महाराष्ट्राच्या सह्याद्रीरांगेत ५००० फूटाच्या वरती मानाने उभी असणारी तीनच शिखरे ! तिसर्या क्रमांकावरती असलेले 'घनचक्कर' चे मुडा शिखर, दुसर्या क्रमांकाचे 'साल्हेर'वरती असलेले 'परशुराम मंदीरा'चे शिखर नि पहिल्या क्रमांकावरती सह्याद्री रांगेतील सर्वोच्च शिखर असलेले सुप्रसिद्ध 'कळसुबाई शिखर' ! उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ५४०० फुटच्या आसपास ! [मायबोलीकर 'हेम' ने माहिती दिल्याप्रमाणे : कळसूबाई(१६४६ मी.) , साल्हेरवरील परशुराम मंदीर (१५६७ मी.) आणि घनचक्करवरील मुडा (१५३२ मी.)]
आजच्या दिवसात मधले पूर्ण जंगल पार करत, अग्नीबाण-वाकडी अश्या सुळक्यांखालून 'कुमशेत' गाठायचे होते. तिथून पुढे मग नदी काठाने पुढे जात ४ तासात पाचनई गाठायचे होते. पाचनईवरुन मग वरती चढत हरिश्चंद्रगड़. एकुण अंतर किमान ८-१० तासांचे होते. टप्पा बराच लांबचा होता तेंव्हा उजाड़ता उजाड़ता, ६ वाजता म्हणजे अगदीच भल्या पहाटे आम्ही त्या राहत्या ठिकाणावरुन निघालो होतो. रतनगड़ बराच मागे पडला होता आणि 'अग्नीबाण सुळका' समोर दिसायला लागला होता. त्याच्या उजव्या हाताला आजोबाची प्रचंड प्रस्तर भिंत देखील दिसत होती.
दिनांक : २०-८-२००० ठिकाण : कोलेजचा कट्टा.