अंमली पुनर्लेखन - भाग १०!

Submitted by अज्ञातवासी on 1 July, 2023 - 12:50

याआधीचा भाग
https://www.maayboli.com/node/83633

(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)

"आत येऊ?"
"कोण तुम्ही?"
"तुमचा सिनियर मला चांगला ओळखतो. आता आत येऊ?"
तो मागे सरकला.
गौडा आत आला, आणि सोफ्यावर बसला.
"बस." गौडाने त्याला आवाज दिला.
तोही बाजूला येऊन बसला.
"ड्रम कुठे आहे?" त्याच्या आवाजात जरब होती.
"मधल्या रूममध्ये..."
"...त्या ड्रममध्ये काय आहे तुला माहिती आहे?"
"हो."
गौडा हसला.
"तुझ्या आयुष्यात आता दोन शक्यता आहेत. एकतर कधीतरी मी परत येईन, हा ड्रम घेऊन जाईन. तेव्हा तुला जिवंत ठेवायचं का नाही, हा अधिकार माझा असेन.
नाहीतर एक दिवस तू स्वतः या ड्रममधल्या वस्तूचा योग्य उपयोग करशील. तेव्हा तर मला नक्की कळेन, आणि मी परत येईन.
पण कुठल्याही परिस्थितीत ह्या ड्रमला काही झालं, आणि तू जिवंत राहिलास...
...तर ट्रस्ट मी, तुला पश्चाताप होईल, तू जिवंत असल्याचा."
गौडाच्या नजरेत जरब होती.
त्याने निमूट मान हलवली.
...आणि गौडा तिथून निघून गेला.
*****
"विलास शिंदे. तुम्ही माझ्यापर्यंत पोहीचण्याचं कारण गौडा होता. गौडा कायम माझ्यावर नजर ठेवून होता.
ती पुडी माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा गौडानेच केलं.
तुमचा सगळ्या मोठा क्लाएंट. AB एंटरप्राईज, उर्फ आदी बसवेश्वर एंटरप्राईज. गौडा लिंगायत समाजाचा आहे. लिंगायत समाजाचे आराध्य, बसवेश्वर महाराज. इनफॅक्ट आता गौडाचा नंबर सुद्धा माझ्याकडे आहे. तुमच्या कृपेने."
विलास शिंदे थिजून त्याच्याकडे बघत राहिला...
...त्याने अक्षरशः सगळा पट त्याच्या डोळ्यासमोर मांडला होता.
"...मिस्टर शिंदे. आजपासून तुम्ही फक्त मला सर म्हणाल. कारण तुम्ही माझ्या आणि गौडाच्या पार्टनरशिपमधील फक्त एक एम्प्लॉयी आहात. आणि आता वेळ आहे, माझ्या खऱ्या पार्टनरला भेटण्याची.
उद्याच एक मीटिंग अरेंज करा. आणि हो, आता काहीही लपवाछपवी नकोय..."
विलास शिंदेच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
"चला निघा... कामाला लागा..." तो म्हणाला.
विलास शिंदे निमूटपणे तिथून निघून गेला.
*****
"साक्षी."
"येस सर?"
"थकलो मी. कॅन वी डू इट टूमारो?"
"वी कॅन, बट आय फिल..."
"किती काम करून घेतेस माझ्याकडून..." त्याने मान मागे टेकवली.
"...आफ्टर ऑल, आय लव प्राजक्ता, मी प्राजक्तासाठी काहीही करू शकते." तिने अक्षरशः हसू दाबत म्हटले.
"दिल जित लिया. चिटणीसना बोलव. थोडावेळ ब्रेक घेऊयात. आय विल गेट अ कॉफी फॉर यु."
तो बाहेर गेला, तिने फोनची बटणे दाबायला सुरुवात केली.
परत येताना त्याच्या हातात दोन मग होते.
"सिरीयसली सर, आय हेट ब्लॅक कॉफी."
"तू टेस्ट डेव्हलप कर, यू विल लाईक इट."
