बऱ्याच महिन्यांपूर्वी, आमच्या चिरंजीवांना एक अतिशय कृश झालेले मांजरचे पिल्ले रस्त्याकडेला एका पडक्या बांधकामात धडपडताना दिसले. ते इतरांचे लक्ष वेधून कोणाची मदत मिळते का पाहत होते. पण कुणीच तिकडे लक्ष देत नव्हते. याला दया आली आणि त्यास घरी घेऊन आला. मला याआधी शहरात (पुण्यात) मांजर पाळण्याचा फारसा चांगला अनुभव नव्हता. त्यात आणि ती मांजरी असेल तर तिला दर चार महिन्यांनी पिल्लं होतात. त्यासाठी आपले घर हाच एक तिला आधार असतो. आणि एकदा मांजरीला घरात पिल्लं झाली कि आपले हाल कुत्रे खात नाहीत!
चिमा्ने जन्म दिलेल्या दोन छाव्यांमुळे अगदी नवजात अर्भक ते पूर्ण वाढलेलं मांजर इथपर्यंतचा प्रवास आम्हाला खूप जवळून पाहता आला, अनुभवता आला. चिमाला मोजून दोनच पिल्ले झाल्याने त्यांना सांभाळणं तसंही अवघड नव्हतंच. (तेव्हा आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो. पण मांजरं बाळगण्याच्या दृष्टीने तळमजला असलेला सर्वात योग्य असं मला कायम वाटतं). 'इवली' या शब्दाला सर्वात समर्पक असं उदाहरण म्हणजे मांजरीची नवजात पिल्लं! खरोखर इतके छोटे जीव असतात ते! डोळेही मिटलेली ती नाजूक त्वचेची, चिमणीपेक्षा बारीक आवाजात म्यावम्याव करणारी नाजूक बाळें पाहून यांचेच पुढे इरसाल बोके किंवा लबाड मांजरी होतील असं अजिबात वाटत नाही!
(माझ्या पाळीव मांजरांच्या अनुभवांवरचे हे लेख मी फार पूर्वी लिहिले होते आणि बहुतेक जुन्या हितगुजवरही होते जे आता त्यासमवेत गडप झालेत. हा लेख मी पाळलेल्या मांजर क्र. २बद्दल आहे. मां. क्र. ३-४ आणि १ चे लेख नंतर टाकेनच.)
टारझन द वंडर कॅट भाग ०१ - घरामधल्या आठवणी…
Tarzan The Wonder Cat : Part 01 : Inside The House
मुखपृष्ठ :