किरदूर्ग एक भय मालिका भाग १
सकाळी अचानक दारावरची बेल वाजली!
यशवर्धन राजे ला आश्चर्य वाटले की एवढ्या
सकाळी कोण भेटायला आले असेल. तो अनिच्छेनेच बऱ्याच वेळाने अंथरुणातून उठला आणि दार उघडल्यावर त्याला उभा असलेला पोस्टमन दृष्टिस पडला. यशवर्धनने रजिस्टरवर सही केली आणि पत्र हातात घेतले. पोस्टमन ने जाताना रागाने बघितले.
यशवर्धन पत्र घेऊन पलंगावर बसला
आणि शिक्क्यावरील गावाचे नाव वाचले, त्याच्या मनात आठवणींचा पूर आला. ते पत्र किरदुर्ग गावातील त्याचा मित्र सुधाकर चे होते आणि नाव वाचल्यावर कॉलेज चे दिवस आणि आज पर्यंतचा भूतकाळ त्याच्या नजरे समोर उभा राहिला.