिशय सुरेख मंदिर. काल रात्री अंधारात हे सौंदर्य बघायचे हुकले होते. थोड़े पुढे जाउन बाहेर पाहिले आणि परत मागे आलो. ज्या ठिकाणी राहिलो होतो ती जागा सुद्धा अप्रतिम होती. हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखराच्या पोटात खोदलेली एकुण ८ लेणी आहेत. त्यातल्या सर्वात मोठ्या आणि राहण्याजोग्या असलेल्या दुसऱ्या लेण्यात आम्ही राहिलो होतो.
आजच्या दिवसात मधले पूर्ण जंगल पार करत, अग्नीबाण-वाकडी अश्या सुळक्यांखालून 'कुमशेत' गाठायचे होते. तिथून पुढे मग नदी काठाने पुढे जात ४ तासात पाचनई गाठायचे होते. पाचनईवरुन मग वरती चढत हरिश्चंद्रगड़. एकुण अंतर किमान ८-१० तासांचे होते. टप्पा बराच लांबचा होता तेंव्हा उजाड़ता उजाड़ता, ६ वाजता म्हणजे अगदीच भल्या पहाटे आम्ही त्या राहत्या ठिकाणावरुन निघालो होतो. रतनगड़ बराच मागे पडला होता आणि 'अग्नीबाण सुळका' समोर दिसायला लागला होता. त्याच्या उजव्या हाताला आजोबाची प्रचंड प्रस्तर भिंत देखील दिसत होती.
पहाटे ६ च्या आसपास जाग आली. एक-एक करून सर्व उठले आणि मग निघायची तयारी सुरू झाली. सकाळी करायची सर्व महत्वाची कामे उरकून झाली. आज नाश्त्याला नुडल्स बनवायचे होते. त्याची तयारी सुरू झाली. आम्ही शाळेच्या मागच्या बाजुला 'चुल x २' बनवली. म्हणजे २ चुली बनवल्या हो. एकावर चहा आणि दुसऱ्यावर नुडल्स बनवायला सुरू केले. जसे-जसे नुडल्स बनत गेले तसे-तसे ते अधिक अधिक घट्ट होत गेले. इतके की त्यातून चमचा फिरेना. नंतर समजले की मॅगी ऐवजी कोणीतरी हाक्का नुडल्स विकत आणले होते.
दिनांक : २०-८-२००० ठिकाण : कोलेजचा कट्टा.