"अजिबात नाही सर." ती हसली.
"कान्ट हेल्प."
"आत येऊ सर?" चिटणीस बाहेरूनच म्हणाले.
"येस. या. कॉफी घेणार?"
"नाही सर. आताच चहा झाला."
"ओके. साक्षीच म्हणणं असं आहे, की तुमचं सेल्स, प्रॉफिट, कॉस्ट, यात काहीतरी बेसिक गफलत होते आहे?"
"हो सर."
"आणि ती काय?"
"सर कालची जोशी पेंटची कन्सायमेंट एक करोडची होती, बरोबर."
"हो."
"सर्व मिळून आपल्याला दहा लाख देखील खर्च आला नसेल."
"मग?"
"आणि जोशी जेवढं बिलिंग होतं, त्याच्या पंधराच टक्के अमाऊंट देतात."
"हो..मग?"
"सर मग हा उरलेल्या पंच्याऐंशी लाखाचं काय करायचं? आणि जोशी नाही, प्रत्येक कस्टमरची हीच परिस्थिती आहे. एटीफाय परसेंट रेवेन्यू कुठून येणार? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट फाडून खाईल आपल्याला."
"चिटणीस. तुमच्या अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये किती लोक आहेत?" त्याने प्रश्न विचारला.
"वीस."
"सगळ्यांना बोलवा."
"आता?"
"हो."
"तुमचा फोन युज करू?"
"चला, सोबतच जाऊ. साक्षी..."
"चलो." ती म्हणाली.
तो एक मजला खाली उतरला.
"अकाऊंटस डिपार्टमेंट. वी आर गोइंग ऑन ग्राउंड फ्लोअर. ऑल ऑफ यू. नाऊ." त्याच्या आवाजात जरब होती.
सगळेजण जागेवरून उठले, आणि त्याच्या मागोमाग निघाले.
थोड्याच वेळात सर्वजण ग्राउंड फ्लोअरवर होते.
तिथेच एक कंटेनर उतरवला होता.
"चिटणीस. उघडा तो."
"काय?"
"कंटेनर उघडा."
चिटणीस भांबावून गेले.
"ओके मीच उघडतो."
त्याने तो अजस्त्र कोयंडा काढला, आणि दोन्ही दारे उघडली.
...सगळेजण अवाक होऊन बघत राहिले...
...नोटांनी खच्चून भरलेला तो कंटेनर होता.
...इतकी रक्कम एकत्र कुणीही उभ्या आयुष्यात चित्रपटात बघितली नव्हती...
"चिटणीस..."
"बोला सर."
"कॅश सेल्स. सगळे आऊटस्टँडिंग क्लोज करा."
त्याची नजर सगळ्यांवर रोखली गेली.
थोडावेळ कुणी काहीही बोललं नाही.
"येस सर." चिटणीस म्हणाले.
"आय एम ए बिस्ट चिटणीस. तुमचं इन्कम टॅक्स सुद्धा मी फाडून खाईन. हे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची. आणि हो, मला ही रक्कम किती आहे तेही माहितीये, तुमचा आकडा येण्याची वाट बघेन. साक्षी. चल. यांना यांचं काम करू दे. लक्षात ठेवा, तुमचा मालक चीप नाहीये,
...आणि प्राजक्ता अमूल्य आहे..."
साक्षी भानावर आली, आणि त्याच्या पाठोपाठ निघाली...
...सगळेजण कपाळाला हात लावून त्यांच्याकडे बघत राहिले.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोंधळ होतोय डोक्यात.. असो.. हामाबुदो... बुध अन् शनी regular भाग येत आहेत हे आवडतय... चांगल लिहिता हेसां नलगे..

<<< बुध अन् शनी regular भाग येत आहेत हे आवडतय... चांगल लिहिता हेसां नलगे..

Submitted by अनघा >>>
सहमत..
तुम्ही लिखाण पुन्हा नियमित सुरू केलेत याबद्दल अभिनंदन..