Submitted by बिपिनसांगळे on 2 July, 2023 - 02:50
पाऊस
----------------------------------
आई गं
सरसर पाऊस आला गं
जाऊ दे भिजायला गं
क्षणात ऊन कुठे लपलं
जोरदार वारं हे सुटलं
वास भारी मातीला गं
जाऊ दे भिजायला गं
शेजारची पोरं अंगणात
फेर धरुनी रिंगणात
जाऊ दे फेर धरायला गं
जाऊ दे भिजायला गं
पाण्याच्या झाल्या नद्या
सोडू गं त्यात होड्या
दे ना कागद करायला गं
जाऊ दे भिजायला गं
बरं ऐकतो मी तुझं
जातो छत्री घेऊन
पण बाहेर नेऊन
मी बंदच ती करेन
नाहीतर तूच चल भिजायला गं
मस्त मस्त धारा झेलायला गं
--------------------------------------------------
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाचक मंडळी नमस्कार .
वाचक मंडळी नमस्कार .
मी फारसा सक्रिय राहू शकत नाही . इतर लेखकांच्या कृतींना किंवा माझ्या लेखनावरच्या अभिप्रायांना योग्य वेळी प्रतिसाद देऊ शकत नाही . नंतर फार उशीर झालेला असतो . हा माझा दोष आहे . तरी क्षमा असावी .
धन्यवाद .
मस्त कविता. आशा करते सर्व ठीक
मस्त कविता. आशा करते सर्व ठीक असेल.
. मस्त कविता..
. मस्त कविता..
बालभारतीतल्या कवितांची आठवण झाली..
बिपिनजी , फार दिवसांनी वाचलं तुमचं लेखन..