एकोटाक्याच्या कभिन्न चखण्यारात्री

Submitted by नाचणी सत्व on 16 August, 2018 - 23:31

एकोटाक्याच्या कभिन्न चखण्यारात्री पाय मोकळे करायला बाहेर पडलो होतो.

नीलदंती शीतललहरींनी अंगावर शहारे येत होते. अंगावरील गात्रे नि गात्रे नीलदंतीच्या प्रभावाखाली हुडहुडत फिस्कारत होती. माझं एक पाऊल शिखरावर होतं आणि दुसरं पायथ्याशी. माथ्यावर हिमवर्षाव होत होता. घामाच्या धारा लागल्या होत्या. पायथ्याला किरमिजी सूर्य आग ओकत होता. थंडीने टाच दुखायला लागली होती.
अलगदच पलिकडच्या जंगलात शिरलो तेव्हां त्रिमितजाणिवा आकुंचन पावत होत्या. अर्धउन्मिलित नेणिवांच्या शृंखलाहीन प्रदेशात मी आक्रसत चाललो होतो..

भगव्या झाडांची दाटी बोलावत होती. आकाश जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले. मी चांदण्या वेचून घेतल्या. एखादी नटमोगरी इनबॉक्सात जेवण झालं का विचारल्यासारखी आशाळभूत तप्त चेहरा करून बसलेली खड्यासारखी वगळली. नंतर तो नादच सोडून दिला. अंधारातही चंदेरी पानांवरून घरंगखत येणारा निळा चंद्रप्रकाश चित्तथंबोर घुंगरगुंटी सारखा आल्हाददायक भासत होता. अश्व दौडल्यासारखा भास झाला. नाथमाधवांच्या सोनेरी टोळीतील स्वार असावा असा विचार करून दुर्लक्षच करणार होतो पण...

लाखो हरीणपंथी क्षत्रिय प्राणी मऊ मेण्याहून अशा सिंहस्थाकडे आपल्या मागण्या घेऊन मोर्चाने चाललेले होते. गाजपरसिंहांची तरलचित्रांचा आसमंतात फैलाव झालेला होता. पेट्रोमॅक्सची बत्ती धरलेल्या एका गो-यापान काळविटाकडे पाहत षटकोनी आकाराची भंदरफळे तोडून मी खायला सुरूवात केली. भिंगारविहाराच्या चौकातल्या मचापवृक्षाने बालपणी या फळांचा झिंगुडानंद दिला होता.
हे जंगल कुठले असा विचार करत असताना दोन फुटाचा एक बुंधा दिसला. त्यात एक लहरशृंखला प्रवेश करत होती आणि कोट्यवधी लहरशृंखला दुस-या बाजूने वातावरणात फैलावलेल्या होत्या. त्या लहरींवर उर्ध्वजांघांवर मुखपुस्तिका उमलल्या होत्या. कुठे संकेता संकेतातील स्थळे.

आणि इतक्यात प्रवेशिकेची कळ दाबता जननीमुखी उघडली. नागरी देवांच्या देवनगरीत देवनागरीचा जागर जाहला. प्रकाशमान दृश्यपटल समोर पसरले. जणी लाखो जाणिवा ब्रह्मांडातून एकवटल्या. प्रत्येक जाणिवे च्या विशेषनामाचा सांकेतिक शब्द अंगुलीस्पर्शाने फुलत होता. एका भीषण युद्धाची चाहूलच जणू लागत होती.
वक्षयञ
हळ्ळफट्ट
कि
ळाज्ञमेय
ञाक्षृक ?

जाणिवांच्या अनुक्रमणिकेत असंबद्ध गप्पा अग्रक्रमाने अग्रक्रमिल्या. निष्काळजी काव्यास अनकुचीदार मऊ भाले फुटताना नेणिवांचा कोळसा हिरवाबुंद पेटला होता. संधिवाताचा निळा प्रकाश रंध्रारंध्रातून डोकावत होता. भव्य व्यासपीठावर ललना बाळास स्तनपान करत होती. मंत्रीगणांत खलबत चालू असता प्रधानजींनी वेतनाचा प्रश्न मांडला. सेवक रजा मागत होता. मदतनीस बिळात दौडले. कायदेकानून लाजून चूर झाले. बाफाबाफांवर अश्व दौडले. कुठे उपाशी बोका लवंडला कुठे राजस कन्या.

भारतमाता अनुल्लेखआग्रही वदली कवळ घेऊनी आणि चुकचुकत पाल दौडत राहिली. निराशेने उद्गारवाचक चिन्ह तापले. अराजकमान्य राक्षसी आपुलकीस आले. कृष्णशक्तींना जाग आली. मदतनीसांची भुतोस्की वदली. यमनियमांचे कारण नुरले. आपले आपले विश्व उरले.

एकच जयघोष, एकच मंत्र
एकच बाणा, एकच तंत्र

हेमाशेपो, हेमाशेपो , हेमाशेपो

इति लेखनसीमा

- वीर अंतरीक्षकुमार डागदार

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंद, मानव Proud
आभार.

मानव, वैयक्तिक कुठेय काही ? मलाच अजून व्यक्ती दिसल्या नाहीत Lol

अक्की ३२० Happy

कळलं काही नाही पण आपली शब्दांवरची हुकूमत पाहून आपले कौतुक वाटले. इतके दिवस आपले फक्त प्रतिसाद वाचत होतो. आता आपले स्वतंत्र लिखाण वाचायला नक्की आवडेल.

