लेखन

A1 जहाज, कार्यालयीन कुजबूज आणि बेहिशोबी पैसा !

Submitted by कुमार१ on 23 August, 2023 - 06:39

प्रवास करण्याचा सर्वात सोपा आणि अगदी नैसर्गिक मार्ग म्हणजे चालत जाणे. परंतु लाखो वर्षांपूर्वी मानवाला जशी दूरवरच्या प्रवासाची ओढ लागली तसा त्याने प्रवासासाठी काही मदत-साधनांचा विचार केला. त्यांच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी जलप्रवास हा अगदी प्राचीन म्हणता येईल. नदीच्या एका तीरावरुन दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी ओंडक्यावर बसून जाणे हा त्यातला अगदी मूलभूत प्रकार. या संकल्पनेचा पुढे विस्तार होऊन विविध प्रकारच्या बोटी आणि महाकाय जहाजे निर्माण झाली.

विषय: 

माझ्या काही कविता

Submitted by अमृतमय on 22 August, 2023 - 04:54

मिट्ट काळोख
आशेचा कवडसा
प्रकाशदाता

कार्यमग्न व्हा
अपेक्षा न तक्रार
आयुष्यभर

तुझीच नाव
वादळात फसेल
सावरशील?

रंगांचा सण
चाहूल वसंताची
जादू सृष्टीची

काट्यात फूल
खुललेले सदा
प्रेरणादायी

दुःख साचले
विरेचन करावे
मोकळे व्हावे

खाऱ्या अश्रूनी
दुःख सारे धुतले
पवित्र झाले

अटळ मृत्यू
आगम्य जीवनेच्छा
जीवनसत्य

उदास मन
देह झाकोळला
पूर डोळ्याला

जरी दोघांचा
समांतर प्रवास
अबोल साथ

विषय: 
शब्दखुणा: 

मी पाऊस आणि कविता

Submitted by मित्रहो on 20 August, 2023 - 07:23

काही गोष्टी बदलत नाही म्हणतात ना ते खरे आहे. आता हेच बघा उन्हामुळे तापून पाण्याचे बाष्प होते. त्याचे ढगात रुपांतर होते. कुठेतरी कसातरी कमी दाबाचा पट्टा वगैरे तयार होतो आणि मग पाऊस पडतो. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी कोण कुठे काय खणतो ते माहित नाही पण तो तयार होत असतो. थोडक्यात काय पाऊस पडणे ही एक सरळ साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. दवाखान्यात उगाचच चेकअपसाठी अॅडमिशन घ्यावी इतकं हे रटाळ प्रकरण आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

गुलज़ार - एक व्रतस्थ अस्वस्थ .

Submitted by किंकर on 18 August, 2023 - 13:53

आज हिंदी सिनेमाला लाभलेला हिरा झळाळत नव्वदीकडे वाटचाल करण्यासाठी सरसावला आहे . आपण तो शतायुषी व्हावा म्हणून देवाला साकडे घालू या . प्रत्येकाच्या थोड्या थोड्या शुभेच्छा त्यांचे उर्वरित आयुष्य त्यांना सहजच म्हणण्यास प्रवृत्त करू दे ....
' जिंदगी गुलज़ार है '
हिंदी सिनेमाचा एक संपूर्ण आधार ' संपूर्णंसिग कालरा ' अर्थात गुलज़ार

विषय: 

तिळ-गूळ!

Submitted by केजो on 14 August, 2023 - 18:54

एकदा कपडे घ्यायला मॅालमधे गेले होते. कपड्यांचा ढीग घेऊन ट्रायल रुममधे गेले. हा टॅाप घालून बघ, नाक मुरडून दुसरा घालून बघ, असं करता करता अचानक माझा खरेदीचा मूडच गेला. सगळे कपडे चुकीच्या साइझचे वाटू लागले. मग ह्या दुकानात माझ्या देहयष्टीला सुडौल भासवणारे ब्रॅन्ड्सच नाहीत, असा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला. सगळा पसारा आवरून बाहेर पडणार तितक्यात कानावर गोड हिंदी आलं. “अजी, सुनते हो. तुस्सी देखलो इक वार. थोडी मोटी तो नही लगदी?” परदेशात राहून दोन दशकं उलटलीयेत, तरीही आपली भाषा ऐकली की, पटकन मन भारतात जाऊन पोहोचतं.

विषय: 

दिल है हिंदुस्थानी- शेजारी!

Submitted by केजो on 14 August, 2023 - 18:50

कमी-बहुत प्रमाणात भारतात शेजारधर्म पाळणारे सगळेच असतात असं म्हंटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. सख्खे शेजारी वर्षानुवर्षं एकमेकांच्या सुख-दुख्खात सहभागी होतात. मुंबईसारख्या सर्व धर्म समभाव मानणाऱ्या शहरात तर शेजारी जवळच्या नातेवाइकांसाखेच होऊन जातात. त्यात कोणाची भाषा-धर्म-जात शक्यतो आडवी येत नाही. अठरापगड जातीतले शेजारी एकाच बिल्डिंगमध्ये राहून सगळे सण- वार एकत्र साजरे करतात. ईदीचा शीरखुर्मा, गणपतीचे मोदक, ख्रिसमसचा केक एकमेकांच्या घरी जात असतात. आम्ही ज्या मजल्यावर राहायचो तिथे तर मराठी, गुजराथी, तामिळ, आणि पंजाबी अशी चार घरं होती. सगळ्यात धम्माल म्हणजे ह्या चार शेजारणींच्या गप्पा.

विषय: 

आतुर

Submitted by केजो on 14 August, 2023 - 18:49

आज-काल फक्त तुझाच विचार असतो मनात. कधी एकदा तुला भेटतेय असं झालंय. तुझ्या नुसत्या आठवणींनीही अंगावर काटा फुलून येतो. स्वतःशीच मी हसू लागते आणि आजूबाजूच्यांना मला चिडवण्याचं जणू निमित्तच मिळतं. तू आलास की हे करू, ते करू असं मी वर्षभर ठरवत राहते. तू आलास की, तुझ्याबरोबर लांबवर बाईकवर भटकायला जायचंय. माहितीये की, तुझ्याबरोबर बाईकवर भटकायचं स्वप्न पूर्ण होणार नाहीये. तरीही वेडं मन अजूनही आशा ठेवून आहे. बाईक नाही तरी निदान लॉन्ग ड्राईव्हवर जाऊया, आणि गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून जगाची पर्वा न करता दोघंच डोळ्यात डोळे घालून हरवून जाऊया.

विषय: 

दिल है हिंदुस्थानी- आमंत्रण

Submitted by केजो on 14 August, 2023 - 18:48

आता शाळा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. उन्हाळ्यात बरेच जण कुठे ना कुठे प्रवास करत असतात, त्यामुळे जवळपास दोन महिने फारशी कोणाची भेट होणार नाही. तर त्या आधी एकदा भेटी व्हाव्या म्हणून इथे अमेरिकेत “समर पार्टीज” सुरू झाल्या आहेत. आम्हा भारतीयांच्याही भेटी-गाठी होतायेत, तर मुलांच्या शाळांमधल्या अठरापगड मित्र-मैत्रीणींच्याही पार्ट्या होतायेत. अशावेळी काही फरक प्रकर्षाने जाणवतात.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन