लेखन

पाऊस

Submitted by बिपिनसांगळे on 2 July, 2023 - 02:50

पाऊस
----------------------------------
आई गं
सरसर पाऊस आला गं
जाऊ दे भिजायला गं

क्षणात ऊन कुठे लपलं
जोरदार वारं हे सुटलं
वास भारी मातीला गं
जाऊ दे भिजायला गं

शेजारची पोरं अंगणात
फेर धरुनी रिंगणात
जाऊ दे फेर धरायला गं
जाऊ दे भिजायला गं

पाण्याच्या झाल्या नद्या
सोडू गं त्यात होड्या
दे ना कागद करायला गं
जाऊ दे भिजायला गं

विषय: 
शब्दखुणा: 

अंमली पुनर्लेखन - भाग १०!

Submitted by अज्ञातवासी on 1 July, 2023 - 12:50

याआधीचा भाग
https://www.maayboli.com/node/83633

(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)

विषय: 

अंमली - पुनर्लेखन भाग ९

Submitted by अज्ञातवासी on 28 June, 2023 - 11:51

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83617

(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)

धागा भरकटण्याचा धोका

Submitted by प्रकाश घाटपांडे on 27 June, 2023 - 10:01

मायबोली किंवा तत्सम संवादी संकेतस्थळांवर धागालेखकाने एखादा लेख टाकला तर त्या लेखावरील प्रतिक्रिया या चर्चा व गप्पा या स्वरुपात बनत असतात. त्यावर धागालेखकाचे नियंत्रण असतेच किंवा असावेच असे होत नाही. अन्यथा धागा वा! वा! छान छान! अशा त्रोटक प्रतिक्रियात वा केवळ वाचनमात्र स्वरुपात होतो. धागा भरकटण्याचे डेव्हिएशन किती व कसे असावे याचे साचेबद्ध उत्तर देता येत नाही. प्रत्यक्ष भेटीतही जेव्हा आपण अशा गप्पा मारतो त्यावेळी त्यात बराच विस्कळीत पणा येत असतो. ही काही विशिष्ट औपचारिकतेचे बंधन असणारी न्यायालयातील केस नसते. भरकटण्याचा धोका हा जिवंत धाग्यात असतोच. मूळपदावर गाडी आणावी लागते कधी कधी.

पुस्तक परिचय- राग दरबारी

Submitted by वावे on 24 June, 2023 - 02:33

राग दरबारी - श्रीलाल शुक्ल

ही हिंदी कादंबरी मी नुकतीच स्टोरीटेलवर ऐकली. त्रिलोक पटेल यांनी अभिवाचन केलं आहे.
टोकदार,बुद्धिमान, जाणकार, सणसणीत उपरोध या कादंबरीत ठासून भरलेला आहे. विषय मुख्यतः राजकारण.

विषय: 
शब्दखुणा: 

कोणा सांगावयाचे?

Submitted by निखिल मोडक on 21 June, 2023 - 17:03

काटे वाट्यास आले, हे ना सांगावयाचे
केले जखमी फुलांनी, कोणा सांगावयाचे?

नव्हता अंधार नशिबी, हे तो खरे जरीही
मज पोळले दिव्यांनी, कोणा सांगावयाचे?

जो मार्ग चाललो तो, होता खरे सुगंधी
ते रान केतकीचे, कोणा सांगावयाचे?

सत्यात उतरली स्वप्ने, नसता ध्यानीमनी हे
उडवून झोप ती गेली, कोणा सांगावयाचे?

झाल्या असतील कविता, मागे काही बऱ्याही
मज काळजी नव्याची, कोणा सांगावयाचे?

©निखिल मोडक

शब्दखुणा: 

अंमली - (पुनर्लेखन) भाग ७!

Submitted by अज्ञातवासी on 21 June, 2023 - 10:39

(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83591

Pages

Subscribe to RSS - लेखन