ह्या धाग्याच खर नाव अॅडमिरल जोशी यांनी राजीनामा का दिला अस करायच मनात होत.
आपल्याला अवगत असेल की आत्ताच झालेल्या नेव्हीच्या सिंधुरत्न या पाणबूडीमध्ये परीक्षणा दरम्यान
आग लागली आणि नौदलाने दोन अधिकार्यांना गमावले. ह्या अधिकार्यांनी आपल्या जिवावर उदार होउन पाणबुडीमध्ये त्यावेळेला असलेल्या इतर सर्व अधिकारी, नौसैनीकांना वाचवल, पण स्वता:ला वाचवू शकले नाहीत.
आता टाईम्सच्या हातात आलेल्या पुराव्यानुसार नौदलाने तिन तिन पत्र पाठवून केंद्रीय मंत्र्यांकडे पाणबूडीला
आवश्यक असणार्या बॅटर्यांची पुर्तता करण्या बाबत पाठपुरावा केला होता, पण आपले स्वछ प्रतिमा असलेले
संरक्षण मंत्र्यांनी त्या फाईलवर निर्णय घेण्याएवजी त्यावर निर्णय न घेण्याच ठरवल.
पाणबुड्यांसाठी आवश्यक असलेल्या बॅटर्या ह्या देश्यातच बनवल्या जातात आणि अश्या कारणानेच केंद्रिय
मंत्र्याच्या निर्णय न घेण्याच्या या निर्णयाबद्दल सर्व स्तरांवरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी निर्णय वेळेवर घेतला असता तर सिंधुरक्षक ही पाणबुडी वाचु शकली असती.
टीपः १. सिंधुरत्नवर आग लागली होती, ती आग नादुरुस्त वायर मूळे लागली, बॅटरीचा ह्या आगीत काही
सहभाग नव्हता असा निर्वाळा अपघाताच॑ कारण शोधणार्या पथकाने दिल्याच समजत.
२. सिंधुरक्षक पाणबूडीत तिन चार स्फोट होऊन ती पाणबूडी, त्यात असलेल्या १८ लोकांना घेऊन बुडाली.
नौदलाने ह्या दोन अपघातात २० जीव गमावले, ह्या सर्वाला कोण जवाबदार आहे ?
मंत्र्यांनी ह्या फाईलीवर निर्णय न घेण्यामागे काही कारणे असुही शकतील पण जेंव्हा त्यांनी सिंधुरत्न अपघाताच्या वेळेला ह्या अपघाताचे कारण नौदल प्रमुखांना विचारले तेंव्हा नौदल प्रमूखांचा भडका उडाला.
त्यांनी मंत्र्यांना विचारले की तिन तिन पत्र पाठवून बॅटरी दिल्या नाहीत आता काय विचारता आहात आणि
स्वाभिमानी नौदल प्रमुखांनी आपल्या पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
कदाचीत संरक्षण दलातील प्रत्येक फायलीला भ्रष्टाचाराचा वास येत असावा, पण, आता पर्यंत संरक्षण दलाने
विकत घेतलेल्या वस्तू कमी दर्जाच्या होत्या अश्यातला भाग नाही. आणि हेच बोफोर्स तोफानी दाखवून दिले.
गेल्या १० वर्षापुर्वी नौदलाने सादर केलेल्या ५०,००० को टी रु च्या नुतनीकरणाच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयातुन
अजुनही हिरवा कंदिल दाखवला नाही. त्या प्रकल्पावर मानमीय मंत्र्यांनी तीन समित्यां नेमुन अ हवाल मागवले,
आणि निर्णय काही घेतला नाही.
५०,०००० कोटि पेक्षा जास्त तुट भारत सरकार दरवर्षी आपल्या अन्न वितरण व्यवस्थेत असलेल्या अकार्यक्षमते मूळे सहन करते.
आजची ताजी बातमी:
आजच्या टाईम्स ऑफ ईंडीयाच्या बातमी नुसार, भारतीय सैन्याकडे दारुगोळ्याची कमतरता झाली आहे. सर्वसाधारण हाती असलेल्या दारुगोळ्याच्या साठ्याच्या ५०% साठाच लष्कराच्या हातात आहे जो खर्या युद्दात फक्त २० दिवस पुरु शकेल. लष्कराचे डोळे सुद्दा आता येण्यार्या सरकारच्या वाटेवर लागले आहेत.
खरच केंद्रात असलेले सरकार भारताला कुठे नेणार ?
जन जन को छूआ जन जिवन बदला !!
आज दुपारपर्यंत टाईम्सच्या
आज दुपारपर्यंत टाईम्सच्या वेबसाईट टाईंम्स ने सादर केलेला पुरावा, नेव्ही ने लिहीलेल्या पत्रां विषयीचा व्हीडीयो
उपलब्ध होता. आता तो मिळत नाहीय !!
होपलेस्स.
होपलेस्स.
माझी शिपाईगिरी या
माझी शिपाईगिरी या आत्मचरीत्राचा भाग आठवला जे जनरल एस. पी.पी थोरात यांनी लिहले आहे. १९५८ साली चीनच्या सीमेपर्यंत रनगाडे जातील असे रस्ते बांधुन द्या असे लष्कराने संरक्षण विभागाद्वारे नेहरुजींना लिहले होते. नेहरुजींच्या हिंदी चीनी भाई या घोषणेने संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना ती फाईल नेहरुजींकडे द्यायला भिती वाटत होती.
लष्कराची खात्री होती की चीन युध्द पुकारणार पण नेहरुजींना असे वाटत नव्हते.
वेळ निघुन गेली आपण युध्द हरलो.
यातुन आपण काही शिकलोच नाही का ?
यु पि ए सरकार मध्ये ए के
यु पि ए सरकार मध्ये ए के अँटनी हे एक स्वच्छ मंत्री आहेत असा लोकांचा विश्वास आहे.
स्वच्छ मंत्र्याची काम करण्याची पद्दत मात्र त्यांच्या स्वच्छतेच्या नजरे खालून जाताना अति स्लो होत असावी.
नेव्हीच्या ह्या पाणबूड्या अती जुनाट झाल्या आहेत. ह्या पाणबुड्यांनी त्याचा २५ वर्षांचा कार्यकाल पुर्ण केलेला आहे. प्रत्येक १० वर्षात युद्ध सामुग्रीत, टेक्नॉलॉजी मध्ये अमुलाग्र बदल होत असतो. जर २५ वर्षे जुनी पाणबुडी
घेउन लढायला गेलो तर काय विजय मिळवणार ?
भारतासमोर असे बरेच पेच आहेत आणि त्यात सुद्धा चिनसारखा धुर्त शेजारी आपल्याला लाभला आहे. त्याने
पाकिस्तान ला आपल्या कडे खेचलेच आहे, पण आता पाकिस्तानच्या मदतीने भारताच्या पश्चिम किनार्यावर पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला आहे. सर्व बाजुने भारताची कोंडी करण्याचा प्लान पुर्ण केला आहे. अश्या प्रकारे
चिनशी लढण्या एवजी शरणागती पत्करणच भारताला भाग पडणार आहे.