माझ्या काही कविता

Submitted by अमृतमय on 22 August, 2023 - 04:54

मिट्ट काळोख
आशेचा कवडसा
प्रकाशदाता

कार्यमग्न व्हा
अपेक्षा न तक्रार
आयुष्यभर

तुझीच नाव
वादळात फसेल
सावरशील?

रंगांचा सण
चाहूल वसंताची
जादू सृष्टीची

काट्यात फूल
खुललेले सदा
प्रेरणादायी

दुःख साचले
विरेचन करावे
मोकळे व्हावे

खाऱ्या अश्रूनी
दुःख सारे धुतले
पवित्र झाले

अटळ मृत्यू
आगम्य जीवनेच्छा
जीवनसत्य

उदास मन
देह झाकोळला
पूर डोळ्याला

जरी दोघांचा
समांतर प्रवास
अबोल साथ

तारे लपले
ढगाच्या आडोशाला
सुने आभाळ

तुझ्या शब्दांना
सापडले तराणे
अमर गीत

पाण्यात मासा
तहानलेला कसा
कायम असा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults