आज हिंदी सिनेमाला लाभलेला हिरा झळाळत नव्वदीकडे वाटचाल करण्यासाठी सरसावला आहे . आपण तो शतायुषी व्हावा म्हणून देवाला साकडे घालू या . प्रत्येकाच्या थोड्या थोड्या शुभेच्छा त्यांचे उर्वरित आयुष्य त्यांना सहजच म्हणण्यास प्रवृत्त करू दे ....
' जिंदगी गुलज़ार है '
हिंदी सिनेमाचा एक संपूर्ण आधार ' संपूर्णंसिग कालरा ' अर्थात गुलज़ार
आपण त्यांना एक प्रथित यश व्यक्ती म्हणून ओळखताना एक गीतकार , लेखक , पटकथाकार , दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो . त्यांची कोणताही विषय हाताळताना त्या विषयातील गहनता आपल्या समोर उलगडण्याची सहजता हेच त्यांच्या लिखाणातील मर्मस्थान आहे असे सातत्याने जाणवत राहते.
तरीही मला एक कोडे कायमचे पडले आहे ते म्हणजे ' गुलज़ार ' म्हणजे नक्की काय आहे ? त्यांना समजून घेताना नक्की काय केले पाहिजे ?
कारण त्यांची ' जिंदगी ' म्हणजे फक्त गेली आठ दशके आणि त्यातील जगणे आहे का तो एक अगम्य प्रवास आहे . अल्प अजाणत्या वयात मातेचे छत्र गमावल्या नंतर ते वात्सल्य शोधताना कोणीतरी निर्माण केलेला दुरावा , कोणीतरी दिलेली ममता, इथं पासून ते तारुण्यातील प्रेम आपुलकी ते पुन्हा त्यात आलेली 'दरार ' हे त्यांचे जगणे आहे का , अनेक पुरस्कार, मानसन्मान , लेखक , दिद्गर्शक म्हणून मिळालेले सुयश , प्रसिद्धी, पैसा , सिनेसृष्टीतील झगमगाट, असे माणसांच्या गराड्यात असलेले एकाकी पण हे त्याचे जगणे आहे ?
त्यांनी त्यांची ' जिंदगी ' हीच त्यांच्या संवादाचे साधन केले . त्यामुळे ज्या सहजतेने ते लिहतात -
' तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हू मैं ' किंवा
अनेक अडचणींना सामोरे जात जगताना ते स्वतःशीच गुणगुणत म्हणतात -
' दिल ढुंढता है फिर वही
फुरसत के रात दिन '
त्यांच्या चित्रपट गीतांवर , लेखनावर , उर्दू शायरीवर लिहायचे म्हटले तर मानवीजीवनातील चढउतार देखील किती काव्यात्मक रूप घेऊ शकतात याचे सहज प्रत्यन्तर येईल .
गुलज़ार म्हणचे ' बगीचा ' अनेक विविध रंग आणि सुगंध यांनी व्यापून टाकणारा परिसर . रंगांची ओढ मनात असून देखील त्याची उधळण विचारातून केली तर ती अधिक मोहक असते याची ग्वाही स्वतःचे कामातून देताना त्यांनी स्व वापरासाठी निवडला तो शुभ्र रंग .त्यांनी नेहमीच धवल रंगातील वस्त्रे परिधान केली . हा शुभ्र रंग जो पावित्र्य , नितांत स्वछता , विनम्रतेचे प्रतीक आहे . पण हाच रंग जो किमानता , साधेपणा आणि त्याच बरोबर एक पोकळी /रिकामेपण दर्शवतो त्याची झलक त्यांच्या जीवन दिसते.
त्यांचे जीवन अनेक पैलूंनी भरलेले असले, त्यांनी अनेक प्रकारे स्वतःला व्यक्त केले असले, तरी त्यांच्या मनाची अस्वस्थता खऱ्या अर्थाने व्यक्त होतें ती त्यांच्या
कमीत कमी शब्द मांडणीतून .
गुलजार यांचे - Quote म्हणजे - If you quote a fact or example, you refer to it in order to add emphasis to what you are saying:
हि व्याख्या त्यांच्या मांडणीनंतर मान्यताप्राप्त झाली आहे असे वाटावे .
आरसा आपण दररोज पाहतो , पण ते त्यात डोकावतात त्यामुळे ते सहजच म्हणतात -
' आईंना देखकर तसल्ली हुई
हमको इस घर में जानता हैं कोई '
आपण अस्वस्थ झालो तर चडफडतो पण अस्वस्थता त्यांच्या मनात उतरली कि त्या मनस्थितीला सामोरे जाताना -
' दर्द की गहराई में जब आँखें नम होती हैं,
तब ज़िंदगी की महक महसूस होती है। ' असे त्यांना सहज सुचते .
हे त्यांचे व्यक्त होणे म्हणजेच व्रतस्थ राहत व्यक्त केलेली अस्वस्थता आहे , कधी ती धीर गंभीर शब्दात असते, तर कधी गमतीदार शब्दात पण आशयघन असते , त्यामुळे ते लिहतात -
' थोडासा रफ़ू करके देखिये ना
फ़िर से नई सी लगेगी
जिंदगी ही तो है ..... '
आयुष्यात चुका केल्या तर शिक्षा होणारच , त्याचे भोग भोगावे लागणारच हे जितके खरे तितकेच कधी चूक नसताना अन्याय होतो , आपण आदळआपट करतो आणि ते व्यक्त होतात -
' कुसूर तो बहुत किये है
जिंदगी मै ,
पर सजा वहां मिली जहाँ
बेकसूर थे हम ...
आज ते जगात आहेत , आज ते जगत आहेत . आज ते संसारात आहेत पण ते संसारी नाहीत ते विवाहित आहेत पण वैवाहिक जीवनापासून दूरच आहेत . मुलीकडे पाहून संसार सोडला पण मोडला नाही. राखी जीवन राखून जगली . पण गुलजार ' मेघना ' साठी बरसात राहिले त्यामुळे या सर्व परिस्थीतीवर भाष्य करताना त्यांच्या तोंडी सहज शब्द येतात -
'ना जाने कैसा परखता है
मुझसे मेरा खुदा .....
इम्तिहान भी सख्त लेता है
और मुझे हारने भी नाही देता .... '
आणि म्हणूनच गुलजार तुम्ही शतायुषी व्हा आणि तेही व्रतस्थ राहत आणि आम्हा रसिकांना असेच वैचारिक रित्या अस्वस्थ करत .
कारण शेवटी कशीही असली तरीही - जिंदगी गुलजार है .
गुलज़ार - एक व्रतस्थ अस्वस्थ .
Submitted by किंकर on 18 August, 2023 - 13:53
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संपूर्ण सिंग कालरा यांचे
संपूर्ण सिंग कालरा यांचे नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.
नव्वदीतही फिट वाटणार्यांच्यात चटकन आठवणारे सेलेब्रिटीज म्हणजे गुलजार आणि मिताहारी लालकृष्ण अडवाणी.
>>संपूर्ण सिंग कालरा यांचे
>>संपूर्ण सिंग कालरा यांचे नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.>>+१
छान लेख...
छान लेख...
छान लेख...
आवडला लेख. पण माबोवरती
आवडला लेख. पण माबोवरती दुर्लक्षित राहीलेला वाटला.