लेखन

प्रदर्शन

Submitted by श्रीराम_देशपांडे on 9 October, 2023 - 01:34

सज्जता देवदर्शनासाठी
का तयारी प्रदर्शनासाठी?

नेहमी रिक्त राहते ती रांग
असते जी आत्मदर्शनासाठी

प्रेम करतात जाणिवेसाठी
प्रेम नसते निदर्शनासाठी

देव पावेल का कधी त्यांना?
जे झगडतात दर्शनासाठी

चेहरा साधा चांगला आहे
का सजावट सुदर्शनासाठी?

विषय: 
शब्दखुणा: 

भरणी श्राद्ध भाग २ (भयकथा)

Submitted by प्रथमेश काटे on 3 October, 2023 - 12:39

भरणी श्राद्ध
भाग दुसरा

गप्पा गोष्टी करीत जेवणाला सुरुवात झाली. थरथरत्या हातानं येसाजीने एक भजी उचलली, आणि हातात घेऊन तो एकटक त्या भज्याकडे बघू लागला. त्याच्या नजरेत कमालीची आतुरता दाटून आली होती. जर कुणी त्याच्याकडे निरखून पाहिलं असतं ( खरंतर त्यावेळी तसं न करणेच योग्य ठरणार होतं.) तर त्याला येसाजीच्या डोळ्यात खोलवर कुठेतरी एक वेदना जाणवली असती. क्षणभर त्या भज्याकडे पाहून येसाजीने तो हलकेच तोंडात टाकला. आणि पुन्हा थरथरत्या हाताने त्याने अजून एक भजी उचलली. तेवढ्यात शेजारी बसलेल्या शांतारामचे त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने विचारलं -

शब्दखुणा: 

मार्जार कुटुंब दुजाचे, ज्याचे तयास गेले

Submitted by अतुल. on 3 October, 2023 - 02:04
Berry's kitten

ऱ्याच महिन्यांपूर्वी, आमच्या चिरंजीवांना एक अतिशय कृश झालेले मांजरचे पिल्ले रस्त्याकडेला एका पडक्या बांधकामात धडपडताना दिसले. ते इतरांचे लक्ष वेधून कोणाची मदत मिळते का पाहत होते. पण कुणीच तिकडे लक्ष देत नव्हते. याला दया आली आणि त्यास घरी घेऊन आला. मला याआधी शहरात (पुण्यात) मांजर पाळण्याचा फारसा चांगला अनुभव नव्हता. त्यात आणि ती मांजरी असेल तर तिला दर चार महिन्यांनी पिल्लं होतात. त्यासाठी आपले घर हाच एक तिला आधार असतो. आणि एकदा मांजरीला घरात पिल्लं झाली कि आपले हाल कुत्रे खात नाहीत!

विषय: 

भरणी श्राद्ध ( भयकथा ) भाग १

Submitted by प्रथमेश काटे on 2 October, 2023 - 13:25

आज रंगाच्या वडिलांचे भरणी श्राद्ध होते. सकाळची वेळ. किचनमध्ये तयार होणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांचा घमघमाट घरभर पसरला होता. बाहेरच्या खोलीत लोक येऊन बसायला लागली होती‌. रंगनाथ भिंतीला टेकून ठेवलेल्या खुर्चीत बसून त्यांच्याशी बोलत होता चाहुलीनं त्याची नजर दरवाज्याकडे गेली. त्याचे दोस्त शांताराम दामू आणि येसाजी आले होते.

शब्दखुणा: 

सहवास बाप्पाचा ( लघुकथा )

Submitted by प्रथमेश काटे on 28 September, 2023 - 22:37

चाळीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जायचा. सेक्रेटरी गोडसे काकांच्या घरी गणपतीची मूर्ती स्थापन केली जाई. पण यावेळी काही कारणाने त्यांच्या इकडे गणपती बसवता येऊ शकणार नव्हते. आता काय करावे ? कुणाच्या घरी श्री गणेशाची मूर्ती स्थापन करावी ? असा प्रश्न उपस्थित झाला. प्रत्येक चांगल्या कामासाठी नेहमी पुढे असणाऱ्या ओंकारने तयारी दर्शवली. अर्थात इतरही जण तयार झाले. मात्र गोडसे काकांनी ओंकारच्या घरी गणपती बसवण्याचा निर्णय घेतला.

लेखन उपक्रम ३ – आजी - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 28 September, 2023 - 14:42

आजी
---------
शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच...तो जेव्हा उठला , घरातलं वातावरण वेगळंच होतं .
त्याची आजी गेली होती.
त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता . तो बाहेर अंगणात आला . तिथे मारत्या होता . त्याच्यापेक्षा मोठा .
तो म्हणाला, ' सदा, तुजी सहल बुडाली ! '
सदाने विचारलं , ' का ? '
'तुजी आज्जी देवाकडं गेली .'
' 'मंजी ? तीबी सहलीलाच गेली का ? '
' हो '
' मंग ती मला का नाय घिऊन गेली ? '

विषय: 

लेखन उपक्रम २- उडदामाजी - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 28 September, 2023 - 01:31

उडदामाजी
-------------
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता.तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं ...
ती एक प्रतिक्रिया होती , माबोवर प्रसिद्ध होणं म्हणजे- या वाक्यावर आलेली .
त्याला ते वाक्य अन प्रतिक्रिया दोन्ही आवडलं . अन त्याच्या डोळ्यांपुढे अनेक प्रतिक्रिया फिरू लागल्या .
खऱ्या- बऱ्या, तिरकस - जोरकस, वेचक - वेधक, खोचक - भोचक, भ्रम तोडणाऱ्या - तंगड्या ओढणाऱ्या...

विषय: 

लेखन उपक्रम 3- नमनाला घडाभर - धाग्या

Submitted by धाग्या on 27 September, 2023 - 13:49

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच...
त्याने उठून मायबोलीवर लॉगिन केले तर त्याला नवा शशक उपक्रम आलेला दिसला. क्षणभर तो उत्साहित झाला खरा... मग त्याने शब्द मोजून पाहिले तर शंभरातले सव्वीस शब्द संयोजकांनी सुरवातीवरच खर्च केलेले. आता पाऊणशे शब्दांत काय डोंबल कथा लिहिणार असा विचार त्याच्या मनात आला. मग त्याने पुन्हा शब्द मोजले तर आता तेराच शब्द उरलेले त्याला दिसले. मग त्याने फोन मिटला आणि गाऊ लागला...
एक दो तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारा बारा तेरा....

विषय: 

कॕनडा कादंबरीतला आणि आजचा

Submitted by नितीनचंद्र on 26 September, 2023 - 21:36

कॕनडीयन पंतप्रधान यांनी त्यांच्या देशात घडलेल्या नागरिकाच्या हत्येसाठी भारताला दोषी ठरवल्या दिवसापासुन ज्या घडामोडी घडत आहेत, मला १९८५-८६ वाचनात आलेली कादंबरी रोज आठवते आहे.

कादंबरी चे नाव इन हाय प्लेसेस जी कॕनडा सरकार, त्यांच्या मध्यवर्ती निवडणुका व त्यातला बहुचर्चीत मुद्दा भोवती घोटाळते.

या कादंबरी ने एके काळी विक्रीचे रेकाॕर्ड मोडले आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन