भारतीय हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानावरून ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात 19 एप्रिल 2022 ला यशस्वी चाचणी घेतली गेली. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ब्रह्मोस हे जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) आणि लक्ष्यावर अचूक मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारतीय भूदलात आणि नौदलात आधीच सामील करण्यात आलेले आहे. भारतीय नौदलातील युद्धनौकांवर ते तैनात करण्यात आलेले असून सध्या या क्षेपणास्त्राच्या पाणबुडी आवृत्तीचाही विकास केला जात आहे. त्याचबरोबर लढाऊ विमानांवरून डागता येऊ शकणाऱ्या आवृत्तीचा विकास आता पूर्ण होत आला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाईदलाची विमाने उतरवता यावीत या दृष्टीने देशाच्या विविध भागांमधील राष्ट्रीय महामार्ग घडवले जात आहेत. त्यामध्ये महामार्गांचा काही भाग हवाईदलाच्या गरजांनुसार विकसित करून त्याचा वापर धावपट्टीप्रमाणे करण्यात येत आहे. राजस्थानातील बाडमेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925 ए वरील सत्ता आणि गंधव या गावांदरम्यानच्या 3 किलोमीटरच्या पट्ट्यात विकसित करण्यात आलेल्या महामार्गावरील धावपट्टीचे 9 सप्टेंबर 2021 ला उद्घाटन झाले.
८ ऑक्टोबर. भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस. याच दिवशी १९३२ मध्ये अवघ्या ४ वेस्टलँड वापिटी विमाने आणि ५ वैमानिकांसह भारतीय हवाई दलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात भारतीय हवाई दलाने विविध संकटांच्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. भारत प्रजासत्ताक झाल्यावर रॉयल इंडियन एअर फोर्सचे इंडियन एअर फोर्स झाले.
बरीच वर्षे वाट पाहिलेला दिवस अखेर आज उजाडला. नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.च्या कारखान्यात गेली पाच-सहा वर्षे सुखोई-30 एमकेआय या भारतीय हवाईदलाच्या सामरिक शक्तीची ओळख असलेल्या लढाऊ विमानावर जगातील एकमेव स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जोडणी सुरू होती. त्यासाठी विमानात आणि या क्षेपणास्त्रातही आवश्यक बदल करण्यात येत होते. अर्थातच त्याची माहिती धडाडीच्या मराठी वृत्तवाहिन्यांना नव्हती.