5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस लॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.
भारतीय ध्वजधारक एमव्ही साईबाबा या तेलवाहू जहाजावर हुथी बंडखोरांनी 23 डिसेंबरला दक्षिण लाल सागरात ड्रोन हल्ला केला. एकाच दिवसात हुथी बंडखोरांनी व्यापारी जहाजांवर केलेला हा दुसरा होता. त्यामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी लाल सागरातील परिस्थिती किती धोकादायक झाली आहे, हे दिसून येत आहे.
नव्या शतकात बदलत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाला आपल्या ताफ्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रवाहक अणुपाणबुड्यांबरोबरच (SSBN) हल्लेखोर अणुपाणबुड्यांचीही नितांत गरज भासत होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलासाठी नेर्पा ही अकुला-2 वर्गातील हल्लेखोर अणुपाणबुडी भारतानं भाड्यानं घेतलेली होती. भारतीय नौदलाची शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं ते एक महत्वाचं पाऊल होतं. वाजपेयी सरकारच्या काळात 2004 मध्ये भारत आणि रशियामध्ये या पाणबुडीसंबंधीचा करार झाला होता. त्यानुसार आधी रशियाकडून अकुला-2 वर्गातील दोन अणुपाणबुड्या 10 वर्षांसाठी भाड्यानं घेण्याचा निर्णय झाला होता.
भारतीय नौदलासाठी रसद पुरवठा जहाजं (Fleet Support Ship) बांधण्याच्या प्रकल्पाला सरकारने 2016 मध्ये मान्यता दिली होती. आता त्यासंबंधीचा करार संरक्षण मंत्रालय आणि विशाखापट्टणममधील हिंदुस्थान शिपयार्ड लि. यांच्यात 25 ऑगस्ट 2023 ला करण्यात आला आहे. त्या करारामार्फत भारतीय नौदलासाठी 5 अशी जहाजं स्वदेशातच बांधली जाणार आहेत. हा संपूर्ण व्यवहार 19,000 कोटी रुपयांचा असणार आहे. या जहाजांचे आरेखन आणि बांधणी पूर्णपणे स्वदेशी असणार आहे. यातील प्रत्येक जहाजाचं एकूण वजन सुमारे 44,000 टन असणार आहे.
भारतीय नौदलाच्या हवाई शाखेत नव्या तुकडीचा – आयएनएएस 316 (INAS 316) समावेश गेल्या 29 मार्चला करण्यात आला आहे. या तुकडीत सागरी टेहळणी करणाऱ्या P-8I या दीर्घपल्ल्याच्या विमानांचा समावेश आहे. गोव्यात दाभोलिममध्ये असलेल्या नौदलाच्या हवाईतळावर (आयएनएस हंसा) ही तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे अरबी समुद्राची अधिक प्रभावीपणे टेहळणी करणे शक्य झाले आहे. भारतीय नौदलात सध्या एकूण 12 P-8I विमाने सामील करण्यात आलेली आहेत.