नव्या शतकात बदलत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाला आपल्या ताफ्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रवाहक अणुपाणबुड्यांबरोबरच (SSBN) हल्लेखोर अणुपाणबुड्यांचीही नितांत गरज भासत होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलासाठी नेर्पा ही अकुला-2 वर्गातील हल्लेखोर अणुपाणबुडी भारतानं भाड्यानं घेतलेली होती. भारतीय नौदलाची शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं ते एक महत्वाचं पाऊल होतं. वाजपेयी सरकारच्या काळात 2004 मध्ये भारत आणि रशियामध्ये या पाणबुडीसंबंधीचा करार झाला होता. त्यानुसार आधी रशियाकडून अकुला-2 वर्गातील दोन अणुपाणबुड्या 10 वर्षांसाठी भाड्यानं घेण्याचा निर्णय झाला होता.
भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला.
"जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की' या भारतीय नौदलाच्या गीतामध्ये एका ओळी असेही म्हटले गेले आहे की, ‘रक्षा करेंगे सागर तट की, ताकद बढ़ायेंगे भारत की’. या ओळीलाच अनुकूल राहत भारतीय नौदलाने आज विविध प्रदेशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे.
ह्या धाग्याच खर नाव अॅडमिरल जोशी यांनी राजीनामा का दिला अस करायच मनात होत.
आपल्याला अवगत असेल की आत्ताच झालेल्या नेव्हीच्या सिंधुरत्न या पाणबूडीमध्ये परीक्षणा दरम्यान
आग लागली आणि नौदलाने दोन अधिकार्यांना गमावले. ह्या अधिकार्यांनी आपल्या जिवावर उदार होउन पाणबुडीमध्ये त्यावेळेला असलेल्या इतर सर्व अधिकारी, नौसैनीकांना वाचवल, पण स्वता:ला वाचवू शकले नाहीत.
आता टाईम्सच्या हातात आलेल्या पुराव्यानुसार नौदलाने तिन तिन पत्र पाठवून केंद्रीय मंत्र्यांकडे पाणबूडीला
आवश्यक असणार्या बॅटर्यांची पुर्तता करण्या बाबत पाठपुरावा केला होता, पण आपले स्वछ प्रतिमा असलेले