समुद्रावरची हवाई शक्ती
Submitted by पराग१२२६३ on 12 November, 2021 - 22:29
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाईदलाची विमाने उतरवता यावीत या दृष्टीने देशाच्या विविध भागांमधील राष्ट्रीय महामार्ग घडवले जात आहेत. त्यामध्ये महामार्गांचा काही भाग हवाईदलाच्या गरजांनुसार विकसित करून त्याचा वापर धावपट्टीप्रमाणे करण्यात येत आहे. राजस्थानातील बाडमेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925 ए वरील सत्ता आणि गंधव या गावांदरम्यानच्या 3 किलोमीटरच्या पट्ट्यात विकसित करण्यात आलेल्या महामार्गावरील धावपट्टीचे 9 सप्टेंबर 2021 ला उद्घाटन झाले.
‘रेड फ्लॅग’ युद्धसराव हे जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव मानले जातात. दरवर्षी अमेरिकेत नेवाडा राज्यातील नेलिस आणि अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळांवर हे सराव चार टप्प्यात आयोजित केले जातात. यंदा अलास्कामध्ये पार पडलेल्या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने आजवरच्या सर्वांत मोठ्या पथकासह सहभाग घेतला होता.