भरणी श्राद्ध ( भयकथा ) भाग १
Submitted by प्रथमेश काटे on 2 October, 2023 - 13:25
आज रंगाच्या वडिलांचे भरणी श्राद्ध होते. सकाळची वेळ. किचनमध्ये तयार होणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांचा घमघमाट घरभर पसरला होता. बाहेरच्या खोलीत लोक येऊन बसायला लागली होती. रंगनाथ भिंतीला टेकून ठेवलेल्या खुर्चीत बसून त्यांच्याशी बोलत होता चाहुलीनं त्याची नजर दरवाज्याकडे गेली. त्याचे दोस्त शांताराम दामू आणि येसाजी आले होते.