लेखन
तात्पुरते घर
घर मालकाची नोटीस आलेली आहे. लवकरात लवकर घर खाली करावे. पण माझा जीव घरात अडकलाय. घर आता जुने झाले आहे. रंगाचे पोपडे उडालेत. घर गळतय. पण मी या घरात ६५ वर्षे झाले रहातोय. त्यामुळे या घरात जीव अडकला आहे.
सोन्याचा महाल ते भुकेकंगाल: मुघलांच्या पतनपर्वातील रोचक कहाण्या
बाबर पासून बहादुरशाह जफर पर्यंत विविध मुघल सम्राटानी या देशावर सत्ता गाजवली. विशेषतः बाबर (इ.स. १५२६) ते औरंगजेब (इ.स. १७०७) पर्यंत मुघलांची निरंकुश सत्ता होती म्हटल्यास वावगे ठरू नये. जे प्रादेशिक राजे वा प्रांतिक शासक शरण येत नाहीत त्यांच्यावर आक्रमण करून त्यांच्या नृशंस हत्या करायच्या, त्यांच्या जमिनी बळकवायच्या, त्यांच्या स्त्रिया पळवून आणायच्या आणि त्यांची राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणून तेथील कर आपल्या तिजोरीत भरायचा, अशी सर्वसाधारणपणे मुघलांची राज्य करण्याची पद्धती होती. शेकडो ते हजारो स्त्रिया मुघल बादशाहांच्या जनानखान्यात असल्याचे सांगितले जाते.
तो खून, ती बाई आणि 'ते' पत्र
सन २०२१च्या मे ते ऑगस्ट या कालावधीत वाचकांना विदेशी साहित्यातील काही गाजलेल्या निवडक कथांचा आणि कथा लेखकांचा परिचय लेखमालेतून करून दिला होता (https://www.maayboli.com/node/79806 ). या लेखातून अशाच एका गाजलेल्या विदेशी दीर्घकथेचा परिचय करून देतो.
शतकापूर्वीच्या त्या कथेपर्यंत जायला काही निमित्त घडले.
ती रात्र भाग १
अखेर निर्णय मार्गी लागला!
भारतीय नौदलासाठी रसद पुरवठा जहाजं (Fleet Support Ship) बांधण्याच्या प्रकल्पाला सरकारने 2016 मध्ये मान्यता दिली होती. आता त्यासंबंधीचा करार संरक्षण मंत्रालय आणि विशाखापट्टणममधील हिंदुस्थान शिपयार्ड लि. यांच्यात 25 ऑगस्ट 2023 ला करण्यात आला आहे. त्या करारामार्फत भारतीय नौदलासाठी 5 अशी जहाजं स्वदेशातच बांधली जाणार आहेत. हा संपूर्ण व्यवहार 19,000 कोटी रुपयांचा असणार आहे. या जहाजांचे आरेखन आणि बांधणी पूर्णपणे स्वदेशी असणार आहे. यातील प्रत्येक जहाजाचं एकूण वजन सुमारे 44,000 टन असणार आहे.
अंमली! - भाग २२
याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83950
किरदूर्ग एक भय मालिका भाग १
सकाळी अचानक दारावरची बेल वाजली!
यशवर्धन राजे ला आश्चर्य वाटले की एवढ्या
सकाळी कोण भेटायला आले असेल. तो अनिच्छेनेच बऱ्याच वेळाने अंथरुणातून उठला आणि दार उघडल्यावर त्याला उभा असलेला पोस्टमन दृष्टिस पडला. यशवर्धनने रजिस्टरवर सही केली आणि पत्र हातात घेतले. पोस्टमन ने जाताना रागाने बघितले.
यशवर्धन पत्र घेऊन पलंगावर बसला
आणि शिक्क्यावरील गावाचे नाव वाचले, त्याच्या मनात आठवणींचा पूर आला. ते पत्र किरदुर्ग गावातील त्याचा मित्र सुधाकर चे होते आणि नाव वाचल्यावर कॉलेज चे दिवस आणि आज पर्यंतचा भूतकाळ त्याच्या नजरे समोर उभा राहिला.
किरदूर्ग एक भय मालिका प्रस्तावना
भय कथा हा सर्वांचा आवडीचा विषय!
तशी भय कथा सर्वानाच वाचायला आवडते!
आज च्या काळात तर इंटरनेट मूळे लायब्ररीत जाऊन पुस्तके वाचण्याची तसदी घ्यायची आवश्यकता राहिली नाही
मी नवीनच कथा लेखन सुरू केले आहे! आवडीचा विषय भय कथा!
ही माझी पाहीलीच कथा किरदूर्ग च्या लिखाणाला मी सुरुवात केली आहे!
ही कथा आहे एका निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या गावाची! अतृप्त शक्ती च्या प्रादुर्भावा मूळे, संपन्न गावाच्या होत असलेल्या वाताहतीची!
तसेच
लहान पनीच अध्यात्माशी जोडल्या गेलेल्या एका योध्याच्या सोनेरी आयुष्याची ही सुरुवात आहे!
अंमली - भाग २१!
अंमली - भाग २०!