भारी झालं. पण सगळ्यांनाच प्राज्ञ मराठी समजत नाही हो. (जर हे प्राज्ञ मराठी असेल तर. मुळात प्राज्ञ हा शब्द फक्त पुलंकडून ऐकलाय. त्यापलीकडे माहिती नाही. पण असंच काहीसं असावं ते.)

छान आहे. मस्त रिलेट झालं.
रात्री झोपेतला स्वप्न बघतानाचा माझा मेंदू रेकॉर्ड केला तर असंच काहीसं मिळेल.

मला सखाराम गटणे आठवला Proud

भारी झालं. पण सगळ्यांनाच प्राज्ञ मराठी समजत नाही हो. (जर हे प्राज्ञ मराठी असेल तर. मुळात प्राज्ञ हा शब्द फक्त पुलंकडून ऐकलाय. त्यापलीकडे माहिती नाही. पण असंच काहीसं असावं ते.)+१११११११११

वैयक्तिक ताशेरे वगळून लेखनाला __/\__ +११

भारीच !

सचिन काळे, मनःपूर्वक आभार आपले.

मी चिन्मयी - धन्यवाद आपले. हे प्राज्ञ नाही हो अज्ञ माणसाचे मराठी आहे. Happy

किल्ली आभार . ताशेरे नाहीत हो. व्यक्ती कुठली ते मलाच अद्याप समजलेले नाही Lol

आनंद - धन्यवाद. माझ्या आडनावातच अड्डा असल्याने स्वाभाविक आहे.

रश्मी - आभारी आहे.

शाली - आभार वाचल्याबद्दल. बाकी मलाही समजलेले नाही काय लिहीलेय ते. Lol

व्यत्यय - कसं कोण जाणे पण तुमचा तीर अंधारात का होईना निशाण्यावर बसला. मनापासून आभार.

मिस्टर पंडीत, मामी, बब्बन - मनापासून आभार आपले.

लोक म्हणत होते ना - मायबोलीवर मराठीच लिहा! घ्या म्हणावे आता!!
पुनः नाही म्हणणार, इंग्रजी शब्द वापरू नका.

बाकी आजकाल मराठी कळले नाही म्हणायची लाज वाटत नाही मराठी लोकांना.

नन्द्या ४३ आणि आसा , आभार. माझ्याही डोक्यावरूनच गेलं.

स्वप्नाली >> हो. अक्षर चांगले नाही माझे. पुढच्या वेळी सुधारेन.
उद्गारवाचक चिन्हंही राहीलेय एक.

तुमचा शब्द संग्रह खूपच अफाट आहे....पण खरंच नाही समजली ....उद्या आणखी एकदा वाचून पाहीन...तुम्हीही थोड उलगडून सांगितलं तर बरे होईल नसमजलेल्या साठी Happy

गुढगर्भ अंधारात बसून काजव्याच्या लेखणीने रिक्त ओसाड अज्ञात पटलावर धूळअक्षरे उमटवत केलेलं हे लिखाण वाचून स्तिमित झालो

हो. अक्षर चांगले नाही माझे. पुढच्या वेळी सुधारेन.
उद्गारवाचक चिन्हंही राहीलेय एक.>>> Lol
काय लिहिलंय! मला तर यात बरंच काही सामावल्यासारखं वाटतंय... पण नेमकं काय ते सांगता येणार नाही.

यावर एकच उतारा -
'हिमोग्लोबिन ऑफ द अ‍ॅटमॉस्फेरिक प्रेशर इन द कंट्री!'

पण जगन्नियंत्याच्या परिप्रेक्ष्यातुन पाहु जाता अथांग पसरलेल्या या टीचभर विश्वातला पृथ्वीचा लसलसता कोंभ जागीच थिजलेला जाणवतो. गुरुजींचा श्याम पायाला माती लागु नये म्हणुन धडपडतो तेव्हा त्याला उमगत नाही की सगळ्यांचे पायच मातीचे आहेत. पिपाणीच्या आवाजाने कान किटतात तेव्हा तुतारी भावांना भावते. लांडग्यांशी लढता लढता ससे नखं पाजळु लागतात. भारतमातेवर होणारे अथक आघात पाहुन आफ्रिकेतला राजपुत्र उद्विग्न होउन गुर्गुरतो. फडफडत धडपडणारी पणती सात वेळा शिलगवावी लागलेली बघुन क्रांतिसुर्याचा किरण सत्ताविसाव्यांदा खदाखदा हसतो पण दुर्दैवाने उजेड मात्र कुठेच पडत नाही. त्याच वेळी अंधाराचे शिलेदार बीभत्स बुभु:कार करत शड्डु ठोकतात. गणपत वाणी वीडी फुकत रहातो. ओल्या पिपात मेलेल्या उंदरांना उषःकालाशी काहीच देणंघेणं नसतं...

ललिता - प्रीति >>:हहगलो:

व्यत्यय >>> भारी जमलंय.
फडफडत धडपडणारी पणती सात वेळा शिलगवावी लागलेली बघुन क्रांतिसुर्याचा किरण सत्ताविसाव्यांदा खदाखदा हसतो पण दुर्दैवाने उजेड मात्र कुठेच पडत नाही. >>>>> Lol

आशुचँप >>> Lol
उमानु, टवणे सर, आदिति, पवनपरी >>> सर्वांचे आभार.

लिहलय छान. एकदा असं लिहायचा प्रयत्न करायला पाहिजे वाचताना भारी वाटतं Happy
व्यत्यय, तुम्ही पण भारी लिव्हलय

Pages